मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 161 – माझा पांडुरंग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 161 माझा पांडुरंग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

भक्ती वेडा पुंडलीक

भक्ती त्याची साधा भोळी..।

ऊभा राही चंद्रमौळी …।

विटेवरी…।।१।।

धन्य धन्य  सखूबाई ..।

देव बंदी तिच्या घरी..।

संत सखू वारी करी..।

पंढरीची…।।२।।

जनाईचे जाते ओढी.,।

नाम्यासाठी खीर खाई…।

गुरे राखी चोख्या पायी…? 

पांडुरंग …।।३।।

बादशाही दरबारी..।

महार झाला जगजेठी..।

हातामधे घेऊन काठी..।

दामासाठी..।।४।।

थोर भक्त अधिकार..।

देव बनला कुंभार।

देई मातीला आकार..।

गोरोबांच्या…।।५।।

भक्तांसाठी ना ना रंग..।

उधळीतो पांडुरंग ..।

रोज कीर्तनात दंग…।

 नामाचीया…।।६।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #183 ☆ मनी‌मानसी… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 183 – विजय साहित्य ?

 मनी‌मानसी… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

(वृत्त : पृथ्वी ) २४ मात्रा प्रत्येक ओळींत

मनपटलावर काजळकांती

कुणी कोरली

तुझ्या घराची वाट वसंता दुःख

घालवी

नको अबोला,नकोच सलगी,

प्रेम राहुदे

तुझ्या घराचे दार मोकळे,चैत्र पालवी.

हवी कशाला, सुखे उशाला,रहा अंतरी

तना मनाची, शाल धुक्याची, सौख्यसुंदरी

सुर्यगंध नी शब्दसुतेची काव्यस्पंदने

सुमन शलाका,प्रेम प्रितीची,

स्नेह मंदिरी.

आधाराची, प्रेमळ छाया, जगण्याचे बळ

जीवननौका,तरंग केशर,

तरते अविचल

ऋणानुबंधी, जुळले धागे,

संचित ठेवा

मित्र मिळावा,तुझ्या सारखा,

पचवी वादळ.

एक मागणे,तुला ईश्वरा, रहा पाठिशी

सखा सोबती, अतूट नाते, असो गाठिशी

नाना‌रूपे,भेट जीवनी, तू वरचेवर

गोंदण झाले, तव स्नेहाचे,

मनी मानसी.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मेघ-मल्हार…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “मेघ-मल्हार…” ☆ श्री आशिष मुळे ☆

टाकून केश-संभार उभ्या

निष्प्राण या वेली

उभे निःशब्द वृक्ष

अजुनच निस्तब्ध होऊनी

 

पसरली कोरडी धरती

मैलों न मैल भेगाळली

सरकली निवडुंगाच्याही

पाया खालची माती

 

मनात मेघ बळीराजाच्या

नयानांतुनी बरसती त्याच्या

चिंता-सर्प विहरती आता

छोट्याशा नंदनवनात त्याच्या

 

प्रेम पक्ष्यांच्या मावळती आशा

उन्हात या हरवले ते दिशा

लेखण्या संतप्त कवीयांच्या

फेकती आज नभात पाशा

 

आता वेळ लावू नकोस रे

ऋतुकाल विसरू नकोस रे

प्रताप नभांत करावया

फक्त विजाच तळपवू नकोस रे

 

सोडून सिंहासन तुझे

आता उतरून खाली ये

बिलगावया प्रियेला तुझ्या

आज आत्ता लगेच ये….

 

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंगबेरंगी  शब्दाविष्कार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ रंगबेरंगी  शब्दाविष्कार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

     रंगबेरंगी शब्दांनी

       कवणांची रंगावली

     हृदयाच्या या अंगणी

        कृष्णनाद केकावली.

     चंचल ऋतू चलन

         भक्तीप्रीय  शब्दांजली

     अक्षर जीवन रंग

           राधेसाद  कृष्णांजली.

     पर्णलेखणी मुरली

           भावचरणे अधीर

     लयताल  सुमधूर

            ज्ञानदर्शन  मंदिर.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #169 ☆ आसरा…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

 

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 169 ☆ आसरा…! ☆ श्री सुजित कदम ☆

अभंग वृत्त

इवलासा जिव

फिरे गावोगाव

आस-याचा ठाव

घेत असे…!

 

पावसाच्या आधी

बांधायला हवे

घरकुल नवे

पिल्लांसाठी..!

 

पावसात हवे

घर टिकायला

नको वहायला

घरदार..!

 

चिमणीच्या मनी

दाटले काहूर

आसवांचा पूर

लोटलेला..!

 

पडक्या घराचा

शोधला आडोसा

घेतला कानोसा

पावसाचा….!

 

बांधले घरटे

निर्जन घरात

सुखाची सोबत

होत असे..!

 

घरट्यात आता

रोज किलबिल

सारे आलबेल

चाललेले..!

 

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पक्षी का नक्षी… – कवी – श्रीपाद  देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

?  “ पक्षी की नक्षी ?” – कवी – श्रीपाद  देशपांडे ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

ऊन सावली सुंदर नक्षी 

फांदीवर तो बसला पक्षी 

छायाचित्र हे कुणी काढले 

वळून पाहतो निरखून पक्षी —

निसर्ग रचना किती मनोहर 

वसती येथे अगणित पक्षी 

सौंदर्याची जाण ना त्याला 

पंखावर ही दुर्मिळ नक्षी —-

बघणार्‍याने बघत रहावे 

कुणी अचानक दृश्य टिपावे 

तोच म्हणे मी याचा साक्षी 

सावली मधून ही बनते नक्षी —-

एकच फांदी एकच पक्षी 

निसर्ग असे जो त्यांचा साक्षी 

ऊन कोवळे कोवळी पाने 

त्यातून इतकी सुंदर नक्षी —-

वर्णन करण्या शब्द अपुरे 

इतका सुंदर दिसतो पक्षी 

सुंदरता हा निसर्ग देतो 

आपण व्हावे त्याचे साक्षी —

         (हा फोटो ज्याने कुणी काढला त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार) 

कवी – श्रीपाद देशपांडे 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पावसाचे स्वरविश्व ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? कवितेचा उत्सव ?

💦 पावसाचे स्वरविश्व 💦 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

 कडाडले मेघ नभी..

 आला काळोख दाटून…

 बिजली ही नृत्य करी..

आसमंत झळाळून…।

 

थेंब थेंब पर्जन्याचा..

हळूच उलगडला…

पावसाच्या लडीतून..

धुवाधार कोसळला…|

 

मेघ आळवी मल्हार..

वारा वाजवी पिपाणी…

पर्जन्य स्वर कानात..

अन् पावसाची गाणी…|

 

 एक चिंब स्वरविश्व ..

उभं केलं पावसानं…

 छान लागलासे सूर..

 हरपले सारे भान…|

 

 मैफिलीला चढे रंग..

डोले भवताल सारा…

 मनमोर अंतरीचा..

 फुलवी सुखे पिसारा…|

💦🌨️.

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 190 ☆ गुरूवंदना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 190 ?

☆ गुरूवंदना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

माझी गुरूमाय कलावती गं माऊली

किती दुःखी कष्टी मन आई सुखाची  सावली!

लाभे निरंतर छाया,दूर पळे कासाविशी !

आई तुमच्या कृपेची होऊ उतराई कशी?

आई मायेचा सागर कधी आटतच नाही

माझी झोळी जडशीळ तरी फाटतच नाही!

 मूढ मी लेकरू अन आई अगाध अमोल

त्यांचे उपकार माझ्या आत हृदयात खोल!

भोळा भक्तिभाव माझा पायी तुमच्या अर्पण

व्हावा उभा जन्म माझा तुमच्या भक्तिचाच सण!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बहर… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बहर ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

हिरव्या हिरव्या कुरणावरती

तृणपुष्पे डोलती

सौंदर्याने नटली सृष्टी

पक्षीगण विहरती

 

रिमझिम आल्या वर्षा सरी

गंधयुक्त ही कुंद हवा

चल ना सखया चिंब व्हावया

सोबतीस मज तूच हवा

 

दर्यावरती जाऊ आपण

पाहू सागराचे उधाण

जलबिंदुंच्या शीतल स्पर्ष्ये

विसरू आपण देहभान

 

पुळणीत चालूया स्वैरपणे

उमटतील ती प्रीत पाऊले

सहवासातच दोघांच्या

पावसात ही प्रीत फुले

 

चाफ्याचा दरवळ प्रीतिस अपुल्या

सुगंधात त्या होऊ धुंद

जिवाशिवाचे मिलन होई

मिलनात नाचू बेधुंद

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #196 ☆ ‘सपान…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 196 ?

सपान ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कशी उडाली उडाली वाऱ्यासोबत ही माती

सोडताना विसरली आहे जुनी नातीगोती

कधी पाण्याच्या सोबत डोळा चुकवून जाते

सोसाट्याचा वारा येता पहा कशी उधळते

तिच्या जाण्याने ही दैना आणि दुय्यम गणती

सकदार माती होती आज तिचा कस गेला

आब नाही राहिलेली डागाळला फेटा शेला

काल शेतात वेचले होते जोंधळ्याचे मोती

काय पाहिलं मी होतं माझ्या शेताचं सपान

कसं सांगू कशी होती शेती माझी रूपवान

दृष्ट लागली मातीला गुंग झाली माझी मती

चक्रीवादळने नेली होती माती पळवून

झंझावात संपताच दिले रस्त्यात सोडून

कर्मयोग आहे का हा आहे सांगा कर्मगती ?

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares