मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 146 – कहाणी माई बाबांची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 146 – कहाणी माई बाबांची ☆

पाहून दुःखीतांची व्यथा  

कळवळले बाबांचे मन।

माईनेही दिली साथ

सोडून सारे मोह बंधन।

नाही किळस वाटली भळभळत्या जखमांची।

 

फाटक्या कपड्यांची,

नि झडलेल्या बोटांची ।

सुसंस्कृतांनी बहिष्कृत

केलेल्या कुष्ठरोग्यांची ।

 

असाह्य पिडीत जीवांची

जाणून गाथा या जीवांची।

धुतल्या जखमा आणि

केली त्यांनी मलमपट्टी ।

 

घातली पाखरं मायेची 

केली वेदनांशी गट्टी ।

अंधारी बुडलेल्या जीवांना

दिली उमेद जगण्याची ।

 

पाहून अधम दुराचार

लाहीलाही झाली मनाची।

हजारोने जमली जणू

फौजच ही दुखीतांची

 

रक्ताच्या नात्यांने नाकारले

तीच गत समाजाची ।

कुत्र्याची नसावी अशी

तडफड पाहून जीवांची।

दुःखी झाली माई बाबा ऐकून कहानी कर्माची ।

 

पोटच्या मुलांनाही लाजावे

अशी सेवा केली सर्वांची ।

जोडली मने सरकारनेही

दिली साथ मदतीची ।

 

स्वप्नातीत भाग्य लाभले।

नि उमेद आली जगण्याची।

आनन्द वन उभारले।

माणसं मिळाली हक्काची ।

 

अंधारच धुसर झाला नि

प्रभात झाली जीवनाची ।

देवही करी हेवा अशीच

करणी माई आणि बाबांची ।

 

आम्हालाच किळस येते

तुमच्या कजट विचारांची।

तुमच्या कुजट विचारांची।

तुमच्या कुजट विचारांची ।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एका आईचं मनोगत… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

? कवितेचा उत्सव ?

☆ एका आईचं मनोगत… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆ 

(श्रीराम यांच्यासह रामायणातील काही पात्रांवर सगळीकडे वेगवेगळ्या पध्दतीचं लिखाण होत आहे. अनेकजण विविध पोस्ट, व्हिडिओ पाठवतात.रामायणातील एक पात्र- माता कैकेयी. तिचं मनोगत एका कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. – सतीश शिरसाठ) 

राज्याभिषेकाचा डाव मोडून,

श्रीरामांनी वनाचा रस्ता धरला

तेव्हा ;

लोकप्रेम आणि लोकक्षोभाच्या वणव्यात

मी होरपळले होते.

महाराजांची  तडफड पाहून

मी कळवळले होते.

पण क्षणभरच !

 

आठवले होते,

एका घनघोर युध्दात

महाराजांची मी

ढाल झाले होते.

रामलक्ष्मणांच्या बाळलिलांनी

मी सुखावत  होते.

आकाशातले तारे वेचून

त्यांना खेळायला मी देत होते.

उर्मिला आणि सीतेला

मी माहेर आणून दिले होते.

 

कसं सांगू ?

वासरासाठी गायही शिंगं उगारते;

आईपण जगताना,

राजधर्म मी विसरले होते.

 

श्रीरामाच्या वनगमनानं

नियतीनं मला खलनायिका केलं .

रामप्रासादात कुणाच्याही

डोळ्याला डोळा

मी भिडवू शकले नाही,

अगदी मंथरेच्याही !

तरीही,

नव्हता खेद त्याचा मला.

 

तू आलास,

तुझ्या बंधुप्रेमाच्या  तेजाने-

दिपून गेले मी;

बाळा,

गुन्हेगार मी आयोध्येची,

महाराजांची आणि

इतिहासाची;

पण हे भविष्या,

तू तरी मला समजून घेशील का ?

 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #168 ☆ राम नाम मंत्र घोष… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 168 – विजय साहित्य ?

☆ राम नाम मंत्र घोष… ✒ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

विष्णू अंश रामरूप,रघु कुलाचारी

राम नाम मंत्र घोष,संकटे निवारी..||धृ.||

अस्त्रशास्त्र कला विद्या,वेद पारंगत

गुरूगृही रामचंद्र,निती सुसंगत

युद्ध शास्त्र आत्मसात,पुत्र सदाचारी..||१.||

दाशरथी राम सवे,लक्षुमण भ्राता

यज्ञरक्षणार्थ राम, ऋषीमुनी त्राता

विश्वामित्र मागतसे,राम साह्यकारी..||२.||

क्रूरतेचे मूर्त रूप,त्राटिका भयाण

त्राटिकेस देई सजा,सिद्ध रामबाण,

मारीच नी सुबाहुचा,अंत मोक्षकारी..||३.||

वनवासी रामचंद्र,बंधुभाव गाथा

एक एक राम शौर्य,लीन होई माथा

रामलीला देई न्याय,भवभय हारी..||४.||

राम रावणाचे युद्ध,अंत दानवांचा

सुग्रीवादी हनुमान,मैत्र राघवांचा

सीता पती रामराय,जगता उद्धारी..|| ५.||

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत पहाट… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ. मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ वसंत पहाट… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

वसंतातली पहाट

चैत्रांगण रेखाटले

आंबेमोहोर गंधाने

अंगण ते सुखावले

 

मोगरीच्या सुमनांना

अलगद हो वेचले

गुढीपाडवा, तो आज

झेंडुसह मी गुंफिले

 

आंबा फाटे कडुनिंब

साखरेच्या गोड गाठी

ब्रम्हध्वजाच्या साक्षीने

शुभेच्छा तुमच्या साठी

 

आनंदी, आरोग्य दायी

जीवन तुम्हा लाभावे.

समाधानी आयुष्यात

सेवाकार्यात रमावे.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ कविता… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

धरू पाहता दूर धावते

पुन्हा परतुनी हळूच येते

एकांती तर खूप बहरते

अशी निरागस कविता असते

 

भावार्थाला साद घालते

 साजलेवुनी नटून बसते

चपला होऊन कधी विहरते

अशी निरागस कविता असते

 

शांत मनाने जगा निरखते

सुखदुःखाच्या बिया वेचते

भिजते रुजते मग अंकुरते

अशी निरागस कविता असते

 

परंपराना निवडत बसते

आदर्शना नित्य सजवते

समाजात ती पुन्हा मिरवते

अशी निरागस कविता असते

 

मार्दवतेने विकसीत होते

निर्दयतेवर खूप बरसते

आठवणींचा झुला झुलवते

अशी निरागस कविता असते

 

समतेसाठी किती झगडते

भाव मनातील सदा फुलवते

उन्मादाने  हसते  रडते

अशी निरागस कविता असते

 

ती सत्याचे स्वागत करते

लबाडास पण खूप ठेचते

चिरशांतिचा मार्ग दावते

अशी निरागस कविता असते

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #154 ☆ संत तुकाराम महाराज… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 154 ☆ संत तुकाराम महाराज… ☆ श्री सुजित कदम 

 माघ मासी पंचमीस

जन्मा आले तुकाराम

जन्मदिन शारदेचा

संयोगाचे निजधाम…! १

 

ऋतू वसंत पंचमी

तुकोबांचा जन्मदिन

जीभेवर ‌सरस्वती

नाचतसे प्रतिदिन…! २

 

साक्षात्कारी संत कवी

विश्व गुरू तुकाराम

संत तुकाराम गाथा

अभंगांचे निजधाम…! ३

 

सतराव्या शतकाचे

वारकरी संत कवी

अभंगात रूजविली

भावनांची गाथा नवी…! ४

 

जन रंजले गांजले

त्यांना आप्त मानियले

नरामधे नारायण

देवतत्व जाणियले…! ५

 

तुकोबांची विठुमाया 

कुणा कुणा ना भावली

एकनिष्ठ अर्धांगिनी

जणू अभंग आवली…! ६

 

सामाजिक प्रबोधन

सुधारक संतकवी

तुकोबांचे काव्य तेज

अभंगात रंगे रवी…! ७

 

विरक्तीचा महामेरू

सुख दुःख सीमापार

विश्व कल्याण साधले

अभंगाचे अर्थसार…! ८

 

केला अभंग चोरीचा

पाखंड्यांनी वृथा आळ 

मुखोद्गत अभंगांनी

दूर केले मायाजाल…! ९

 

एक एक शब्द त्यांचा

संजीवक आहे पान्हा

गाथा तरली तरली

पांडुरंग झाला तान्हा..! १०

 

नाना अग्निदिव्यातून

गाथा  प्रवाही जाहली

गावोगावी घरोघरी

विठू कीर्तनी नाहली…! ११

 

जातीधर्म उतरंड

केला अत्याचार दूर

स्वाभिमानी बहुजन

तुकाराम शब्द सूर…! १२

 

रूजविला हरिपाठ

गवळण रसवंती

छंद शास्त्र अभंगाचे

शब्द शैली गुणवंती..! १३

 

दुष्काळात तुकोबांनी

माफ केले कर्ज सारे

सावकारी पाशातून

मुक्त केले सातबारे….! १४

 

प्रपंचाचा भार सारा

पांडुरंग शिरावरी

तुकोबांची कर्मशक्ती

काळजाच्या घरावरी…! १५

 

कर्ज माफ करणारे

सावकारी संतकवी

अभंगात वेदवाणी

नवा धर्म भाषा नवी…! १६

 

प्रापंचिक जीवनात

भोगियले नाना भोग

हाल अपेष्टां सोसून

सिद्ध केला कर्मयोग…! १७

 

परखड भाषेतून

केली कान उघाडणी

पांडुरंग शब्द धन

उधळले सत्कारणी…! १८

 

अंदाधुंदी कारभार

बहुजन गांजलेला

धर्म सत्ता गुलामीला

जनलोक त्रासलेला…! १९

 

साधी सरळ नी सोपी

अभंगाची बोलगाणी

सतातनी जाचातून

मुक्त झाली जनवाणी…! २०

 

संत तुकाराम गाथा

वहुजन गीता सार

एका एका अभंगात

भक्ती शक्ती वेदाकार…! २१

 

सांस्कृतिक विद्यापीठ

इंद्रायणी साक्षीदार

प्रवचने संकीर्तनी

पांडुरंग दरबार…! २२

 

संत साहित्यांची गंगा

ओवी आणि अभंगात

राम जाणला शब्दांनी

तुकोबांच्या अंतरात. २३

 

साक्ष भंडारा डोंगर

कर्मभूमी देहू गाव 

ज्ञानकोश अध्यात्माचा

नावं त्याचे तुकाराम…! २४

 

सत्यधर्म शिकवला

पाखंड्यांना दिली मात

जगायचे कसे जगी 

वर्णियले अभंगात…! २५

 

युग प्रवर्तक संत

शिवराया आशीर्वाद

ज्ञानगंगा विवेकाची 

तुकोबांच्या साहित्यात…! २६

 

सांप्रदायी प्रवचनी 

नामघोष  ललकार

ज्ञानदेव तुकाराम

पांडुरंग जयकार…! २७

 

नाना दुःख सोसताना

मुखी सदा हरीनाम

झाले कळस अध्याय

संतश्रेष्ठ तुकाराम…! २८

 

तुकोबांच्या शब्दांमध्ये

सामावली दिव्य शक्ती

तुका म्हणे नाममुद्रा

निजरूप विठू भक्ती…! २९

 

नांदुरकी वृक्षाखाली

समाधीस्थ तुकाराम

देह झाला समर्पण

गेला वैकुंठीचे धाम…! ३०

 

फाल्गुनाच्या द्वितीयेला

पुण्यतिथी महोत्सव

संत तुकाराम बीज

अभंगांचा शब्दोत्सव..! ३१

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ घाट कहाणी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? घाट कहाणी… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

मानव आणि निसर्ग यात

एकदा भांडण की जाहले

मान व पाठ एक करून

आव्हान हसत स्विकारले॥

राईचा त्या पर्वत बनला

दोन गावात मज्जाव आला

राई पर्वतांची उभी राही

मानवाला निर्बंध पडला॥

शिवा युक्ती मनी आठवली

शिव शंभूची प्रार्थना केली

शिवा म्हणूनी दोन गावांना

वाघ नखे हाती चढवली॥

पोट पर्वताचे टरटरले

मनू हस्त ना थरथरले

पोटमाळे केले पर्वतांचे

मार्ग त्यातूनच निर्मियले॥

घाट गाव जोड प्रकल्पाचा

निर्धाराने पहा पूर्ण केला

घाट झाली आता वहिवाट

आता मधे निर्बंध नुरला॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विरून गेला पट सतरंगी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ विरून गेला पट सतरंगी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

विरून गेला पट सतरंगी

सरले गारुड ऋतुगंधांचे

कळले नाही कधी आटले

कढ व्याकुळही घनांतरीचे !

 

मंद जाहले गगनदीपही

दंतकथा जणु टिपुर चांदणे

वठली झाडे , पसार पक्षी

सुने सुने वन उदासवाणे !

 

गवतावरले थेंब दवाचे

अता न हळवे पूर्वीइतुके

पूर ओसरे गडद धुक्याचा

पुनश्च डोंगर होत बोडके !

 

कधीकाळच्या निळ्या नभाची

थंड तिह्राइत साद दादही

फडफड थोडी व्याकुळ पंखी

सरता सरता सरेल तीही !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 175 ☆ झाडे… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 175 ?

💥 झाडे… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

झाडे दिसतात सर्वदूर

जाऊ तिथे जिकडे तिकडे,

माहेरच्या वाड्याभोवती,

पिंपर्णीची पाच झाडे,

त्यांच्या फांदी फांदीवर

आपसुकच जीव जडे !

 

आजोळच्या बंगल्याजवळ

 गुलमोहराचे लाल सडे

दारापुढच्याआंब्याखाली,

माझे बालपण झुले !

 

शाळेसमोर शिरीषवृक्ष,

त्याच्या आठवणी लक्ष लक्ष !

 

सासरच्या इमारतीपाशी

 पांगारा आणि सोनमोहर

खिडकीतून देत असतात,

मूक पहारा अष्टौप्रहर!

 

कितीतरी झाडे अशी

आयुष्याशी नाते जोडतात,

प्रवासात, वळणावर,

झाडे पुन्हा पुन्हा भेटतात,

निश्चल असली तरीही,

आठवणींचा झिम्मा खेळतात!

 

झाडे कधीच भांडत नाहीत

ती फक्त माया करतात,

आयुष्यभर माणसांवर

आपली गर्द छाया धरतात!

© प्रभा सोनवणे

१६ मार्च २०२३

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पालवी…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पालवी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

माझ्या रानात,रानात

तुझ्या झाडाची पालवी

गर्द सावल्या,सावल्या

माझ्या मनाला झुलवी

 

जस सपान, सपानं

एक असाव घरटं

दोन पाखरं,पाखरं

गुज प्रेमाच चावट.

 

गं तुझ हिरवं लेण

माझ्या काळजात ठाण

काळी पांघर हलते

तुला जल्माचीच आण.

 

वारा धावतो,धावतो

सुसाट पिसाट खुळा

वर आभाळ,आभाळ

चुंबते ओढ्याच्या जळा.

 

आता बांधात,बांधात

सळसळ चाल धुंद

झाली चाहुल-चाहुल

सांज येळची ही मंद.

 

पुन्हा भेटशी भेटशी

अशी दुपार वकत

तुझ्या पालवीत जीव

आयुष्य गेले थकत..

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares