मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सूर संपन्न – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – सूर संपन्न –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

सप्तसूरांच्या छटा घेऊनी

अवतरला स्वर्गदूत भूवरी

खोल आनंदाच्या डोहात

हर्षतरंगच उमटवी अंतरी..

वाद्यातूनी झंकारिती तारा

दृढ भावनाविष्कार अवतरे

साकारूनी स्वर-लहरींतूनी

गंधर्व हस्तमुद्रित नाद स्वरे..

गीतसूरांतुनी चैतन्य आत्म्यास

दूर मनांतले विषण्ण ते काहूर

कोमल रिषभ धैवत निषाद

व्यक्त करिती अनामिक हूरहूर..

राग स्वर शब्द सूर नि ताल

बध्द रचनेची किती आवर्तने

अथांग महासागर संगीताचा

तृप्त कर्ण मुग्धमधुर झलकीने..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 102 – कोणा का कळेना ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 102 – कोणा का कळेना ☆

स्त्री मनाची ही व्यथा रे आज कोणा का कळेना।

अतं रीच्या वेदनांची गाज कोणा का कळेना।

 

माय बापाच्या घराचे सौख्यदायी बंध सारे।

तोडलेले यातनांचे काज कोणा का कळेना ।

 

अंकुरे हा बालिके चा कोंब मातेच्या कुशीचा।

गर्भपाता सज्ज होई राज कोणा का कळेना।

 

नामधारी योजनांचे भोग सारे भोगताना।

बाप भ्राता वा पतीचा बाज कोणा का कळेना

 

झीज सारी सोसते ही हुंदक्यांना का गिळूनी।

संस्कृतीच्या पूजकांचा माज कोणा का कळेना।

 

सोडवाना नार बाला श्वास घेण्या मुक्ततेचा।

रंजनाच्या चिंतनाचा साज कोणा का कळेना।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेमरंग … ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रेमरंग … ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

 जागेपणी प्रिये तू, डोळ्यापुढे असावी

मिटताच लोचने मी, स्वप्नातही दिसावी. || धृ ||

 

झुकवून नेत्र खाली, रोखून ते पहाणे,

जणू पाहिलेच नाही, असले तुझे बहाणे,

पदरास  पीळ भरता, नेहमीच तु दिसावी      ||१||

 

तू रेखीता कपोली, ती चंद्रकोर लाल,

मुखचंद्र लाजुनी ग, होईल लाली लाल,

जास्वंदी सम लाली, गाली सदा दिसावी  ||२||

 

आषाढ मोकळा तू, झटकू नकोस वेडे,

हरवून भान जाते, वेल्हाळ प्रेम वेढे

गजऱ्यांस माळताना, खिडकीत तू दिसावी ||३||

 

जा तू खूशाल आता, झुकवून नेत्र खाली,

काळीज फेकले मी, वाटेत भोवताली,

तुडवीत काळजाला, जाता सदा दिसावी ||४||

 

ते दक्ष लक्ष जेव्हा, डोळ्यात रंगते ना!

पाहू नको, कि पाहू? माझे मला कळेना,

प्रीती तुझी न माझी, अद्वैत आज व्हावी ||५||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ टिचकी… ☆ श्री अरूण ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ टिचकी… ☆ अरूण ☆

सकाळ भरभर निघून जाते,

उन्हं सरसर वाढत जातात,

कुठवर आलाय मेसेजचा पक्षी

मनाचे पंख फडफडवीत राहतो,

काळीजडंखही होत राहतो,

जोपर्यंत तुझं अलवार अस्तित्व

उतरत नाही मोबाईलच्या स्क्रीनवर,

मन तरुची पाने सळसळत राहतात,

घड्याळाचे काटे पुढे सरकत राहतात,

अन् प्रतिक्षेच्या सागरलाटा धडकत राहतात पुनःपुन्हा

मोबाईलच्या काचेवर टिचकी मारत…! 😊

साभार – श्री अरुण 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग… ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ अभंग… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

नित्य ते भजन | हरीचे स्मरण||

श्रद्धा जागरण | संतवाणी ||

 

देई समाधान | अंतरात ज्योत||

समईची वात | तेवताना||

 

आनंदे वंदन | ठेविले मस्तक||

आवडे स्वस्तीक | दारातले ||

 

मन चिंब ओले | स्वर बरसती ||

गाऊया आरती | भक्तिभावे ||

 

गंध दरवळ | शांत गाभार्‍यात ||

भेट एकांतात | विश्वनाथा ||

 

पाठीशी उभा जो | विठ्ठल सावळा ||

जीव होई गोळा | पाहताना ||

 

एकादशी दिनी | शब्दांची गुंफण ||

आले मी शरण भगवंता || 

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नदीचे गाणे… ☆ वि.म.कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी) ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ नदीचे गाणे… ☆ वि.म.कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी) ☆

वि.म.कुलकर्णी. (स्मृतीदिन) – (ऑक्टोबर ७, इ.स. १९१७ – मे १३, २०१०)

नदीचे गाणे

दरीदरीतुन,वनावनातुन

झुळझुळ मी वाहत येते,

मी मंजुळ गाणे गाते,

मी पुढेच धावत जाते.

 

वसली गावे तीरावरती,

त्यांना भेटून जाते पुढती,

लतावृक्ष किती काठावरती,

भूमितूनी जे मला भेटती.

 

फुलवेली मज सुमने देती,

कुठे लव्हाळी खेळत बसती,

कुठे आम्रतरू माझ्यावरती,

शीतल अपुली छाया धरती.

 

पाणी पिऊनी पक्षी जाती,

घट भरूनी कोणी जल नेती,

गुरे -वासरे जवळी येती,

मुले खेळती लाटांवरती.

 

मी कोणाची–मी सर्वांची

बांधुनिही मज नेणा-यांची!

जेथे जाईन- तेथे फुलवीन,

बाग मनोहर आनंदाची.

 – वि.म.कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #124 – विजय साहित्य – देणार प्राण नाही…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 124 – विजय साहित्य ?

☆ देणार प्राण नाही…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

 (वृत्त  आनंद – गागालगा लगागा)

सरणात जाळ नाही

मरण्यात शान नाही.

 

आरोग्य स्वच्छता ही

करणार  घाण नाही.

 

वैश्विक हा करोना

ठरणार काळ नाही.

 

संसर्ग शाप झाला

अंगात त्राण नाही .

 

साधाच हा विषाणू

नाशास बाण नाही .

 

सोपे नसेल जगणे

हरण्यात मान नाही .

 

बकरा नव्हे बळीचा

देणार प्राण नाही .

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पिलं गेली दूर दूर… ☆ सुश्री सुमन किराणे ☆

सुश्री सुमन किराणे

? कवितेचा उत्सव ?

☆ पिलं गेली दूर दूर… ☆ सुश्री सुमन किराणे ☆

पिलं इवली इवली

घरट्यात झाडावर

आणि घरट्याचा सारा

भार  दोन  फांद्यावर

        पर्ण नक्षीच्या पदरी

        मिळे जीवाना उबारा

        झुलवितो झुल्यामध्ये

        ममतेचा मंद वारा

पाजवूनी गोड रस

भार वाहिला मायेनं

कुशी हिरव्या फांद्यांच्या

जीव वाढती जोमानं

        पंख फुटता सुंदर

        फांद्या लागती हसाया

        पिला वाढविण्यासाठी

        किती झिजविली काया

येता बळ पंखामध्ये

सारी निघाली उडून

आणि बिचारं घरटं

कसं झालं सुनं सुनं

        फांद्या वाकल्यात आता

        एक मेकांचा आधार

        शोधे बारीक नजर

        पिलं गेली दूर-दूर

 

© सुश्री सुमन किराणे

पत्ता – मु.पो. हेर्ले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर.

मोबा.9850092676

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बा द श हा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 बा द श हा ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

सुंदर निळे हसरे डोळे

केस कुरळे रुपेरी डोईवर,

सडसडीत शरीर बांधा

तेज आगळे मुखावर !

 

हाती पडता निर्जीव तारा

काढी त्यातून स्वर्गीय सूर,

वाद्य साथीचे काश्मीरचे

जगभर केले अजरामर !

 

हरपला बादशहा संतूरचा

रसिक मुकती ब्रम्हानंदाला,

जागवून जुन्या आठवणी

सूर जादुई तारेचा थंडावला !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

११-०५-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #109 – माझी आई…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 109 – माझी आई…! ☆

माझ्यासाठी किती राबते माझी आई

जगण्याचे मज धडे शिकवते माझी आई

तिची कविता मला कधी ही जमली नाही

अक्षरांची ही ओळख बनते माझी आई…

 

अंधाराचा उजेड बनते माझी आई

दु:खाला ही सुखात ठेवे माझी आई

कित्तेक आले वादळ वारे हरली नाही

सूर्या चा ही प्रकाश बनते माझी आई…

 

देवा समान मला भासते माझी आई

स्वप्नांना ही पंख लावते माझी आई

किती लिहते किती पुसते आयुष्याला

परिस्थिती ला सहज हरवते माझी आई…

 

ठेच लागता धावत येते माझी आई

जखमेवरची हळवी फुंकर माझी आई

तिच्या मनाचे दुःख कुणाला दिसले नाही

सहजच हसते कधी न रडते माझी आई…

 

अथांग सागर अथांग ममता माझी आई

मंदिरातली आहे समई माझी आई

माझी आई मज अजूनही कळली नाही

रोज नव्याने मला भेटते माझी आई…

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print