क्रिकेट समजणाऱ्यांना रन आऊट म्हणजे काय हे सांगायला नको. खरंतर खेळतांना आऊट होण्यात आनंद नसतोच. या पध्दतीने आऊट होण्याचं दु:ख वेगळच असतं.
पण तरीसुद्धा काहीजण आपल्यापेक्षा समोरच्याला महत्व देत केवळ समोरच्याला चांगली संधी मिळावी, त्या संधीचा त्याने उपयोग करावा, मी पुढच्या वेळी प्रयत्न करेन, पण आज तु मिळालेली संधी सोडू नकोस हां आणि असाच विचार करत काहीवेळा स्वतः असं रन आऊट होण्याचा धोका पत्करतात.
असा स्वतः आऊट होण्याचा धोका परत्करणारे आपले असतात. आणि हे आपले आपल्या रोजच्या खेळात, सतत असतात. मग ते आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, बहिण, काका, मामा, मावशी, आत्या इ…… थोडक्यात सगळे नातेवाईक आणि मित्र असतात.
थोडक्यात आपलं मोठं होण्यासाठी, आनंदासाठी, भविष्यासाठी, चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी असे स्वत:हून रन आऊट होण्याचा धोका परत्करणारे जे कोणी असतात त्यांच्यामुळे आपण काही प्रमाणात आपला डाव सावरत आणि साकारत असतो. तो डाव चांगला झाल्यावर ……..
कोणीतरी रन आऊट होण्याचा धोका पत्करून आपला डाव सावरला आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.
असं आऊट होतांना त्यांनी त्यांचा वेळ, आनंद, आवडणाऱ्या गोष्टी, छंद, काही प्रमाणात सुख, आराम हे स्वत:हून सोडलेलं तर असतंच. पण हे सोडण्यात त्यांना आनंद आणि समाधान असतं. या गोष्टी सोडण्याच्या त्रासात सुध्दा ते एक वेगळा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि वेळोवळी तो आनंद व्यक्त करतात.
आणि याचा उल्लेख ते करत नाहीत. केला तर क्वचित करतात. आणि त्यातही यातून समोरच्याने मिळवलेल्या यशाचा, केलेल्या प्रगतीचा, दाखवलेल्या हिमतीचा, आणि प्रेमाचा आदर या ऊल्लेखात असतो.
अशा पध्दतीने रन आऊट होण्याची संधी जवळपास प्रत्येकाला मिळते. फक्त त्या वेळी आपण रन आऊट व्हायचं का करायचं हे ठरवाव लागतं.
ज्याला हे समजलं आणि उमजलं तो रन आऊट झाल्यानंतर सुध्दा जिंकत असतो………..
(तिच्या मनात त्याच्याबद्दलच्या विचारांचा, आठवणींचा हिंदोळा झुलत राहायचा, कधी कधी तिच्याही नकळत…) – इथून पुढे
दीपकने दोन्ही कुटुंबांचा पिकनिक आणि सहभोजनाचा कार्यक्रम ठरवला. स्वप्नील ,त्याची बायको स्वप्ना आणि मुलगी तेजाला घेऊन आला. स्वप्नाला पाहून का कुणास ठाऊक पण तिला कसंसंच झाले. स्वप्ना तशी छान होती ,मोकळेपणाने बोलणारी, सहभागी होणारी..तिच्याशी एखाद्या मैत्रिणीप्रमाणे वागली. ती ही तशीच वागली .पण स्वप्नीलचं स्वप्नाशी असणारे वागणे तिला रुचले नाही. तसा तो तिच्याशी आवश्यकतेपेक्षा थोडेसे जास्तच अंतर राखून वागतोय असे तिला जाणवले आणि ती मनोमन नाराज झाली होती. ती नाराजी फक्त त्यालाच जाणवेल अशी व्यक्त ही केली होती पण त्याने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. मग तीही आस्ते आस्ते पण मनाविरुद्ध दीपककडे सरकली. तशा गप्पा छान झाल्या.पिकनिक ही मस्त झाली.. सोनू आणि तेजाची तर चांगलीच गट्टी जमली होती. त्या दोघांनी खूपच धमाल केली. फक्त ती मनातून अस्वस्थ झाली होती, कुठंतरी अंतर्यामी दुखावली होती. इत्तर कुणाच्याही ध्यानी-मनी आलं नसलं तरी स्वप्नीलला ते चांगलंच जाणवले होते
घरी आले तेव्हा सारेच दमले होते, सोनू तर काही न खाताच लगेच झोपून गेला. दीपक हॉल मध्ये टीव्ही वर बातम्या पाहत बसला होता. ती अस्वस्थ मनाने सोनूजवळ पहुडली होती. तिला खरेतर स्वप्नील काहीसा जास्तच त्रयस्थपणाने वागल्याने त्याचा राग आला होता. ती मनोमन दुखावली गेली होती. मोबाईलचा मेसेज टोन वाजला. स्वप्नीलचा मेसेज होता. तसाच डिलीट करावा असे तिला वाटत होते पण तिने तो वाचला.
‘सॉरी, तू समजूतदार आहेस, सारे समजून घेशील हा विश्वास आहे. एकच सांगतो, तू भेटल्यापासून मला दुसऱ्या कुणाचंच आकर्षण वाटत नाही… अगदी कुणाचंच . मिस यू..‘
तिने मेसेज वाचून डिलीट केला. तिच्या मनात आले ,दीपकच्या मनात काही येऊ नये म्हणून कदाचित आपणही असेच वागलो असतो, कदाचित नकळत वागतही असू आणि त्या विचाराबरोबर तिच्या मनातली अस्वस्थता, त्यांच्याबद्दलचा राग ही डिलीट झाला. तिने त्याला तसाच रिप्लाय दिला आणि ती उठून हॉलमध्ये दीपकजवळ येऊन त्याला बिलगून बसली.
ऑफिसात रोज भेट व्हायचीच, बोलणे ही व्हायचं पण शब्दांचे, नजरेचे अर्थ बदलले होते. ‘अहो जाहो’ करणारा तो ‘अगं तूगं ‘ कधी करू लागला ते तिच्याही ध्यानात आले नसलं तरी तिला ते मनापासून आवडू लागले होते. सहज भासवलेल्या स्पर्शात ओढ, हवेहवेसेपण पाझरू लागले होते. दिवस जात होते तसे भेटीची ओढ वाढत होती. घरी परतल्यावर, सुट्टीदिवशी कॉल, मेसेज तर होत होतेच पण ‘गुडनाईट’ शिवाय झोप लागत नव्हती आणि ‘गुडमॉर्निंग’ शिवाय जाग येत नव्हती.
एकीकडे त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत असताना दीपकचा स्पर्श नकोसा वाटू लागला होता. ती ते दर्शवत नव्हती तरी दीपकला ते जाणवू लागले होते. त्याने ते एकदा बोलूनही दाखवले होते पण काहीतरी सबब तिने सांगितल्यावर त्याने ती सबब काहीही न बोलता मान्य केली होती,स्वीकारलीही होती. सुरवातीच्या काळात तिच्या मनात येणारी अपराधीपणाची भावना, विचार आताशा येईनासे झाले होते.. उलट ती स्वप्नील मध्ये जास्तच गुरफटत चालली होती आणि तिला त्याची जाणीवही होईनाशी झाली होती. आपण नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करतोय हा विचार ही तिच्या मनाला स्पर्शत नव्हता..आणि ‘का ?’ हा प्रश्नही तिला पडत नव्हता. जणू तिच्या मनावर त्याचं गारुड होते.. त्या गारुडाने तिचे भान हरपले होते.. विचारशक्ती कुंठित झाली होती. योग्य अयोग्य याचा विचार ही मनात येत नव्हता .
दीपक दोन दिवसांकरीता ऑफिसच्या कामानिमित्त परगावी गेला तेव्हा कधी नव्हे ते तिला मोकळे मोकळे वाटले. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. कधी दीपक एखादा दिवस जरी येणार नसला तरी तिला कसेतरी वाटायचं..झोप यायची नाही. त्याकाळापूरती मनात आणि घरातही एक पोकळी जाणवायची. एकटं एकटं वाटायचं . ती त्याच्या येण्याची खूप आतुरतेने वाट पहायची. तो आला की खूप रिलॅक्स व्हायची. यावेळी मात्र तिला तसे काहीच वाटले नव्हते .
तिने दीपक परगावी गेल्याचं बोलता बोलता स्वप्नीलला सांगितले होते. ते त्याला सहज सांगितले की मुद्दामहून हे तिला स्वतःला सुध्दा कदाचित सांगता आले नसते पण स्वप्नीलला ते सूचक वाटले आणि तो संध्याकाळी तेजाला घेऊन तिच्या घरी आला होता. तेजा आणि सोनूची जोडी उड्या मारतच खेळायला अंगणात पळाली. ती चहा ठेवायला किचन मध्ये जाताच मागून स्वप्नील आत गेला .. आणि असोशीने खसकन् तिला जवळ ओढले. ती त्या क्षणाची वाटच पाहत असल्यासारखी मिठीत विसावली पण पुढच्याच क्षणी भानावर आली.. ‘ मुले पटकन आत येतील..’ म्हणत पटकन बाजूला झाली. स्वप्नील काहीतरी म्हणत होता. तिला सांगत, समजावत होता पण ती त्याक्षणी ठाम राहिली.
“ रागावलात ? सॉरी.. .पण इथे शेजारच्या कुणीही घरच्यासारखं पटकन आत येतात.. भीती वाटते.. सोनू तर खेळताखेळता मध्येच पळत पळत आत येतो. “
स्वप्नील ‘ नाही ‘ असे म्हणाला असला तरी नाराज झालाय हे तिला जाणवले होते. तिने ‘सॉरी ‘ म्हणून, त्याचा हात स्वतःहून हातात घट्ट धरत त्याला खुलवायचा प्रयत्न केला.
थोडा वेळ थांबून जाता जाता त्याने विचारले,
“ ठीक आहे. तिकडे तरी येशील ना? “
ती ‘ हो ‘ म्हणाली होती आणि आलीही होती. बाईक उभी करून कपडे सरळ करता करता तिला हे सारे आठवले तशी ती विचारात पडली..
‘ हे काय आहे? प्रेम की आकर्षण, शारीरिक ओढ? आपण तर दीपकवर प्रेम केले..त्याच्या सहवासात खूपच सुखी होतो. ओढ होती, असोशी होती.. मग अलीकडे आपल्याला हे झालंय तरी काय ? आपण एवढ्या कशा बदललो, एवढया कशा वाहवलो? काही दिवसातच आपण स्वप्नीलकडे आकर्षिलो गेलो आणि आपल्याला इतकी वर्षे आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, ज्याच्यासाठी आपणच सर्वस्व आहोत त्या दीपकचाही आपल्याला विसर पडला.. ..त्याच्या प्रेमाशी आपण प्रतारणा करतोय हे ही आपल्या मनातही आलं नाही कधी…इतकंच नव्हे तर त्याचा सहवास, स्पर्शही नकोसा वाटू लागलाय… इतक्या कशा बदललो आपण? इतक्या कशाला भाळलो आपण.. आपल्या स्तुतीला, गोड बोलण्याला..? आणि या साऱ्यात दीपकला मनातनं वजाच करून टाकल्यासारखे दूर ठेवले.. इतक्या कशा मोहात आंधळ्या झालो आपण .. आणि का? का? का?.. आणि स्वप्नीलचं, आपले नाते तरी काय? या नात्याचं भविष्य तरी काय ? ‘
तिच्या मनात विचारांचं वादळ उठले.. शेवटी मोहमयी मन आणि तिचे अंतर्मन यांत द्वंद्व सुरु झाले आणि त्या एका क्षणात आपण काय करतोय याचं तिला भान आले.
….आणि स्वप्नीलच्या बंगल्याचं गेट उघडण्यासाठी पुढे सरसावलेला तिचा हात थबकला.
तर माझ्या मते धर्म म्हणजे एक आदर्श जीवन पद्धती आहे.
नियम आणि चौकटी धर्माने आखून दिलेल्या आहेत.
त्यांचे योग्य तऱ्हेने पालन करून जीवन जगावे .असे जीवन आनंददायी आहे .
अगदी सकाळी ऊठल्यानंतर अंथरुणावरून खाली उतरण्याच्या आधीच गादीवर बसून …
प्रार्थना केली जाते…
“कराग्रे वसते लक्ष्मी
करमुले सरस्वती
करमध्ये तु गोविंदा
प्रभाते कर दर्शनम्
समुद्र वसने देवी
पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमोस्तुभ्यमं
पादस्पर्श क्षमस्व मे…”
हे पृथ्वी माते माझ्या पायांचा तुला स्पर्श होणार म्हणून क्षमा याचना करून दिवसाची सुरुवात करायची.
हे म्हणताना शब्दातून आपोआप लीनता येते. आपली कृतज्ञता दाखवली जाते.
हात जोडले जातात..
नंतर नित्यकर्म सुरू….
आंघोळ करून देव पूजा …
तेव्हा मग स्तोत्र – मंत्र आरती……..
मात्र हे नुसतं म्हणायचे नसतात ..
त्यात शिकवण असते …मनाची समजूत असते…
तसे देवाचे प्रेम आणि माया पण असते .
त्याचा अर्थ आणि मुख्य म्हणजे भावार्थ समजून घेऊन ती म्हणायची असतात.
संकटात दुःखात मनाला त्यांचा फार मोठा आधार असतो.
फुलांनी सजलेल देवघर,मंद तेवणारी समई,उजळलेली निरांजन बघताना मनात सदभावना दाटून येते.
सकाळ अशी सात्विकतेने सुरू झाली की दिवस आपोआप निरामय आनंदात जातो.
हे नुसतं म्हणणं नाही तर याचे पाठांतर पण हवे ….
यासाठी अभ्यास हवा..
त्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा …
आणि मग ते स्तोत्र – मंत्र शांतपणे डोळे मिटून एकांतात म्हटले की मिळणारा आनंद हा शब्दात सांगता येत नाही .
त्याचा अनुभव घ्यायला हवा.
जेवताना…
“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे….”.म्हणावे..
मग ते साधे जेवण होत नाही तो यज्ञ कर्म होतो हे … मार्मिकपणे सांगून ठेवले आहे .
याला आयुर्वेदाचा आधार आहे….
“सीताकांत स्मरण जय जय राम…”
म्हटल्यानंतर त्या अन्नाकडे बघायची आपली दृष्टी बदलते .
अन्न उत्तम रीतीने पचते .घरच्या गृहिणीने कष्ट घेऊन ते बनवलेले असते. त्याचा आपोआप मान राखला जातो .पवित्रता जपली जाते .
म्हणूनच त्याला पूर्णब्रह्म म्हटलेले आहे …..
हे रोज म्हणायला जमणार नाही पण सणावारी …रविवारी म्हणून तर बघा आपला आपल्यालाच आनंद वाटतो.
शाळेत आजही सरस्वती मातेला प्रथम वंदन केले जाते .
“या कुंदेंदु तुषारहार धवला
या शुभ्र वस्त्रावृता…”
असे म्हणून सरस्वतीची प्रार्थना केली जाते .तिच्याकडे आमची जडता (अज्ञान) दूर कर अशी विनवणी करायची. मात्र त्यासाठी प्रयत्न आपण करायचे आहेत. आपल्याला अभ्यास करायचा आहे हे लक्षात ठेवायचे आहे.
मनाचे श्लोक ,अथर्वशीर्ष ,पसायदान हे शाळेत म्हणून घेतले जाते.पाठ करून घेतले जाते.
कदाचित त्या वयात अर्थ लक्षात येत नाही .पण मोठे झाल्यानंतर तो आपोआप बरोबर कळतो… समजतो..
हेच ते संस्कार….
हुरहुर लावणारी संध्याकाळ… दिवेलावणीची वेळ झालेली असते… तेव्हा देवासमोरचा दिवा लावला जातो … तेवढ्या मंद प्रकाशाचाही आधार वाटतो…क्षणभर हात जोडले जातात.
“शुभंकरोती कल्याणम्…” म्हणायचं ..आरोग्यम् धनसंपदा हे किती वर्षांपूर्वीच आपल्याला सांगून ठेवलं आहे .सवयीने आपण ते म्हणतो पण ते कृतीतही यायला हवं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
निरामय आरोग्यासाठी आपला आहार विहार योग्य असायला हवा. जाताजाता केवढी शिकवण दिलेली आहे. आपण सहजपणे नेहमी म्हणतो म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही…
रात्री झोपायच्या वेळी शरण आलेल्या लोकांचे क्लेश दु:ख दूर करणाऱ्या गोविंदाला नमस्कार करायचा .
असा संपूर्ण दिवस प्रार्थनेने संस्काराने आपोआप बांधला गेला आहे.
त्याचे एक संरक्षित आवरण आपल्या भोवती असते. त्यात आपल्याला सुरक्षित वाटते.
एक अदृश्य शक्ती आहे ती मला सांभाळते आहे… हा मनात विश्वास असतो .
संकट येत नाही तोपर्यंत काही वाटत नाही .मात्र ते आले की आपण आपोआपच परमेश्वराला शरण जातो. मस्तक टेकवले जाते. हात जोडले जातात.. त्या क्षणी त्या एकाचाच आधार आहे हे आपल्या अंतरंगातून आपल्याला जाणवते.
.. आणि मग त्याची प्रार्थना अजूनच आर्ततेनी केली जाते.
मनापासून जेव्हा आपण शरण जातो तेव्हा ती प्रार्थना सफल होते..
आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनात इतकं सगळं म्हटलं जात नाही.
हेही तितकच अगदी खरं आहे .
नाही म्हटलं गेलं तरी चालेल …
…
पण दिवसातून एकदा अगदी मनापासून त्याला हाक दिली त्याची आळवणी केली तरी ती त्याच्या पर्यंत पोहोचते….
किती वेळा काय काय म्हणतो… हेही महत्त्वाचे नाही .
आतूनच जाणीव होऊन खरं खरं त्याच्याशी बोलायचे…
त्याला सांगायचे….
अभ्यास वाढला की सांगणे पण कमी होते…
तो सर्वज्ञच आहे….
याची जाणीव होते..
इतके सारे ज्ञान भांडार आपल्या हाताशी आहे. पूर्वजांनी हा ठेवा देऊन ठेवलेला आहे.
शब्दांचा फार मोठा आधार असतो. त्या जगनियंत्त्याला शरण जाऊ…
आपली विनवणी त्याच्यापर्यंत पोहोचेलच….. तो विश्वास मात्र मनात हवा.
तो असला की पुढचे सगळे सोपे होते.
“सर्वेपि सुखिनः:सन्तु सर्वे संन्तु निरामया:
सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात…”
.. .. रात्री झोपताना सर्वांचे कल्याण व्हावे कोणी दुःखी असू नये अशी प्रार्थना करायची.
आपल्याही नकळत आपला दिवस असा जातो…..
हाच तो धर्म…… प्रत्येकाचा आपला आपला धर्म असतो.आणि तो त्याप्रमाणे वागत असतो.
सर्व धर्मात हीच शिकवण असते .. शब्द फक्त बदलतात…..
यासाठी दिवसाच्या चोवीस तासांतील फक्त काही मिनिट आपल्याला द्यावी लागतील.
प्रत्येकाला सुखी शांत आणि आनंदी जीवनाची आस असते, तसंच प्रत्येकाचा ही एक स्वतःचा असा
☆ “सिंहाचलम”… भक्त प्रल्हाद व प्रभु नृसिंह..!… लेखक : श्री श्रीकांत पवनीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणमजवळ समुद्र सपाटीपासून आठशे फूट उंच असलेल्या सुरेख व अप्रतिम डोंगराचे नाव आहे सिंहाचलम…! सिंह आणि अचलम( पर्वत) म्हणजे सिंहाचलम..! सिंहाचा पर्वत ..! समुद्रातीरावरच्या आंध्र प्रदेशातल्या उत्तर विशाखापट्टणम पासून केवळ सोळा किलोमीटरवर जवळ एक अप्रतिम असा पर्वत आहे आणि या पहाडावर एक सुरेख अनेक वृक्षांनी बहरलेले लहानसे स्वच्छ सुंदर शहरच आहे.पहाडा वरच्या रम्य वनश्रीत वसलेली जणूकाही देवभूमीच..! या उंच मार्गावर अननस,आंबे व अनेक फळांची व फुलांच्या झाडांची नुसती बहार आहे. या अनेक वृक्षांखाली मोठमोठ्या दगडी शिला स्थापित आहे आणि अनेक भाविक पर्यटक येथे दर्शना अगोदर नंतर या सिंहाचलम पर्वतावर विश्रांती घेत असतात. हा पर्वत म्हणजे प्रभु नृसिंहाचे निवासस्थान मानले जाते.भक्त प्रल्हादाच्या रक्षणाकरिता प्रभू नृसिंह प्रगट झाले अशी अनादि काळापासून पारंपारिक मान्यता आहे आणि आपले बालपण अशा गोष्टीत रमून गेले होते.
लुनार वंशाचे ऋषि पुरुरवा हे आपली पत्नी उर्वशी सोबत वायु भ्रमण करत असताना एका विशिष्ट नैसर्गिक शक्तीने प्रभावित होऊन या सिंहाचलम पर्वतावर पोहोचले व त्यांना एक विष्णूची प्रतिमा/मूर्ती डोंगरात पुरलेली दिसली. ती मूर्ति काढून धुळ साफ करताना भगवंताची आकाशवाणी झाली .मूर्तीला चंदनाचा लेप लाऊन वर्षातून फक्त एकदा भक्तांना मुळ मूर्तीचे दर्शन घडवावे व भक्तांचे कल्याण करावे.ऋषि पुरुरवा यांनी ही भगवंताची आज्ञा मानून या शोधलेल्या ठिकाणी प्रतिमा /मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि भक्तांचा ओघ सुरू झाला. आज येथे भव्यदिव्य श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरात संपूर्ण चंदनाचा लेप असलेली नरसिंहाची मूर्ती बघायला मिळते.या मंदिराची विशेषता अशी की येथे भगवान विष्णु हे वराह आणि नृसिंहच्या संयुक्त अवतारात लक्ष्मीसोबत स्थापित झालेले आहे आणि याची स्थापना भक्त प्रल्हादाने केली आहे असे मानल्या जाते.हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भक्त प्रल्हादाने हे मंदिर बांधले आणि ते काळाच्या ओघात या पहाडात गडप झाले आणि ऋषि पुरुरवा यांच्या दृष्टीस पडले.आतले मंदिर अतिशय भव्य असून बघितल्या बरोबर प्राचीनत्व जाणवते . मंदिरातले वातावरण अत्यंत भारावलेले असून मंद दिव्यांच्या आराशीची एक दिव्य झळाळी चन्दन मूर्ती समोर व मंदिरात दिसते.मूर्ती जवळ प्रवेश मिळतो. अकराव्या शताब्दीत मुळ मंदिराचे गर्भगृह बांधल्या गेले असे समजते. विष्णूच्या “वराह नरसिंह” रूपातले हे मंदिर आहे व इथल्या अनेक मंदिरात प्रत्येक खांबावर मूर्तीकलेचा प्राचीन कलात्मक आविष्कार बघायला मिळतो आणि त्या कलावंतांना दाद द्यावीशी वाटते. . वर्षभर मूर्ती चन्दन लेपाने झाकलेली असते आणि पुजारी पाटा वरवंट्यावर चंदनाचा लेप तयार करताना मंदिर परिसरात दिसतात. येथील मुख्य उत्सव चैत्र शुद्ध एकादशीला होणारा “वार्षिक कल्याणम” आणि वैशाखातल्या तिसर्या दिवशीची “चन्दन” यात्रा असते .याला “ चंदनोत्सव ” म्हणतात. मंदिरात कपाळावर चन्दन लाऊन चंदनाचा प्रसाद वाटला जातो. वैशाखातल्या अक्षयतृतीयेला संपूर्ण सिंहाचलमचे महोत्सवाचे दृश्य बघण्यासारखे असते आणि देश विदेशातून असंख्य भाविक दर्शनाला येतात. अक्षयतृतीयेच्या दिवशी भगवान लक्ष्मीनृसिंहाचा ओल्या चन्दनाने अत्यंत आकर्षक शृंगार केल्या जातो. भगवंताचे वास्तविक स्वरूप केवळ याच एका दिवशी बघायला मिळते.
असुर शक्तिची संस्कृती शक्तिशाली होत असताना असुर राज हिरण्यकश्यपू व कयाधुच्या पोटी विष्णुभक्त प्रल्हादाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाचे वरदान असल्याने उत्तरप्रदेशातल्या हरदोईचा हा राजा हिरण्यकशपु निरंकुश झाला होता.या राजाच्या आदेशानुसार कुणीही राज्यात विष्णुची भक्ति करू शकत नव्हते. पण पुत्र भक्त प्रल्हादाची भगवान विष्णुवर अतूट श्रद्धा असल्याने क्रोधित होऊन राजाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आणि बहीण होलीकाने या कपटात त्याला मदत केले. होलिकेला आगीपासून संरक्षण असल्याने ती प्रल्हादाला घेऊन आगीत बसली परतू भगवंताच्या कृपेने प्रल्हादाला काहीच न होता होलीका भस्म झाली आणि दुसर्याच दिवशी भगवान नरसिंहाने विष्णुचे रूप घेऊन हिरण्यकशपुला मारले आणि प्रजेला अत्याचारा पासून मुक्त केले.ही घटना मात्र हरदोई येथे घडली असे समजते तर काही अभ्यासकांच्या मते ही घटना सिंहाचलमच्या पहाडावर घडल्याचे सांगितल्या जाते.याची आठवण म्हणून होलिका दहन उत्सत्वाला हरदोइ पासून सुरवात झाली. हिरण्यकश्यपुचा जन्म उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्याचा आणि तो तेथला राजा सुद्धा होता ..! पण अत्यंत कठोर तपस्येने व भक्तीने त्याने ब्रंहादेवाकडून विचित्र वर मागून जवळपास अमरत्व प्राप्त केले. त्याला असे वरदान होते की कुठलाच मनुष्य,पशु, दैत्य, देवता, नाग, प्राणी, यांच्या कडून आकाश आणि जमिनीवर मृत्यु येऊ नये. तसेच घरात व बाहेर , दिवसा व रात्री सुद्धा मृत्यु येऊ नये .पण भगवान विष्णुने नृसिंहाचे(ना स्त्री ना पुरुष) असे रूप घेऊन त्याचा अंत हरदोईच्या पहाडा वरील उंचीवरच्या महालाच्या दरवाज्यात ऐन सायंकाळी केला आणि हिरण्यकशपुचे वरदान सुद्धा कायम राहिले.हिरण्यकश्यपूला मारल्यावर अनेक दिवसपर्यंत नृसिंहाचा क्रोध कायम होता व भक्त प्रल्हादाने हा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला. हाच क्रोधाग्नी शांत करण्याकरिता ते या डोंगरावर आले व “सिंहाचलम” हे त्यांचे कायमचे निवासस्थान बनले . हरदोईला हिरण्यकशपुच्या किल्ल्यांचे काही अवशेष अजूनही बघायला मिळतात असे समजते. “हरिद्रोह” म्हणजे हरीचा द्रोह करणारा हे नाव हिरण्यकशपुने ठेवले कारण तो हरी सोबत नेहमी द्रोह करायचा व पुढे त्याचे हरदोई झाले.तर काही अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार येथे हरीचे दोन अवतार झाले आणि ते म्हणजे नृसिंह आणि वामन..! हरीने दोन वेळा येथे अवतार घेतले म्हणून याला “हरिद्वय”म्हणतात ..पुढे त्याचे हरदोई झाले अशीही मान्यता आहे . .हरदोईला हिरण्यकश्यपुची नगरी मानल्या जाते.प्रल्हाद कुंड व प्रल्हाद किल्ला व नृसिंह मंदिर आजही हरदोईला बघायला मिळतात. याच्या वरून सिंहाचलम व हरदोई ही दोन्ही स्थळे प्रभु नृसिंहाच्या अस्तित्वाची साक्ष देतात.भारतामध्ये नृसिंहाची अनेक मंदिरे आहेत पण सिंहाचलमला नृसिंहाचे घर म्हटल्या जाते.
पद्म पुराणानुसार प्राचीन काळात वैशाख महिन्यातल्या शुक्लपक्षाच्या चतुर्दशीला नरसिंह प्रकट झाल्याने हा त्यांचा जन्मदिवस मानला जातो.
असे हे भक्त प्रल्हाद व प्रभू नृसिंहाचे निवासस्थान “नृसिंहाचलम” ..! पण काळाच्या ओघात शब्दाचा अपभ्रंश होऊन नृसिंहाचलम चे आज “सिंहाचलम” झाले ..!
लेखक :श्री श्रीकांत पवनीकर
पर्यटन लेखक, नागपूर.
मो -9423683250
प्रस्तुती : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज सकाळीच सतीश ने टी टेबलवर एक मस्त एक्सायटिंग घोषणा केली. “आजचा कार्यक्रम आहे बाली हाय क्रुझ. आपण सनसेट डिनर क्रुझ बुक केली आहे.”
वाॅव! बाली आणि समुद्र सफारी शिवाय परतायचे हे केवळ अशक्य!
बाली बेनोवा बंदर (जिथून आमची क्रुझ सुरू होणार होती) आमच्या वास्तव्यापासून एक-दीड तासाच्या अंतरावर होते. आम्हाला बाली हाय क्रुझतर्फे पिक अप आणि ड्रॉप होता. दुपारी साडेतीन वाजता आम्ही निर्गमन करणार होतो त्यामुळे सकाळी आम्ही बरोबर आणलेले थेपले, दशम्या, बेसन वड्या, चिवडा, घारगे असे विविध पदार्थ खाऊन लाईट (?) लंच घेतले. बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळलो, डॉब्लर्स नावाचा एक लहान मुलांचा पण अतिशय गमतीदार असा मानसिक तत्परता वाढविणारा खेळही खेळलो. OLDAGE IS DOUBLE CHILDHOOD चाच जणू काही अनुभव घेतला म्हणा ना!
बरोबर साडेतीन वाजता आमची सहा जणांची रंगीन टीम मस्त नटून थटून बेनोवा बंदरकडे जायला तयार झाली. आमची पिकअप कार आलेलीच होती. नेहमीप्रमाणेच गणवेशातला रुबाबदार हसतमुख पण नम्र ड्रायव्हर स्वागतास तयार होताच.
रस्त्यावरून जाताना प्रमोदच्या आणि ड्रायव्हरच्या नेहमीप्रमाणेच मस्त गप्पा चालू होत्या. भाषेचा अडसर कसाबसा पार करत गप्पा रंगल्या होत्या. तो सांगत होत, “इंडोनेशियामध्ये ८७% मुस्लिम आहेत पण बाली हे एकमेव असे बेट आहे की इथे ९०% हिंदू धर्मीय आहेत. हिंदू देवदेवतांची पूजा करणारे आहेत आणि हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारे आहेत. घरोघरी हिंदू रिती परंपरा येथे पाळल्या जातात.”
अशा रितीने गप्पागोष्टी करत, फळाफुलांनी नटलेली वनश्री पहात, चौका-चौकातली शिल्पे आणि वास्तुकलेचे भव्य दर्शन घेत आम्ही बेनोवा बंदर वर पोहोचलो. तिथले वातावरणच पर्यटन पूरक होते. सागर किनाऱ्यावर अनेक लहान-मोठी जहाजे नांगर टाकून उभी होती. आमच्यासारखेच अनेक उत्सुक पर्यटक देशोदेशाहून तिथे आलेले होते.अर्थात सारेच अत्यंत उत्साही आणि आनंदी मूडमध्ये होते. आमची सनसेट डिनर क्रुझ संध्याकाळी साडेपाचला सुटणार होती. जवळजवळ साडेतीन तासाची समुद्रसफर होती आणि डिनरसह संगीत, नृत्य असा भरगच्च कार्यक्रम बोटीवर असणार होता. तत्पूर्वी आम्हाला तिथे एक मधुर, शीतल स्वागत पेय देण्यात आलं. काउंटर वर आम्ही आमची तिकिटे घेतली प्रत्येकी ११ लाख इंडोनेशियन रुपये! जवळजवळ प्रत्येकी साडेसहा हजार भारतीय रुपये. सर्व कारभार अतिशय शिस्तपूर्ण आणि नीटनेटका होता. सगळ्यांना सांभाळून बोटीपर्यंत नेले जात होते. रुबाबदार वातावरण, सुसज्ज रेस्टॉरंट,सागराचं आणि आकाशाचं खुलं दर्शन देणारा मस्त सुरक्षित डेक आणि सोबतीला हलकेच बालीनीज पारंपारिक वाद्य संगीत. एका वेगळ्याच वातावरणात गेल्याचा अनुभव आम्हाला मिळत होता.
ठीक साडेपाच वाजता बोटीने किनारा सोडला आणि त्या हिंदी महासागरातली ती अविस्मरणीय सफर सुरू झाली. निळे व्योम आणि आप या निसर्गतत्त्वांचा किती अनाकलनीय परिणाम मनावर होतो हे प्रत्यक्ष अनुभवत होतो. काही वर्षांपूर्वी आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या दर्शनाने जी समाधीस्थ अवस्था काही क्षणापुरती का होईना पण जाणवली होती अगदी तशीच या सागर दर्शनाने पुनश्च जाणवत होती.” सागरा प्राण तळमळला.. सागरा…” अगदी नेमके हेच वाटत होते. खरं सांगू ?निसर्ग इतका अथांग, अफाट असतो की आपलं अस्तित्व त्याच्यासमोर फक्त कणभराचंच असल्यासारखं वाटतं! निसर्गासमोर सारं “मी पण” अहंकार, गर्व स्वतःविषयीच्या कल्पना, (गैर) सारं सारं काही क्षणात गळून पडतं. मनाच्या खोल गाभाऱ्यात “कोहम” नाद घुमत राहतो.
आता माथ्यावरील निळ्या आकाशातले रंग बदलू लागले होते. बोट समुद्राच्या मध्यभागी आलेली होती. किनाऱ्यावरची घरे आणि हळूहळू पेटत चाललेले दूरचे दिवे हे सुद्धा खूप आकर्षक भासत होते.पश्चिम दिशेला ढळणार्या सूर्याने आकाशात केशरी, जांभळे रंग, उधळले होते मावळणाऱ्या सूर्यकिरणांतून पाण्यावर हलकेच तरंगणारे ते सोनेरी रंग पाहतांना कुसुमाग्रजांच्या कवितांच्या ओळी आठवल्या.
आवडतो मजला अफाट सागर
अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर
सायंकाळी मिळे..
हवेतला तो गुलाबी गारवा! स्तब्ध होत होतं सारं.. मन, डोळे जणूं अमृत प्राशन केल्यासारखे तृप्त होत होते. हलके हलके काळोखात बुडत चाललेला दिवस जणू काही उद्याचा नवा प्रकाश घेऊन येण्याचं आश्वासन देऊनच परतत होता. थोड्यावेळापूर्वीचा प्रकाशातला तो रोमँटिक निसर्ग कसा नि:शब्दपणे गूढ होत चालला होता.
ठीक साडेसात वाजता क्रुझ वर डिनर सुरू झाले. सोबत मस्त संगीत. आमच्याबरोबरचे युवक— युवतींचे मेळावे अगदी धुंद, उत्तेजित झाले होते. आणि त्यांच्या समवेत त्यांना पाहताना नकळत आम्ही आमच्या गतकाळात जात होतो. कुठेतरी आजच्या आणि कालच्या काळाशी तुलनाही करत होतो. पण त्या क्षणी मात्र त्यांचं हे तारुण्य, जगणं, जीवन साजरं करणं पाहून निश्चितच हरखूनही गेलो होतो. त्यांचा प्रवास आमचा प्रवास निराळा होता. त्यांचं बाली पर्यटन आणि आमचं बाली पर्यटन यात खूप फरक होता. फरक ऊर्जेचा होता, मस्ती, भोगणं इतकच नव्हे तर खाण्यापिण्यातलाही होता. भरभरून जगणं आणि खूप काही जगून झाल्यानंतरच जगणं यातला फरक होता. समान फक्त एकच होतं. अनुभव. आनंदाचा, रिफ्रेश होण्याचा, रिक्रिएशनचा.
भरभरून खायला होतं. गरमागरम, आकर्षक आणि चविष्ट पदार्थांची रेलचेल होती.शौकीनांसाठी जलपानही होते. एकंदरच इंडोनेशियन जेवणाचा थाट औरच होता. उत्सुकतेपोटी आम्ही निरनिराळे पदार्थ चाखून पाहिले. काही आवडले, काही बेचव वाटले. पण एकंदर अन्नसेवनाचा यज्ञ कर्म मजेत पार पडला.
त्यानंतर खास क्रुझ वरील सर्व पाहुण्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम होता. अर्थातच संगीत आणि नृत्य. मुळातच बालीयन हे कलासक्तच आहेत. संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय हे त्यांच्या धमन्यातूनच वाहत असावं.
बालीनीज नृत्य पाहण्याची आम्हालाही फार उत्सुकता होती.
बालीनीज नृत्य हे लोक परंपरेचं प्रतीक आहे. शास्त्रोक्त पद्धतीची ती एक अतिशय मनोरम अशी नृत्यकला आहे. बालीनीज नृत्याच्या माध्यमातून नाट्यमयरीत्या हिंदू परंपरा, तसेच रामायण— महाभारतातील कथांची अतिशय मनोहारी मांडणी केली जाते. अनेक वाईट गोष्टींचे, विकारी वृत्तींचे (एव्हिल स्पिरिट्स) दमन हा विषय या नृत्याच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे सादर केला जातो. या संपूर्ण नृत्यात हस्त,पाद, मान, बोटे, डोळे यांच्या कलापूर्ण हालचालीतून प्रेक्षकांसमोर पौराणिक कथा उलगडत जाते. चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर, सत्याचा असत्यावर, देववृत्तीचा असुर वृत्ती वर विजय कसा होतो याचं अत्यंत आकर्षक देहबोली आणि मुद्राभिनयातून केलेलं प्रकटीकरण पाहताना प्रेक्षक थक्क होतात.
या बालीनीज नृत्या मागे अनेक वर्षांचा इतिहासही आहे. पंधराव्या शतकापासून बालीनीजची सांस्कृतिक परंपरा काहीशी बदलू लागली आणि हिंदू धर्मीय एक प्रकारच्या या नृत्य कलेतून एकत्र यायला लागले, अधिक जोडले जाऊ लागले.
तसे या शास्त्रोक्त पारंपारिक नृत्याचे अनेक प्रकार आहेत बारोंग, फ्रॉग, जॉग, जेगॉग,लेंगोंग काकॅक वगैरे. आणि प्रत्येक नृत्य प्रकारची वैशिष्ट्ये निराळी आहेत. विषय निराळे आहेत, पोशाख वेगळे आहेत. आमच्यासमोर बोटीवर जे नृत्य सादर होत होते ते बारोंग प्रकारातले होते.यात राधाकृष्णाची प्रेमलीला होती.
पुरुष आणि स्त्रियांचा नृत्य करताना परिधान केलेला पोशाख ही आकर्षक होता. या पोशाखाचे दोन भाग असतात. वरचा व खालचा कमरेपासून पायापर्यंतचा. वरच्या भागाला सॅश म्हणतात व खालच्या भागाला केन म्हणतात. संपूर्ण पोशाखाला साबुक असे म्हणतात. आणि प्रामुख्याने कपड्याचा रंग सोनेरी असतो. डोक्यावर टोपेग नावाचा लाकडी कला कुसरीचा मोठा गोल मुकुट असतो. बाकी गळ्यात, हातात केसात, फुलांच्या,खड्यांच्या माळा घातलेल्या असतातच. नाचताना त्यांच्या हातात कधी पंखे, कधी फुलांच्या कुंड्याही असतात. एकंदर हा डान्स अतिशय नयनरम्य असतो. हे नृत्य बघत असताना मला केरळमधील कथकली, मोहिनीअट्टम किंवा ओडिसी नृत्याची प्रामुख्याने आठवण झाली. देशोदेशीच्या कला कुठेतरी समानतेच्या धाग्याने जोडलेल्या असतात हे नक्कीच.
तर मित्रांनो!अशा रितीने चौफेर आनंदाचा अनुभव घेत आम्ही रात्री अकरा वाजता घरी परत आलो.आमच्या बाली सफरीचा हा समारोपाचा टप्पा होता. दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता आमची परतीची फ्लाईट होती.डेनसपार ते सिंगापूर ते मुंबई.
बाली बेटावरचा अविस्मरणीय आनंदाचा अनुभव घेऊन आता भारतात परतायचे होते. या आठ दिवसात इंडोनेशियातील बाली या निसर्गरम्य बेटाशी आमचं एक आनंददायी आणि भावनिक नातच जुळून आलं होतं. इथला निसर्ग, हिंदी महासागराचे विहंगम नजारे, इथली संस्कृती, परंपरा, कला आणि माणसं यांच्याशी एक रेशीम धागा नकळत जुळला गेला होता.
बाली हे जसं देवांचं बेट तसं बाली हे स्वप्नांचंही बेट आहे. इथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे. शांतता आणि विश्रांतीच्या शोधात आलेल्या पर्यटकांसाठी समुद्राच्या लाटा पाहणे, सूर्योदय, सूर्यास्त पाहणे, पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटणे हे सारं काही आहे. तरुणांसाठी इथे आनंददायी नाईट लाईफ आहे, आकर्षक मार्केट्स आहेत! हिरवीगार जंगले आहेत, कायाकिंग,सर्फरायडींग ,स्कुबा डायव्ह पॅरासेलिंग सारख्या साहसी सागरी क्रीडा आहेत. भौतिकता आणि आध्यात्मिकता यांची झालेली एक विलक्षण सरमिसळही इथे पाहायला मिळते.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरची आमची ही बाली सहल आमच्यासाठी नक्कीच आनंदाची ओंजळ ठरली. वयाची आठवण ठेवूनही आम्ही या बेटावरचा प्रत्येक क्षण बेभानपणे जगलो मात्र. आणि जगणं हे किती आनंददायी आहे हा मंत्र घेऊन आणि आता पुढची सहल कुठे असे ठरवतच भारतात परतलो. आमच्या विमानाने बालीची भूमी सोडली आणि उंच आकाशात झेप घेतली. पुन्हा एकदा वरून दिसणाऱ्या अथांग महासागराचे आणि गगनचुंबी गरुड विष्णूच्या शिल्पाचे निरोपाचे दर्शन घेतले आणि भारताच्या दिशेने .,”चला आता आपल्या घरी, आपल्या देशी” या भावनिक ओढीने आणि इतक्या दिवसांच्या मित्र—मैत्रीणीच्या,सहवासाच्या विरहाची हुरहुर बाळगत परतीच्या प्रवासासाठीही आनंदाने तयार झालो.
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग- 8 – जहाँ कदम बढ़े पत्रकारिता की ओर… ☆ श्री कमलेश भारतीय ☆
(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)
मित्रो! आप सोच रहे होंगे कि आखिर यह जालंधर में ऐसा क्या है जो बार बार वही जाता हूँ! जालंधर में मैने कलम पकड़नी सीखी और शायद पत्रकारिता का क, ख, ग, भी यहीं से सीखा और पहले सीखा प्रेसनोट लिखना! कैसे भला? ‘विचारधारा’ के जितने आयोजन होते, बाद में मेरी जिम्मेदारी हो गयी कि गोष्ठी की पूरी रिपोर्ट लिखकर अखबारों के कार्यालय में पहुंचाऊं, क्योंकि मेरी हिंदी की लिखावट थोड़ी अच्छी थी और उन दिनों फोटोस्टेट करवा कर प्रेसनोट बांटा जाता था! मुझे स्कूटर चलाना कभी नहीं आया तो कोई स्कूटर वाला सहयोगी अपने स्कूटर के पीछे बिठाकर हर अखबार के दफ्तर ले जाता और इस तरह प्रेसनोट लिखने का शऊर सीखा। हालांकि दूसरे दिन समाचार प्रकाशित होने पर उस खबर का पोस्टमार्टम किया जाता कि ऐसा क्यों लिखा, ऐसे क्यों नही लिखा? मतलब मुद्दे की बात कहाँ है? जो समाचार कोई संदेश लोगों के बीच मुद्दा ही स्पष्ट न कर पाये, वह समाचार कैसा? तो इस तरह अनजाने ही पत्रकारिता की ओर कदम बढ़ते गये!
अब आपका परिचय अपने एक और दोस्त व कथाकार सुरेंद्र मनन से करवाता हूँ जो जालंधर के होने के बावजूद , मेरे सम्पर्क में चंडीगढ़ में आये! वे चंडीगढ़ में नौकरी कर रहे थे और रमेश बतरा के साथ चंडीगढ़ में हमारी दोस्ती का सफर शुरू हुआ! जालंधर भी कुछ मुलाक़ातें हुईं लेकिन ज्यादा मुलाकातें चंडीगढ़ में हुईं। इनका पहला कथा संग्रह उठो लछमीनारायण आया! इसके बाद कैद में किताब, फिर ये चंडीगढ़ से भी उड़ान भर दिल्ली जा पहुंचे, वहां इनकी रूचि दस्तावेजी फिल्में बनाने में बढ़ती गयी और अनेक अंतरराष्ट्रीय पुरस्कार भी जीते! पर फिर कहानी की ओर लौटे तब बर्षो बाद कथा संग्रह आया-अहमद अल हिल्लोल कहां हो? इतने बर्षों बाद मुझे याद रखा और वह कथा संग्रह हिसार के पते पर भेजा!
कैद में किताब और शिलाओं पर लिखे शब्द हिल्लोल भी आया! मैं इस दोस्त से जब फोन पर बात शुरू करता हूं तब हर बार कहता हूँ, हां भई सुरेंद्र मनन, नाम तो है मनन, भावें मेरी गल्ल मन्नन या न मन्नन ! फिर हम हंसते हुए नयी ताज़ी पूछते हैं, अपनी अपनी अपनी खैर खबर देते हैं! बेशक हमारी रूबरू मुलाक़ात पिछले कई सालों से नहीं हुई लेकिन दोस्ती बरकरार है! यह दोस्ती ज़िदाबाद! अब मिलने की इच्छा भी बलवती होती जा रही है!
जालंधर में मेरी एक लम्बे समय से महिला गीता डोगरा भी दोस्तों की सूची में शामिल हैं, जो सिमर सदोष और हिंदी मिलाप के माध्यम से परिचय के दायरे में आईं और वैसे तो अमृतसर की थीं लेकिन विवाह जालंधर में हुआ तो समारोहों में मिलना जुलना होता रहा! ये वहां पहले पंजाब केसरी से जुड़ी रहीं फिर दैनिक जागरण से! आजकल त्रिवेणी साहित्य मंच चला रही हैं और अनेक पुस्तकों की रचना कर चुकी हैं, त्रिवेणी को कभी पालमपुर तो कभी मोगा तक ले जाती हैं। नाटक भी लिखा जो लूणा के दर्द पर केंद्रित है और पंजाब की श्रेष्ठ कहानियाँ का संपादन भी किया, जिसमें मेरी कहानी मंगवाकर सम्मानपूर्वक प्रकाशित की! बीच में साहित्यिक पत्रिका भी निकाली, उसमें भी मेरी रचनायें आती रहीं वैसे गीता डोगरा सबसे ज्यादा अमृता प्रीतम से प्रभावित हैं! इसीलिए इनकी पत्रिका भी अमृता प्रीतम की पत्रिका नागमणि के आकार की है और नाम भी है पारसमणि ! लघुकथा लेखन भी किया और बहुत ही भावुक कविताओं के संकलन भी इनके नाम हैं आजकल थोडा़ अस्वस्थ रहती हैं, फिर भी साहित्य लेखन जारी है। संयोग देखिए की आज गीता का जन्मदिन है और अचानक इस ओर मेरा ध्यान गया!इनकी स्वस्थता की दुआ करते आज जालंधर की यादों को यहीं पर विराम दे रहा हूँ। फिर मिलेंगे जालंधर की यादों के साथ!
(श्री सुरेश पटवा जी भारतीय स्टेट बैंक से सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों स्त्री-पुरुष “, गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की (नर्मदा घाटी का इतिहास) एवं तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकश।आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल “माँ – अपने दामन ख़ुद काँटे रख…” ।)
ग़ज़ल # 113 – “माँ – अपने दामन ख़ुद काँटे रख…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
💥 🕉️ श्रीमद्वाल्मीकीय रामायण का 51 दिन का प्रदीर्घ पारायण पूरा करने हेतु आप सबका अभिनंदन।🕉️
💥 साधको! कल महाशिवरात्रि है। कल शुक्रवार दि. 8 मार्च से आरंभ होनेवाली 15 दिवसीय यह साधना शुक्रवार 22 मार्च तक चलेगी। इस साधना में ॐ नमः शिवाय का मालाजप होगा। साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ भी करेंगे।💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈