मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राम, राम, राम… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

राम, राम, राम☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

राम आनंदी प्रभात आहे

प्रखर प्रतापी प्रपात आहे

राम सीतावर सुकांत आहे

 गुणसागर हा प्रशांत आहे

*

राम धरेच्या कणात आहे

निसर्ग निर्मित धनात आहे

राम रंगला वनात आहे

विश्व व्यापल्या जगात आहे

*

राम वायुच्या सुरात आहे

युद्धा मधल्या विरात आहे

राम ठेवला घरात आहे

पवनसुताच्या उरात आहे

*

राम राहिला मठात आहे

संसाराच्या  घटात आहे

राम पिकाच्या मळ्यात आहे

संतांच्या पण गळ्यात आहे

*

राम राबत्या करात आहे

गरुडाच्या ही परात आहे

राम नाटकी नटात आहे

राजकारणी पटात आहे

*

राम बांधला सुतात आहे

निवडणुकीच्या मतात आहे

राम वाटला गटात  आहे

दलबदलूंच्या कटात आहे

*

राम जाहला दिगंत आहे

राम स्वरुपी अनंत आहे

राम नांदतो प्रजेत आहे

राम मंदिरी निवांत आहे

*

राम रक्षणा समर्थ आहे

पण भारत का अशांत आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

सौ. नेहा लिंबकर

? कवितेचा उत्सव ?

तू☆ सौ. नेहा लिंबकर ☆

तू माता तू भगिनी

तू सीता तू मोहिनी

तू यामिनी तू कामिनी

तू पाणिनी तू धारिणी

तू  त्यागी तू योगिनी

तू वज्र तू मृगनयनी

 

तू अशी अन् तू तशी

घरातही अन् जगातही

तूच एक  स्वामिनी

तूच एक स्वामिनी

💐 जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 💐

© सौ.  नेहा लिंबकर

पुणे 

मो – 9422305178

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ थोरवी स्त्रीत्वाची… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ थोरवी स्त्रीत्वाची ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

माऊलीच्या ममतेची

तिच्या असीम त्यागाची

स्वाभिमानी बाण्याची

थोरवी ही स्त्रीत्वाची

*

कधी वज्रापरी कठोर

कधी कुसुम कोमला

बनते ती रणरागिणी

शुभांगी ही चित्कला

*

माता भगिनी तनया

भार्या होतसे प्रेमला

मनी मायेचा पाझर

प्रेम स्वरुप वत्सला

*

संस्कारित पिढी घडवी

कुटुंबाचा होई आधार

संसाराचा रथ चालवी

 होऊनिया ती सूत्रधार

*

 अर्थार्जन नी संसाराची

 करते  कसरत सारी

घास मायेने भरवते

अन्नपूर्णा साक्षात् खरी

*

जुनी जोखडे रुढींची

हसतची तिने तोडली

अस्मितेचे पंख लेवूनी

झेप नभांगणी घेतली

*

सारी क्षेत्रे पादाक्रांत

करी लीलया यशोयुता

देशासाठी लढणारी

हीच असे तेजान्विता

*

शक्तीरुपिणी चिद्शक्ती

अवतरते  तिच्या रुपाने

भूषवावे सदैव तिजला

सन्मानाच्या वर्तनाने

*

नित करुया आपण

जागर गं स्त्रीशक्तीचा

पूज्य भाव असो मनी

थोर स्त्रीत्व जपण्याचा

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “सूर्य घेऊनी शिंगांमध्ये…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “सूर्य घेऊनी शिंगांमध्ये– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सूर्य घेऊनी शिंगांमध्ये

नदीकाठावर उभी गाय

भुकेलेल्या वासराला

पान्हा सोडीतसे माय

*

 बंधनरूपी गळ्यात अडणा 

 स्त्रीत्व म्हणूनी का या खुणा?

 ताबा मिळणे सोपे जावया

 अडण्याचा हा असे बहाणा !

*

 कुठेही जावो चरावयाशी

 सांजवेळी परतते  घराशी

 दुध दुभत्याची रेलचेलही

 गोधन असता नित हाताशी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महिला दिनानिमित्त… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

महिला दिनानिमित्त… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

अनेक नाती तुझ्यात गुंतती

कुंठित होते मती

नाही शोभा ह्या जगला नाही

कोणती गती

 

सुगंध जसा दरवळवा

भिजत जाते माती

भाव भावनांचा बांधून झुला

शब्द शब्द  पाझरती

 

सर्व काही सोडून  येशी

तृषार्थ त्या पणती

कळीची हे फुल होती

गंध बंध उमलती

 

तुझ्यामुळे शक्य सखे

जगात जीव जगती

प्रेम ज्योती रात तेवती

उजळीत त्या वाती

 

तुझे समर्पण ते मी पण

देहाचे तर्पण

चंदन काया झिजे संसारी

नसे कर्ते पण

 

ज्योत वात फुले फुलवात

 वारा तो स्नेहात

उजळे पणती तमोगुणाची

 सूर्य अन चंद्रात

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

8 मार्च 24

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 212 ☆ [1] नारी रूप [2] मानस पूजा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 212 – विजय साहित्य ?

☆ [1] नारी रूप [2] मानस पूजा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

☆ [1] नारी रूप ☆

(जागतिक महिला दिनानिमित्ताने..)

घरा घरपण

जिच्यामुळे येते

पूर्ण रूप देते

नरा नारी…..! १

*

पती आणि पत्नी

शिव आणि शक्ती

प्रेम प्रिती भक्ती

भारवाही….! २

*

आई,बाई,दाई

वात्सल्य आगर

संसार सागर

नारी रुप….! ३

*

ताई,माई,अक्का

आज्जी,काकी,मामी,

गुणदोष नामी

सामावले….! ४

*

सखी,राज्ञी,माता

नारी शक्ती रूप

चैतन्य स्वरूप

ललना‌ ही…! ५

*

संस्कार जनक

माहेरचा वसा

सासरचा ठसा

निजरूपी…! ६

*

भाव भावनांचे

मूर्त रूप नारी

सुख, दुःख, हारी

आदिमाया….! ७

*

विश्व वंदनीय

भाग्यश्रीची छाया

कविराज माया

कवनात…! ८

☆ [2]  मानसपूजा ☆

*

नमो शंकरा जपात आहे,

कैलासाची माया

शिव स्वरूपी,भालचंद्र तू,

चैतन्याची छाया.

*

निळी निळाई, फणींद्र माथा

चराचरी वास

शंख डमरू,त्रिशूलधारी,

ओंकाराचा न्यास.

*

निलकंठ तू, त्रिनेत्रधारी,

शोभे सिद्धेश्वर

 ब्रम्हांडधीशा उमापती तू,

स्वामी विश्वेश्वर.

*

शिवपिंडीचा महादेव तू

नंदी भक्तगण

शिव नामाने,पहा व्यापिले

त्रैलोक्याचे मन.

*

पंचाक्षरीच्या,नाम जपाने

घेतो देवा नाम

पंचामृती ही,मानस पूजा

सेवा‌ ही निष्काम.

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कानगोष्टी… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

कानगोष्टी ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

स्त्री-पुरूष मैत्रीच्या,

सीमा असतात फार धूसर,

निर्मळ नात्यालाही घायाळ करते,

समाजाची गढूळ नजर !

*

हुंगत राहते ती श्वानासम,

सदा, लैंगिकतेचा पदर,

कानगोष्टी होतात खबर,

संशयाचं गारूड मनावर!

*

वाग्बाणांनी करती बेजार,

पुराव्यांची ना इथे जरूर,

मांडूनी आयुष्याचा बाजार,

करती  विश्वासा  हद्दपार!

   *

समाज म्हणजे का कोणी गैर ?

मी, तुम्ही आणि आपणचं सार !

बाजार गप्पांनाच येतो पूर,

आणि सत्य  राहतं कोसो दूर !

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्त्री… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ स्त्री… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

अबोल होते माझी वाणी

बाल्य अवस्था गोजिरवाणी

कशी मोठी झाली  फुलराणी

*

भाग्य लाभले स्त्री जन्माचे

समर्पित भाव भोगण्याचे

उजळीत पणती सौभाग्याची

गायलीस तू ती पण गाणी

*

तुझ्या उदरी रामकृष्ण ही

तुझ्याच कुक्षी छत्रपती ही

झाशीची तू लढलीस राणी

तूच लिहली तुझी कहाणी

*

कधी कधी मग ह्रदय द्रवते

काळीज आतून का फाटते

निर्भया रस्त्यात जिवंत जळते

जीवन होते मग अनवाणी

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आकाशाशी जडले नाते… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आकाशाशी जडले नाते?  सुश्री वर्षा बालगोपाल 

पद न वाजवता गूपचूप येऊन का

नभ सख्याने ठरवले डोळे झाकायचे?

पद गात होती धरा सखी तन्मयतेने

भाळला आणी विसरला जे करायचे॥

*

लहर आली त्याला ठरवले होते जणू

खोडी काढून तिची थोडे उचकवायचे

लहर प्रितीची आली, पहातच राहिले

मुग्ध होऊन  विसरले भान जगताचे॥

*

कर घेतले करात नकळत नभाने

शपथेने म्हणे जन्मांतरी ना  सोडायचे

कर माझ्याशी लग्न वदे धरा प्रेमे मग

आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 220 ☆ वैशाख वृत्त ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 220 ?

वैशाख वृत्त ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

केदार अश्रु  आज तिथे ढाळतो कसा?

माझाच देव आज मला टाळतो कसा?..

*

मीही झुगारलेत अता बंध कालचे

इतिहास काळजातच गंधाळतो कसा?..

*

देवास काय सांग सखे मागणार मी

माझेच दु:ख देव शिरी माळतो कसा?..

*

अग्नीस सोसतात उमा आणि जानकी

बाईस स्वाभिमान इथे जाळतो कसा?.

*

राखेत गवसतात खुणा नित्य-नेहमी

स्त्रीजन्म अग्निपंखच कुरवाळतो कसा?..

*

मदिरेस लाखदा विष संबोधतात ते

सोमरस नीलकंठ स्वतः गाळतो कसा ?

*

वैशाख लागताच झळा पोचती ‘प्रभा’

सूर्यास सूर्यवंशिय सांभाळतो कसा?..’

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print