?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  माया काही संपत नाही… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सौ गौरी गाडेकर ☆

श्री आशिष बिवलकर   

(१ )

बसवला नातू खांद्यावर,

आजा आनंदात मिरवीत !

पिढ्यानं पिढ्या हेच  चाले,

वारसाचा कित्ता  गिरवीत !

एक आयुष्याच्या संध्याकाळी,

अस्ताला चाललेला दिनकर !

दुसरा केशरी प्रभा घेऊन,

उगवलेलला कोवळा प्रभाकर !

आयुष्याचे ऊन पावसाळे झेलून,

एक अनुभवाने झुकलेला वृक्ष !

दुजा बिजातून अंकुरलेला,

उज्वल भविष्याची देणार साक्ष !

दोन टोकाच्या दोन पिढ्या,

पण नाते ते आपुलकीचे !

एक दुजाकडे डोळे लावलेले,

त्यांच्या वयातल्या करमणुकीचे !

आजा देई नातवाला,

संस्काराची  शिदोरी !

कोवळ्या वेलील्या,

सुकल्या काठीची उभारी !

कष्टाने रखरखलेले हात,

नातवाला कधीच बोचत नाही !

काळजी घेणारे मांजराचे दात,

तिच्या पिलाना कधी टोचत नाही !

म्हातारपणात बालक होऊन,

बालकासंगे आनंदात खेळावे !

दुसरेच असते ते बालपण,

आनंदी क्षणांचे  मध घोळावे !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

सौ. गौरी गाडेकर

( २ )

आज्याचे हात निबरलेले 

नातवाला टोचत नाहीत

केससुद्धा आधार देतात

माया काही संपत नाही. —

चष्म्या मधून रस्ता पहात 

जपून आजा चालत राही 

मायेच्या या गाठोड्याला 

जीवापरी जपत राही —

सरती पिढी वारसाला

डोक्यावर बसून घेई 

आपल्यापेक्षा मोठा हो 

कृतीतून सांगत राही — 

दुधापेक्षा साय मऊ 

स्नेह तिथे गोळा होई 

क्षण क्षण आनंदाचा

जाता जाता जगून घेई  —

एक नागडा दुसरा उघडा

कुणाला काही वाटत नाही

माया असते काळजात

तिथे कापडाची गरज नाही  —

दोघांचही बालपणच 

दोन टोकं जीवनाची

भूपाळी ती एकाची नि 

भैरवी ती दुसऱ्याची — 

कवी : एक अज्ञात डाॅक्टर

प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments