श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ विरून गेला पट सतरंगी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

विरून गेला पट सतरंगी

सरले गारुड ऋतुगंधांचे

कळले नाही कधी आटले

कढ व्याकुळही घनांतरीचे !

 

मंद जाहले गगनदीपही

दंतकथा जणु टिपुर चांदणे

वठली झाडे , पसार पक्षी

सुने सुने वन उदासवाणे !

 

गवतावरले थेंब दवाचे

अता न हळवे पूर्वीइतुके

पूर ओसरे गडद धुक्याचा

पुनश्च डोंगर होत बोडके !

 

कधीकाळच्या निळ्या नभाची

थंड तिह्राइत साद दादही

फडफड थोडी व्याकुळ पंखी

सरता सरता सरेल तीही !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments