मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मोल  क्षणाचं…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “मोल  क्षणाचं” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

जगण्याची धडपड

कधीच नाही संपत

वेळ काढल्याशिवाय

वेळ कधीच नाही भेटत….

 

हरवलेल्या क्षणांचे

दुःख असते मोठे

रोज धावता धावता

जगायचे मात्र राहते…

 

वेळ नाही म्हणून

किती काळ ढकलणार

अर्ध आयुष्य संपल्यावर

मागे वळून मग पाहणार…

 

आजचा सुंदर दिवस

जगायचा राहून जातो

भूत भविष्यात

आपण हरवून बसतो….

 

काल गेलाय निघून

परतून न येण्यासाठी

उद्याची कोण देते हमी

सांगा या जीवनी….

 

आज आणि आता

यावर आपली सत्ता

नको विचारांचा गुंता

ओळखा आपली क्षमता..

 

झालं गेलं सोडून द्यावं

जगायचे ते जगून घ्यावं

उद्यासाठी का बरं थांबावं

आजच्या क्षणाचं मोल जाणून घ्यावं …

😊

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #189 ☆ बालकृष्णा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 188 – विजय साहित्य ?

☆ बालकृष्णा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

बालपणी बालकृष्णा

होती आवड काल्याची

दुध साय दही लोणी

होती श्रीमंती घराची…! १

 

धष्टपुष्ट होण्यासाठी

हवा सकस आहार

दही दुध लोण्यासाठी

पडे गोविंदाला मार…! २

 

गोपालांचे घरदार

दह्या दुधाचा सागर

देई मिळवोनी धन

हेची सुखाचे आगर…! ३

 

मथुरेच्या बाजारात

दूध दही विकोनीया

चरितार्थ गोपालांचा

दुग्धामृत सेवुनीया..! ४

 

दुध‌ दही विकताना

नको मुलांची आबाळ

चोरी करून लोण्याची

येई कृष्णावर आळ..! ५

 

बालकांना चुकवोनी

दही हंडी शिंक्यावरी

चोरूनीया लोणी खाणे

दंगामस्ती घरोघरी…! ६

 

उंच मानवी मनोरा

रचुनीया गोपालांचा

हाती लागे दही‌हंडी

मेवा हाती रे लोण्याचा..! ७

 

बाळलीला गोकुळीच्या

त्यात कृष्ण सामावला

फोडूनीया‌ दहीहंडी

कृष्ण अंतरी धावला..! ८

 

हंडी दही उत्सवाने

दिला ऐक्याचा संदेश

आला आला रे गोविंदा

त्याचा आगळा आवेश..! ९

 

बाल गोपालांची लिला

साठवण शैशवाची

दहीहंडी जपतसे

आठवण गोकुळाची..! १०

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वर्षा की शरद, काय हवं अंबरा ? ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

वर्षा की शरद, काय हवं अंबरा ? ☆ सौ.मंजिरी येडूरकर

कैवल्यदानीच्या दोन पोरट्या धरा, अंबरा

समंजस हि धरा,अंबरा परि खळखळणारी॥

 

म्हणे अंबरा, ” नेसू माझे कधी काळे तर कधी राखाडी

क्वचितच असते रेष त्यावरी लखलखणारी”॥

 

नच खळेना डोळ्यामधले पाणी हळवे

कधी करी आकांत तर कधी मुसमुसणारी॥

 

रंगबिरंगी फुलवेलींची नक्षी रेखली

धरेस मिळते हिरवी साडी झगमगणारी॥

 

अखेर थोडी हसली गाली आज अंबरा,

नेसून दावी पिवळी साडी सळसळणारी॥

 

चैतन्याने रात भारली प्रणयरंगी

काळी साडी, खडी त्यावरी चमचमणारी॥

 

मनोमनी तो आज लाजला, चकोर भोळा

लख्ख प्रकाशी, बघून अंबरा थरथरणारी॥

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #172 ☆ राखी… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 172 ☆ राखी… ☆ श्री सुजित कदम ☆

आताशा का कोणास ठाऊक..?

राखी पौर्णिमा म्हटलं की

डोळे भरून येतात कारण ..

मला अजूनही आठवतात

ते लहान पणी चे दिवस..

राखी पौर्णिमा असली की

मी सकाळी लवकर उठून ताईने

माझ्या हातावरती राखी बांधण्याची

वाट पहात बसायचो…

आणि माझ्यासारखीच ताई सुध्दा

ताईने हातावर राखी बांधली ना

की मला खूप

श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं आणि

आई नंतर कुणीतरी आहे

आपली काळजी घेणारं…

असं सहज मनात यायचं…!

लग्न करून जेव्हा ताई

सासरी गेली ना..

त्या नंतर सुध्दा

रात्रीचा प्रवास करून मी

राखी पौर्णिमेला सकाळीच

ताईला भेटायला जायचो …

तेव्हा ताई मला म्हणायची

एवढी दगदग कशाला करायचीस?

त्यावर मी तिला म्हणायचो

तू एकच बहीण आहेस माझी

तुझ्यासाठी मी कूठूनही येऊ शकतो

त्या वेळी राखी पौर्णिमेला ताईने

प्रेमाने मनगटावर बांधलेली राखी

पुढचं वर्ष भर मी मनगटावर

तशीच ठेवून द्यायचो

ताईची आठवण म्हणून…!

पण आता मात्र

राखी पौर्णिमा म्हटलं की

डोळे भरून येतात

आणि मोकळ्या मनगटावर

फक्त आसवांचे थेंब ओघळतात..!

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – गुरू…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– गुरू… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

ज्याला अभ्यास आवडी,

त्यास कौतुकाची गोडी !

जो काढेल  खोडी,

त्याला हातावर छडी !

चुकलात तर हक्काने,

करकचून कान पकडी !

चांगले शिक्षक म्हणजे,

जीवनाची खरी  शिडी !

विद्यार्थ्यांच्या यशात गुरुचे,

असते  मोठे योगदान !

विद्यार्थ्यांचे यश बघून,

गुरुची उंचवते मान !

शिक्षक आदराचे  स्थान,

भागावी  ज्ञानाची  तहान !

भावी पिढीचा शिल्पकारच तो,

ज्ञानदानाचे कार्य करी महान !

कृतज्ञतेचे भाव शिष्य,

गाती गुरुचे  गुणगान !

धन्य गुरु धन्य शिष्य,

या परंपरेचा अभिमान !

© श्री आशिष  बिवलकर

05 सप्टेंबर 2023

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कौशल्य… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– कौशल्य… – ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

पुष्पकृती घडवली

पहा किती कौशल्याने

नथ आणखी कोयरी

दावते मोठ्या खुबीने॥

गजमुखही सुंदर

त्यात दिसे साकारले

का आहे हे मला सांग

विठोबाचे कानातले?

दिसतील यातूनच

अजूनही काही चित्रे

सुमनावलीची स्तुती

योजूनिया शब्द पत्रे॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्राजक्त… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ प्राजक्त… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

सत्यभामेसाठी

प्राजक्ताचा वृक्ष

भूवरती आला

सुगंधाने त्याच्या

सृष्टीचा कलश

भरून गेला!

त्या सुगंधात होता

सत्यभामेचा गर्व

त्या सुगंधात होते

रुक्मिणी प्रेम अपूर्व !

तराजू समभावाचा

होती लपली त्यात

कृष्ण प्रेमाची शिष्टाई

वृक्ष सत्यभामादारी

फुले रुक्मिणी अंगणी !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृष्ण कृष्ण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ कृष्ण कृष्ण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कृष्ण नाम जप l

ध्यास लागे मनी ll

सावळा तो ध्यानी l

निरंतर ll…….१

 

मोरपीस शिरी l

दिसे वेणू हाती ll

गळ्यामध्ये शोभती l

पुष्प माला ll……२

 

कृष्ण की विठ्ठल l

मनी मी साशंक ll

सावळे कौतुक l

एकरूप ll……३

 

उत्पत्ती ती ब्रह्मा l

विष्णू तो पालक ll

शिव तो नाशक l

त्रिगुण हे ll….४

 

देवगण सारे l

जगाते उध्दारी ll

किमया ही सारी l

ब्रम्हांडात ll….. ५

 

ईश्वराचे रूप l

आसमंती असे ll

परमात्मा वसे l

दिगंतात ll……६

 

देव निराकार l

मानतो साकार ll

आहे तोच खरा l

परमात्मा ll…..७

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 198 ☆ चित्रकार… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 198 ?

☆ चित्रकार… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

एक चित्रकार अवचित भेटतो,

एका हळव्या वळणावर….

चित्र तुमचं  रेखित राहतो….

आयुष्याच्या कॅन्व्हासवर….

चित्र तेच कॅन्व्हास तोच…

काळ बदलतो आपोआप…

चेह-यावरची एक सुरकुती….

प्रगल्भते  वयानुसार……

चित्राचे त्या शिल्प बनते

त्याच जुन्या वळणावर…

नाही उडत रंग त्याचे….

नसते त्याला जरामरण….

चित्रकार तो शिल्पकार तो

तोच नियंता विश्वाचा..

प्रत्येकाच्या मनीमानसी….

भाग्यविधाता जगण्याचा….

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ॥ जय देवी मंगळागौरी ॥ ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ 🙏🏻 जय देवी मंगळागौरी 🙏🏻 ☆ सौ. विद्या पराडकर ☆

जय देवी मंगळागौरी

सुवासिन मी तुजला पुजिते,जय देवी धृ☘️

सुवासिनीचा हिरवा चुडा,नेसले बाई शालू हिरवा

मंगलमणी हे गळ्यात माझ्या,

तुजला पुजिते. 

जय देवी मंगळागौरी ☘️

 

पांच वर्षांची पूजा बांधते,

सासरी,माहेरी तुजला पुजिते

भक्तीचे चंदन,भावाचे हळदकुंकू

तुजला अर्पिते.   ‌‌

जय देवी मंगळागौरी ☘️

 

शिवशंकराहुन सुंदर,भोळा

दिधलासे पती तू भाग्यवतीला

नयनांच्या ज्योती प्राणांची आरती

तुजला अर्पिते

जय देवी मंगळागौरी.       ‌‌☘️

 

सौभाग्य दान देई ग माते

अखंडत्वासाठी नाते हे तुझे

हृदयाच्या निरांजनी

तुजला ओवाळते

जय देवी मंगळागौरी.          ☘️

 

संस्कृती जतन करण्या

पुजु या पार्वती रमणाला

मांगल्याच्या या सणाला

पावित्र्याची नीती

जय देवी मंगळागौरी.        ‌‌  ☘️

 

सुवासिन मी तुजला पुजिते

जय देवी मंगळागौरी             ☘️

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print