मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ येईन म्हणते, जरा थांब… ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ येईन म्हणते, जरा थांब ☆ सौ. मंजिरी येडूरकर

गोळा करीन प्रभातीचे रंग

पक्षांच्या गाण्यातील सारे सूर

फुलांनी उधळलेले रंग, गंध

एखादं इंद्रधनुष्य पण घेऊन येते

*

हवाय मला पहाट वारा, दवबिंदूंचे मोती

दिनकराचे तेज, चंद्राची शीतलता

आकाशाची निळाई, धरतीची हिरवाई

चमचमणाऱ्या तारा, चांदणंही घेऊन येते

*

घेऊन येते ती वात्सल्याची पखरण

बालपणी आपण अनुभवायची असते

आणि मग ती ओट्यात गोळा करून

आपल्या पिलांवर उधळायची असते

*

घेऊन येते सहचराचे प्रणय रंग

सहवासाचे रेशीम बंध, घेऊन येते

सख्यांचं मैत्र, नात्यातला हळुवारपणा,

इतकं सारं घेऊन कशी येणार मी? तूच ये

*

दाखवेन तू निर्मिलेली सारी सृष्टी, ये!

धरतीच्या स्वर्गसुखात आकंठ डुंबायला!

कळेल तुला, मी कां येऊ शकत नाही ते!

येशील ना मग! वाट पाहते, तुझीच!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – विसावा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ – विसावा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ

थांबला तो संपला असं जरी असलं

तरी त्या थांब्यावर थोडं विसावून

स्वतःला वेगळ्या चश्म्यातून पहावे

*

आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेची

अद्ययावत करून उत्तरपत्रिका

व्हावे खुश स्वतः वरच बेफाम

सैल सोडावा कधीतरी स्वतःचा लगाम

*

आयुष्याच्या गणिताची

नसतात साचेबद्ध उत्तरे

इथे लयलूट करती

आशेची विविध सुगंधी अत्तरे

*

काय कमावले काय गमवले

ह्या काथ्याकूटात न रमावे

*

अगदी किरकोळ सुखालाही

बंदीस्त करून मनाच्या कुपीत

आपल्या जिवन गाण्याला द्यावे

आपल्याच मनाचे संगीत🎤🎶

🥰दEurek(h)a 😍

🥰दयुरेखा😍

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कणिका… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कणिका… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

कणिका

वणवा पेटला पेटला

पळसफुलांनी

पाकळ्यांवर झेलला.

*

हे वितळणारं ऊन

गच्च ठेवलय धरून

झाडाझाडांनी पानापानांतून

*

रंग फुलांचे चोरले

फुलपाखरांनी

पंखांवर मिरवले

*

सूर्य तापतो तापतो आहे.

तरीही खुळा गुलाब

गालात हसतोच आहे.

*

काही क्षणिका

ग्रिष्माचा अंगार झेलीत

पाकळी पाकळी मातीत मिळते.

नको खंत त्याचा

मनी मी ठसविते.

फळाफळातील अमृत प्राशीत

बीज नवे जीवन धरते

मरणात खरोखर जग जगते.

*

वाट

त्या जंगली वाटेला

राजरस्त्याचे रूप देण्याची

स्वप्ने पहात

तो निघाला तिथून

उद्दाम ईर्षेने……

पण सावल्या बुडायच्या आत

त्यालाच गिळून टाकले तिने

*

व्रतोत्सव

सारं रान वणवलं, तेव्हा

आभाळही बघत राहिलं

शून्य काचेरी डोळ्यांनी

कुणा शापित वृक्षांच्या

दहनाचा व्रतोत्सव

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आता तरी… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ आता तरी… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

निष्पाप जीवांची चुकी 

भेट दिली पहलगामला 

कारण नसतांना उगीच

जीव हकनाक गमावला 

*
क्रूर कृत्याने पाकड्यांच्या 

जग हादरले नरसंहाराने

जशास तसे उत्तर द्यावे 

आता तरी भारत सरकारने 

*
स्वर्ग सुंदर हा धरेवरचा 

नरक होईल अशाने 

दिवस आता निघून गेले 

वागण्या गोडीगुलाबीने

– – – वागण्या गोडीगुलाबीने

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चंद्रमा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चंद्रमा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

शांत शितल

मनात आनंद

आनंदात मी

आत्मानंदात मी

दाहक दिवस

संपलाच की

 

टिपूर चांदणं

आठवणीचं कोंदण

कोंदणात ती

तीच यामिनी

 

झोका घेत

आठवणीत रमलो

 

तुझी साथ

शितल चंद्रासम

 

तोच चंद्र 

आज आहे साक्षीला..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 270 ☆ वसंत… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 270 ?

☆ वसंत… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(वसंतोत्सव काव्याचा)

ऋतूराज येता सजे सोहळा

उन्हाच्या जरी भोवती रे झळा

बहावा असा पीतवर्णी झुले

अहाहा किती सानुली  ही फुले …

*

जरी लाल पांगार वाटे नवा

जुना तोच तेथे असे गारवा

कसा रोज कोकीळ गातो तिथे

दिसे आमराई सुहानी  जिथे

*

वसंतात चौफेर रंगावली

फुलाच्यांच आहेत साऱ्या झुली

सुखासीन सारी मुलेमाणसे

जमीनीत आता  सुखाचे ठसे

*

कशी साठवू आज डोळ्यात मी

निळ्या ,लाल रंगातली मौसमी

सुगंधात न्हाते ,फुले मोगरा

जणू जीव झाला बसंती-धरा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चारोळ्या… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ चारोळ्या… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

घन अंधारी, नदीकिनारी

एक काजवा लहरत जाई

प्रकाश टिंबे मांडितो परि तो

जळतही नाही, विझतही नाही.

*

तप्त रस सोनियाचा

खाली आला फुफाटत

सारा शांतला शांतला

फुलाफुलांच्या देहात

*

किती आवेग फुलांचे

वेल हरखून जाते.

काया कोमल तरीही

उभ्या उन्हात जाळते.

*

किती कशा भाजतात

उन्हाळ्याच्या उष्ण झळा

परि झुलतात संथ

बहाव्याच्या फूलमाळा

*

किती किती उलघाल

होते काहिली काहिली

एक लकेर गंधाची

सारे निववून गेली

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गझल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गझल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

काय सांगू गझल हीतर राम आहे

ईश्वराच्या साधनेचे प्रेम आहे

*

ध्यास आहे जो जयाच्या अंतरीचा

तोच येथे गझल होतो नेम आहे

*

मानता नाजूक नाते कृष्ण राधा

कोण सांगा राधिकेचा शाम आहे

*

लावली ज्याने समाधी साधनेची

गझल त्याला लाभलेले दाम आहे

*

शब्द असतो बांधलेला भावनेशी

त्यात अवघा साठलेला जोम आहे

*

माणसाला माणसांची जाण नाही

कोण येथे जाणणारा व्योम आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #282 ☆ झुकली माफी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 282 ?

☆ झुकली माफी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

अपराध्याला कुठली माफी

माफ करुन त्या फसली माफी

*

अपराधी तो मोठा होता

समोर त्याच्या झुकली माफी

*

त्या नेत्याने मागितलेली

ती  तर होती नकली माफी

*

दुष्ट कर्म हे किती घृणास्पद

त्याला पाहुन विटली माफी

*

शतकवीर तर तू अपराधी

पुन्हा मागतो कसली माफी

*

गुन्हेगार मी नव्हतो तरिही

माझ्यावरती रुसली माफी

*

तूच अता तर मला माफ कर

असेच काही म्हटली माफी

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाठीराखा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ पाठीराखा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

(पादाकुलक वृत्त)

धावा ज्याचा अंतरी करितो

तोची पाठी राखा माझा

मनमानी त्याची चाले जीवा

पंढरीनाथा होई राजा.

*

साधा भोळा भक्त मी पामर

नाही प्रपंचासी कैसा बोजा

अभंगी रंगता त्याची ओवी

संत सुख वाटे दर्शनी साजा.

*

जैसा सागर व्याकुळ तीरा

तैसेची मन साक्षाता तर

पांडूरंग मंदिरी ध्यानाशी

पावावा मोक्षा मज विश्वंभर.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares