वेळ- दोनच अक्षरी शब्द.पण नाना प्रकारचे अर्थ सामावणारा. कारण संदर्भानुसार अर्थ बदलत जातात हो. नीला मैत्रिणीला म्हणाली, ‘अग,एक प्रदर्शन पाहायला जायचं आहे. वेळ आहे का तुला माझ्याबरोबर यायला.’ ‘ हो.एका पायावर तयार आहे बघ यायला.’ नीला पटकन उत्तरली. तोच आई नीलाला जेवायला बोलवू लागली, नि नीला आईस म्हणाली, “नाही ग आई. वेळ लागेल थोडा. मी एक आर्टिकल लिहितेय. ते पुरं होत आलय. ते झाल्यावर येते. इथं पहिल्यांदा वेळ या शब्दाचा अर्थ सवड होतो तर तर दुसऱ्या उदाहरणात वेळ म्हणजे उशीर.
रामराव असेच मित्रांच्यात बसून बोलतांना म्हणाले, “ माझ्या एका मित्रावर, दिनेशवर काय वेळ आलीय बघा. लेकीला कॅन्सर झाला नि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही उपयोग झाला नाही. शिवाय कर्जही वाढले.” इथं “वेळ ” म्हणजे वाईट परिस्थिती.
कोणत्याही गोष्टीसाठी वेळ महत्वाची असते. आपले नियोजन योग्य, काटेकोर असेल तर कोणत्याही वेळेस एखादे नवीन काम सुरू केले तर ते नीट पार पडते. याउलट आपली योग्य तयारी नसेल तर अगदी मुहूर्त पाहून काम सुरू केले तरी ते यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही.वेळ पाळणे सुद्धा महत्वाचे असते हं. वेळ पाळण्याची सवय म्हणजे वक्तशीरपणा. वक्तशीरपणा हा एक चांगला गुण आहे, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दुसऱ्यावर चांगला पडतो.
कोणतेही काम वेळेत करण्याच्या सवयीमुळे आपण कामे वेळेत पूर्ण करतो.वेळ दरवेळी सोयिस्कर असतेच असे नाही. पण काही वेळा अवेळही योग्य प्रकारे हाताळल्याने आपण कोणत्याही प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडतो.चांगली वेळ आपण हसतमुखाने चांगल्या प्रकारे वर्तन करतोच पण वेळ वाईट असताना सुद्धा जो विवेकाने वर्तन करुन त्या वाईट वेळीही चांगला वागतो नि कोणत्याही प्रसंगास व्यवस्थित सामोरा जातो तोच खरा.
कातरवेळ म्हणजेच तिन्हीसांजेची वेळ थोडी हुरहूर निर्माण करणारी असते.सकाळची वेळ प्रसन्नच ! कारण सूर्यदेवांच्या आगमनानं पृथ्वीवर चैतन्यमय वातावरण असते. फुलांच्या उमलण्याची, सूर्यविकासी कमळे उमलण्याची ही वेळ खरच आनंदमय असते. सकाळपासून सूर्यास्तापर्यंत प्रकाशाची सोबत असते. त्यामुळे एकाकीपणा जाणवत नाही. त्यामानाने रात्रीच्या वेळी एकाकी वाटते. कधीकधी मनात भीतीही दाटते.
परीक्षार्थी ज्या वेळेची उत्सुकतेने वाट पाहतात ती वेळ निकालाची. निवडणुक लढविणारे उमेदवारसुद्धा मतमोजणीनंतर विजय घोषित होण्याच्या वेळेची वाट पाहतात अगदी उतावीळपणे. म्हणूनच म्हणावे वाटते वेळेचे नियोजन हवेच. मग काम बौद्धिक असो, आर्थिक असो की अन्य कोणत्याही प्रकारचे….. कारण वेळ काही कधी सांगून येत नाही.
“ हॅलो ss .. हा तुझा बाबा रिटायर झाला गं एकदाचा ss !!” ..
बाबा आपल्या चेन्नईत राहणाऱ्या एकुलत्या एका मुलीला फोनवर अगदी उत्साहात सगळं सांगत होते.
“ वा वा !! मग या आता दोघेही आराम करायला थोडे दिवस इकडे !”
“ नको गं बाई …. तुमचा राजाराणीचा संसार त्यात या म्हातारा-म्हातारीची लुडबूड कशाला उगाच ?? आमची मुंबईच बरी आपली.. आणि खरं सांगू का ?? इतकी वर्ष कामाचा व्याप आणि नोकरीतल्या बदल्यांमुळे तुझ्या आईला अजिबात वेळ देऊ शकलो नाही ss पण आता पुढचं सगळं आयुष्य फक्त तिच्यासाठीच राखून ठेवलंय बघ. तेव्हाची तिची राहिलेली हौसमौज शक्य तितकी पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे आता!
बापलेकीच्या मनसोक्त गप्पा झाल्या आणि आई-बाबा ठरल्याप्रमाणे निवृत्तीनंतरचं निवांत आयुष्य जगू लागले. फिरणं, नाटक-सिनेमा, वाचन, मनात आलं की बाहेर जेवण, देवदर्शन, सण, नातेवाईक, समारंभ आणि बरंच काही .. या ना त्या निमित्ताने बाबा कायम आई सोबत असायचे. पण हा मनमुराद जगण्याचा आनंद फार काळ काही त्यांना घेता आला नाही. तीन-चार वर्षातच आईला काहीशा ‘अकाली वार्धक्याने’ ग्रासलं. हातपाय दुखायचे. अशक्तपणा आला होता. बाहेर पडणं तर पूर्णच बंद. जेमतेम घरच्याघरी कशीबशी फिरायची. भरीला बारीक सारीक इतर त्रास होतेच. पुढे रोजचं घरकाम करणं सुद्धा कठीण झालं. लेकीने येऊन घरकाम आणि स्वयंपाकासाठी एका मावशींची व्यवस्था केली. शिवाय ती स्वतः दोनेक महिन्यातून एकदा तरी येऊन जायची. हळूहळू आईची दृष्टी कमी झाली. सहाजिकच लिखाण, वाचन, टीव्ही बघणं यावर बंधनं आली. देवादिकांचं करणं, जपमाळ, देवपूजा यात आता जास्त वेळ घालवायला लागली. या सगळ्यामुळे आधीच मितभाषी असलेल्या आईचं बोलणं सुद्धा आधीपेक्षा कमी झालं. उतारवयातल्या या बऱ्यावाईट दिवसांत बाबांची मात्र आपल्या अर्धांगिनीला पूर्ण साथ होती.
आताशा दोघांचा दिनक्रम चांगलाच बदलला होता. अगदी आखून दिल्याप्रमाणे. बाबा दिवसभरात शक्य तितकी घरकामात मदत करायचे. आठवड्यातून एकदा भाजी वगैरे आणायचे. वेळ मिळेल तेव्हा आईला वर्तमानपत्र, मोबाईलवर येणारे लेख-गोष्टी वाचून दाखवायचे. गाणी लावून द्यायचे. आईला शक्यतो घरी एकटे ठेवायचे नाहीत ते. म्हणून दिवसा कुठे जायचे नाहीत पण संध्याकाळी मावशी आल्या की मात्र मोकळ्या हवेत जरा
– 2 –
तासभर एक फेरफटका मारून यायचे. पण त्याचा मार्गही अगदी ठरलेला. सोसायटीच्या आवारात थोडावेळ, मग तिथून लायब्ररी, मग बागेत चालणं, नंतर तिथल्या काही मित्रमंडळींसोबत गप्पा, मग कधीतरी उगाच चणे-शेंगदाणे-फुटाणे घ्यायचे आणि शेवटचा मुक्काम फुलवाल्याकडे. अगदी न चुकता दररोज देवासाठी “ फुलपुडी ” घेऊन यायचे.
असं सगळं सुरू असताना एके दिवशी सकाळी बाबा बाथरूममध्ये पाय घसरून पडले.
शेजाऱ्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. छोटसं फ्रँक्चर असल्यामुळे प्लॅस्टर घातलं. लेक ताबडतोब निघाली आणि संध्याकाळपर्यंत पोचली. पाठीलासुद्धा थोडा मार लागला होता, त्यात वयही जास्त म्हणून “पाच महीने तरी घराबाहेर पडायचं नाही” अशी सक्त ताकीद दिली होती डॉक्टरांनी. घरच्या घरी वॉकर घेऊन फिरायला परवानगी होती फक्त.
“ बाबा ss तुम्ही दोघं चला आता चेन्नईला माझ्याबरोबर.
“ काहीतरीच काय ?? असं जावयाकडे राहतात का इतके दिवस ?”
“ काय बाबा ? असं काही नसतं . हे कसले जुनाट विचार घेऊन बसलात ?”
“ हेहेहे sss अगं गंमत केली गं बाळा. होऊ नयेच पण भविष्यात कधी अगदीच अगतिक झालो तर तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला ? .. पण आत्ता नको . तुझं दिवसभर ऑफिस असतं. त्याचे सुद्धा कामासाठी दौरे सुरू असतात आणि आमचंही इथे सगळं रुटीन सेट झालंय आता. त्यात बदल नको वाटतो, म्हणून म्हणालो !!”.
बाबा ऐकणार नाहीत म्हंटल्यावर शेवटी मुलीनी एका ओळखीच्या संस्थेमार्फत दिवसभर घरी राहून बाबांची काळजी घेऊ शकेल अशा एका विश्वासू मुलाची सोय केली.
दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून सुटका झाली आणि छोट्या अँब्युलंसमधून स्वारी घरी निघाली. वाटेत बाबांनी एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला थांबवायला सांगितलं. खिडकी थोडीशी उघडली आणि बाजूच्या फुलवाल्याला म्हणाले … “ बाबा रे ss .. उद्यापासून जरा घरी “फुलपुडी” देशील का रे ? महिन्याचे पैसे एकदम घे हवं तर आणि तुझे घरपोच देण्याचे काय असतील ते पण सांग !!”.
“ अहो काका , पाठवतो नक्की. दुकान बंद केलं की देईन आणून. आणि पैसे द्या हो आरामात. तुम्ही फक्त लवकर बरे व्हा आता!. पैसे काय आता ऑनलाईन पण येतात !“
“ ते काही मला जमत नाही बुवा अजून !”
हे ऐकून मुलगी म्हणाली, “ बाबा थांबा. ते मी करीन. आता आधी घरी जाऊया लवकर.
“दादा, तुमचा नंबर द्या. मी घरी पोचल्यावर करते ट्रान्सफर लगेच.”
फुलपुडीचं सगळं ठरवून अँब्युलंस घरच्या दिशेने निघाली.
– 3 –
“ काय हे बाबा ? तुमच्या या अवस्थेत त्या फुलपुडीचं काय एवढं अर्जंट होतं का ? आणि तुम्ही कधीपासून इतके धार्मिक झालात हो?”
“ अगं मी आजही अजिबात देवभोळा नाहीये, पण रोज सकाळी देवपूजेला सुरुवात करायच्या आधी तुझ्या आईनी ही फुलपुडी उघडली की त्यातल्या वेगवेगळ्या रंगांची ती प्रसन्न फुलं बघून, त्यांना स्पर्श करून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटतो बघ.
चेहरा खुलतो गं तिचा आणि मग ती तासन् तास तल्लीन होऊन पूजाअर्चा करत असते.
दिवसभरातली ही एकंच गोष्ट ती इतक्या मनापासून करते. म्हणून केवळ हा अट्टाहास.
एकवेळ भाजी-किराणा आणायला एखाद-दोन दिवस उशीर झाला तरी चालेल. आम्ही खिचडी कढी खाऊ, पण तिच्या त्या रोज नव्याने उमलणाऱ्या आनंदाच्या कळीसाठी ती फुलपुडी दररोज घरी येणं माझ्यासाठी महत्वाचं आहे, . कळलं का ? म्हणून तू आपले ते फुलवाल्याचे पैसे मात्र न विसरता पाठव हां! . आणि जो पर्यंत मी बाहेर फिरू शकत नाही तोवर दरमहा पाठवत जा म्हणजे मला उगीच ह्याला त्याला सांगत बसायला नको.
एकहाती तुझ्याकडेच राहू दे हे काम !!”
बाबा निवृत्त झाले तेव्हाच्या त्यांच्या भावना आणि आईला कायम साथ देण्याचा तेव्हा व्यक्त केलेला विचार आजही इतका दृढ आहे हे बघून लेकीलाही दाटून आलं.
“ हो बाबा ss .. हे बघा.. या महिन्याचे लगेच केले सुद्धा ट्रान्सफर मोबाईलवरून. तुम्ही निश्चिंत रहा !!”
मुलगी दोन-तीन दिवस राहून , त्यांचं सगळं मार्गी लावून गेली. “फुलपुडी” मात्र त्या दिवसापासून रोज येऊ लागली. दिड महिन्यांनी डॉक्टरांना दाखवण्यासाठी म्हणून लेक- जावई येऊन गेले. त्यानंतर काही दिवसातच मुलीला तिच्या कंपनीकडून ६ महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जायची संधी चालून आली होती. आई बाबांना कधी काही मदत लागली तर? या काळजीने ती जायला तयार नव्हती पण “अशी संधी वारंवार येत नाही, आता माझी तब्येत सुधारते आहे . तू गेली नाहीस तर आम्हा दोघांना वाईट वाटेल” अशी भावनिक मनधरणी बाबांनी केली आणि शेवटी ती रवाना झाली.
दिवसामागून दिवस सरत होते. बाबा हळूहळू बरे होत होते. प्लॅस्टर निघालं. वॉकर शिवाय चालणं सुरू झालं. परिचारक मुलाचे कामाचे तास हळूहळू कमी करत एक दिवस त्यालाही सुट्टी देऊन टाकली. इतके सगळे बदल होत असले तरी एक गोष्ट तशीच होती ती म्हणजे गेले ५ महीने दररोज संध्याकाळनंतर दारावर अडकवली जाणारी “फुलपुडी”. या ऑनलाईन युगात पैसे भरायला मुंबई-चेन्नई-ऑस्ट्रेलिया सगळं सारखंच असल्यामुळे
– 4 –
मुलगी सातासमुद्रापार गेली असली तरी फुलपुडीचा आणि त्यासोबत येणारा ‘आनंदाचा रतीब’ नियमित सुरू होता. आता बाबा अगदी पूर्ण बरे झाले होते. एके दिवशी दुपारी त्यांनी मुलीला फोन केला. तब्येतीची सगळी खबरबात दिली आणि म्हणाले ..
“ अगं बाळा .. आता पुढच्या महिन्यापासून तू ते फुलपुडीचे पैसे भरू नकोस. मी आता पूर्वीसारखा आणत जाईन रोज फिरायला जाईन तेव्हा !”.
असं म्हंटल्यावर मुलीने डोळे एकदम मोठे केले, कपाळावर हात मारला आणि जोरात ओरडलीच ..
“ ओह नो sss बाबा बाबा .. आय अॅम एक्सट्रिमली सॉरी बाबा. मी इकडे यायच्या तयारीत साफ विसरून गेले ते फुलपुडीचं. आणि इथे आल्यावर तर काम इतकं वाढलंय ना!. शी sss असं कसं विसरले मी . माझ्यामुळे फुलपुडी येणं बंद झालं तिकडे. बाप रे!
आणि आईच्या पूजेचं काय ?
एकदम अपराधी भावनेने तिचा डोळ्यांचा बांध फुटला. तिची ही अवस्था बघत बाबांनी तिचं वाक्य मध्येच तोडलं..
“ अगं अगं हो हो हो ss … हरकत नाही … तू पैसे भरले नसलेस तरी तो फुलवाला रोज देत होता फुलपुडी. त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस…. आईची देवपूजा अगदी व्यवस्थित सुरू आहे .. अगदी नियमितपणे.. चांगला आहे गं तो फुलवाला . खूप वर्ष ओळखतो मी त्याला.”
हे ऐकून तिला थोडंसं हायसं वाटलं.
“ हुश्श !!.. थांबा लगेच त्याचे ३ महिन्याचे राहिलेले पैसे ट्रान्सफर करते !”.
“ नको नको … आता मी स्वतः जाऊनच देतो .. त्याचे आभार प्रत्यक्ष मानतो. मला इतक्या दिवसांनी बघून त्यालाही जरा बरं वाटेल.!”
☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 1 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
डाॅ.भालचंद्र फडके
डाॅ.भालचंद्र फडके. एक ज्येष्ठ मराठी साहित्यिक. विद्यार्थीप्रिय आणि समाजप्रिय प्राध्यापक. समाजातील अनेकांना प्रेरणा आणि साहाय्य दिलेला कल्पवृक्ष.
याचबरोबर सामाजिक परिवर्तन, लोकशिक्षण अशा अनेक क्षेत्रांत मुक्त संचार केलेल्या निस्पृह आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या सरांच्या सहवासाचा परीसस्पर्श ज्यांना लाभला त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. फडके सर म्हणजे अमृताचा अथांग सागर. त्यांना पहाण्याचे आणि ऐकण्याचे भाग्य मला मिळाले…
फडके सर हे मोठे साहित्यिक होते. मात्र त्यांचे एकही पुस्तक शाळेत माझ्या वाचण्यात आले नव्हते. याचं एक मुख्य कारण होतं की,शाळेतल्या पुस्तकांत त्यांचे धडे नव्हते. हायस्कूल संपवून मी पुढे ओतूरमधील काॅलेजात गेलो. पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सेंट्रल कॅम्पसाठी काॅलेजकडून माझी निवड झाली होती. कॅम्प विद्यापीठाच्या परिसरातच होता. विद्यापीठाच्या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य वातावरणात आमचा मुक्काम होता. तिथं अनेक जणांची उत्तमोत्तम भाषणं ऐकली. फडके सर तेव्हा विद्यापीठाच्या प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाचे संचालक होते. ‘ सामाजिक परिवर्तन आणि युवकांची भूमिका’ अशा कुठल्याशा विषयावर ते तास दोन तास बोलले रहाण्याच्या तंबूंबाहेरच्या उन्हात आम्ही ते मन लावून ऐकत होतो. अतिशय पोटतिडीकीने सर बोलत होते. सरांना मी पहिल्यांदाच पहात होतो. तरी यांना कुठंतरी मी पाहिलंय असं जाणवत होतं. टीव्हीवर किंवा कुठल्यातरी वर्तमानपत्रात मी सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांना पाहिलं होतं. त्यांच्यात आणि फडके सरांमध्ये मला खूप साम्य जाणवले.
काॅलेजमध्ये शिकत असताना मी काॅलेजतर्फे चालणा-या राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमात संघटक आणि पर्यवेक्षक म्हणून काम केले. विद्यापीठात त्याच विभागाचे फडके सर संचालक होते. त्यावेळी सर्वसामान्य माणसं आणि कार्यकर्ते यांच्याविषयी सतत पत्रे ,निरोप आणि फोनवरून काळजी करण्याची त्यांची प्रवृत्ती मी अनुभवली.
बी.ए. झाल्यावर मी पुण्यातील कर्वे इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सर्व्हिसेस या संस्थेतून एम.एस.डब्ल्यू.केले.
नंतर मी पुणे विद्यापीठातील प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून रूजू झालो. सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी सरांचा दांडगा लोकसंपर्क, सर्वसामान्य माणसांविषयी कळकळ आणि साध्या रहाणीतून त्यांची महानता मी अनुभवली. आमच्या विभागातर्फ प्रौढ शिक्षण आणि विविध सामाजिक विषयांवर सतत चर्चासत्रे, कृतिसत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण कार्यक्रम आणि विविध पातळ्यांवर परिषदा आयोजित केल्या जात. त्यावेळी समाजाच्या अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि नामवंत अभ्यासकांना सर आवर्जून घेऊन येत.
माझ्या मते १९८५ वर्ष असावं. देशातील प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आयोजित केलेले पहिले ‘समर इन्स्टिटय़ूट’ आमच्या विद्यापीठात झाले. त्याचे संपूर्ण नियोजन फडके सरांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम हा केंद्राधारित होता. यात वस्ती किंवा गाव हा आधार होता. यात तीस निरक्षरांना केंद्रात शिक्षण देणे अपेक्षित होते. मात्र एक अडचण सतत जाणवत होती. अनेक दुर्गम भागात निरक्षरता असूनही तीस निरक्षर एकत्र मिळवणे, इतके लोक एकत्र बसतील अशा जागेची उपलब्धता, साहित्याची उपलब्धता होणे अडचणीचे होते. प्रौढ शिक्षण कार्यक्रमातील ही अडचण लक्षात घेऊन एका नवीन कार्यक्रमाचे सूतोवाच फडके सरांनी समर इन्स्टिटय़ूटमध्ये केले. पुढे ‘ कार्यात्मक साक्षरता सामूहिक कार्यक्रम ‘ (Mass program for Functional Literacy) देशभर कार्यान्वित झाला. या कार्यक्रमाची बीजे मला फडके सरांच्या त्या भाषणातील मांडणीत दिसून येतात. पुणे शहरातील विविध वस्त्यांतून विद्यापीठाने प्रायोगिक प्रौढ शिक्षण केंद्रे चालवली. मी या केंद्रांचा समन्वयक होतो. यावेळी या केंद्रातून अनेक उपक्रम राबवले गेले. त्यातून कार्यक्रमांचे नियोजन आणि व्यवस्थापन मी शिकलो.
फडके सरांची एक आठवण मला सांगावीशी वाटते. दिल्ली विद्यापीठातील प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाचे संचालक डाॅ.एस.सी.भाटिया होते, त्यांनी सांगितलेली ती आठवण…
तेव्हाच्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी भाटिया सरांकडे सरकारच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यावेळी त्यांनी फडके सरांच्या नावाची सूचना मंत्र्यांना केली. सरकारच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी फडके सर अधिक प्रभावीपणे बोलू शकतील असा विश्वास त्यांनी मंत्र्याकडे बोलून दाखवला. मंत्र्यांना भेटायला फडके सर बुशशर्ट आणि पायात चप्पल घालून रेल्वेने गेले आणि सरकारला प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी परखड शब्दांत सुनावले होते.
बारामतीतील एका काॅलेजने प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला मदत करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा एक दिवसीय मेळावा आयोजित केला होता. यासाठी सरांसोबत आम्ही विभागातील सर्वजण गेलो होतो. काॅलेजने आयोजित केलेला हा एक अभिनव उपक्रम होता. तो अतिशय यशस्वी झाला. पुण्यात पोहचल्यावर सरांनी यावर मला एक लेख लिहायला सांगितलं .तो लेख त्यांनी सकाळ या नावाजलेल्या वर्तमानपत्रात प्रकाशित होण्यासाठी प्रयत्न केले.
सरांसोबत विभागातील आम्ही अनेक सहकारी नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर काॅलेजच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला भेट देण्यासाठी गेलो होतो. काॅलेजमधील प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिका-यांनी विड्या वळणा-या कारखान्यातील प्रौढ शिक्षण केंद्रात आमची भेट आयोजित केली होती. एका हाताने विड्या वळत तेथील निरक्षर महिला शिक्षण घेत होत्या. कामात मग्न असलेल्या महिलांना कसं शिकवायचं हे आव्हान होतं. फडके सरांनी ते आव्हान लिलया पेलले. .तिथल्या फळयावर सरांनी एक शब्द लिहिला- काजू.या शब्दावर सरांनी चर्चा सुरू केली. सरांनी महिलांना विचारलं,” काजू हा एक शब्द आहे.या शब्दांत दोन शब्द लपले आहेत. कोणते ?”
” का आणि जू ” उत्तर आले.
सर ‘का’ विषयी बोलले- “ जगात कोणतेही प्रश्न ‘का ‘या शब्दांतून निर्माण होतात ” असं सांगून ‘ जू ‘म्हणजे काय?”
असा प्रश्न त्यांनी विचारला.स्तब्धता पसरली.सरच म्हणाले, ” जू तुमच्या मानेवर नेहमीच असते.” असं म्हणून स्त्रियांच्या रोजच्या जीवनातील विविध प्रकारच्या जूचे त्यांनी वर्णन केले.
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा ८ ते १४ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा ८ ते १४
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या आठ ते चौदा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
वेद॒ वात॑स्य वर्त॒निमु॒रोरृ॒ष्वस्य॑ बृह॒तः । वेदा॒ ये अ॒ध्यास॑ते ॥ ९ ॥
सर्वगामी उत्तुंग जयाचा असतो संचार
गतीशील पवनाचे आहे सामर्थ्य अति थोर
ऊर्ध्व राहती या वायूच्या विभिन्न ज्या देवता
या सर्वांना वरुणदेवते तुम्ही ओळखुनि असता ||९||
☆
नि ष॑साद धृ॒तव्र॑तो॒ वरु॑णः प॒स्त्या३ स्वा । साम्रा॑ज्याय सु॒क्रतुः॑ ॥ १० ॥
आज्ञा अपुल्या गाजवूनिया समग्र विश्वावर
वरुणदेवता समर्थ करिते सुराज्य जगतावर
साम्राज्या प्रस्थापित करण्या विराज सप्तलोकी
अतिव आदरे सारे त्यांना घेती हो मस्तकी ||१०||
☆
अतो॒ विश्वा॒न्यद्भु॑ता चिकि॒त्वाँ अ॒भि प॑श्यति । कृ॒तानि॒ या च॒ कर्त्वा॑ ॥ ११ ॥
निर्मिली देवे किती अद्भुते विश्वाला सजविती
ज्ञानी समर्थ देव तया कौतुके अवलोकिती
मानस त्याचा अजुनी आहे नवाश्चर्य निर्मिण्या
समर्थ तरीही त्यांना अपुल्या चक्षूने पाहण्या ||११||
☆
स नो॑ वि॒श्वाहा॑ सु॒क्रतु॑रादि॒त्यः सु॒पथा॑ करत् । प्र ण॒ आयूं॑षि तारिषत् ॥ १२ ॥
समर्थ आहे हा आदित्य राजा विश्वाचा
मार्ग आम्हाला दावित जावो सदैव सन्मार्गाचा
जीवन अमुचे करुन निरामय सुखी अम्हाला करा
आरोग्यमयी आयुष्याला वृद्धिंगत हो करा ||१२||
☆
बिभ्र॑द्द्रा॒पिं हि॑र॒ण्ययं॒ वरु॑णो वस्त नि॒र्णिज॑म् । परि॒ स्पशो॒ नि षे॑दिरे ॥ १३ ॥
वस्त्र आपुले दिव्य नेसुनी मिरवितसे शोभेने
कवच सुवर्णाचे तयावरी झळाळते तेजाने
सेवक त्याचे त्याच्या भवती नम्र उभे ठाकले
भव्य तयाच्या रूपाने साऱ्या विश्वा दिपविले ||१३||
☆
न यं दिप्स॑न्ति दि॒प्सवो॒ न द्रुह्वा॑णो॒ जना॑नाम् । न दे॒वम॒भिमा॑तयः ॥ १४ ॥
कपटीकृत्यांचा दुष्टांच्या यांना धाक नसे
मनुष्यजातीच्या द्वेष्ट्यांची भीतीही ना वसे
पातक करिती दुर्जन खल यांना भिववीती कसे
सर्वसमर्थ शक्तीशाली धाक कुणाचा नसे ||१४||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
☆ “एकटेपणा…” – लेखक : श्री ऐश्वर्य पाटेकर ☆ प्रा.भारती जोगी ☆
‘थिंक पॉझिटिव्ह’ नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे “एकटेपणा”. पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे.
या दिवाळी अंकातील “एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज !” हा श्री ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार चे मानकरी आहेत, आणि त्यांची ‘भुईशास्त्र’ आणि ‘जू’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे.
*********
“मला आमच्या इथं गावातील बिया वाल्या बाईची गोष्ट आठवते. बिया वाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं. हा तिचा हात गुण होता की झाडा -कोडावरची माया? माहित नाही.
मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं. ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती. पण तीने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही.
बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही.
तिला एकदा आई म्हणाली होती,
“आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झाले असतं तर आता नातू -पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!”
तेव्हा तिचे उत्तर होतं, “नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोरं कुणी सांभाळली असती? ”
” कसा जन्म जावा ओ आत्याबाई तुमचा?”
तेव्हा ही बिया वाली बाई म्हणाली, “जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती?
होती ग.. पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली. म्हणाली, आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना…
दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला..
अन तसही, किती लेकरा बाळावाल्या आया बाया होत्या माझ्या भवतीच्या. पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे.
माझ्या या लेकरा बाळांना पाय नाहीत, हे एका अर्थी बरंच झालं.! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. “
*********
खूप अंतर्मुख केलं बियावाल्या बाईंच्या या छोट्याश्या कथेने.
…….
वर उल्लेखलेल्या बियावाल्या बाईंना अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं? एकटेपणाच्या जाळ्यात सापडू नये यासाठी 3 सूत्र नकळत आपल्या वागण्यातून देऊन जातात त्या…
पाहिलं सूत्र म्हणजे, “आपल्यातील पॅशन ओळखा, त्यात व्यस्त रहा”,
दुसरं, “आपलं दुःख कुरवळणं थांबवून, जे आहे त्यातही माझ्या दृष्टीने कसं चांगलंच होतंय असा दृष्टिकोन ठेवा”
आणि तिसरं, खूप महत्वाचे सूत्र म्हणजे, “आपण लावलेल्या झाडांवर कधीही आपली मालकी सांगू नका, थोडक्यात, detach राह दुसऱ्यांसाठी काही करण्याची सेवावृत्ती अंगी असू द्या.”
लेखक : श्री ऐश्वर्य पाटेकर
माहिती संकलक : प्रा. भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
… ” तुला हजार वेळा बजावून देखील का येतेस या विहिरीवर पाणी भरण्यासाठी… या विहिरीवर फक्त गावातल्या उच्च जमातीच्या लोकांना पाणी भरण्याचा हक्क आहे… तुमच्या सारख्या कनिष्ठ जमातीला हिथं पाण्याचा थेंब देखील मिळणार नाही… आणि हे सांगुन देखील तू इथं रोजच सकाळ पासून उभी असतेस… तुझी सावली या विहिरीवर पडली तर त्यातले पाणी विटाळले गेले तर आम्हाला पाणी कसे बरे मिळेल… तुला इथचं उभी राहण्याची हौस जर असेल तर जरा या विहिरी पासून दूर उभी राहा कि जरा… आमच्या घरी कडक सोवळं ओवळं पाळलं जातं म्हटलं… गावाच्या कोसोदूर असलेल्या या विहिरीवरून पाणी न्यायची तंगडतोड करावी तेव्हा कुठे घरातले आम्हाला दोन वेळेचं खाऊ पिऊ घालतात घरात ठेवून घेतात…तुझ्या सारखं नाही.. सकाळीच तुला त्यांनी इथं पाण्यासाठी पिटाळली कि बसले ते दिवसभर चकाट्या पिटायला घराच्या ओट्यावर.. संध्याकाळ पर्यंत पाण्याचा एखादा माठ भरून घरी नेलास तरी तुझं किती कौतुक करत बसतात… आणि आमच्या घरी आम्हाला मात्र जरा उशीर होण्याचा अवकाश लाखोली वाहत असतात.. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आम्हाला… जा जा दुसरीकडे कुठे विहीर शोध जा.. इथं बिलकुल थांबू नकोस.. “
… ” ताई आपल्या गावात हिच एक विहीर आहे हे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे… तुमची उच्च जमातीच्या घरांपेक्षा आमची कनिष्ठ जमातीची घरं हाताच्या बोटावर मोजता येणारी.. या वैराण वाळवंटात शेकडो मैल दूरवर गाव नि वस्ती आहेत.. तिथं देखील एखादं दुसऱ्या विहिरींना पाणी आहे.. आता आपल्या गावाची हिच विहीर गावकुसाबाहेर कोसांवर असल्यानं तुम्हाला पाणी नेण्यासाठी किती सायास करावे लागतात मगं आमची काय कथा… तुमचं सगळयांच भरून झालं कि द्याल आम्हाला प्रत्येकाला निदान दोन दोन घागरी.. एक पिण्याला नि दुसरी स्वयंपाकाला… भागवून घेऊ आम्ही कसंतरी… पण तुम्ही नाही म्हणू नका.. पाणी देण्याचं पुण्य तेव्हढं तुम्हाला नक्कीच मिळेल… माणसांसारखी माणसचं आहोत आपण एकाच आकाराच्या देहाची, जन्माने उच्च निच्च माणसात भेदभाव जरी झाला तरी माणुसकी मात्र अभेद्य असते कि… तहान भूक जशी तुम्हाला तशीच ती आम्हालाही आहेच कि.. त्यांना कुठे असतो भेदभाव… तुमचे माठ मातीचे आणि आमचेही त्याच मातीपासून बनलेले.. प्रत्येक माठामाठात भरलेले पाणी हे त्या विहिरीतलेच एकच आहे.. ते तुमच्या माठातले सोवळयाचे नि आमच्या ओवळयातले हा भेदभाव पाणी कुठं करते.. त्याला फक्त तहानलेल्याची तृष्णा भागविणे एव्हढेच ठाऊक असते… आपला स्त्री जन्मच मुळी अभागी आहे बघाना.. तुम्हाला तुमच्या घरी दासीचं जिणं जगावं लागतयं तेच आमच्या घरी सुद्धा चुकलेलं नाही.. या पुरुषसत्ताक परंपरेत स्त्रियांच्यावर अन्याय होत आलेत आणि आपण सगळ्या आपापल्या कोषात राहून मूकपणे सहन करत आहोत.. आपण आपापसातील दरी जर मिटवली नाही तर या अन्यायाचं परिमार्जन कसं करणारं… एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीचं दुख समजू शकते.. कारण स्त्रीच्या हृदयात प्रेमाचा झरा अखंडपणे स्त्रवत असतो…माझी हि बडबड कदाचित तुम्हाला आवडणार नाही.. पण तो दिवस दूर नाही…स्त्रीचं समाजाचं नव्यानं परिवर्तन घडवून नक्की आणेल… पाण्यात काठी मारुन भेद होत नसतो… हेही लवकरच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही… “
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श आधारित एक विचारणीय लघुकथा ‘सच से दो- दो हाथ’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 119 ☆
☆ लघुकथा – सच से दो- दो हाथ ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆
सूरज की किरणें उसके कमरे की खिड़की से छनकर भीतर आ रही हैं। उसने लेटे- लेटे ही गहरी साँस ली – ‘ सवेरा हो गया फिर एक नया दिन,पर मन इजाजत ही नहीं दे रहा बिस्तर से उठने की। करे भी क्या उठकर? उसके जीवन में कुछ बदलने वाला थोड़े – ही है? वही-वही बातें, उसके शरीर को स्कैन करती निगाहें, मन में काई-सी जमी घुटन, जो न चुप रहने देती है, न चीखने। उसके शरीर का सच और घरवालों की आँखों को दिखता सच! दो पाटों के बीच वह घुन -सा पिस रहा है। कैसे समझाए उन्हें कि आँखों देखा हमेशा सच नहीं होता। ओफ्! —-‘
तब तो अपना सच उसकी समझ से भी परे था। छोटा ही था, स्कूल – रेस में भाग लिया था। उसने दौड़ना शुरू किया ही था कि सुनाई दिया – ‘अरे! महेश को देखो, कैसे लड़की की तरह दौड़ रहा है।‘ गति पकड़े कदमों में जैसे अचानक ब्रेक लग गया हो। वह वहीं खड़ा हो गया, बड़ी मुश्किल से सिर झुकाकर धीरे-धीरे चलता हुआ सब के बीच वापस आ खड़ा हुआ। क्लास में आने के बाद भी बच्चे उसे बहुत देर तक ‘लड़की-लड़की‘ कहकर चिढ़ाते रहे। तब से वह कभी दौड़ ही नहीं सका, चलता तो भी कहीं से कानों में आवाज गूँजती – ‘लड़की है, लड़की।‘ वह ठिठक जाता।
‘महेश! उठ कब तक सोता रहेगा?‘ – माँ ने आवाज लगाई। ‘ कॉलोनी के सब लड़के क्रिकेट खेल रहे हैं, तू क्यों नहीं खेलता उनके साथ? कितनी बार कहा है लड़कों के साथ खेला कर। घर में घुसकर बैठा रहता है लड़कियों की तरह।‘
‘मुझे अच्छा नहीं लगता क्रिकेट खेलना‘ – उसने गुस्से से कहा।
माँ के ज्यादा कहने पर वह साईकिल लेकर निकल पड़ा और पैडल पर गुस्सा उतारता रहा। सारा दिन शहर में घूमता रहा बेवजह इधर – उधर। साईकिल के पैडल के साथ ही विचार भी बेकाबू थे – ‘ बचपन से लेकर बड़ा होने तक लोगों के ताने ही तो सुनता आया है। आखिर कब तक चलेगा यह लुका छिपी का खेल ? ‘
घर पहुँचकर उसने साईकिल खड़ी की, कमरे में जाकर अपनी पसंद का शॉल निकाला और उसे दुप्पटे की तरह ओढ़कर सबके बीच में आकर बैठ गया।
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “अकिंचन की शक्ति…”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 151 ☆
☆ अकिंचन की शक्ति… ☆
लक्ष्य साधते हुए सीढ़ी दर सीढ़ी बढ़ते जाने के लिए दृढ़ निश्चयी होना बहुत आवश्यक होता है। अधिकांश लोग आया राम गया राम की तरह केवल समय पास करना जानते हैं। उन्हें कुछ करना- धरना नहीं रहता वो तो हो हल्ला करते हुए हल्ला बोल में शामिल होकर अपनी पहचान को बनाए रखने की जद्दोजहद में लगे रहते हैं। वैचारिक दृष्टिकोण के बिना जब कोई भी तथ्य प्रस्तुत करो तो वो प्रभावी नहीं होता है। आजकल एंकर भी मजे लेते हुए बात को जिस बिंदु से शुरू करते हैं उसी पर बिना निष्कर्ष निकाले समाप्त करना चाहते हैं, जिससे उनका नियमित कार्यक्रम सुचारू रूप से चलता रहे। एक मुद्दे पर एक दिन तो क्या एक वर्ष तक खींचा जा सकता है। घोषणा पत्र महज घोषणा बन कर रह जाए तभी तो सफलता है। नीतियों के साथ चलना कोई नयी बात नहीं होती किन्तु बिना सिर- पैर की बातों से भी अपने आपको चर्चा का बिंदु बनाए रखना कोई आसान कार्य नहीं है। माना एक सिक्के के दो पहलू होते हैं। पर खोटे सिक्के का क्या किया जाए। इनसे जेब में खनखनाहट होगी या नहीं ये तो भुक्तभोगी ही बता सकता है।
ऐसे लोग जिनको साफ तौर पर कह दिया जाता है, जाओ यहाँ से…। अपना मुह बंद रखो, तुम्हें कोई सुनना नहीं चाहता। वही आगे चलकर खींचतान करते हुए नए- नए विचार रखते हैं जिन्हें अमलीजामा पहनाने वाला विजेता का ताज धारण कर लेता है।
भले ही बाल की खाल क्यों न निकालनी पड़े, बिना मतलब की बातों पर चर्चा होते रहनी चाहिए।लोगों को केवल मनोरंजन से मतलब रहता है। जब देश में पूछ परख कम हो तो विदेशों की यात्रा करें, वहाँ सब कुछ चलेगा, भाषा की भी कोई बाध्यता नहीं रहती, इसी बहाने आपको देश में मीडिया कव्हरेज मिलने लगती है। अब तो अधिकांश लोग धरना प्रदर्शन की जगह सात समंदर पार जाकर ढूंढ रहे हैं।
खैर ये सब तो चलता रहेगा, अपना अस्तित्व किसी भी तरीके से बना रहे, इसका ध्यान अवश्य रखिए।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
श्री हनुमान साधना संपन्न हुई साथ ही आपदां अपहर्तारं के तीन वर्ष पूर्ण हुए
अगली साधना की जानकारी शीघ्र ही आपको दी जाएगी
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈