मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सराव… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– सराव…– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

शिक्षण आता बास झालं  

कार्यक्रम  करावे म्हणतो

माईक धरून गाण्याचा

म्हणून सराव करतो.

रसिकांसमोर तसंच जाणं 

खरं म्हणजे धाडस आहे

लपून छपून सराव करणे

सध्या माझे चालू आहे

माईकशी मेळ जमला की

कार्यक्रम  करणार  बरं 

ऐकायला सगळे याल ना !

सांगा अगदी खरं  खरं  

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पांडुरंगा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ पांडुरंगा…  ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(व्योमगंगा)

पंढरीला वैष्णवांची मांदियाळी पांडुरंगा

चंद्रभागा देवतांचे पाय क्षाळी पांडुरंगा

 

भक्त आले संत आले लाभ घेती  दर्शनाचा

आत्मरंगी रंगले ते देत टाळी पांडुरंगा

 

मोक्षप्राप्ती मागताना एकवेडी आस आहे

काळजाच्या अंतरंगी मूर्त काळी पांडुरंगा

 

जीवनाची बाग आहे तू दिलेले दान येथे

फुलव तू ती काळजीने होत माळी पांडुरंगा

 

तूच दाता तूच त्राता देह माझा चंदनाचा

घातली मी माळ कंठी गंध भाळी पांडुरंगा

 

दान आता मागतो मी जगवण्याला सत्व माझे

नाचताना वाळवंटी देत हाळी पांडुरंगा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 158 – नको गर्व वेड्या ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 158 – नको गर्व वेड्या ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

नको गर्व वेड्या

वृथा या धनाचा।

असू देत ओला

 तो कोना मनाचा।

 

खुळी द्वैत बुद्धी

तुला साद घाली।

अथांग मनाला

कुठे जाग आली।

 

हा पैसा नि सत्ता

असे धूप छाया।

तू धुंदीत यांच्या

नको तोलू माया।

 

लाखो सिकंदर

इथे आले गेले।

सत्तेमुळे कोणा

अमरत्व आले।

 

नको देऊ थारा

मनाच्या तरंगा।

विवेकी मनाला

धरी अंतरंगा।

 

बोली मनाची ही

मनाला कळावी।

निस्वार्थ हळवी

सरम जुळावी।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #180 ☆ पदोपदी वारी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 180 – विजय साहित्य ?

🌼 पदोपदी वारी…! 🌼 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आत्मानंदी बोध, आळंदीचे धाम

मुखी हरीनाम, शुभारंभी…! १

 

जन्म जन्मांतरी, नष्ट‌ होई पाप

पुण्याचा प्रताप,  पुण्यशील..! २

 

पालखी विठोबा , पुणे शहरात

माहेरपणात, रमे वारी…! ३

 

अष्टांग योगाचा, दिव्य दिवे घाट

भक्ती रस लाट, उचंबळे…! ४

 

सप्तचक्र‌ ताबा, प्राणायाम ठेवा

सोपानाची सेवा,‌सासवड…! ५

 

जिंकतो इंद्रिये, विनासायास

जेजुरी निवास, मोक्षदायी…! ६

 

जिव्हाळा‌ संपन्न, वाल्ह्याचा मुक्काम

प्रेमळ विश्राम, पालखीचा..! ७

 

वैष्णवांसी लाभे , आनंदाचा कंद

सज्ज हे लोणंद, स्वागतासी…! ८

 

तरडगावात, ब्रम्हानंदी सुख

चिंतनी सन्मुख, पांडुरंग…! ९

 

ब्रम्ह पुर्ण सत्य, फलटणी  बोध

जीवनाचा शोध, संकीर्तनी..! १०

 

द्वंद्वमुक्त होई, बरड निवासी

वारीचा प्रवासी, सुजलाम..! ११

 

नातेपुते गावी, मुक्त मोहातून

व्यक्त श्वासातून, पांडुरंग…! १२

 

ज्ञानाची साखळी, माळशिरसात 

भक्ती अंतरात, नवविधा…! १३

 

नको‌ वेळ वाया, सांगे वेळापूर

दिसे अंतपूर, पंढरीचे…! १४

 

वाखरी मुक्कामी, वाचासिद्ध वाणी

प्रासादिक गाणी,  ठायी ठायी..! १५

 

पांडुरंगमय, होई वारकरी

कृपाछत्र धरी, पांडुरंग…! १६

 

केला नामोल्लेख,पदोपदी वारी

सुखदुःखे हारी, मुक्कामात..! १७

 

कविराज चित्ती, प्रतिभेची मात्रा

घडविली यात्रा, प्रासादिक..! १८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विश्व नेत्रदान दिवस निमित्त – नवीदृष्टी…☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ विश्व नेत्रदान दिवस निमित्त – नवीदृष्टी… ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆

पाहू दे शोभा अरुणोदयाची

अन् यामिनीच्या कौमुदीची

सप्तरंगी इंद्रधनुच्या किमयेची

रंगावलीने सजलेल्या अंगणाची

 

कसा दिसतो रे थेंब वर्षावाचा

अन् धरतीवरी हिरवा गालिचा

कसा विहरतो मयूर उपवनी 

अन् गाणारे कोकिळ मैना वनी

 

डोळे पाहतील रंग वात्सल्याचा

ज्याने अंत केला अंधत्वतमाचा

अन् घेतला वसा आदर्श तेजाचा

दृष्टी -अमृत देऊन अमरत्वाचा

 

सुंदर जग पाहण्यासाठी जगावे

परोपकारी होऊन संजीवन द्यावे

मृत्यू पूर्वी नेत्रदान करून जावे

मरावे परी दृष्टी रूपी उरावे

 

मृत्यू पूर्वी दान देऊन जा रे

दृष्टी -अमृत देऊन अमर हो रे

नको आता खंत नेत्रहीनतेची

मजा लुटू द्या या जीवनपटाची

 

© सौ. मुग्धा कानिटकर

विश्रामबाग, सांगली

फोन 9403726078

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ किंमत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ किंमत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

नभी मेघांचे कसे हे,

काठ भरजरी झाले.

संध्येच्या आसंमंताचे,

रंग शर्वरी झाले.

परतून पाखरे गेली,

सैरभैर वारे झाले.

सळसळणार्‍या पानांनी इथल्या ,

गलबलून वृक्ष आले.

लखलखून रेघ वीजेची,

उस्फूर्त येउन गेली.

कडकडणार्‍या मेघांनी मग,

बरसात सरींची केली.

स्पंदने हृदयाची माझ्या ,

पावसाशी जुळली होती.

आवेगी थेंबथेंबांची मज,

किंमत कळली होती.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #166 ☆ संत चांगदेव… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 166 ☆ संत चांगदेव☆ श्री सुजित कदम ☆

योग सामर्थ्य प्रचुर

चांगदेव महाराज

चांगा वटेश्वर स्वामी

तपश्चर्या शोभे साज…! १

 

तापी पुर्णा नदीतीरी

केली तपश्चर्या घोर

चौदा सहस्त्र वर्षाचे

योगी चांगदेव थोर…! २

 

प्रस्तावना काय लिहू

चांगदेव संभ्रमात

आत्मज्ञान गुरू कृपा

ज्ञाना निवृत्ती शब्दात…! ३

 

संत ज्ञानेश्वर कीर्ती

ऐकुनीया घेई भेट

पत्र कोरेच धाडले

अहंकारी भाव थेट….! ४

 

भेटण्यासी आला योगी

वाघारूढ होऊनीया  

दाखविला चमत्कार

बोधामृत देऊनीया…! ५

 

चांगदेव पासष्टीने

दिलें पत्रास उत्तर

मुक्ताईस केले गुरू

सेवा कार्य लोकोत्तर…! ६

 

गुरू शिष्य प्रवासात

चांगदेवा उपदेश

मेळवावा अंतरंगी

मानव्याचा परमेश…! ७

 

स्फुट काव्य अभंगात

चांगदेव विवेचन

आयुष्याचे कथासार

योग साधना मंथन…! ८

 

सांप्रदायी साहित्याला

दिली योगशक्ती जोड

मन निर्मळ पावन

घेई हरीनाम गोड…! ९

 

चौदा सहस्त्र वर्षाचा

योगी राही कोरा कसा

मुक्ता करी प्रश्न साधा

दिला भक्ती मार्ग वसा…! १०

 

 

आत्म स्वरुपाचे ज्ञान

लोक कल्याणाचा वसा

ज्ञाना निवृत्ती मुक्ताई

चांगदेव शब्द पसा…! ११

 

अंतरंगी तेजोमयी

होते ईश्वराचे रूप

गर्व अहंकार नाश

प्रकाशले निजरूप….! १२

 

ज्ञानदेव गाथेतील

केले अभंग लेखन

तत्वसार ओवी ग्रंथ

चांगदेव सुलेखन…! १३

 

दर शंभर वर्षांनी

बदलले निजधाम

योग साधना प्रबळ

तप साधना निष्काम…! १४

 

चौदा सहस्त्र वर्षाचा

संत योगी चांगदेव

तपश्चर्या भक्ती भाव

दैवी अध्यात्मिक ठेव…! १५

 

पुणतांबा पुण्यक्षेत्री

आहे समाधी मंदिर

संजीवन समाधीत

ध्यानमग्न  गोदातीर…! १६

 

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ माया काही संपत नाही… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सौ गौरी गाडेकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  माया काही संपत नाही… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सौ गौरी गाडेकर ☆

श्री आशिष बिवलकर   

(१ )

बसवला नातू खांद्यावर,

आजा आनंदात मिरवीत !

पिढ्यानं पिढ्या हेच  चाले,

वारसाचा कित्ता  गिरवीत !

एक आयुष्याच्या संध्याकाळी,

अस्ताला चाललेला दिनकर !

दुसरा केशरी प्रभा घेऊन,

उगवलेलला कोवळा प्रभाकर !

आयुष्याचे ऊन पावसाळे झेलून,

एक अनुभवाने झुकलेला वृक्ष !

दुजा बिजातून अंकुरलेला,

उज्वल भविष्याची देणार साक्ष !

दोन टोकाच्या दोन पिढ्या,

पण नाते ते आपुलकीचे !

एक दुजाकडे डोळे लावलेले,

त्यांच्या वयातल्या करमणुकीचे !

आजा देई नातवाला,

संस्काराची  शिदोरी !

कोवळ्या वेलील्या,

सुकल्या काठीची उभारी !

कष्टाने रखरखलेले हात,

नातवाला कधीच बोचत नाही !

काळजी घेणारे मांजराचे दात,

तिच्या पिलाना कधी टोचत नाही !

म्हातारपणात बालक होऊन,

बालकासंगे आनंदात खेळावे !

दुसरेच असते ते बालपण,

आनंदी क्षणांचे  मध घोळावे !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

सौ. गौरी गाडेकर

( २ )

आज्याचे हात निबरलेले 

नातवाला टोचत नाहीत

केससुद्धा आधार देतात

माया काही संपत नाही. —

चष्म्या मधून रस्ता पहात 

जपून आजा चालत राही 

मायेच्या या गाठोड्याला 

जीवापरी जपत राही —

सरती पिढी वारसाला

डोक्यावर बसून घेई 

आपल्यापेक्षा मोठा हो 

कृतीतून सांगत राही — 

दुधापेक्षा साय मऊ 

स्नेह तिथे गोळा होई 

क्षण क्षण आनंदाचा

जाता जाता जगून घेई  —

एक नागडा दुसरा उघडा

कुणाला काही वाटत नाही

माया असते काळजात

तिथे कापडाची गरज नाही  —

दोघांचही बालपणच 

दोन टोकं जीवनाची

भूपाळी ती एकाची नि 

भैरवी ती दुसऱ्याची — 

कवी : एक अज्ञात डाॅक्टर

प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मला काय त्याचे?… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

 

? कवितेचा उत्सव ?

☆ मला काय त्याचे?… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(षडाक्षरी)

पेटलेले रान

दूर वणव्यात

सारे काही छान

माझ्या ह्या गावात

 

वन्य जीवितांचा

भीषण आकांत

मला काय त्याचे

माझे काय त्यात

 

रानातील आग

आली रे गावात

आग दूर किती

इथे मी निवान्त

 

दशदिशातुन

डोंब उसळत

मला काय त्याचे

माझे त्यात काय

 

गावातील आग

आली रे वस्तीत

आक्रोश किंकाळ्या

काळजा भेदीत

 

त्रयस्थ खिडकी

थरार पाहत

मला काय त्याचे

माझे काय त्यात

 

वस्तीतील आग

घुसली घरात

सुसाट वेगात

जिभल्या चाटीत

 

खुद्द मीच आता

राक्षसी ज्वालात

“वाचवा वाचवा”

टाहो हा फोडीत

 

एकही न पुढे

मदतीचा हात

सारेच तटस्थ

मंत्र हा घोकीत :

 

” मला काय त्याचे

माझे काय त्यात

मला काय त्याचे

माझे काय त्यात “

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 187 ☆ जन्म मृत्यू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 187 ?

जन्म मृत्यू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

झाले असेल स्वागत

जन्मा आले तेव्हा खास

मोठ्या मुला नंतरची

लेक आनंदाची रास

 

जन्मगाव आजोळच

आजी मायेचाच ठेवा

भाग्य माझे फार थोर

कसे घडविले देवा

 

असे चांदण्यांचा गाव

खेळायला, फिरायला

सुशेगात होई सारे

आरामात जगायला

 

सुखासिन आयुष्यात

घडे भले बुरे कधी

लपंडाव नियतीचा

कधी गवसली संधी

 

सुखकर हे जगणे

कधी पडले ना कष्ट

दिस आले दिस गेले

लागो कुणाची न दृष्ट

 

अशी संतुष्टी लाभली

नसे कशाचीच हाव

माझी कविताच आहे

सा-या आयुष्याची ठेव

 

आता निरोप घेताना

आहे एवढीच आस

मिळो सुखांत जिवाला

तृप्त शेवटचा श्वास

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares