कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 215 – विजय साहित्य
☆ गाथा तुकोबांची…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
गाथा तुकोबांची
अमृताची धारा
प्रबोधन वारा
प्रासादिक..! १
*
तुकाराम गाथा
जीवन आरसा
तात्त्विक वारसा
विठू नाम…! २
*
दिली अभंगाने
दिशा भक्तीमय
षडरिपू भय
दूर केले…! ३
*
अभंगांचे शब्द
जणू बोलगाणी
झाली लोकवाणी
गाथेतून…! ४
*
जीवनाचे सूत्र
महा भाष्य केले
भवपार नेले
अभंगाने…! ५
*
तुकाराम गाथा
आहे शब्द सेतू
प्रापंचिक हेतू
पांडुरंग…! ६
*
वाचायला हवी
तुकाराम गाथा
लीन होई माथा
चरणातें…! ७
*
कविराज शब्दी
गाथा पारायण
अंतरी स्मरण
तुकोबांचे..! ८
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈