मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तू 🧚… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

शब्दाशी तू नित खेळत राहावे

अन फुलून यावी तुझी कविता

 चांदणगात्री बहरून यावे अन

 स्पर्शात लाभो एकजीवता

*

अमृतमय त्या ओंजळी तुनी

मधुघटांनी  रिक्तची व्हावे

 करपाशी मम चांदण गोंदण

तुझे नित्यची लखलखत ऱ्हावे

*

स्पर्शसुखाने जाग यावी

दिवसाही मग रातराणीला

गंधाळून मम अंगांगाला

सूर गवसावा रागिणीला

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #227 ☆ किंमत… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 227 ?

☆ किंमत… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वडा-पाव हा कुणा चहा तर कुणास बुर्जीवाला

रस्त्यावरती भूक लागता आठवतो मग ठेला

*

कुणास शंभू कुणा राम तर कुणा बासरीवाला

प्रत्येकाचा ईश्वर आहे काळजात बसलेला

*

थांबत नाही कुणीच आता सूर्याच्या थाऱ्याला

हवे कुणाला कोकम सरबत कुणास कोका कोला

*

बालपणीचा बंधू असतो प्रिय हो ज्याला त्याला

लग्नानंतर आवड बदलते प्रिय वाटतो साला

*

शेतामधला वळू मोकळा धूळधाण करण्याला

अन कष्टाळू बैल बिचारा बांधतोस दाव्याला

*

पाठीवरती ओझे वाही गाढव म्हणती त्याला

त्याच्यावरती प्रेम करावे वाटे कुंभाराला

*

मी छोटासा महत्त्व माझे इथे नसे कोणाला

खुंटा आहे म्हणून किंमत आहे या जात्याला

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी छंद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी छंद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

या मराठीचा छंद

जीवना आत्मानंद

ग्रंथ श्लोक अगंध

काय हवे ज्ञानीया.

*

लेखणीही ऊदंड

सामर्थ्यात अखंड

श्री’ते ‘ज्ञ’त पाखंड

सत्य पोथी-पुराण.

*

बोली विवीध गोडी

सहज अर्थ जोडी

माय मराठी मोडी

व्यास-वाल्मिकी ऋषी.

*

ओहोळ जैसा वाहे

तैसी वळणे राहे

वळणदार दोहे

अक्षरे धन्य ओवी.

*

मन अतृप्त नित्य

लिहीता नि वाचस्थ

प्रमाणाचा प्रशस्त

सारस्वता लौकिक.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ माझी मायबोली… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– माझी मायबोली…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

मराठी प्रसवे | माझी मायबोली |

ज्ञानियांची वाली | राजभाषा ||१||

*

मराठी धरते | ज्ञानाची सावली |

भाषांची माऊली | जगी श्रेष्ठ ||२||

*

मराठी दाखवी | जगाची खिडकी |

सर्वांची लाडकी | मातृभाषा ||३||

*

मराठी गिरवी | हाती बाराखडी |

मुळाक्षर कडी | ज्ञानासाठी ||४||

*

मराठी शिकवी | संतांचे वचन |

ज्ञानाचे लोचन | अध्यात्माने ||५||

*

मराठी पाजते | मुखी बाळकडू |

पराक्रम घडू | कर्तूत्वाने ||६||

*

मराठी फोडते  | मदांध ते तख्त  |

क्षात्रधर्म व्यक्त | सामर्थ्यांने ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी माऊली… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी माऊली☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

भाषा मराठी माऊली मला कृपेची सावली

तिने लडिवाळपणे प्रजा मराठी जपली

पूर्वजांनी लेखनाने तिची खूप सेवा केली

लाख मराठी मुखांनी सिंहगर्जना ही केली…

*

ज्ञाना, तुका, नामा, एका, तिच्या भजनी लागले

सरस्वतीच्या मंदिरी दिव्य ज्ञान साठवले

ज्ञानसाठा पुरवाया झाली संस्कृत जननी

अनुवाद करण्याने भव्य तिजोरी भरली…

*

तेज लेवून स्वतंत्र नांदू लागली मराठी

भाषा भगिनींच्यासंगे तिच्या झाल्या गाठीभेटी

प्रगतीच्या वाटेवर खूप केली घोडदौड

झाली संमृद्ध संपन्न सा-या जगाने पाहिली…

*

प्रादेशिक वळणाची तिची खुमारी वेगळी

लळाजिव्हाळा जपतं दीर्घ बनली साखळी

तिच्या सामर्थ्याची आता झाली आहे परिसिमा

ज्ञान मिळवत  तिने  भारी  भरारी घेतली …

*

अध्यात्माचे अंतरंग मराठीनेच खोलले

सर्व धर्म समभाव हेच तत्व जोपासले

नीतिशास्त्र सांगताना हाच मांडला आदर्श

लोकसाहित्याची धारा साध्या शब्दात मांडली…

*

ज्ञानशाखा आळवत केली स्वतंत्र निर्मिती

जागतिक आकांक्षांची केली सारी परिपूर्ती

सर्वांगीण विकासाचा ध्यास मनात जपत

जागतिक स्तरावर तोलामोलाने वाढली…

*

ग्रंथ निर्मिती कराया थोर साहित्यिक आले

त्यांना पदरी घेवून तिने आपले मानले

आता घेतलाय वसा स्वयंस्फूर्त कर्तृत्वाचा

त्याने मराठी बाण्याची गोडी सर्वत्र वाढली…

*

आपल्याच कर्तृत्वाचा जपू आपण वारसा

जगी ध्वज फडकवू माझ्या मराठी भाषेचा

एकसंध होवूनीया लावू सामर्थ्य पणाला

तेज दाखवाया घेवू हाती मराठी मशाली…

*

आहे अंगात सर्वांच्या एक बळ संचारले

माय मराठी म्हणून मन आहे भारावले

करू मानाचा मुजरा आज मराठी भाषेला

तिच्या वैभवाची स्वप्ने आम्ही मनी साकारली…

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 163 ☆ अभंग… दाता कैवल्याचा, मनोहर.!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 163 ? 

☆ अभंग… दाता कैवल्याचा, मनोहर.!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

मानव जीवन, खूप अवघड

साधा परवड, प्रत्येकाने.!!

*

इथे नाही सुख, दुःख ते सदैव

सर्वस्व अभाव, आयुष्यात.!!

*

अशातुनी काढा, अनमोल वेळ

स्मरणात काळ, घालवावा.!!

*

चक्रधारी कृष्ण, त्यास आठवावे

मनी साठवावे, प्रेमादरे.!!

*

कवी राज म्हणे, पुत्र देवकीचा

दाता कैवल्याचा, मनोहर.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गौरव मराठीचा… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ गौरव मराठीचा… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

महाराष्ट्राच्या मातीमधुनी जन्मते मराठी

मातपित्याच्या लाघवामधे पाझरे मराठी

*

पसायदानी दीपामध्ये तेवते मराठी

तुकयाच्याही गाथेमध्ये गातसे मराठी

*

म्हाइंभटांचे लीळाचरित्र पेरते मराठी

चक्रधरांच्या विचारांतुनी रूजते मराठी

*

जनाबाईंच्या जात्यामध्ये ओवते मराठी

मुक्ताईची ताटी उघडे अभंगी मराठी

*

आर्या मोरोपंत सांगती जनरीत मराठी

होनाजीच्या कवनामध्ये थिरकते मराठी

*

तुतारीत केशवसुतांच्या प्राण फुंकते मराठी

कुसुमाग्रजांच्या कण्यामधुनी लढविते मराठी

*

आण्णांच्या शाहिरीमधुनी स्फुरणते मराठी

पठ्ठे बापूराव कवनात जोशते मराठी

*

महानोरांच्या जोंधळ्यातले चांदणे मराठी

इंदिरेच्या काव्यातले बहरले ॠतू मराठी

*

शिवरायांच्या पोवड्यात  मर्दते मराठी

गदिमांच्या रामायणात दंगते मराठी

*

 विडंबनात अत्रेंच्या खळाळते मराठी

बालकवींच्या बागेमध्ये बागडे मराठी

*

खेबुडकरी लावणीत घुंगुरते मराठी

भटांच्याही गझलेत गुंजते मराठी

*

पु.लं.चा  जगप्रवास पेलते मराठी

शांताबाई कविता जपती संस्कार मराठी

*

चला जपूया आज वारसा जागवू मराठी

अभिमानाने मिरवूया जगी समृद्ध मराठी

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “फुलासम जिणे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “फुलासम जिणे– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

फुलासम काया 

फुलाचेच मन

बसाया आसन

फुलाचेच

*

तारुण्य  हे असे

फुलासम जिणे

आयुष्याचे सोने

हेच दिस

*

याच दिसाला

जपून वागावे

फुलाला जपावे

जीवेभावे …… 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ माय मराठी… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

साहित्याच्या समईमधली वात मराठी

जगण्यासाठी उजेड देते ज्योत मराठी

वर्ण स्वरांची बाग बहरली फुले उमलली

काव्य कथांचे तारांगण ही रात मराठी

*

लय तालाच्या झुडूपाचे हे पान मराठी

अलंकापुरी भावभक्तीचे दान मराठी

कितीक भाषा भगिनी तिजला जगता माजी

आई म्हणुनी अग्रपुजेचा मान मराठी

*

अभंग ओवी श्लोकामधली गेय मराठी

आर्या भारुड पोवाड्याचे श्रेय मराठी

सजे लावणी सौंदर्याला उपमा नाही

मराठीत मी जगणे मरणे ध्येय मराठी

*

मातेच्या गर्भात उमगली मला मराठी

कोण आईला दुष्ट बोलतो “बला” मराठी”

देवनागरी लिपी आमची वैभवशाली

दिक्कालाच्या पार पोचवू चला मराठी

*

साहित्याचा गिरी लंघण्या पाय मराठी

कामधेनुच्या दुग्धावरची साय मराठी

परभाषेच्या आक्रमणाने व्यथित झाली

सहोदरांनो अता वाचवू माय मराठी

गझलनंदा

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी माझी… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

सौ. प्रतिभा संतोष पोरे 

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी माझी ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

✒️

वर्णमालेची लाभे श्रीमंती

अक्षर अक्षरांची महती

उच्चाराची गोड प्रचिती

समृद्ध असे मराठी माझी।१।

✒️

संस्कृत भाषेचीच लिपी

वृत्त, अलंकार शोभती

वाक्प्रचार, म्हणी व्याप्ती

देई ज्ञान मराठी माझी।२।

✒️

नवरसांची सजे पेरणी

काव्यसुमनांची पुरवणी

अभंग ,भारूडात देखणी

 गोड गाण्यात मराठी माझी।३।

✒️

महाराष्ट्राची प्रिय मायबोली

मनामनांसी लिलया जोडी

अभ्यासे गवसेना हिची खोली

शिलालेखावरी मराठी माझी।४।

✒️

ज्ञानदेव, तुकारामांची लेखणी

एकनाथ , नामदेवांच्या गायनी

जात्यावर ओव्या गाई जनी

संतांची अभिव्यक्ती मराठी माझी।५।

✒️

मराठी परंपरेचा राखू मान

मातृभाषेचा करूया सन्मान

बोलून, लिहून वाढवू शान

अंतरात साठवू मराठी माझी।६।

शब्दसखी प्रतिभा

✒️

© सौ. प्रतिभा पोरे

पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print