सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 220 ?

वैशाख वृत्त ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

केदार अश्रु  आज तिथे ढाळतो कसा?

माझाच देव आज मला टाळतो कसा?..

*

मीही झुगारलेत अता बंध कालचे

इतिहास काळजातच गंधाळतो कसा?..

*

देवास काय सांग सखे मागणार मी

माझेच दु:ख देव शिरी माळतो कसा?..

*

अग्नीस सोसतात उमा आणि जानकी

बाईस स्वाभिमान इथे जाळतो कसा?.

*

राखेत गवसतात खुणा नित्य-नेहमी

स्त्रीजन्म अग्निपंखच कुरवाळतो कसा?..

*

मदिरेस लाखदा विष संबोधतात ते

सोमरस नीलकंठ स्वतः गाळतो कसा ?

*

वैशाख लागताच झळा पोचती ‘प्रभा’

सूर्यास सूर्यवंशिय सांभाळतो कसा?..’

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments