मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ अभंग… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

शापभ्रष्ट

फुलांच्या देठाचा। सोसवेना घाव।

जखमांची ठेव । माझ्या उरी ।।

रकताळल्या मना। आधार कुणाचा ।

फाटक्या दयेचा। जलबिन्दू।।

सोशीत झेलीत। अनंत आघात।

हिंडलो जगात। शापभ्रष्ट।।

आभाळा भिडण्या। भोवंडले प्राण।

देई चढवून । क्रुसावरी ।।

अदृष्ट

अमृताची बीजे । लवित राहिले ।

उगवून आले । वीषवृक्ष ।।

चांदण्यांचे सडे । शिंपीत राहिले ।

अंगार भासले । पथिकाला ।।

वाट उजळण्या । मशाल लाविली ।

चूड गा धरिली । म्हणताती ।।

कोणत्या शापाचे । भोग भोगविले ।

काय त्वा रेखिले । अदृष्टात ।।

© श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170, email-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #127 – जगणं…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 127 – जगणं…! 🍃 श्री सुजित कदम ☆

माझ्या मायेला डोक्यावरून

पाण्याचा हंडा घेऊन येताना

पाहीलं ना

की वाटतं पाण्याशिवाय

जगता आलं असतं तर

किती बरं झालं असत….

माझ्या मायेच्या पायाना

झालेल्या जखमांची संख्या

जरा कमी झाली असती…

आणि

भेगाळलेल्या भुईसारखी

कोरड्या पडलेल्या घशाची

तहान आम्हाला

पाण्याच्या एका घोटावर

भागवावी लागली नसती

गोठ्यातली जनावर

डोळ्यांसमोर तडफडून मरून

पडली नसती

अन् कर्जामुळ माझ्या बापाला

आत्महत्या ही करवी लागली नसती…

लहान असतानाच माझ्या मायेन

मला बोट धरून

डचमळत का होईना

पाण्याचा तांब्या हातात धरून

चालायला शिकवलय

तेव्हा मी

ओळखू शकलो नाही

की माझी माय मला

चालायला आणि जगायला

दोन्ही शिकवतेय ते

माय नेहमी म्हणायची

तूला चालता आणि जगता दोन्ही यायला हवंं

कारण

चाललास तर पाणी आहे

अन् पाणी आहे तर जगणं आहे…

आज इतक्या वर्षी नंतर ही

माय डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन चालते आहे

आणि तिच्या बरोबरीने मी ही….!!!!

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नोबेल ☆ संग्राहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ नोबेल… ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

अंधार गडद होत जाताना —आकाशाचा फळा चमचम चांदण्यानी जातो भरत,

तसे शिक्षकाच्या खात्यात जमा होत जातात विद्यार्थी.

किती तरी भावी डाॅक्टर, इंजिनियर, व्यापारी, नेते, पत्रकार व गुंडसुद्धा 

अर्ध्या चड्डीत असतात त्याच्या धाकात समोर बसलेले….

त्याच्या चष्म्याचा नंबर बदलत जातो हळुहळु तसे,

अनेक चेहरे अस्पष्ट होत जातात…….

मात्र  प्रार्थनेसारखे शांत, कुशाग्र ,

फंडाच्या रकमेसारखे आजारी,

वेतनवाढीसारखी आनंदी , गुणी,

व शाळा तपासणीसारखी उपद्रवी मुले नोंदवली जातात ठळक.. .. .. 

सेवापुस्तकातल्या नोंदीसारखी ….

पुढे मागे भेटत राहतात, अनोळखी वळणांवरुन देत रहातात आवाज.

भर गर्दीत ,समारंभात, संमेलनात…………कुठेही.

“हे माझे सर बरं का !”

“या माझ्या मॅडम बरं का ! “.. .. ..

आपुलकीनं सांगतात सर्वांना….

गच्च भरलेल्या बसमधे

हात धरुन करतात आग्रह खिडकीपाशी बसण्याचा.

“नमस्कार करते हं !” म्हणत नव-यालाही लावतात वाकायला.. .. 

तेव्हा अधोरेखित होतो त्याचा पेशा…

कसलं गारुड करतो तो पोरांवर ? 

अन् स्वीकारत राहतो आयुष्यभर…

एखाद्या बुज-या आवाजाला दिलेल्या हिमतीचा…..जनस्थान पुरस्कार !

कविता शिकवतांना फुटलेल्या हुंदक्याची……  फेलोशीप !

सुंदर हस्ताक्षरासाठी  दिलेल्या शाबासकीची…….. साहित्य अकादमी !

पाठीवरुन मायेनं हात फिरवल्याबद्दलचे……… ज्ञानपीठ !

अन् फळ्यासमोर चोख भूमिका बजावल्याचे…. “नोबेल !”

संग्राहिका : अंजली दिलीप गोखले 

मो ८४८२९३९०११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कळते कोठे ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ कळते कोठे ☆  श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

(गागागागा गागागागा गागागागा)

प्रेमापोटी प्रेम कराया जमते कोठे

पण ममतेचे  दर्शन आता घडते कोठे

 

देणे घेणे सतत असावे गरजे पुरते

आत्म्यालाया शांती पुरती मिळते कोठे

 

नाही पर्वा म्हणताना ही मन घाबरते

धाडस तेव्हा औदार्याचे लपते कोठे

 

चुकल्यानंतर सावरण्याची होते घाई

मन वेड्यानो तुमचे तेव्हा असते कोठे

 

मोक्षासाठी तप करताना ध्यानी येते

जगण्यामधले बंधन सारे तुटते कोठे

 

कर्म धर्म पण जपले जाते तनमन लावत

संकट येता झगडत बसणे सरते कोठे

 

जगभवतीचे तुमचे असते तुमच्यासाठी

शांत मनाने उपभोगाया कळते कोठे

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 150 ☆ तीन सख्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 150 ?

☆ तीन सख्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

किती दिवसांनी सख्या भेटल्या…

सांजवेळी पाणवठ्यावर ,

व्यथा मनीच्या अशा  उमटल्या

आपोआपच ओठांवर….

तहानलेल्या नदीपरी त्या नांदती संसारी…

शल्य मनीचे असे जाहले

व्यक्त विहीरीच्या साक्षीने

कितिक मेल्या..बुडून गेल्या

या पाण्यात खोल…

सख्या बोलल्या निश्चयाने..

“बेला च्या पानापरी राहू…

ढळू न देऊ तोल…”

समजून घेऊ आपण आता

या जगण्याचे मोल..

मुक्त होऊनी जळात न्हाल्या,

डोण जाहली तृप्त…

रूपवती त्या बनल्या आता..

मासोळ्या स्वच्छंद…

अशा घागरी स्वच्छ घासल्या

सोन्यावाणी लख्ख…

डोईवर ते घडे घेऊनी निघाल्या

तिनही गरती झोकात…

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंदन ☆ कै सदानंद शांताराम रेगे ☆

कै सदानंद शांताराम रेगे

(२१जून १९२३ – २१ सप्टेंबर १९८२)

? कवितेचा उत्सव ?

☆ चंदन ☆ कै सदानंद शांताराम रेगे ☆

आषाढाने खाली लवून

दिले पालवीला आलिंगन

अन् विजेच्या ओठांनी

तो लागला घेऊ

जेव्हा क्षितिजाचे जांभळे चुंबन

जेव्हा वादळाच्या कवेत

वितळलेली मातीही झाली

लाजेने हिरवी

अन् दरवळले

तिच्या वक्षावर

श्रावणाचे कोवळे चंदन….

 – सदानंद रेगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आजी आजोबा — ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आजी आजोबा — ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

आजी आजोबा नसले की बालपण अधुरं राहतं,

आई बाबांनाच मग थोडं आणखी नरम व्हावं लागतं..

हक्काचा श्रोता नी कूस चोवीस तास मिळत नाही,

आई बाबांच्या कुशीत ‘ ती ‘ ऊब मिळत नाही..

शिस्तीला अल्पविराम मिळत नाही,

कारणाशिवाय उगीच लाड होत नाहीत..

रागावली आई तर हळूच लाडवांचा डबा येत नाही,

शिक्षा केली बाबांनी तर—

— त्यांना त्यांचंच बालपण आठवून दटावायला आजोबांची ढाल मिळत नाही..

आई बाबांची सावली तर नेहमीच असते, पण बुंध्यातला गारवा सापडत नाही,

आजी आजोबांशिवाय आठवणींची शिदोरी पूर्ण होत नाही …

आजी आजोबा दिनाच्या मुलायम शुभेच्छा… 🌹🙏🏻

संग्राहिका : जुईली अमोल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उंबरठा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ उंबरठा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

रांगायला लागले तेव्हापासून

उंबरठा सारखा खुपत होता

ओलांडता येत नव्हता

म्हणून मुळीच आवडत नव्हता (१)

 

नंतर सारवून रांगोळी घातली

मग  फारच आवडायला लागला

त्यालाच ठेचकाळत मोठी झाले

मर्यादेचे शिक्षण मिळाले(२)

 

माप ओलांडून सासरी आले

त्याला ओलांडताना  भान जागले

सासुरवाशीण माहेरवाशीण

अदबीनेच वागू लागले (३)

 

फ्लॅटमध्ये मी आले आता

नवे रूप त्याचे मज दिसता

हळवा आठव मनी बागडता

सखाचा झाला प्रिय तो आता (४)

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानेशांचे ध्यान… ☆ श्री.संत गुलाबराव महाराज ☆

?कवितेचा उत्सव ? 

🌴 ज्ञानेशांचे ध्यान  🌿 श्री.संत गुलाबराव महाराज ⭐

सुंदर ते ध्यान इंद्रायणीतीरी

सावळी गोजिरी मूर्ती मध्ये॥

 

पांडुरंगकर तयाचे आसन

सामोरे निधान निवृत्तिराज॥

 

सोपानमुक्ताबाई शोभती आणिक

नारदादि लोक पूजिताती॥

 

हृदयीचे गुह्य उमटले आता

अंतर्बाह्य चित्ता समभाव ॥

 

ज्ञानेश्वर तात आणि कृष्ण पति

सौभाग्यसंपत्ति नित्य मज ॥ 

 

संत गुलाबराव महाराज.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #156 ☆ नक्षत्रांचे फुलणे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 156 ?

☆ नक्षत्रांचे फुलणे…

समर्पणाच्या तेलामधल्या लावु प्रीतिच्या वाती

लैला-मजनू सोबत व्हावी तुझी नि माझी गणती

 

पुनवेच्या या चांदण रात्री नक्षत्रांचे फुलणे

फांदीवरच्या कळ्या फुलांचे आनंदाने झुलणे

भल्या पहाटे दवात भिजुनी तुझ्यासारख्या नटती

 

मेंदीसोबत हात फुलांचे छान रंगले होते

फांदीसोबत जडले होते जन्मभरीचे नाते

तुझ्याचसाठी या नात्याला पहा लागली गळती

 

मातृत्वाचा स्पर्श सोडुनी तुझ्यासोबती आले

जन्मोजन्मी या संसारी तुझीच रे मी झाले

तुझ्या घराचा दिवा लावण्या जळत राहिली पणती

 

वृक्ष बहरला नवीन फांद्या नव्या युगाची नांदी

इतिहासाच्या पानांवरती व्हाव्या याच्या नोंदी

या प्रीतीची नोंद रहावी नव्या पिढीच्या हाती

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares