सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 210 ?

परदेशी पाहुणा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

परदेशातला मुलगा,

दहा दिवसांसाठी घरी येतो…

अर्थात ऑफिस च्या कामासाठी,

इथेही चालूच असतं त्याचं …

ऑफिस, मित्र, आप्तेष्टांना भेटणं,

तरीही तो घरात असतो,

त्याच्या जुन्या आवडी निवडीसह,

कुठले भारतीय पदार्थ,

खायचे असतात त्याला ?

तिथे न मिळणारे ?

“हल्ली सगळीकडे

सगळं मिळत,

आईबाप सोडून”

एक घिसापीटा डायलॉग …

अनेकजण ऐकवतात!

 

दिवस भर भर

सरकतात पुढे !

निघण्याच्या दिवशी

त्याचे आवडीचे पोहे करताना आठवतं ,

तो चार वर्षांचा असताना म्हटलेलं,

“आई ,आज जगदीश च्या डब्यातले

पोहे खाल्ले, मस्त होते,

लिंबू पिळलेले!”

 

आज त्याच्यासाठी पोहे करताना,

तेच आठवलं,

म्हटलं हसून…

“आज जगदीश च्या आई सारखे,

पोहे केलेत!”

मुलं कितीही मोठी झाली,

दूर देशी गेली,

 तरी,

तरी आपल्या हाकेच्या अंतरावरच

असतं त्यांचं शैशव,

आपण खूप जपून ठेवलेलं !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments