सौ शालिनी जोशी
कवितेचा उत्सव
☆ शब्द… ☆ सौ शालिनी जोशी ☆
☆
शब्द —
शब्द सगुण शब्द साकार
शब्दांचे मूळ असे ओंकार
शब्दच गंध शब्दच सुमन
शब्दच होती देवपूजे साधन
शब्दच रत्न शब्दच धन
शब्दच वित्त मानिती सज्जन
शब्दच संगीत शब्दच तान
शब्दच रमविती तन मन
शब्दच राग शब्दच ढोंग
शब्दच संतांचे होती अभंग
शब्दच सौंदर्य शब्दच अलंकार
शब्दच सुवर्ण आणि हार
शब्दच शस्त्र शब्दच बाण
शब्दांचे योगे दुर्गुण हरण
शब्दच शास्त्र शब्दच विज्ञान
शब्दच कारण तरण्या जीवन
शब्दच संवाद शब्दच विसंवाद
शब्दच निवारण करिती भेदाभेद
शब्दच नेती परमार्थाच्या वाटे
शब्दांना विसावा जेथे भेटे 🙏
☆
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈