मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंग पंचमी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ रंग पंचमी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

(रेशीमकोष संग्रहातून)

ती रात पंचमीची

रंग उधळत होती

त्या चन्द्र चांदण्यात

राधा भिजत होती

*

तो क्षण यौवनाचा

एकांत मागीत होता

भरून रंग पिचकारी

कान्हा भिजत होता

*

ती मोरपंखी फडफड

ढोलीत त्या झाडा च्या

फुलवित पंख पिसारा

पाकळ्या उमलीत होत्या

*

त्या नक्षत्रांची बरसात

कवटाळून बाहू पाशी

प्राशुनी रंग तयाचा

जीव शिवात चिंब होता

*

रंग रंगात रंगुन

मश्गुल तो श्रीरंग

बहरे मदन आनंग

उधळीत सारा रंग

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मळभ… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मळभ ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

आज मी या वृक्षतळी

अशी उदास बसलेली

मनी सवे  भारलेल्या

तव प्रेमाच्या चाहुली

*

तुझ्या मिठीत सजलेल्या

 किती सुरम्य सांजवेळा

कुंतली या मोगऱ्याचा

प्रीतगंध दरवळला

*

क्षण क्षण तो सुरंगी

चांदण्यात भिजलेला

राग रागिणी  सुरांनी

धुंद असा नादावला

*

दाटले का तुझ्या मनी

मळभ  रे संशयाचे

काय जाहले नकळे

दुभंगले नाते प्रीतीचे

*

 पखरली वाट तुझी

 कधीच मी आसवांनी

पाहते वाट अजुनी

येशील तू परतूनी

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महिला संपावर… – कवी : डी . आर. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ महिला संपावर… – कवी : डी . आर. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

महिला साऱ्या  संपावरती

जाऊन बसल्या अवचित

बघूनी त्यांचा रुद्रावतार

पुरुष झाले भयभीत

*

रोज सकाळी उठल्यावर

आयता  मिळे  चहा

हवं तेव्हा नाश्ता, जेवण

मिळत होते पहा

*

आंघोळीला पाणीदेखील

बायको देई गुणी

आता तोंड धुण्यासही

तांब्यात मिळेना पाणी

*

शाळेत मुले डबा घेऊन

जात  होती  कशी

आता कपभर चहा नाही

कोपऱ्यात पडली बशी

*

रविवारच्या दिवशी कसा

पूर्वी  मिळे  आराम

आता मात्र नशीबी आले

बारीकसारीक  काम

*

हॉटेलमध्ये करता जेवण

बिघडून  गेले  पोट

पैसे देऊन भोजन नाही

उगाच  बसली  खोट

*

घरात कुणी आले गेले

सरबराई  होईना

बाहेरूनच बोले पाहुणा

मध्ये  कुणी  फिरकेना

*

साऱ्यांचेच अडले घोडे

पाऊल  पुढे  पडेना

महिलांविना  कुणाचे

काम  एक  होईना

*

मुले, पुरुष, तरुण

सारेच गेले चक्रावून

कळली हो स्त्रीची महती

प्रचिती आली  पाहून

*

नम्रपणे  त्यांनी  केली

महिलांची मनधरणी

महापुरुषही लीन झाले

डोळ्यांत  आले  पाणी

*

खुदकन महिला हसल्या

वदल्या–” कशी वाटली नारी ?”

हात जोडुनी सारे बोलले

–” दुर्गे  दुर्घट  भारी “

कवी :श्री. डी. आर. देशपांडे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खरी धुळवड ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? खरी धुळवड श्री प्रमोद वामन वर्तक ☆

नाते तुटले जन्माचे 

साऱ्या खऱ्या रंगांशी,

डोळ्यांसमोर कायम 

काळी पोकळी नकोशी !

*

काया दिली धडधाकट

पण नयनांपुढे अंधार,

समान सारे सप्तरंग

मनात रंगवतो विचार !

*

तरी खेळतो धुळवड

चेहरा हसरा ठेवुनी,

दोष न देता नजरेला 

लपवून आतले पाणी !

छायाचित्र – शिरीष कुलकर्णी, कुर्ला.

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 223 ☆ झाड- पक्षी- बाई ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 223 ?

झाड- पक्षी- बाई ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

तिला भारद्वाज दिसला अचानक,

दारासमोरच्या,

पानगळ सोसून….

नुकतीच नवपालवी फुटू लागलेल्या,

झाडावर!

ती…

नव-याच्या शिव्या खात…

भारद्वाज दिसला की ,

दिवस चांगला जातो

या श्रद्धेवर जगणारी…

जोडते हात भारद्वाजाला,

तिच्या दारी दाणापाणी,

शोधणा-या,

तिच्या भाग्यविधात्या…

भारद्वाजाकडे मागते,

अखंड सौभाग्याचं दान,

आणि भारद्वाज…

निरखतोय खाली वाकून,

 तिच्याच अंगणात,

त्याच्या प्रारब्धाच्या खाणाखुणा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खरे रंग… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ खरे रंग ☆ श्रीशैल चौगुले ☆

आता रंगत नाही आभाळ

आणि आभाळातल्या इंद्रधनुष्यासरखे मनही,

तरिही रंगपंचमी खेळावीशीच

वाटते,पाखरे सातरंगांच्या सावलीतून उडताना पाहिले कि,

पाण्यातही मिसळत नसतो

नकली रंग विष मिसळलेल्या

रसायनी पावडरचा अगदी

खोटा मायेचा हात फिरवून

स्वतःचा आनंद द्वीगुणीत करणार्या नव्या पिढीसारखा

मग मी न्याहाळातच रहातो

जळणार्या होळीतून येणारा

दारु बिअरची दुर्गंधी सहन करत

रंगपंचमीत भिजलेल्या लाल रंगांच्या अनेक भिन्न आंदोलकांच्या गर्दित हरवलेले माणूसकिचे रंग,

शोधत रहातो हरवलेला कॕनव्हास

ज्यावर ब्रश फिरवून रंगवू ईच्छितो

जुनी रंगपंचमी

परंतु ओघळतच असतो फक्त

लाल रंग न थांबणारा

जिथे नसतात कोणतेच नैसर्गिक

प्रेमाने भरलेले रंग.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆— निष्काम भक्ती — ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

? कवितेचा उत्सव ?

☆ — निष्काम भक्ती — ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

(संत तुकाराम महाराज  बीजेनिमित्त काव्य रचना – दि.  २७ . ३ . २४)

अभंगरचना

धन्य इंद्रायणी | धन्य  देहू ग्राम |

संत तुकाराम  | वसे तेथे ||

*

विठ्ठला चरणी | सदा लीन मन |

सोने,चांदी,धन | तुच्छ वाटे ||

*

अभंगाची गाथा | पाण्यात तरली |

पणास लागली | सारी भक्ती ||

*

परब्रह्म  रूप | विठ्ठलाचे ध्यान |

नाही देहभान | तुकयासी ||

*

कीर्तनामधून | केले  प्रबोधन |

सूज्ञ केले जन | उपदेशे ||

*

वृक्ष, वेली, वने | प्राणिमात्र सखे |

न व्हावे पारखे | नित्य बोले ||

*

सदेह वैकुंठी | गेले तुकाराम |

भक्ती ती निष्काम  | सार्थ ठरे ||

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होळी आहे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ होळी आहे☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

नकोत काही चिंता खंता

प्रेमभराने भेटूया

होळी आहे चला गड्यांनो

आनंदाने खेळूया …

 

नकोत दावे उण्यादुण्याचे

नको पवाडे आत्मस्तुतिचे

दिवस आठवत बालपणीचे

ओळखपाळख ठेवत आपण

मुक्त होउनी नाचूया …

 

कुठून आलो कुठे चाललो

वाढत गेलो जगू लागलो

वेळप्रसंगी हसलो रडलो

घडायचे ते घडून गेले

क्षणभर सारे विसरूया …

 

ऐलतिरावर  पैलतिरावर

बांधत आलो काचेचे घर

विशाल धरतीच्या पाठीवर

उरले सुरले आपल्या हाती

प्रेम जगाला वाटूया …

 

जगत राहिलो खेळत खेळी

स्वानुभवाने भरली झोळी

ओळखताना मने मोकळी

माळी होऊन कल्पकतेने

बाग फुलांची फुलवूया …

 

जाणे येणे इथे चालते

कुठे कुणाचे अडून बसते

नवे जोरकस उगवून येते

अंकुरणा-या नव्या पिढीला

मार्ग चांगले दावूया …

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #230 ☆ मोगलाई… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 230 ?

मोगलाई ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

दार उघडाया आता घाबरते चिऊताई

कावळ्याच्या रुपामध्ये नराधम दिसे बाई

*

रात्र झाली खूप होती झोपत का पिल्लू नाही

चिऊताई पिल्लासाठी गात होती गं अंगाई

*

पडताच अंगावर सूर्य किरणं कोवळी

झटकून आळसाला फुलल्या या जाई जुई

*

पाखरांची चिव चिव उठताच ही सकाळी

चारा शोधण्याच्यासाठी झाली साऱ्यांचीच घाई

*

तुला पाहताच घास बाळ आनंदाने खाई

साऱ्या बालंकांची तेव्हा असतेस तू गं ताई

*

चिमण्या ह्या गेल्या कुठे दिसायच्या ठायी ठायी

अचानक आली कशी त्यांच्यासाठी मोगलाई

*

नातं भावाचं पवित्र सांगा निभवावं कसं

आता तर गुंडालाही म्हणू लागलेत भाई

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ या चिमण्यांनो परत फिरा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– या चिमण्यांनो परत फिरा – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

दार बंद करून,

चिऊताई बसली |

कळत नाही,

का बर ती रुसली |

*

ओसरीवर रोज नाचणारी,

आता ती दिसेनाशी झाली |

पूर्वापार माणसाळलेली,

माणसांपासून दूर गेली |

*

एक घास चिऊचा, एक काऊचा

भरवत पिढ्यानं पिढ्या वाढल्या |

चिऊताई तुझ्या गोष्टी ऐकत,

लहानाच्या मोठ्या झाल्या |

*

काळ बदलत गेला,

फ्लॅट संस्कृतीत कुठं राहिली ओसरी |

तुझेच घरटे हिरावलं आम्ही,

भूतदयेचे संस्कार सगळेच ते विसरी |

*

तुझा चिवचिवाट ऐकायला,

मनाची फुरसतच ती राहिली नाही |

चार दाणे तुला टाकायचे असतात,

सुचतच नाही आता मनाला काही |

*

असेल तिथे सुरक्षित रहा,

नामशेष मात्र नकोस होऊ |

चूकचूक करते पाल मनी,

चित्रात उरतील का हो चिऊ?

© श्री आशिष  बिवलकर

दि. 20 मार्च 2024

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈