परिचित शब्द आणि कृती आहे ना? अगदी लहान असल्या पासून म्हणजे शब्दही बोलता येत नसतो तेव्हा पासून सुरु होणारी कृती. भावना शब्दात व्यक्त करण्याचे प्रभावी साधन म्हणजे बोलणे. जास्त बोलणे झाले, नकोसे वाटले की त्याची बडबड होते. मग मोठी माणसे म्हणतात कीती टकळी चालू आहे? आणि बायका जमतात तिथे तर या बडबडीचा उच्चांक असतो. एक असेच हास्य चित्र बघण्यात आले होते. दोन महिलांच्या बोलण्यातून वीज निर्मिती करुन त्यावर रेल्वे चालली आहे असे चित्र होते. यातील अतिशयोक्ती सोडली तर महिला बडबड करतात हे सत्यच आहे. आणि त्याच मुळे त्या मानसिक ताणातून बाहेर पडतात. आणि सर्वात जास्त त्या कोणाशी बोलत असतील? असा विचार आला आणि जरा शोधशोध केली, मैत्रिणींशी चर्चा ( म्हणजे परत बडबडच ) केली. आणि आश्चर्य म्हणजे असे समोर आले, की महिला सर्वात जास्त स्वतःशी बोलतात. आणि मग स्वतःच स्वतःचे निरीक्षण केले. आणि खूपच गंमत वाटली.
अगदी झोपेतून उठल्या पासून याची सुरुवात होते.
सकाळी उठताना
चला उठा, कामे खोळंबली आहेत. उशीर झाला तर सगळाच उशीर होणार. आयता चहा कोण देणार? चला चहा करा आणि सगळ्यांना उठवा.
मॉर्निंग वॉकला गेल्यावर
जा बाई जोरात. स्लिम व्हायचे आहे ना. मला काही फरक पडत नाही. मी माझ्याच वेगाने चालणार.
कोणत्याही मीडियावर नवीन लेख दिसला
बरं हिला रोज सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसायला जमते. माझी तर कामेच संपत नाहीत. चला आवरायला हवे.
दुपारी विश्रांतीच्या वेळी
आता जरा पडते. फक्त कोणी यायला नको. आणि कंपनीचा फोनही यायला नको. त्यांना हिच वेळ सापडते. जरा पडले की ऑफरचा फोन करतात.
दुसऱ्याचे स्टेट्स बघून
बरा स्टेट्स बदलायला वेळ मिळतो. कुठे कुठे भटकतात कोण जाणे? आणि असले कपडे या वयात शोभतात का?
दुपारी उठल्यावर
चला आवरायला हवे. आता एकेक जण घरी यायला लागेल. मग त्यांचे चहा पाणी. मी घरीच असते ना, मला काय काम? (असे सगळे म्हणतात. एकदा घरातली कामे करुन बघा, म्हणजे कळेल. ) असे म्हणून सगळीच कामे करावी लागतात.
रात्री झोपताना
झालं एकदाचं आवरुन. कोणी मदत करत नाही. हातावर पाणी पडले की सगळे सोफ्यावर मस्त गप्पा मारत बसणार. आणि मी किचन आवरणार. कधी कधी वाटते तसेच पडू द्यावे. पण तो स्वभाव नाही ना.
मध्यरात्री जाग आल्यावर
अगं बाई आत्ता कुठे तीनच वाजले आहेत. झोपा अजून दोन तास. नाहीतर उठायच्या वेळी झोप लागायची.
अशी जास्तीत जास्त स्वतःशी बडबड चालू असते. इथे थोडीच बडबड दिली आहे. असे अनंत विचार चालू असतात. यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, उघडपणे ज्या भावना बोलू शकत नाही त्या मनात बडबड करतो. यात सगळेच असे तक्रार सूर असतात असेही नाही. बरेचदा मी किती नशीबवान आहे. घरातील माणसे माझे कौतुक करतात. नातेवाईक चांगले वागतात, मान देतात. अशीही विधाने असतात. पण ही चांगली विधाने आपण व्यक्त करू शकतो. त्याने कोणाचे मन दुखावले जात नाही. पण तक्रारी, दुखणी, कामे ज्या गोष्टी उघड बोलून कोणी दुखावेल असे वाटते त्याच गोष्टी मनाशी बडबड करतो.
आता मी नाही का मनातली बडबड तुम्हाला सांगितली. कारण तुम्ही सगळी आपली माणसे आहात. माझी ही मनातली बडबड तुम्हाला म्हणून सांगितली. माझी अजून एक गंमत तुम्हाला सांगते. मी ज्यावेळी एकटी वॉकिंग साठी जाते, त्यावेळी अशीच स्वतःशी बडबड करते. आणि गंमत म्हणजे त्यातून एखादी कविता तयार होते. ती विसरु नये म्हणून रस्त्यावरच्या एखाद्या दुकानात जाते आणि तेथून रद्दी पेपर घेऊन त्यावर उतरवते. आणि घरी येऊन डायरीत लिहिते.
तर माझ्या मनातले आज तुम्हाला सांगितले. तुम्ही पण मनातच ठेवा हं!
तुम्हाला म्हणून सांगते. सकाळ पासून लिहायचे म्हणते, पण वेळ कुठे होतोय. शेवटी आज संध्याकाळी फिरायला न जाता लिहिले तेव्हा कुठे हे लिहिता आले.
☆ (१) मिल्कपॉट आणि (२)नुकसान – श्री सीताराम गुप्ता (३)अनोखी पद्धत – सुश्री मधूलिका सक्सेना ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर☆
तीन अनुवादित लघुकथा……
☆ (१) मिल्कपॉट ☆
आज जवळ जवळ एक आठवड्यानंतर घरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं. अरुण प्रकाशाचा मुलगा अमोल, सून आभा आणि दोन वर्षाचा नातू प्रणव उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी थंड हवेच्या ठिकाणी गेले होते. ती नसल्यामुळे घर कसं उजाड वाटत होतं. मुलांशिवाय कसलं घर? मुले खोड्या करत नसतील, तर घर, घर वाटतच नाही मुळी. मुलं आपली ट्रीप संपवून घरी परत आली आणि छोटा नातू प्रणव घराला पुन्हा घर बनवण्याच्या मागे लागला. तो येताच त्याच्या खोड्या सुरू झाल्या. सूटकेस आणि बॅगेमधील समान काढून तो बाहेर टाकू लागला. सामान काढता काढता त्याच्या हाताला एक गोष्ट लागली आणि ती दाखवण्यासाठी तो आपल्या आजोबांच्याकडे पळत पळत निघाला. त्याच्या हातात सुरेख असा मिल्क पॉट होता. अरुण प्रकाशला समजायला वेळ लागला नाही. त्यांनी आपल्या मुलाला म्हंटलं, ‘हा हॉटेलचा वाटतोय. ‘
‘होय बाबा, हा हॉटेलचाच आहे. ‘
ते ऐकून अरुण प्रकाशला आतल्या आत भूकंप झाल्यासारखं वाटलं. ते काहीच बोलले नाहीत. शून्यात बघत बसले. त्यांना वाटलं, मुलाने येताना तो पॉट उचलून आणलाय. असं काही घडलं, की त्यांना वाटतं, आपण केलेल्या संस्कारात काही कमतरता राहिलीय आणि ते स्वत:ला दोषी मानू लागतात. त्यांना दु:ख होतं.
नातवाच्या हातात हॉटेलचा मिल्क पॉट बघून त्यांना अंगात जाळ उठल्यासारखं वाटू लागलं. त्यांचं मन तडफडू लागलं.
वडलांच्या मनातील भाव मुलाच्या लक्षात आला. तो म्हणाला, ‘बाबा, दहा हजार रुपये रोजचे खोली भाडे होते. ’
तशी अरुण प्रकाश स्पष्टपपणे म्हणाले, ‘ एवढा खर्च करूनही शेपन्नास रूपायासाठी तू आपलं स्वत्व घालवलंस?’
मुलगा अमोल थेटपणे वडलांकडे बघत म्हणाला, ‘तुम्हाला वाटतं, तसं नाही आहे बाबा! आम्ही हा मिल्क पॉट उचलून आणलेला नाही. ‘चेक आऊट’च्या वेळी आपला लाडका नातू प्रणव हातातला मिल्क पॉट सोडेना, तेव्हा मी त्याची किंमत हॉटेल मालकाला देऊ केली, पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. हा पॉट, आमच्यातर्फे या छोट्याला भेट, ’ ते म्हणाले. गिफ्ट म्हणून त्यांनी हा पॉट प्रणवला दिलाय.
आपल्याला वाटतय, आम्ही हॉटेलमधून हा पॉट उचलून आणला, पण तसं नाही आहे बाबा!’
अरुण प्रकाशने सुटकेचा श्वास सोडला. ‘नाही… नाही… मी दोषी नाही. ’ते मनातल्या मनात म्हणाले. ‘मी माझ्या मुलांनावर योग्य संस्कार केले आहेत. माझी मुलं कधीच चुकीचं वागणार नाहीत. ‘ त्यांना इतकं समाधान वाटलं, वाटलं, कॅन्सरसारख्या रोगापासून मुक्ती मिळालीय.
मूळ कथा – ‘मिल्क पॉट’
मूळ लेखक – श्री सीताराम गुप्ता, दिल्ली
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
☆ (२)नुकसान ☆
डॉ. विश्वास यांचा आज या नव्या हॉस्पिटलमधला पहिलाच दिवस होता. मागच्या आठवड्यातच त्याची एम. डी. पूर्ण झाली होती. एका आठवड्यातच त्याला सरकारी हॉस्पीटलमध्ये नोकरी मिळाली होती. हॉस्पिटलमधून परतल्यावर विश्वास मोठा खुशीत दिसत होता. त्याला खूश पाहून त्याचे आई-वडील, बहीण सगळ्यांनाच आनंद झाला. बहीण म्हणाली,
‘दादा, वाटतय, नवी नोकरी आणि हॉस्पिटलचे वातावरण तुला खूप आवडलेलं दिसतय. ‘
‘ते तर आहेच, पण माझ्या खुशीचं आणखीही एक कारण आहे. ’ विश्वास म्हणाला.
‘काय?’
आता तो काय सांगतोय, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती.
विश्वास म्हणाला, ’ आज पाहिल्याच दिवशी दहा हजाराचं नुकसान झालं!’
‘कसं?’ सगळेच एकदम म्हणाले. आई म्हणाली, ‘नुकसान झाल्यावर कुणी खूश होतं का? ‘
‘असं घुमवत फिरवत बोलण्याऐवजी सरळ सरळ सांग ना, काय झालं? मोबाईल हरवला. खिसा कापला गेला? नुकसान कसं झालं?’ वडलांनी प्रश्नांची फैर झाडली.
‘नाही… नाही… आपण घाबरू नका. असं काहीही झालेलं नाही. ‘ विश्वास सगळ्यांना आश्वस्त करत म्हणाला.
‘आज एनजीओने एका फॅक्टरीवर छापा मारला आणि तिथे काम करणार्या अल्पवयीन मुलांना सोडवले. त्या मुलांच्या वयाची तपासणी करण्यासाठी पोलीस त्या मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्याच वेळी एक माणूस माझ्या केबीनमध्ये आला आणि टेबलावर काही पैसे ठेवत म्हणाला, ‘हे दहा हजार रुपये आहेत. हे आपण आपल्याजवळ ठेवा आणि असा रिपोर्ट लिहा, की सगळी मुले पंध्रा वर्षाच्या वर आहेत. ’
पण त्या मुलांपैकी कुणीच चौदा वर्षाच्या वर वाटत नव्हता. अनेक जण दहा – बारा वर्षाचीच वाटत होती. त्यांची परिस्थिती बघून मला अतिशय वाईट वाटलं. मी नोटांचं बंडल उचलून त्याच्या हातात देत, त्याला ताबडतोब बाहेर निघून जायला सांगितलं. ’
तो म्हणाला, ‘ डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणाल तितके पैसे देतो. ‘ तो खिशात हात घालू लागला. मला राग आला. शेवटी शिपायाला सांगून त्याला धक्के मारून बाहेर काढलं.
‘जे खरं वय होतं, तोच रिपोर्ट मी लिहिला. नेमक्या वयाची खात्री करण्यासाठी, ऑसिफिकेशन टेस्टसाठी केसेस पुढे पाठवल्या. ’
सगळी घटना विस्तारपूर्वक सांगून विश्वासने कृत्रीम गंभिरता धरण करत म्हंटलं, ’मग झालं ना पहिल्याच दिवशी दहा हजाराचं नुकसान. ‘
वडील म्हणाले, ‘बेटा, असं नुकसान रोज रोज करत जा आणि आम्हाला सांग. मी खरोखरच खूश आहे, की माझी मुले नुकसान करायला शिकताहेत. असं नुकसान, हाच आमचा सगळ्यात मोठा फायदा आहे. ’ असं म्हणत वडलांनी आपला हात विश्वासच्या डोक्यावर ठेवला आणि विश्वासने आपले डोके त्यांच्या खांद्यावर ठेवले.
मूळ कथा – ‘ नुकसान ‘
मूळ लेखक -सीताराम गुप्ता, दिल्ली.
अनुवाद – उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
☆ (३)अनोखी पद्धत ☆
‘काय चाललाय काय तुझं अंकित?’
‘काही नाही ग… ’ त्याने रेवाचं बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला
‘सारखा सारखा मागे पडतोयस. ’ रेवाच्या बोलण्यात तक्रारीचा सूर होता.
‘येतोय ना!’ अंकित पुन्हा म्हणाला.
‘ओहो…. मोठ्या मुश्किलीने बरोबर फिरायला म्हणून बाहेर पडलो. माझ्याबरोबर चल ना!’ रेवा काही बोलणं सोडत नव्हती.
‘अग, येतोय ना!’
‘आता बागेची, रस्त्याची साफ-सफाई पण तुम्हीच करणार का?’
‘आता चार तुकडे झाडीत पडून राहू देत नं! सफाईचा तर तुला जसा मॅनिया आहे. ’
रेवा वैतागली.
‘ही काही सफाई नाही. ’ अंकित म्हणाला.
‘मग काय आहे?’
‘सफाई नाही तर काय आहे अंकित? मी आत्ताच पाहीलं, जमिनीवरून उचललेले ते कागदाचे तुकडे तू आपल्या बॅगेत भरलेस….. कुणाचं प्रेमपत्र मिळालं की काय? मला तरी सांग. ‘ रेवाने चिडवले.
‘तसंच समज. ’ अंकितने संक्षिप्त उत्तर दिलं.
‘कसला विचार करतोयस?’
‘ये. स्कूटरवर बस. ’ यावेळी रेवा काही न बोलता स्कूटरवर मागे बसली.
दहा मिनीटानंतर अंकित एका घरापुढे थांबला आणि दारावरची बेल वाजवली. दोन-तीन वेळा बेल वाजवल्यावर दरवाजा उघडला गेला.
‘बोला, कुणाला भेटायचय?’
‘रमेशजी… ’
मीच रमेश…. बोला. काय काम आहे?’
‘या १२ एप्रील २०१५ आणि १६ नोहेंबर २०१८च्या पावत्या आपल्याच आहेत?’
‘अं… हो. पण आपल्याकडे कशा आल्या?’
‘आणा. एक हजार रुपये आणा. ’
‘साहेब, हा माझ्यासाठी कचरा आहे. आपणच ठेवून घ्या. ‘ रमेश काहीशा बेफिकीरीने म्हणाला.
‘मग कचरा गाडीत टाकायचं सोडून आपण हा कचरा झाडीत का फेकलात?’
‘काय म्हणायचय आपल्याला?’ रमेश चिडून म्हणाला.
आपलं ओळखपत्र दाखवत अंकित म्हणाला, ‘मी नगर निगमाचा स्वच्छता अधिकारी अंकित राव!’
मूळ कथा- अनूठा तरीका
मूळ लेखिका – सुश्री मधूलिका सक्सेना
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
अनुवादिका –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मंदिराच्या कट्ट्यावर विद्वानांचा मेळावा भरला होता. प्रत्येक जण आपल्या ज्ञानाचे दिवे पाजळत होता.
“अहो आहात कुठे ? मी या मंदिराला 1000 देणगी दिली. शिवाय सहस्त्र भोजनही घातलं. सगळ्यांनी आडवं पडेपर्यंत भोजनावर आडवा हात मारला. नको नको म्हणेपर्यंत ब्राह्मणांना भरपूर भोजन दिलय मी. ” मला या ढोंगीपणाची, आत्मस्तुतीची चीड आली. बढायावर बढाया मारणं चाललं होतं. इतक्यात माझं लक्ष झाडाखाली बसलेल्या साधू बाबांकडे गेलं. शांतपणे डोळे मिटून ते पक्षांचा किलबिलाट ऐकत होते.
तुंदील तनुवर हात फिरवत बसलेल्या पंडितजींकडे मी बघितलं. त्यांच्यासाठीच मी शिधा आणला होता. मनात आलं ह्या भरगच्च जेवणावर ताव मारून ढेकर देणाऱ्या पंडितजींना हा शिधा देण्यात काय अर्थ आहे? अन्नावर अन्न आणि आणि वस्त्रावर वस्त्र असंच नाही का होणार ते ? त्यापेक्षा या गरीब साधूला हे सगळं द्यायला काय हरकत आहे? विचारासारखी मी ताडकन उठलो. साधूबाबाच्या जवळ जात म्हणालो,
” बाबा एक विनंती आहे, तुमची काही हरकत नसेल तर हा शिधा देऊ का मी तुम्हाला? घ्याल? नाही म्हणू नका. ”.. माझ्या प्रश्नावर धीरगंभीर आवाजात उत्तर आलं ” बंधू निर्मळ, निरपेक्ष मनाने तू हे शिधादान करतो आहेस. देवाच्या दरबारातला प्रसाद समजून अवश्य घेईन मी तुझे दान “. कुठली हाव नाही, कुठलीही आसक्ती नाही. मिळेल ते दान पदरांत पडल्यावर समाधान मानण्याची त्यांची वृत्ती बघून मला बरं वाटलं. लगबगीने मी पिशव्या त्यांच्या स्वाधीन केल्या. आणि माझ्या लक्षात आलं बाबांना एकच हात आहे. पिशवी जवळजवळ माझ्या हातातून ओढून घेऊन, तांदुळाच्या पिशवीत हात घालून मुठभर तांदूळ बु्वांनी कट्ट्यावर फेकले. माझा राग अनावर झाला. ‘ केवढा हा माजोरेपणा? ‘ ‘ ‘भिकाऱ्याला ओकाऱ्या ‘ म्हणतात ते असंच असावं. पायरीवर बसलेले पंडितजी माझ्याकडे बघून कुचेष्टेने हसले. त्यांच्यासाठी आणलेला शिधा मी साधूबाबांच्या झोळीत टाकला होता ना !
कुणीतरी म्हणाले सुद्धा, “ हे लेकाचे फार माजलेत. दान सत्पात्रीच द्यावं. अशा माजोरडयांना अशा भिकाऱ्यांना नाही. ”
मी पण तिरीमिरीत उठलो साधूबाबांच्या अंगावर ओरडलो, “अहो काय केलंत हे ? मी तुम्हाला प्रेमाने धान्य दिलं आणि तुम्ही ते भिरकावून दिलंत ? अन्नपूर्णेचा अपमान आहे हा “. ‘ माजोऱ्या सारखा ‘ हा शब्द मात्र मी गिळून घेतला. शांतपणे मान झुकवून ते म्हणाले, ” नाही बंधू.. धान्याचा असा अपमान मी कसा करेनं ? उलट तुमचं धान्य भुकेलेल्या मुक्या जीवांपर्यंत पोहोचवायचं होतं, म्हणून मी ते पारावर टाकलं. तुमचं दान सत्पात्री पडलय. क्षुधा शांतीने तृप्त झालेली ती चिमणी पाखरं भरल्या पोटी आनंदाने घरट्याकडे वळलीत. तुमच्या धान्यातला कण न कण वेचला आहे त्यांनी. तिकडे बघा सहस्त्र भोजन झालय. पण थाळीमध्ये लोकांनी टाकून दिल्यामुळे उकिरड्यावर फेकलेलं अन्न वाया गेलंय. पोटभर भोजन करून चिमण्या उरलेले दाणे आपल्या चोचीत साठवून आपल्या बाळांना देण्यासाठी व घरट्यात जाण्यासाठी आसुसल्या आहेत. ”
मी डोळे विस्फारून पाराकडे बघतच राहिलो. चिवचिवणाऱ्या चिमण्यांचा थवा दाणा न दाणा टिपून घेत होता. साधूबाबा निर्मळ हसत म्हणाले, ” देख बंधू, ‘दाने दाने पर भगवान ने खानेवाले का नाम लिखा है।” आता मी हात जोडले आणि म्हणालो, ” बाबा खरंय तुमचं, बोलक्या जीवांना ओरडून अन्न मिळवता येतं. पण ही मुकी भुकेली पाखरं कशी मागणार धान्य आपल्याजवळ? “ साधू बाबा पुढे म्हणाले, ” चिमण्यांचा चिमणासाचं जीव आहे. पण त्यांनाही पोट आहेच ना? बलवान पक्षी मारतात त्यांना. अन्यायाविरुद्ध समर्थपणे लढण्याची शक्ती ह्यांच्यातही यायला हवी आहे.. हो ना ? त्यांचा दुबळेपणा जाऊन त्यांनी बलवान व्हावं म्हणून मी हा चिमणचारा त्यांना चारला. क्षमा कर मला. ” …. हे तत्वज्ञान ऐकून मी अवाक झालो. माझ्या मनात आलं सगळीच माणसं ढोंगी लबाड नसतात. देवमाणसं पण जगात आहेत. गाभाऱ्यातल्या अन्नपूर्णा देवीला मी हात जोडले. तिच्या डोळ्यातलं वात्सल्य मला साधूबाबांच्या डोळ्यात दिसलं. साधू बाबा दुसऱ्या पाराकडे वळले होते. आणि पुन्हा त्यांची पिशवीतल्या तांदुळानी मूठ भरली गेली होती. पाखरांची क्षुधा शांती करण्यासाठी…
मी ओरडून म्हणालो, “बाबा आपके लिए भी कुछ रखो. “ हसून हात हलवत ते म्हणाले, ” फिकर मत कर बेटा, तेरे जैसे भगवानने दिया हुआ प्रसाद हैं ये. मै भी उसमे भागीदार हो जाऊंगा…”
काय किमया आहे बघा ! मलाच ते भगवान समजताहेत आणि मला त्यांच्यात भगवान दिसतो आहे. मंदिरातली भगवती मात्र आम्हाला आशिर्वाद देत होती. आणि आपल्या सगळ्या लेकरांवरून वात्सल्यपूर्ण नजर फिरवत होती. खडतर आयुष्याचं गणित सोपं करून जगणाऱ्या ह्या निर्मळ मनाच्या साधूबाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून मी हात जोडले. काही प्रसंग साधे असतात. पण त्यात मोठा आशय भरलेला असतो नाही का ? आयुष्याचं तत्वज्ञान सहज सोपं करून सांगणारी अशी ही देवमाणसं जगात आहेत. आणि म्हणूनच जग चाललंय… म्हणूनच… जग चाललंय..
(धन्यवाद. मंडळी … माणसांच्या मनाचे अनेक कंगोरे असतात. कुणी स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेणारे असतात तर. आपल्या घासातला घासही दुसऱ्यासाठी राखून ठेवणारे दिलदारही या जगात आहेत. साधुबुवा एक हाताने अर्थार्जन नाही करू शकत. पण मिळालेल्या धान्यातून ‘चिमणचारा’ ते बाजूला काढू शकतात. एक तीळ सात जणांनी वाटून खावा ही म्हण त्यांना लागू पडते. स्वार्थ आणि परमार्थही ते साधू शकतात. आणि ‘ विश्वची माझे घर ‘ या आनंदात ते जगू शकतात. साधीच माणसं पण विचार मोठे याची प्रचिती मला आली…. म्हणून हा लेखप्रपंच )
☆ सातारचे ‘कंदी’ पेढे – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का – सातारच्या पेढ्यांना “कंदी पेढे” असंच का म्हणतात?
गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची.
भारतात ब्रिटिश राजवट होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटिश रिजंट बसविण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.
सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्या काळात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेचं साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी, म्हैशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. हे दुध जवळचं मोठं शहर म्हणून सातारला पाठवून दिलं जायचं. काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटिशांना ही मिठाई प्रचंड आवडली. त्यांना “करंडी” म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला “कँडी” म्हणायला सुरुवात केली. पुढे याच कँडीचं सातारकरांनी “कंदी” केलं.
साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसविलं होतं. त्यांनी बनविलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच “लाटकर” असे ओळखलं जाऊ लागलं.
कंदी पेढ्याला युरोप मध्ये नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.
त्यांनी सत्तर वर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहोचला.
आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊन देखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊ पणा वाढतो. म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.
भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूर राम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखलं जातं.
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंतलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व इतर खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.
सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल म्हणजे खरपूस भाजलेले, आणि तुपात परतलेले आहेत. हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पेढ्यांमध्ये सातारच्या माणसांचा “स्वॅग” मिक्स झालाय.
या सगळ्यामुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात प्रसिद्ध झाला.
माहिती प्रस्तुती : अनंत केळकर
लेखक : अज्ञात
संग्राहक : अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कहानी – ‘दाना पानी ‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 231 ☆
☆ कहानी – दाना-पानी ☆
नन्दू मनमौजी है। पढ़ाई, कमाई में मन नहीं लगता। बस दोस्तों के साथ महफिल जमाने और कहीं नाटक-नौटंकी देखने को मिल जाए तो मन खूब रमता है। दूसरे गाँव में रामलीला-नौटंकी की खबर मिले तो बेसुध दौड़ता जाता है। रात रात भर सुध बुध खोये बैठा रहता है। सबेरे लौटकर भाई-भौजाई की बातें सुनता है— ‘निठल्ले, पता नहीं तेरी जिन्दगी कैसे कटेगी। बियाह हो गया तो बहू तेरी हरकतें देखकर माथा कूटेगी।’
नन्दू पर कोई असर नहीं होता। अकेले में भौजाई से कहता है, ‘भौजी, मेरी फिकर मत करो। जिसने चोंच दी है वही चुग्गा देगा। अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम। शादी-ब्याह करके क्या करना है? शादी माने बरबादी।’
वैसे नन्दू आठवीं पास है। शासन की नीति है कि आठवीं तक कोई बच्चा फेल नहीं किया जाएगा, इसी के चलते नन्दू वैतरणी पार कर गया। आगे निश्चित रूप से फेल होना है, इसलिए पढ़ाई छोड़ दी।
अब सुबह तो नन्दू अपने भाई सुमेर के साथ खेत पर जाता है, लेकिन दोपहर के खाने के लिए जो घर आता है तो फिर उधर का रुख नहीं करता। दो-तीन घंटे की नींद और शाम को गाँव के पास वाली नदी के पुल के नीचे रेत पर दोस्तों के साथ गप-गोष्ठी। इस गोष्ठी में हँसी-मज़ाक, चुटकुलों के अलावा अभिनय, नकल, नाच,गाना, सब कुछ होता है। गाँव के कुछ सयाने भी जो जवानी में अपनी कला को कहीं न दिखा पाने के कारण कसमसाते रह गये, शाम को इस महफिल में आकर अपनी भड़ास निकाल कर हल्के हो लेते हैं। आकाश में तारे छिटकने पर ही नन्दू की महफिल खत्म होती है।
गाँव की अनगढ़, साधनहीन रामलीला में नन्दू के प्राण बसते हैं। कोई छोटा-मोटा पार्ट पाने के लिए जोर लगाता रहता है। और कुछ न मिले तो मुखौटा लगाकर वानर-सेना या राक्षस- सेना में शामिल हो जाता है। लीला शुरू होने से पहले पर्दा हटा कर बार-बार झाँकता है ताकि बाहर जनता को उसकी उपस्थिति की जानकारी हो जाए। जब तक रामलीला चलती है तब तक नन्दू दिन भर वहीं मंडराता रहता है।
नन्दू गाँव के बलराम दादा का मुरीद है। बलराम दादा सीधे-साधे, फक्कड़ आदमी हैं। सूती सफेद बंडी, सफेद अंडरवियर और टायर की चप्पलों में ही अक्सर देखे जाते हैं। कमाई का ज़रिया नहीं है इसलिए दरिद्रता घर के हर कोने से झाँकती रहती है। लेकिन बलराम साँप का ज़हर उतारने के लिए आसपास के गाँवों तक जाने जाते हैं। आधी रात को भी कोई बुलाने आये तो बलराम अपने कौल से बँधे दौड़े चले जाते हैं। अक्सर नन्दू को आवाज़ दे देते हैं तो नन्दू उनका झोला थामे पीछे-पीछे दौड़ा जाता है। मरीज़ के पास पहुँचकर बलराम नीम का घौरा थाम कर बैठ जाते हैं और मंत्र पढ़ने के साथ बेसुध पड़ा मरीज़ बक्रना शुरू कर देता है। बलराम साँप से मरीज़ को छोड़ देने के लिए मनुहार करते हैं। नहीं मानता तो घौरे से आघात करते हैं। अन्त में साँप मरीज़ को छोड़ देता है और मरीज़ होश में आ जाता है। नन्दू मंत्रमुग्ध सब देखता रहता है।
मरीज़ के होश में आने के बाद बलराम दादा उस स्थान को तत्काल छोड़ देते हैं। पानी तक ग्रहण नहीं करते, पैसे-टके की बात कौन करे। फिर आगे आगे वे और पीछे पीछे नन्दू। सीधे घर आकर दम लेते हैं। नन्दू की बस यही इच्छा है कि बलराम दादा से जहर उतारने का मंत्र मिल जाए। बलराम दादा ने वादा तो किया है, लेकिन अभी मंत्र दिया नहीं।
बाबा-जोगियों में नन्दू की अपार भक्ति है। कोई बाबा गाँव में आ जाए तो नन्दू सेवा में लग जाता है। बाबाओं की ज़िन्दगी नन्दू को बहुत लुभाती है। किसी भी बाबा से हाल-चाल पूछने पर एक ही जवाब मिलता है— ‘आनन्द है।’ बाबाओं के उपदेश नन्दू मुग्ध भाव से सुनता है। बहुत से जुमले और भजन की पंक्तियाँ सीख ली हैं। दोस्तों के बीच में रोब मारने में वे जुमले खूब काम आते हैं।
गाँव में भी कुछ वैरागी हो गये हैं। एक चूड़ीवाली का जवान बेटा अचानक साधु हो गया। अब वह कमंडल और झोला लिये आसपास के गाँवों में घूमता रहता है। माँ सब काम छोड़ रोज़ खाना लेकर उसे ढूँढ़ती फिरती है। मिल गया तो ठीक, अन्यथा उस दिन माँ के हलक से भी निवाला नहीं उतरता। बेटे के चक्कर में उसका धंधा चौपट हो गया। बेटे का मुँह देखने के लिए बावली सी घूमती रहती है।
गाँव के बुज़ुर्ग नत्थू सिंह को भी बुढ़ापे में वैराग्य हो गया था। नदी के पुल के पास ज़मीन में एक गुफा बनाकर वहीं रहने लगे थे। घर छोड़कर वहीं तपस्या करते थे। लेकिन डेढ़ साल में ही उन्हें फिर घर-द्वार ने खींच लिया। अब गेरुआ वस्त्र पहने नाती-नातिनों को खिलाते रहते हैं। उनकी बनायी गुफा अब धँस गयी है।
नन्दू का भी मन उचटता है। यहाँ गाँव में मजूरी-धतूरी के सिवा कुछ करने को नहीं है। दिन भर भाई भौजाई के उपदेश सुनना। बाबाओं के ठाठ होते हैं। जहाँ जाते हैं पच्चीस पचास आदमी पीछे चलते हैं, सेवा में लगे रहते हैं। पाँव छूते हैं सो अलग। भोजन-पानी की कोई चिन्ता नहीं, सब भक्तों के भरोसे। लोग पूछ पूछ कर दे जाते हैं।
एक दिन हिम्मत करके भौजी को बता दिया कि अब गाँव में मन नहीं लगता, सन्यास लेने का मन करता है। पिछली बार जो चिन्तामन बाबा गाँव में आये थे उनका पता ले लिया है। चुनार में उनका आश्रम है। वहीं जाएगा। भौजी को सुना कर गाता है— ‘अरे मन मूरख जनम गँवायो, ये संसार फूल सेमर को सुन्दर देख लुभायो।’
भौजी ने सुमेर को बताया तो उसने डाँटा, ‘पागल हो गया है क्या? बाबागिरी कोई आसान काम है? उसमें भी अकल चाहिए, नहीं तो जिन्दगी भर भटकता रहेगा। यह तेरे जैसे लोगों के बस का काम नहीं। यहीं कुछ काम-धाम कर।’
नन्दू ज्ञानी की नाईं कहता है, ‘काम धाम में कुछ नहीं धरा है। सब माया का फेर है। ये लोक तो बिगड़ ही गया, अभी नहीं सँभले तो दूसरा लोक भी बिगड़ जाएगा। अब तो सोच लिया है, माया से छुटकारा पाना है।’
उसका निश्चय देखकर भाई बोला, ‘खेती की जमीन में आधा हिस्सा तुम्हारा है। अभी पूरी जमीन दद्दा के नाम ही है। उसका क्या करोगे?’
नन्दू महादानी की तरह हाथ हिलाकर बोला, ‘हमें जमीन जायदाद से क्या मतलब! माया रहेगी तो बार बार वापस खींचेगी। हमें अब जमीन जायदाद से कुछ लेना-देना नहीं।’
भाई बोला, ‘तो चलो, पटवारी के पास लिख कर दे दो। जमीन मेरे नाम चढ़ जाएगी।’
नन्दू ने तुरन्त सहमति दे दी। पटवारी के पास जाकर सब काम करा दिया। बोला, ‘जी हल्का हो गया। जितने बंधन कम हो जाएँ उतना अच्छा।’
नन्दू का बाप दमा का मरीज़ था। रात रात भर बैठा खाँसता रहता था। लेटने में ज़्यादा तकलीफ होती थी। साँस खींचते खींचते गले की नसें उभर आयी थीं। गाँव में इलाज नहीं था। सरकारी डाक्टर सबेरे दस बजे आता था और घड़ी के पाँच छूते ही शहर चल देता था, जहाँ उसका परिवार था। दवाखाना कंपाउंडर के हवाले। परिवार गाँव में रहकर क्या करेगा? अन्ततः खाँसते-खाँसते नन्दू का बाप दुनिया से विदा हो गया।
नन्दू की माँ अभी ज़िन्दा थी, लेकिन उसे मोतियाबिन्द के कारण ठीक से दिखायी नहीं पड़ता था। बार-बार चित्रकूट ले जाने की बात होती थी, लेकिन भाई को फुरसत नहीं थी और नन्दू अकेले चित्रकूट में माँ को संभालने की कल्पना से ही घबरा जाता था। इसलिए दिन टल रहे थे।
आखिरकार नन्दू के विदा होने का दिन आ गया। दोस्त-रिश्तेदार इकट्ठे हो गये। सब के मन में नन्दू के लिए प्रशंसा और आदर का भाव था। नन्दू ने माँ,भाई,भाभी के पाँव छुए, बोला, ‘फिकर मत करना। ऊपरवाला मेरी रच्छा करेगा। आदमी के बस में कुछ नहीं है।’
माँ रोते रोते बोली, ‘मत जा बेटा। जाने कहाँ भटकता फिरेगा।’
नन्दू हाथ उठाकर बोला, ‘मत रोको माता। मुझे मारग मिल गया है। अब मुझे रोकने से पाप लगेगा।’
जुलूस के आगे आगे गर्व से चलता नन्दू बस पर बैठकर गाँव से रवाना हो गया। दो-चार दिन बाद दोस्त उसे भूल गये। बस माँ थी जो उसके लिए बिसूरती रहती थी। वह गाँव के लिए पराया हो गया।
साल डेढ़-साल तक नन्दू की कोई खबर नहीं मिली। भाई-भाभी को लगा कि वह बाबाओं के साथ रम गया। अचानक एक दिन उसका फोन आया। भाई से बात हुई। पहले माँ के और गाँव के हाल-चाल पूछे, फिर बोला, ‘यहाँ मन नहीं लगता। सब की याद आती है। बाबागिरी मेरे जैसे लोगों के लिए नहीं है। यहाँ मेरे लिए कोई काम नहीं है। गाँव लौटने का मन होता है।’
भाई व्यंग्य से बोला, ‘हो गयी बाबागिरी? मैंने पहले ही रोका था। आना है तो आजा। कौन रोकता है?’
तीन-चार दिन बाद नन्दू सचमुच आ गया, लेकिन हुलिया ऐसी कि पहचानना मुश्किल। सूखे मुँह पर लंबी दाढ़ी मूँछ, बढ़े हुए अस्तव्यस्त बाल, बेरंग, पुराने गेरुआ वस्त्र, पाँव में खस्ताहाल चप्पल। माँ से मिला तो वह खुश हो गयी।
शाम तक वह दाढ़ी, मूँछ और बाल कटवा कर और कपड़े बदल कर सामान्य हो गया। लेकिन बाबागिरी वाली बात पर वह बार-बार शर्मा रहा था।
दो दिन तक नन्दू बेहोश सोता रहा, जैसे लंबी थकान उतार रहा हो। तीसरे दिन सबेरे भाई से बोला, ‘मैं भी खेत चलूँगा।’
भाई बोला, ‘जैसी तेरी मर्जी। चल।’
उस दिन दोपहर तक काम करके लौट आया। लौट कर सो गया।
अगले दिन हल चलाते चलाते भाई के मुँह की तरफ देख कर बोला, ‘अब तो मुझे यहीं रहना है। यहीं खेती-बाड़ी करूँगा। चल कर फिर से मेरा नाम जमीन पर चढ़वा दो।’
भाई हल चलाते चलाते रुक गया, बोला, ‘कौन सी जमीन की बात कर रहा है? यह जमीन तो अब सिर्फ मेरी है। तूने ही तो लिखा- पढ़ी की थी।’
नन्दू का मुँह उतर गया, बोला, ‘तो हमें कहाँ पता था कि हम लौट आएँगे। लौट आये हैं तो जमीन का हमारा हिस्सा हमें मिलना चाहिए।’
भाई कठोरता से बोला, ‘तो ले ले जैसे लेते बने। अब कल से खेत पर पाँव मत रखना, नहीं तो मुझसे बुरा कोई नहीं होगा।’
नन्दू चुपचाप घर लौट आया। अब घर भी पराया लगने लगा। एक माँ ही प्रेम करने वाली बची थी। भौजी नज़र चुराती थी।
रात किसी तरह कटी। दूसरे दिन नन्दू सबेरे ही खेत के कुएँ पर जाकर बैठ गया। भाई पहुँचा तो उठ कर बोला, ‘यह मेरे बाप की जमीन है। मेरा हिस्सा कोई नहीं छीन सकता।’
सुमेर ने उसकी बाँह पकड़ कर घसीट कर खेत से बाहर कर दिया। दाँत पीसकर बोला, ‘एक लुहाँगी हन के मारूंँगा तो भरभंड फट जाएगा। जान की सलामती चाहता है तो फिर इस तरफ मुँह मत करना।’
नन्दू रोने लगा। रोते रोते गाँव के सयानों से फरियाद कर आया। हर जगह एक ही जवाब मिला, ‘अब तुमने खुद अपने हाथ काट लिये तो हम क्या करें? मामला-मुकदमा कर सको तो करो।’
मामला-मुकदमा करने कहाँ जाए? मामला-मुकदमा करने के लिए उसके पास पैसा कहाँ है? वैसे एक दो विघ्नसंतोषी उसके कानों में मंत्र ज़रूर फूँक गये— ‘छोड़ना नहीं। अदालत में घसीटना।’
नन्दू अब घर के सामने उदास बैठा रहता। भौजी दरवाज़े पर आकर रूखे स्वर में आवाज़ देती, ‘थाली रखी है।’ वह बेमन से उठकर दो चार कौर ठूँस लेता। माँ से बताया था और माँ ने भाई से बात भी की थी, लेकिन सुमेर ने उसकी बात को अनसुना कर दिया था।
दो-तीन दिन नन्दू घर के सामने बैठा दिखा, फिर वह अचानक ग़ायब हो गया। गाँव में कुछ लोगों का कहना है कि वह फिर से चिन्तामन बाबा के आश्रम चला गया, जब कि कुछ लोगों का कथन है कि वह दाना-पानी के चक्कर में दिल्ली चला गया।
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 229☆ सदाहरी
किसी आयोजन से लौटा हूँ। हाथ में आयोजन में मिला पुष्पगुच्छ है। पुष्पगुच्छ घर में नियत स्थान पर रख देता हूँ।
दैनिक आपाधापी में ध्यान ही नहीं रहा और तीन दिन बीत गए। चौथे दिन गुच्छ पर दृष्टि पड़ी। गुच्छ लगभग सूख चुका है। देखता हूँ कि छोटे-छोटे श्वेत पुष्पों के समूह के बीचो-बीच कुछ गुलाब फँसा कर रखे गए थे। वे पूरी तरह पुष्पित हुए बिना ही सूखने की कगार पर हैं। पुष्पों को एक जगह एक आकार में टिकाए रखने के लिए कसकर टेप चिपकाया गया है। टेप के बंधन से मुक्त कर गुच्छ के पुष्पों को एक छोटे खाली गमले में रखकर थोड़ा जल छिड़कता हूँ। खुली हवा में साँस लेने के साथ धूप और जल मिलने से संभवत: उनका जीवन दो-तीन दिन और बढ़ जाए।
विचार शृंखला यही से आरंभ हुई। कितने लोगों का जीवन प्रतिकूलता में ही बीत जाता है। उनके बंधन भी इस टेप की तरह उन्हें बांधे रखते हैं। इनमें थोपे हुए, मानसिक, वैचारिक सभी प्रकार के बंधन होते हैं। स्त्री, पुरुष दोनों इस प्रतिकूलता के शिकार हैं। तथापि अन्यान्य कारणों से स्त्रियों को प्रतिकूलता का दंश अधिक भोगना पड़ता है।
स्त्री मायके की माटी से निकालकर ससुराल की माटी में रोपी जाने वाली बेल है। अधिकांश समय नए स्थान, नई परिस्थितियों, नए क्षेत्र की माटी के तत्वों से संतुलन बैठाने का समय दिए बिना ही बेल से जड़ें जमाने और पल्लवित होते रहने की अपेक्षा कर ली जाती है। जबकि बहुधा उसकी जड़ें मिट्टी की तह तक पहुँच ही नहीं पातीं। पुष्पगुच्छ के गुलाब की तरह उसका विकास रुक जाता है।
दैनिक जीवन में ऐसी अनेक मुरझाई बेलों से आपका भी सामना हुआ होगा। एक ऐसी वरिष्ठ महिला मिलीं जिन्हें जीवन के छह दशक देख लेने के बाद भी सलवार-कुर्ता ना पहन सकने की कसक थी। उनके घोर रुढ़िवादी परिवार में इसकी अनुमति नहीं थी। अब उनकी बहू इच्छित वस्त्रों में रहती है पर वे जाने-अनजाने एक मानसिक बंधन स्वयं पर लाद चुकी हैं। स्वयं ही उससे मुक्त नहीं हो पा रहीं पर भीतर मुरझाई हुई इच्छा अब भी साँस ले रही है। स्त्रियों के संदर्भ को ही आगे बढ़ाएँ तो संभव है कि किसी स्त्री के मायके में भोजन में मिर्च- मसाला न के बराबर डाला जाता रहा हो। ससुराल में मिर्च मसाले के बिना भोजन की कल्पना ही नहीं की जाती। ऐसे में पहले कुछ महीने तो उसके लिए भोजन भी दूभर हो जाता है।
अपना परिवार छोड़कर एक नए परिवार में आई अकेली महिला की पसंद-नापसंद का सम्मान करना नए परिवार का दायित्व होता है। प्राय: होता उल्टा है और नए परिजनों की सारे आदतों का सम्मान करने का बोझ नवेली पर डाल दिया जाता है। जीवन के विभिन्न क्षेत्रों में स्त्रियाँ निरंतर संघर्ष करती दिखाई देती है। पारिवारिक दायित्वों के चलते अनेक बार वे नौकरी में पदोन्नति को ठुकरा देती हैं ताकि स्थानांतरण ना हो और परिवार बंधा रह सके।
कंटकाकीर्ण पथ पर चलती स्त्रियों के लिए सुगम पगडंडी बनाने में हाथ बँटाइए। पुष्पित- पल्लवित होने के लिए उन्हें उर्वरा माटी मुहैया कराइए। जिसे दूसरे घर से लाए हैं, उसे आपके घर की होने, इस घर को अपना बनाने के लिए समय दीजिए।
स्त्रियाँ सदाहरी बेल हैं। सृष्टि में मनुष्य प्रजाति के सातत्य का बीड़ा उन्होंने उठा रखा है। इस सप्ताह महिला दिवस भी है। भारी-भरकम शाब्दिक जंजालों से बचते हुए उनका मार्ग निष्कंटक करने और उन्हें विकास के समुचित अवसर देने के लिए प्रयास करें। आइए, इन सदाहरी बेलों का सदा समुचित सम्मान करें।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
Anonymous Litterateur of Social Media # 177 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 177)
Captain Pravin Raghuvanshi NM—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’. He is also the English Editor for the web magazine www.e-abhivyakti.com.
Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc.
Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.
In his Naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Awards and C-in-C Commendation. He has won many national and international awards.
He is also an IMM Ahmedabad alumnus.
His latest quest involves writing various books and translation work including over 100 Bollywood songs for various international forums as a mission for the enjoyment of the global viewers. Published various books and over 3000 poems, stories, blogs and other literary work at national and international level. Felicitated by numerous literary bodies..!
English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 177