मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 210 ☆ परदेशी पाहुणा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 210 ?

परदेशी पाहुणा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

परदेशातला मुलगा,

दहा दिवसांसाठी घरी येतो…

अर्थात ऑफिस च्या कामासाठी,

इथेही चालूच असतं त्याचं …

ऑफिस, मित्र, आप्तेष्टांना भेटणं,

तरीही तो घरात असतो,

त्याच्या जुन्या आवडी निवडीसह,

कुठले भारतीय पदार्थ,

खायचे असतात त्याला ?

तिथे न मिळणारे ?

“हल्ली सगळीकडे

सगळं मिळत,

आईबाप सोडून”

एक घिसापीटा डायलॉग …

अनेकजण ऐकवतात!

 

दिवस भर भर

सरकतात पुढे !

निघण्याच्या दिवशी

त्याचे आवडीचे पोहे करताना आठवतं ,

तो चार वर्षांचा असताना म्हटलेलं,

“आई ,आज जगदीश च्या डब्यातले

पोहे खाल्ले, मस्त होते,

लिंबू पिळलेले!”

 

आज त्याच्यासाठी पोहे करताना,

तेच आठवलं,

म्हटलं हसून…

“आज जगदीश च्या आई सारखे,

पोहे केलेत!”

मुलं कितीही मोठी झाली,

दूर देशी गेली,

 तरी,

तरी आपल्या हाकेच्या अंतरावरच

असतं त्यांचं शैशव,

आपण खूप जपून ठेवलेलं !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #217 ☆ तुझ्यासारखा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 217 ?

तुझ्यासारखा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कधी वागतो अवखळ वारा तुझ्यासारखा

वादळ होता करतो मारा तुझ्यासारखा

अंधारी ती रात्र छळाया मला लागली

कुठेच नव्हता प्रसन्न तारा तुझ्यासारखा

अवकाळीच्या वर्षावाने चिंब नहाते

देतच नाही तो गुंगारा तुझ्यासारखा

काय शिकवले सांगशील का वाऱ्या त्याला

त्यानेही केला पोबारा तुझ्यासारखा

मी माहेरी आले आहे तुला सोडुनी

अन् बापाचा चढला पारा तुझ्यासारखा

कष्ट सोसुनी घास आणतो अमुच्यासाठी

गोड वाटतो बाबा चारा तुझ्यासारखा

आश्रमातला मनुष्य होता मला भेटला

वाटत होता तो म्हातारा तुझ्यासारखा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिशिर प्रारंभ… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शिशिर प्रारंभ… ☆ श्रीशैल चौगुले ☆

शिशिर प्रारंभ,शिशिर प्रारंभ

सृष्टीपुलकित  हिमवर्षा कुंभ.

टवटवीत जीव फुल पर्ण पक्षी

ऋतूप्रफुल्ल पर्ण गळ नव साक्षी.

स्पर्श हेवा धरा मृदेस,सूर्य ठेवा

ऊबदार कव अग्निचा वाटे दुवा.

धुके शृंगार हरित दवल काया

जन मन तन पुजा शिशीरी माया.

भृंगर नाद,गंध आल्हाद कोमल

धुंद मस्त वायू कृष्णबासरी चल.

वासर अस्त,चांदणे बहर सोहळा

नभी तेज साजेसा मुखचंद्रकोवळा.

ऐसा शिशिर चाले ऐटीत, हर्ष लुटीत

स्वागता पर्वत वृक्षलता प्रेमल पटीत.

नवा-नवा,शिरशिरी गारवा हवा तरुणा

अंतरी चंचल सहवास स्वप्नांकी कामना.

शिशिर प्रारंभ,शिशीर प्रारंभ

हलकासा शिडकावा हिमकुंभ.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बिचारा माऊस ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– बिचारा माऊस – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

कॅमेरा समोर नाचावे,

प्रत्येकाला आगळी हौस |

अपवाद नाही त्याला,

काय करेल बिचारा माऊस |

एक फोटो काढून घ्यावा,

उंदराने केला विचार छान |

फोटो स्टुडीओत घुसला,

बोकोबाचेच होते ते दुकान |

बोकोबा हसून म्हणाला,

उंदीरराव छान द्या स्माईल |

थोडया वेळात तुमचे,

छान स्मारक इथेच होईल |

उंदीर आणि मांजराचे,

दिसायला जरी आहे हे चित्र |

त्यातला उंदीर आपण,

टपलेला काळ बोका विचित्र |

धोक्याच्या ठिकाणी,

सेल्फी काढण्याचा आवरेना मोह |

काळ रुपी बोका,

क्षणात फस्त करून टाकतो देह |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाताळ विशेष – मृत्युंजयाची कविता… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

? कवितेचा उत्सव ?

☆ नाताळ विशेष – मृत्युंजयाची कविता…🎄⛄🌈 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

त्याची काय चूक होती?

की,

लाकडांना बांधून त्याला

खिळे ठोकले त्यांनी.

पण ,

त्यांचे पाप स्वतःच्या शीरावर घेऊन,

येशू –

मृत्युंजय झाला.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक 

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रास… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ रास☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(आनंदकंद)

भाऊक प्रेमिकाला उरणार आस नाही

या कागदी फुलांना मदधुंद वास नाही

माणूस स्वाभिमानी नसतो परावलंबी

लाचार होत कोठे खाणार घास नाही

स्वातंत्र्य प्रेम ज्याला निर्धास्त तोच होतो

तो ही कधी कुणाचा होणार दास नाही

बाजार भोवतीचा भलता भणंग झाला

जगण्यास आज कोठे कसलाच ध्यास नाही

झाल्या प्रदूषणाने जेरीस जीव आला

वारा निकोप येथे घेण्यास श्वास नाही

 विपरीत काळ झाला खोट्यास  मोल आले

सत्तेत हेच आहे नुसताच भास नाही

कृष्णास आज राधा शोधून सापडेना

वृंदावनात आता घडणार रास नाही

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 153 ☆ मज आवडे एकांत… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 153 ? 

☆ मज आवडे एकांत… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(अष्टअक्षरी…)

मज आवडे एकांत

नको वाटतो लोकांत

वेळ पुरेसा मिळता

होई जप भगवंत.!!

मज आवडे एकांत

कृष्ण देव आठवतो

रूप त्याचे मनोहर

मनी माझ्या साठवतो.!!

मज आवडे एकांत

क्षण माझा मी जोपासे

धूर्त ह्या जगाची कधी

भूल पडे त्याच मिसे.!!

मज आवडे एकांत

शब्दाचे डाव मांडतो

नको कुणा व्यर्थ बोल

मीच मला आवरतो.!!

मज आवडे एकांत

राज हे उक्त करतो

शब्द अंतरीचे माझे

प्रभू कृपेने लिहितो.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मला इतकेच म्हणायचे आहे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

मला इतकेच म्हणायचे आहे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

जेंव्हा घरभेदी भिंतीनीच

नात्यागणगोतात भिंती उभ्या

केल्या  . .

कराकरा मिटली निष्ठुर दारं . .

बंदीच झालो घरातल्या –

कारागृहात. .नजरकैद भोगणारे

कैदीच. . .!

खिडकीतल्या गजावर तटतटून

माझे असहाय्य अपयशी हात. .

आणि बाहेर नुसताच काळोख

तेंव्हाही कवितांनीच केली

ना, टकटक . .

आपुलकीची सहिष्णू दस्तक. .

आणि डोळ्यातील ओलीचा –

आश्वासक पाऊस. .

अगदीच एकाकी नसतो आपण. .

मला इतकेच म्हणायचे आहे. .

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिव्याची कैफियत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🕯️🪔 दिव्याची कैफियत !  🕯️🪔 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

गरीब बिचारा मी बापुडा

असे वैर माझे अंधाराशी,

पण वाहून गर्वाने समीरा

ज्योत माझी तू विझवशी !

अंधार सारा दूर सारण्या

मी आयुष्य माझे वेचतो,

निष्ठुर असा कसा तू

माझ्या ज्योतीस वेधतो ?

असेल ताकद तुझ्यात

विझवण्या सहस्त्र ज्योती,

पण एकदा कधीतरी

दाव पेटवून एक तू पणती !

दाव पेटवून एक तू पणती !

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “चालत राहीन असेच आता…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “चालत राहीन असेच आता…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

गर्द हिरवाई दोन बाजूंनी

पायाखाली आपली वाट

चालत राहीन असेच आता 

जिथे घडेल त्याची  गाठ ।।

आयष्यातील सुखदुःखाला

सवे घेतले बांघून गाठ

तेच ओझे पाठीवर  घेऊन 

चालत राहीन अशीच ताठ ।।

जन्मासह तो प्रगट जाहला

अंती भेटीचा क्षण ठरलेला

हिरवाई आहे भवती तोवर

भेटावा वाटे आर्त  मनाला ।।

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print