श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रेमरंग … ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

 जागेपणी प्रिये तू, डोळ्यापुढे असावी

मिटताच लोचने मी, स्वप्नातही दिसावी. || धृ ||

 

झुकवून नेत्र खाली, रोखून ते पहाणे,

जणू पाहिलेच नाही, असले तुझे बहाणे,

पदरास  पीळ भरता, नेहमीच तु दिसावी      ||१||

 

तू रेखीता कपोली, ती चंद्रकोर लाल,

मुखचंद्र लाजुनी ग, होईल लाली लाल,

जास्वंदी सम लाली, गाली सदा दिसावी  ||२||

 

आषाढ मोकळा तू, झटकू नकोस वेडे,

हरवून भान जाते, वेल्हाळ प्रेम वेढे

गजऱ्यांस माळताना, खिडकीत तू दिसावी ||३||

 

जा तू खूशाल आता, झुकवून नेत्र खाली,

काळीज फेकले मी, वाटेत भोवताली,

तुडवीत काळजाला, जाता सदा दिसावी ||४||

 

ते दक्ष लक्ष जेव्हा, डोळ्यात रंगते ना!

पाहू नको, कि पाहू? माझे मला कळेना,

प्रीती तुझी न माझी, अद्वैत आज व्हावी ||५||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments