मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ललाटरेषा…. ☆ श्री प्रकाश लावंड 

☆ कवितेचा उत्सव : ललाटरेषा…. ☆ श्री प्रकाश लावंड 

माझ्या शिवारात पावसा

मोरासारखं नाचून जा

पानांवर लिहिलेली

हिरवी कविता वाचून जा

 

तुझे सांडलेले मोती

बघ आता रुजून आलेत

त्यातले शेलके मोती

तुझ्या ओंजळीनं वेचून जा

 

काळीआई तू उपजाऊ

निर्माणाची उद् गाती

तुझ्या सुपिकतेचा तुरा

माझ्या शेतात खोचून जा

 

पाखरा, शेतात माझ्या

स्वानंदी भिरभिरत रहा

चिमणीच्या दातानं चार

कोवळे दाणे चोचून जा

 

मधमाशांनो पाकोळ्यांनो

तुमच्यानंच शेत फुले

परागकण वाटत जा

मधुकण सारे शोषून जा

 

असाच राहो ऋणानुबंध

शिवार देवते तुझा लळा

माझ्या भाळी एक अमिट

ललाटरेषा खेचून जा

 

© श्री प्रकाश लावंड

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लपलास का रे देवा…. ☆ श्री गौतम कांबळे

☆ कवितेचा उत्सव : लपलास का रे देवा…. ☆ श्री गौतम कांबळे 

वाचवेल कोण आता सांग तुझ्या लेकराला

लपलास का रे देवा गाभाऱ्यात आडोशाला

 

माझी काया रे नाजूक तुझे अंग दगडाचे

कसे कळणार दु:ख तुला जंतू प्रतापाचे

कधी फुटेल पाझर तुझ्या दगडी मनाला

लपलास का रे देवा गाभाऱ्यात आडोशाला

 

कष्टातला माझ्या घास वाहिला मी तुझ्या पायी

कर्मकांडे तुझी मी रे कधी चुकवली नाही

दुग्ध अभिषेक तुला भुके ठेवून बाळाला

लपलास का रे देवा गाभाऱ्यात आडोशाला

 

कसा ठेवू भरवसा सांग तुझ्या आस्तित्वाचा

ठेवा येईल कामाला माणसाच्या कर्तृत्वाचा

सारे शांत झाल्यावर धावशील तू श्रेयाला

लपलास का रे देवा गाभाऱ्यात आडोशाला

 

© श्री गौतम कांबळे

सांगली

मो – ९४२१२२२८३४

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 4 – लाडक्या (न पाहिलेल्या) लेकीस!! ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 4 ☆

☆ कविता – लाडक्या (न पाहिलेल्या) लेकीस!! ☆

तुझ्या आठवांचा बहर

जरासा ओसरेस्तोवर

तू पुन्हा उभी ठाकतेस

माझ्या मनाच्या गाभाऱ्यात

आणि खुणावत राहतेस

माझा अप्रिय भुतकाळ

किती बरं वर्ष झाली?..

तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा

शोधता शोधता हा म्हातारा

हरवून बसलाय स्वतःला..

आताशा तू स्वप्नं रंगवत असशील तुझ्या

उज्ज्वल भविष्याची -(माझ्याशिवाय)

मी मात्र अडकून पडलोय

माझ्याबरोबरच्या तुझ्या भूतकाळात

तू जवळ असल्याचे काही मोजके क्षण

अन तू दूर गेल्यानंतचे सगळेच क्षण

मी कसा जगत आलोय

याचंच नवल वाटतंय आता

बाकी काही नाही पण

या लादलेल्या एकांतवासात

मी मलाच सापडत नाही ..

अन तुही…….

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

07-04-2020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाती ☆ कवी आनंदहरी

☆ कवितेचा उत्सव : नाती ☆ कवी आनंदहरी 

 

शाळेमधली कुणी तेव्हाची, अवचित समोर येते

क्षणभर मग ती मना आपुल्या शाळेत घेऊन जाते

 

नाही बोलणे, नाही भेटणे, दुरून पाहणे होते

पाहणे तरी थेट कोठले  ,नजर चोरणे होते

 

क्षणभर थबकून, ओळखून ती पहिल्यांदाच हसते

विचारीते ती काही काही तरी, वाटे प्रश्न हे नस्तेे

 

बोलावे तिने अजून वाटता, साद तिला ती येते

बोलवूनी त्यां, जवळत त्यांसी, ओळख करुनी देते

 

उगाच तेंव्हा, मनात आपुल्या टोचून जातो काटा

हात पतीचा धरुनी हाती, करूनी जाते ‘ टाटा ‘

 

आठवणी त्या फ़क्त आपुल्या, काही तिच्या न गावी

तरीही वाटते पुन्हा पुन्हा ती अजुनी भेटत रहावी

 

काळजातला हळवा कोपरा.. अजुनी तसाच असतो

वेडेपणा हा आपुल्या मनीचा,आपणां हळूच हसतो

 

परतुनीया ती जाते तरीही, हुरहुरते उगीच उरात

आठवणी त्या जपूनी ठेवीतो काळजातल्या घरात

 

राहवत नाही, पत्नीस सांगतो ,” ती भेटली होती “

हसुनी म्हणे ती ,’ शाळेमधली अशीच असती नाती’

 

© कवी आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 62 – पादाकुलक वृत्त ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  स्त्री विमर्श पर एक अतिसुन्दर काव्यात्मक अभिव्यक्ति पादाकुलक वृत्त। मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 62 ☆

☆ पादाकुलक वृत्त ☆

मनी मानसी तूच राहसी

अखंड चाले तुझेच चिंतन

मला कळेना रोग कोणता

आत्म्या भवती कसले रिंगण ?

 

तूच राहसी श्वासांमध्ये

सदाकदा मी तुला घोकते.

राधा माधव मीरा गिरिधर

रूप तयांचे उभे ठाकते

 

तनामनाचा ताबा घेशी

अन हृदयीचा राजा होशी

तुझ्यावीण ना दूजा कोणी

आसपास तू सदा राहसी

 

तुझ्याच साठी सजते धजते

लाज न लज्जा  आता उरते

अविचारी की स्वैरपणा हा

म्हण काहीही तुला हवे ते

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द – झरे….. ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

☆ कवितेचा उत्सव : शब्द – झरे….. ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे 

 

शुभ्र , फेनल शब्द झर्यानी ,

बहरुन आले काव्याचे,डोंगर !

नवकाव्याची हिरवी रोपे,

उमलून आली त्या अंकावर !

 

मनोभावना शब्द कवीच्या,

अविरत  झरती सृष्टी पटावर !

त्या शब्दांनी खुलूनी आले,

शब्द सृष्टी चे,असीम अंबर !

 

सोनसळ्या किरणातून झरती,

श्रावण धारा मनकुंभातुनी !

वैभव सारे साहित्य गिरीचे,

उजळुन येई शब्दामधुनी!

 

उधाण येईल प्रेमसागरी,

शब्द सरिता मिळताच जळी !

शब्द झर्यातील बिंदू न् बिंदू,

बनतील मोती सागर तळी !

 

© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

मो.नं . 8087974168

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 61 ☆ रियाज ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता  “रियाज।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 61 ☆

☆ रियाज ☆

पापण्यांनी उघडले

आज धरणाचे दार

गेला वाहून हुंदका

येता आसवांना पूर

 

स्वप्न मनात हिरवे

उडे आकाशात घार

फडफड ही स्वप्नाची

होता पायामधे दोर

 

ताल भांड्यांनी धरला

त्यात शिजवली तूर

दिसभरचा रियाज

नाही सापडला सूर

 

चुली सोबत जळते

नाही देत ती नकार

तिच्या कष्टाला ना मोल

रोज रांधते भाकर

 

गंध कापराचा होता

त्याने भरलेले घर

लक्ष दिले नाही कुणी

गेला उडून कापूर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राधा कृष्ण…. ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील 

☆ कवितेचा उत्सव : राधा कृष्ण…. ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील 

 

एकरूप

दोन जीव

जणू भासे

उमा शिव

 

कृष्ण राधा

नित्य ध्यास

दोन देह

एक श्वास

 

अवतरे

जगी प्रीत

समर्पण

हीच रीत

 

प्रेमांकुर

मनी फुले

राधा वेडी

स्वप्नी झुले

 

हा दुरावा

प्रीती जरी

दृढ नाती

जन्मांतरी

 

© सौ. मनीषा रायजादे-पाटील

सांगली

9503334279

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कर्ज…. ☆ सौ.माधवी नाटेकर

☆ कवितेचा उत्सव : कर्ज…. ☆ सौ.माधवी नाटेकर 

 

तू मला भेटतोस

कामाची यादी देतोस

आणि म्हणतोस “वेळ नाही–

मुळीच वेळ नाही कर्जात मी गहाण आहे”

 

बोलताना कधी विचार केलास?

कुठेतरी,केव्हातरी,कसेही

गहाण आपण सर्वच आहोत

मुलामाणसांच्या प्रेमात

गहाण पडलेले अनेक

मानव जातीच्या उगमापासून

अनंतापर्यंत

नात्यागोत्याच्या देणवळीत

आपण – – –

कायम सर्वच गहाण आहोत

 

सर्वात सोपं पैशाचं कर्ज

व्याजासह फेडून फिटतं

प्रेमाचं कर्ज वाढत जातं

देतादेता बेरीज करतं

चक्रवाढीने वाढत जातं

तेव्हां त्याचा गुणाकार करतं

 

ऐकलीस का कधी कहाणी–

मीरा-मधुरा प्रेमाची?

मुरलीधर नाटनागर

मीरेच्या भक्तीत गहाण

तसाच माझ्या प्रेमात—

तू पडला आहेस – –

जन्माचा गहाण

 

ह्या जन्मी जमणार नाही पण!

पुढच्या जन्मी येशील का!

तुझं-गहाणखत सोडवून घ्यायला?

 

© सौ. माधवी नाटेकर

9403227288

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 12 ☆ प्रेम काय असतं……☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी)  मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “ प्रेम काय असतं……)

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 12 ☆ 

☆ प्रेम काय असतं…… 

 

प्रेम एक, अडीच अक्षरांचे पत्र

प्रेम एक, मंत्रमुग्ध करणारे स्तोत्र

 

प्रेम म्हणजे, सहजआकर्षण,

प्रेम म्हणजे, निर्भेळ समर्पण

 

प्रेम एक निर्मळ सरिता

प्रेम एक मुक्त कविता

 

नकोत प्रेमात वासना

असाव्या फक्त संवेदना

 

नुसते शरीराचे, आकर्षण नसावे

प्रेमानेच प्रेमाला, हस्तगत करावे

 

विचार करावा फक्त मनाचा

मनात राहून मन जिंकण्याचा

 

नको नुसते हवेत गुब्बारे

प्रेमासाठी मन शुद्ध हवे रे

 

गंध असले की फुले हातात असतात

गंध संपला फुले कचऱ्यात पडतात

 

प्रेमाचे सूत्र असे मुळीच नसते

असे असेल तर, प्रेम लगेच संपते

 

वासनांध प्रेमाला, हवस म्हणतात

त्याला अपवाद काही व्यतिच होतात

 

म्हणून सांगतो, प्रेम अपराध नसतो

निर्मळ प्रेम, मनाचे मन जोपासतो

 

मात्र प्रेमात पडून वेळ निभावणं

आणि गरज झाली की साथ सोडणं

 

हा मात्र अक्षम्य भयंकर गुन्हा ठरतो

एखाद्याच्या मृत्यूस पण त्यात होतो.

 

कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन,

वर्धा रोड नागपूर,(440005)

मोबाईल ~9405403117, ~8390345500

Please share your Post !

Shares
image_print