श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ आलो चुकून येथे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : रसना)

(लगावली : गागाल गालगागा  गागाल गालगागा)

आलो चुकून येथे भूमी न परिचयाची

मी भोगितो सजा ही येथे चुकावयाची !

 

फुटलो उरी कितीही या शुष्क कातळांना

कळणार ना कधीही ती गोष्ट भंगण्याची !

 

झाकून सूर्य ठेवा देऊ नकाच ओल

ही कोडगी बियाणी सृजनास यावयाची !

 

जाळ्यास त्या रुपेरी फसणार कोण आता

पंखास पाखराच्या बाधा दिगंतराची !…….

 

काळोख पेरणारे सारेच सूर्य तुमचे

नाही पुजावयाची ती दैवते भ्रमाची !

 

झाला न डंख रक्ता त्या धूर्त प्रेषितांचा

झाली म्हणून फत्ते माझ्या खुळ्या क्रुसाची !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments