मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 163 ☆ मनी दाटे हूरहूर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 163 ?

☆ मनी दाटे हूरहूर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 

पक्षी जाता दूरदूर

मनी दाटे हूरहूर

 

चार दिसांसाठी येती

आणि उडुनिया जाती

 

लेक सून नातवंड

स्रोत प्रीतीचे अखंड

 

दूरदेशी राहण्यास

परी नित्य आसपास

 

   असो सुखात कुठेही

मोकळ्या या दिशा दाही

 

विस्तारल्या कक्षा आणि

   घरोघर ही कहाणी

 

मायबाप मायदेशी

पिले उडती आकाशी

 

असे क्षेम  दोन्ही कडे

आनंदच चोहिकडे

 

परी वाटे हूरहूर

परतून जाता दूर

© प्रभा सोनवणे

(३ जानेवारी २०२२)

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्रांती… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ क्रांती…  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

क्रांतीची ज्वाला असो की

ज्योत मंदशी तेवती –

पाय माघारी न घेणे

हेच दोघी सांगती —

 

ज्वालेत जळती किती समीधा

गणती कधी करता न ये –

त्यानेच परि त्या क्रान्तीला

अंती पहा साफल्य ये —

 

ज्योत त्याहुनी सानुली

तरी काम करते क्रांतीचे –

रुजवते मनामनात

बीज उज्ज्वल प्रगतीचे —

 

सातत्य गतीचे राखते

मन निश्चयाशी बांधते –

ती ज्योत क्रांतीची जपा

मग प्रगती खचितच साधते —

 

विचारात, प्रवृत्तीत आणि

सद् भावातही होवो क्रान्ती –

क्रांतीचा नित हेतू हाच

‘ विश्वात भरूनी राहो शांती‘ —

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संकल्प… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ संकल्प… ☆ सौ राधिका भांडारकर

सरले हे वर्ष मनुजा

स्वागत करुया नववर्षाचे

किती बेरजा किती वजा

क्षण आठवू सुखदु:खाचे..

 

कालचक्र हे अखंड चाले

 पुन्हा  न येते गेली वेळ

झटकू आळस कष्ट करु

जीवनाची फुलवू वेल..

 

ध्यानी असू दे एक तत्व

आयुष्या नसतो लघुमार्ग

नसते सुट्टी ना आराम

यत्ने अंती फुलेल स्वर्ग…

 

करा संकल्प नववर्षाचा

एक कूपी करा रिकामी

सुगंध नवा त्यात भरा

झटकून टाका जे निकामी..

 

नव्या पीढीचे तुम्ही स्तंभ

आण बाळगा सृजनाची

युद्ध नको शांती हवी

जगास द्या हाक  प्रेमाची…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #169 ☆ कौलारू घर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 169 ?

☆ कौलारू घर…  ☆

आयुष्याला पुरून उरलो आहे मी तर

पदोपदी हा झाला होता जरी अनादर

 

ऊब सोबती तुझी मिळाली कधीच नाही

पांघरण्याला मला दिली तू ओली चादर

 

ह्या गुढघ्यांनी हात टेकले असे अचानक

आधाराला निर्जिव काठी चढलो दादर

 

शीतलतेची होती ग्वाही म्हणुन बांधले

शेण मातिचे चार खणाचे कौलारू घर

 

ओढे नाले ढकलत होते वहात गेलो

अंति भेटला खळाळणारा अथांग सागर

 

जरी सुखाच्या रथात बसुनी प्रवास केला

खड्ड्यांचा हा रस्तोरस्ती होता वावर

 

जीवन म्हणजे असतो कापुर कळले नाही

अल्प क्षणातच जळून गेला होता भरभर

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष सदिच्छा ! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ नववर्ष सदिच्छा ! 🪔 डॉ.सोनिया कस्तुरे ☆

नववर्षात सर्वांना आरोग्य लाभावे

कष्टकरी शेतकरी मजूरांना न्याय मिळावे

 

मालकीहक्क,लाचारी,गुलामी संपावी

अत्याचार, हिंसेला मुठमाती मिळावी.

 

चिंता,संताप , व्यसन, फसवणूक नसावी.

विश्वातील प्रत्येक व्यक्ती सुखाने नांदावी.

 

स्त्रीयांना जगण्याचे नवे बळ मिळावे.

गगनाला भेदण्याचे स्वातंत्र्य गवसावे.

 

अभिमान,स्वाभिमान,आत्मभान जागावे.

मानसिक,भावनिक, वैश्वीक नाते जडावे.

 

नवजात बाळाला विश्वास मिळावा.

वाढत्या वयाने आनंद साठवावा.

 

गोरगरीब,दीन,दुय्यम कुणी नसावे.

दोन वेळच्या जेवणाने तरी तृप्त व्हावे.

 

सत्याच्या वाटेवर सर्व काही असावे

शांततेच्या मार्गावर बुद्धत्व फुलावे.

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 111 ☆ अभंग… स्मरा कृष्ण… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 111  ? 

☆ अभंग… स्मरा कृष्ण… ☆

श्रेष्ठ सज्जनांचा, संत महंतांचा

आणि आचार्यांचा, मान ठेवा.!!

 

अहंकार जावा, धर्म आचरावा

गर्व ही नसावा, मनांतरी.!!

 

सात्विक आहार, सुंदर विचार

हृदयी आदर, नित्य हवा.!!

 

श्रीकृष्ण प्राप्तीची, उत्कंठा असावी

अप्राप्ती भावावी, श्रीमुर्तीची.!!

 

कवी राज म्हणे, चालता बोलता

उठता बसता, स्मरा कृष्ण.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष — (एक शाश्वत सत्य) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ नववर्ष — (एक शाश्वत सत्य) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

नववर्षाचा नवदिन आला, गतसालाचा निरोप घेऊन,

                         नवविचार अन् नवीन आशा, साजही मोहक किती हा लेवून ।।

 

जुने जाऊ द्या मरणालागून, हीच एक पळवाट असे,

                          आत्तापासून नवीन आशा– या वाटेने चालतसे ।।

 

जिथले तिथेच सगळे तरी हा, नवेपणाचा केवळ भास,

                           थकल्या जीवा नवी उभारी, जगण्याला ही नवीन आस ।।

 

काल नि आज नि उद्या असे हे, चक्रच नेमे फिरत असे,

                            नवे कोणते जुने कोणते, ठरवायाला सवड नसे ।।

 

काल मला तो काळ भेटला, म्हणे कशास्तव माझी गणना,

                             नव्या – जुन्याची नुसती गल्लत, शाश्वत सत्यही मनात जाणा ।।

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वागत नव वर्षाचे… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वागत नव वर्षाचे 💐 सौ. विद्या पराडकर ☆

नव्या उषेचे नव्या दिशेचे गीत गाऊ या चला

नव वर्षाचे स्वागत करण्या सिध्द होऊ या चला

 

ज्ञानाचे हे दीप लावूनी

अज्ञान अंधःकार दूर लोटूनी

एकतेचा ध्यास घ्यावया सज्ज होऊ चला

 

स्वातंत्र्याचे रक्षण करूनी

आक्रमकांशी लढत देऊनी

देशप्रेमाचे गान गावया सज्ज होऊ चला

 

मानवतेचे सूत्र घेऊनी

उष:कालचे स्वागत करुनी

नव्या भारताचे गीत गावया सज्ज होऊ ‌चला

 

लहान मोठा भेद सारुनी

विशाल दृष्टीचे ‌दान‌ देवूनी

देशहिताचे कर्तव्य करण्या सज्ज होऊ चला

 

समस्यांचे निवारण करुनी

एक दिलाने साथ देवूनी

स्वराज्याचे सुराज्य करण्या  सज्ज होऊ चला

नव वर्षाचे स्वागत…💐

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वि नं ती ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 वि नं ती ! 🖊️ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

आठवांच्या हिंदोळ्यावर

आज घ्या झोके सावकाश,

परवा पासून खुणावेल

ते-वीसचे नवे अवकाश !

⭐

पूर्ण करण्या नवे संकल्प

कंबर तुम्ही आपली कसा,

समाधान वाटेल मनाला

पूर्ण केलात जर तो वसा !

⭐

अडल्या नडल्या लोकांना

करा मदत यथाशक्ती,

सोबत जागवा आपल्या

देशाप्रती तुम्ही भक्ती !

⭐

ठेवा आठव जवानांचा

घेता मुखी रोज घास,

मातृभूमीचे रक्षण करणे

ज्यांच्या मनी एकच ध्यास !

⭐

चुकले माकले गतसाली

जा सारे तुम्ही विसरूनी,

नव वर्षाचे नवे संकल्प

ठेवा मनात घट्ट धरूनी !

⭐

🌹 नवीन वर्षाच्या शुभेच्छा !🌹

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मातृत्व – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– मातृत्व – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

गाय जेंव्हा माय होते

कासेला वासरू लुचते

त्या ओठांच्या स्पर्शाने

ती आपसूक पान्हावते

मातृत्वाचा शिरी तूरा

मुखी पडती अमृत धारा

ढूशा देऊनी पिते वासरू

जिव्हास्पर्शी  स्नेह झरा

आई भोवती जग बाळाचे

बाळासाठी जगणे आईचे

पशुपक्षी कटक वा मानव

बदलून  जाते विश्व बाईचे

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

29/12/22

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares