(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से \प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत है “भावना के दोहे”।)
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है “सन्तोष के नीति दोहे”। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
स्वप्न म्हंटलं किं ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ आठवणं सहाजिकच आहे.पण ‘स्वप्न’ म्हणजे फक्त तेवढंच नव्हे.मुंगेरीलालसारखे दिवास्वप्ने पहाणारे जसे आहेत तसेच आयुष्यातलं नेमकं उद्दीष्ट ठरवून त्यादिशेने प्रदीर्घकाळ अथक, प्रयत्न न् कष्ट करीत ध्येय प्राप्तीनंतरचा स्वप्नपूर्तीचा कधीच न विरणारा आनंद मिळवणारे आणि जपणारेही आहेतच. दिवास्वप्नं पहात स्वप्नरंजनात मश्गूल रहाणाऱ्यांबाबतची किंव आणि स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करणाऱ्यांबद्दलचा कौतुकमिश्रित आदर यांना निमित्त होणाऱ्या स्वप्नांच्या या दोन रुपांमधे गूढ असं कांहीच नाहीय.पण प्रत्येकालाच सुप्तावस्थेत दिसणाऱ्या स्वप्नांमधे मात्र कधीच थांग न लागणारं गूढ ठासून भरलेलं आहं.ती स्वप्ने हेच एक गूढ विश्व आहे. जाणवतं, दिसतं.. पण ते जसंच्या तसं इतरांना त्याचवेळी दाखवता मात्र येत नाही. ते खास ज्याचं त्याचंच असतं. त्या क्षणांपुरतं त्याच्यासाठी अगदी खरं..तरीही तो एक भासच.भास-आभासाचा चकवा देत रहाणारा एक खेळ!
‘स्वप्न’ मला एखाद्या भरकटत गेलेल्या नाटक किंवा सिनेमासारखं वाटतं.बघताना त्यात गुंतत जात असलो तरी त्यातून बाहेर पडल्यावर न पटणारं, असंबद्ध, अविश्वसनीय सगळं कृत्रिम,तद्दन काल्पनिक, कशाचा कशाला मेळ नसणारं असं काहीसं वाटत रहाणारं..!
खरंतर स्वप्न एखाद्या नाटक किंवा सिनेमातल्या प्रसंगांच्या विखुरलेल्या तुकड्यांसारखंच तर असतं.आपल्या मन:पटलाच्या रंगभूमीवर दिसणारं नाटक किंवा मन:पटलाच्या पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमासारखं..!स्वप्न आपण समोर बसून नाटक-सिनेमासारखं पहातही असतो आणि अकल्पितपणे त्याचाच एक भाग बनून स्वतः त्यात भूमिकाही करत असतो. तरीही आपला स्वतःचाच मन:पटलावरचा आपलाच वावर समोर बसून पहावा तसं पाहूही शकत असतो.सगळंच गूढ.. अतर्क्य..!
हे स्वप्न पडणं जसं तसंच त्यांचं विरणंही तितकंच गूढ!त्याचा थांगच लागू नये असं.मला स्वतःला आजपर्यंत पडलेल्या असंख्य स्वप्नांपैकी अगदी मोजकीच स्वप्ने आज आठवतात हे जसे , तसेच इतर न आठवणाऱ्या स्वप्नांचे विरुन जाणेही मला अनाकलनीय वाटतं आलंय हेही खरेच.स्वप्न पहात असताना त्यातले सगळेच घटना-प्रसंग एखाद्या वास्तव क्षणांसारखे अनुभवत असताना त्या क्षणी मनाला झालेल्या त्या स्वप्न-घटनादृश्यांच्या स्पर्शांची जाणिव, त्या स्पर्शांमधला त्या त्या वेळचा दिलासा,आनंद किंवा दुःख, वेदना,थरारही लख्ख जाणवत राहिलेला पुढे बराच वेळ. पण दचकून जाग येताच कुणालातरी ते स्वप्न, तो अनुभव सांगावं असं उत्कटतेने वाटत असतानाच जादूची कांडी फिरावी तसं सगळंच विरून गेलेलं..! हे विरुन जातंच कसं आणि कुठे हे प्रश्नही स्वप्ने कां आणि कशी पडतात या प्रश्नांसारखीच अनुत्तरीत, अनाकलनीयच! या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम मानसशास्त्रीय संशोधनाद्वारे अखंडपणे सुरु आहेही.पण ‘आपल्या मनातल्या सुप्त इच्छा,भावनांचा कल्लोळ, दडपणं,नैराश्य,अस्वस्थ करणारे त्रासदायक विचार..असं सगळ्याचं आपल्या सुप्तावस्थेत चित्रभाषेत प्रकट होणं म्हणजे स्वप्न’ यासारखे आजवरच्या संशोधनाचे निष्कर्ष मला तरी अनेक शक्यतांपैकी फक्त एक शक्यता आहे असेच वाटते. एखाद्या हिमनगाचे टोक दिसावे तसे न् तेवढेच.स्वप्नाच्या गूढ अर्थांच्या एका सूक्ष्म कणाएवढे!कारण स्वप्नांच्या इतर अतर्क्य, सूचक,प्रेरणादायी,दृष्टांतसदृश स्वप्न-प्रकारांचा थांग या निष्कर्षानंतरही अद्याप कुणालाच लागलेला नाहीय.अगदी तो अनुभव,त्यातली उत्कटता ज्याने स्वतः अनुभवलीय त्यालाही नाही.
या अतर्क्य अशा सूचक स्वप्नांचा मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे.अतिशय उत्कट आनंदानुभव दिलेले ते क्षण आणि त्यातील बारकाव्यांसकट ते मोजके स्वप्नानुभवही मी इतक्या वर्षांनंतरही विसरु शकत नाहीय..!आणि तरीही त्यामागील गूढ मात्र अथक प्रयत्नांनंतरही मला उकललेलं नाहीय.निदान ते उकलेपर्यंततरी ‘स्वप्न’ म्हणजे अतिशय गूढ असं बरंच कांही.. असंच म्हणावं लागेल.
☆ अरूंद वाट प्रेमाची… भाग २(भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिले – ‘कोणत्या पोझमध्ये युवतीने उभं राह्यला हवं होतं?’ मधुचा हा प्रश्न, मधुलिकासाठी प्रश्न नसून एक प्रकारे आव्हानच होतं तिला. आता इथून पुढे -)
‘या पोझमध्ये …’ असं म्हणत, काही अंतरावर मधुलिका एक जीवंत कलाकृती होऊन झटकन उभी राहिली. डोळे अर्धवट मिटलेले. पापण्या, भुवया, हनुवटी, हाताचा सगळा दृश्यभाग, पायांची बोटे, पिंढरीपर्यंतचा सगळा भाग पांढर्या-करड्या मातीने माखलेला. मधु विस्मित होऊन बघत राहिला. त्याला वाटलं, मेनकेने उर्वशीला, स्वत:चा सगळा साज-श्रुंगार सोपवून स्वत: आपल्या हाताने तिला सजवलीय आणि खजुराहोच्या अप्रतिम शिल्प-सुंदरींच्या मध्ये आणून उभी केलीय. त्याने आत्तापर्यंत बनवलेल्या सगळ्या मूर्ती त्याला व्यर्थ वाटू लागल्या. त्याची दृष्टी तिचं एकेक अंग सावकाशीने न्याहाळू लागली, त्याचवेळी तिचा पदर आपल्या जागेवरून जरा सरकत मधुला जसं काही निमंत्रण देऊ लागला. तो सहजच पुढे आला आणि मधुलिकाच्या अगदी जवळ पोचला. मधुलिकाने आपले डोळे मिटले. मधुने मधुलिकाच्या नाभी-सरोवराला आपल्या उजव्या हाताच्या तर्जनीने स्पर्श केला. तिथली ओली माती काढली आणि आंगठ्यावर घेऊन मधुलिकेची भांग भरली. मधुलिकाचे ओठ कापले. मधुने आपल्या ओठांनी त्याला स्पर्श करत तिला आश्वस्त केले. वास्तविक मधुलिकाच्या मातीने माखलेल्या देहाचा, ओठ हा एवढा एकच हिस्सा असा होता, जो राखेमध्ये पेटलेल्या निखार्यासारखा भासत होता. मधुलिकाने त्या क्षणी आपलं सारं शरीर मधुच्या बाहूत झोकून दिलं. मगनभाई या दरम्यान केव्हा तरी आले. त्यांनी निर्जीव मूर्तींमध्ये गरम श्वास भरणार्या युगलमूर्तीला पहिलं, तेव्हा ते गुपचुप निघून गेले.
मधूने बनवलेल्या मूर्ती आता शिल्प आणि सौंदर्याची नवनवीन परिमाणं प्रस्थापित करू लागल्या. त्याची कीर्ती वाढली, तसाच त्याला पैसाही चांगला मिळू लागला. मूर्ती चांगल्या किमतीत विकल्या जाऊ लागल्या. आता तो, गणपती, सरस्वती, दुर्गा, काली यासारख्या उत्सवी मूर्तींकडे कमी लक्ष देऊ लागला कारण त्याच्याकडच्या कलात्मक मूर्तींना अधिकाधिक मागणी येऊ लागली. चांगल्यापैकी पैसा खर्च करून त्याने आपल्या वडीलोपार्जित घराचे नूतनीकरण केले. घरात दोन दोन दुचाकी वाहनांबरोबरच एक कारदेखील आली. मधुलिका आता कारखान्यात क्वचितच कधी येऊ शकत होती. तिच्याकडे मधूच्या संसाराबरोबरच मधूने बनवलेल्या मूर्तींची प्रदर्शने भरवणे, जाहिराती, चर्चा, विक्री या सार्याची जबाबदारीदेखील होती.
त्यांच्या विवाहाला आता सात वर्षे झाली होती, पण दोघांच्यातील प्रेम, अनुराग पाहून असं वाटत होतं की दोघांचा जसा काही कालच विवाह झालाय. मधूला कारखान्यातून यायला कधी उशीर झालाच, तर मधुलिका फोन करकरून त्याला नुसती हैराण करायची. आणि मधु… त्याच्या प्रत्येक कलाकृतीत कुठल्या ना कुठल्या कोनातून मधुलिकाच झळकायची.
‘मधुजी, आपण बनवलेल्या कलाकृती इतक्या जीवंत कशा दिसतात?’
‘नुसत्या दिसतातच नाही, तर त्या धडकतातसुद्धा श्रीमान! आपण कान लावून पहा. आपल्याला माझ्या कलाकृतीचं धडधडणं स्पष्ट ऐकू येईल.’
‘ कुणाच्या हृदयाची ही धडधड आहे, जी आपल्या कलाकृतीत धडधडते?’
‘हिची… ही मधुलिका. माझं जीवन, माझी प्रेमिका, माझी प्रेरणा, पत्नी… माझं सगळं काही….’ आणि मधूने शेकडो प्रेक्षकांसमोर मधुलिकाच्या गळ्यात हात टाकून तिला जवळ ओढले.
मधु आणि मधुलिकाचे दिवस, महीने, वर्षे पंख लावून प्रणयाकाशामध्ये मुक्त विहार करत होते, पण एक दिवस असा आला की समोर एक शून्य येऊन उभं राहिलं. ते वेळी-अवेळी दोघांमध्ये प्रगाढ मौनाचं रूप धरण करू लागलं. दिवसेंदिवस बिछान्याकडे जाताना विस्तारत जाणार्या या मौनाला तोडण्याचा प्रयत्न करत एक दिवस मधुलिका म्हणाली,
‘माझे सगळे रिपोर्टस आले आहेत. म्हणून म्हणते, तुम्ही दुसरं लग्नं करा…. आपल्याला मूल मिळेल.’
‘आपल्याला?’
‘हो. तुझं मूल माझंही असेलच.’
‘आणखीही दुसरा एखादा मार्ग असू शकतो. एखादं मूल अॅडॉप्ट करू या.’
‘नाही. माझी अशी इच्छा आहे की तुझ्या रक्ताचं असं मूल जन्माला यावं, की जे पुढच्या काळात जगातला एकमेवद्वितीय कलाकार असेल.’
‘तुला सहन होईल माझं दुसरं लग्नं?’
‘हो. एका कलाकाराच्या जन्माच्या तीव्र इच्छेसाठी मी काहीही सहन करीन!’
मधुच्या मनात आलं की तिला सांगावं, ‘नाही. तू नाही सहन करू शकणार!’ पण तो काहीच बोलला नाही. तो म्हणाला, ‘ठीक आहे. हे अखिल भारतीय प्रदर्शन होऊन जाऊ दे. मग कुणाला तरी पकडून आणीन या घरात. किंवा तू स्वत:च निवडून आण आपली सवत.’
अखिल भारतीय मूर्तीकला प्रदर्शनाला अद्याप दोन महीने अवकाश होता. त्याच्या तयारीसाठी मधु दिवस-रात्र एक करत होता. त्याने एक मानवी आकाराची स्त्री-मूर्ती घडवायला सुरुवात केली. तिला पृष्ठभाग नव्हता. दोन्हीकडे चेहराच होता. कुठूनही बघितलं, तरी ती सुंदर दिसायची. हळू हळू मूर्तीचं अद्भुत सौंदर्य झळकू लागलं. टायटल मधुलिकानंच दिलं, ‘मोहिनी’. प्रदर्शनाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला, तसतशी मधुची व्यग्रता वाढली. तिचं रंग-रूप, साज-शृंगार यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, म्हणून मधुने मूर्ती कारखान्यातून आणून घरीच एका खोलीत ठेवली.
एका रात्री मधुची वाट बघता बघता मधुलिकाला डुलकी लागली. झोप उघडली, तेव्हा तिने पहिलं, रात्रीचे दोन वाजलेत. मधु बिछान्यावर नाही असं पाहून, मधुलिका ‘मोहिनी’ला ठेवलेल्या खोलीकडे वळली. मधु नाकाचं नक्षीकाम करत कधी एका ब्रशने, तर कधी दुसर्या ब्रशने रंग भरत होता. त्या रात्रीनंतर तर जसं काही रूटीनच झालं. मधू रात्रीचा बराचसा वेळ मोहिनीच्या खोलीत काढू लागला. मधुलिकालाही रात्री मधु जवळ नसण्याची सवय होऊ लागली. खरं तर अखिल भारतीय मूर्तीकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी मधुलिकानेच मधुला भाग पाडलं होतं.
‘मोहिनी’ जवळ जवळ पूर्ण झाली होती. मधुने त्या दिवशी मधुलिकाला म्हंटलं,’ तुझ्या पारखी नजरेने एकदा आपल्या ‘मोहिनी’कडे बघ.’
मधुलिकाने खोलीत जाऊन ‘मोहिनी’कडे बघितलं, तेव्हा ती चकीतच झाली आणि तिच्या गळ्यातून सहाजोद्गार बाहेर पडले, ‘वा: काय सौंदर्य आहे. जो कुणी एकदा हिला बघेल, आपलं सारं राज्य तिच्यावर उधळून देईल.’ असं बोलता बोलता तिने आपल्या गळ्यातली मोत्यांची सुंदर माळ काढली आणि मोहिनीच्या गळ्यात घातली. अन्य स्त्री-रूपावर मोहित होऊन तिचा गौरव स्त्रीनेच करावा, अशी ही पहिलीच वेळ असेल आणि इथे तर गौरव करणारी खुद्द मधुलिकाच होती.
मूळ हिंदी कथा – ‘गली अति सॉँकरी’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – ३ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
अबुधाबीची संगमरवरी मॉस्क हे २०१४ चे आकर्षण होते. पांढरा शुभ्र संगमरवर वापरलेली ती माॅस्क उन्हामध्ये अक्षरशः चमचमत होती. जास्त ऊन असेल तर डोळ्याला त्रास होईल इतकी ! माॅस्कमध्ये प्रवेश करताना पूर्ण पायघोळ ड्रेस लागतो. आत प्रवेश केला की, तेथील अतिप्रचंड गालिचा आपले लक्ष वेधून घेतो ! बाप रे ! केवढा मोठा आणि सुंदर, रंगीत डिझाईनचा गालिचा ! थक्क होऊन गेलो आम्ही ! सगळीकडे संगमरवर आणि त्यावर अतिशय उत्तम रंगीत चित्रकाम ! अप्रतिम ! येथील टॉयलेट सुद्धा बघत रहावी अशी सुंदर संगमरवरी ! अतिशय समृद्ध अशी दुबई, अबुधाबी ही ठिकाणे ! अबुधाबीचे कॉर्निशसुद्धा लोकांना फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे…
पण एक ऑफ साईट ठिकाण आम्ही पाहिले ते म्हणजे फ्लेमिंगो रिझाॅर्ट ! तिथे राहण्यासाठी छोटे छोटे बंगले आहेत. जावयांनी तेथील बुकिंग केले होते. खरंतर समुद्रासारखे खेळणारे पाणी तिथे नाही. पण रेझाॅर्टसमोर मुलांना खेळायला जागा, सगळीकडे वाढवलेली हिरवीगार झाडे आणि रेझाॅर्टच्या व्हरांड्यात बसून समोर शांत दिसणारे पाणी पाहत बसायला खूप आवडले ! विशेष म्हणजे जाई जुईसारख्या वासाच्या फुलांचे वेल प्रत्येक बंगलीजवळ होते. एक दोन दिवस घालवायला खूपच सुंदर ठिकाण होते.
अशीच ‘ मिरॅकल गार्डनची ट्रिप ! एका वर्षी आम्ही मिरॅकल गार्डनला गेलो होतो. तिथे विविध रंगांची फुले आणि विविध आकारात तयार केलेल्या फुलांच्या व झाडांच्या आकृत्या यामुळे मिरॅकल गार्डन हे दुबईजवळचं खरोखरच मिरॅकल आहे. तिथेही वासाची फुले नाहीत, पण वेगवेगळ्या बोगन वेली आणि इतर रंगीत फुले, पाने यांनी ट्रेन, प्राण्यांचे,पक्षांचे आकार बनवून बाग सुशोभित केली आहे.
पाहता पाहता मुलीला दुबईमध्ये जाऊन पंधरा-सोळा वर्षे झाली. दरवर्षी आम्ही बदलती दुबई पहात होतो हेही विशेषच ! २०१९ मध्ये शेवटची दुबई ट्रिप झाली.. या ट्रिपमध्ये ” दुबई फ्रेम ” हे नवीन ठिकाण पाहिले. दुबई फ्रेम खूपच उंच आहे. दोन्ही बाजूंनी लिफ्ट आहे. एका लिफ्टने चढणे आणि दुसरीकडून उतरणे ! या दोन्हींना जोडणारा मोठा काचेचा मार्ग आहे, त्यावरून लोक फिरत असतात. काचेतून खाली पाहिले की माणसे, वाहने, इमारती, खेळण्यातल्या सारखी छोटी दिसतात ! मनात आलं, हे जग म्हणजेच कॅलिडोस्कोप आहे ! जितकं फिरू तितक्या विविध आकाराच्या, रंगांच्या, प्रतिमा बघायला मिळतात. दुबई हे चिमुकलं राज्य ! पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडच्या वैशिष्ट्यांनी बनलेले ! भारताला जवळचे आणि हिंदी वातावरण असल्याने आपलेसे वाटणारे ! तिथे टुरिझमची जाणीवपूर्वक वाढ केलेली आहे. येथील कायदेकानू कडक असल्याने गुन्हेगारी तशी कमी आहे. इथे वाळूत फारसे काही पिकत नाही, त्यामुळे बरेचसे खाद्यपदार्थ परदेशातूनच येतात. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि आधुनिक गोष्टींचा पुरेपूर उपयोग केलेला आहे. अशी ही दुबईची रंगीबेरंगी दुनिया आहे ! आमच्या दुबईच्या कमीत कमी पंधरा-वीस ट्रिप्स झाल्या असतील ! जून, जुलैचा ऐन उन्हाळा सुद्धा दुबईत अनुभवला आहे ! लेक – जावयामुळे आमचे दुबई वास्तव्य अगदी सुखाचे असते. २०१९ साली दुबईहून १२ मार्चला पुण्यात आलो, तेव्हा कोरोनाचा प्रभाव सगळीकडे दिसत होता. गेली दोन वर्षे ” दुबई बहोत दूर है ” म्हणत गेली. पण आठवणींच्या कप्प्यात असलेली दुबई कशी कशी बदलत गेली, याचे हे माझ्या अल्पमतीने केलेले निरीक्षण !
☆ मानवी सवय…(एक खरी गोष्ट)☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
एक महिला आहे जयपूरमध्ये, ती PG ( पेइंग गेस्ट ) ठेवते. त्यांचे वडिलोपार्जित घर आहे, ज्यामध्ये मोठ्या १०-१२ खोल्या आहेत. 3 बेड प्रत्येक खोलीत ठेवल्या आहेत. त्यांच्या पीजीमध्ये जेवणही उपलब्ध आहे.
त्या मनापासून स्वयंपाक करतात. खाणाऱ्यांनाही ते आवडते. इतके उत्तम की सर्वोत्तम शेफला बनवता येणार नाही. नोकरदार लोक आणि विद्यार्थी त्यांच्या PG मध्ये राहात.
प्रत्येकजण सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण घेई, ज्यांना गरज आहे त्यांना दुपारचे जेवण पॅक करून मिळे.
पण त्यांचा एक विचित्र नियम आहे, प्रत्येक महिन्यात फक्त 28 दिवस अन्न शिजवले जाई, उर्वरित 2 किंवा 3 दिवस स्वयंपाकघर बंद. ते दिवस हॉटेलात खा अथवा काहीही करा, पण बाहेर.
मी विचारले, “ हे का ? किती विचित्र नियम आहे हा. तुमचे स्वयंपाकघर फक्त २८ दिवसच का ?”
“ आमचा नियमच आहे. म्हणूनच आम्ही फक्त २८ दिवसांसाठीच जेवणाचे पैसे घेतो. “
मी म्हणालो, “ हा काय विचित्र नियम आहे ? आपणच बनवला आहे, मग नियम बदला.”
ती म्हणाली, “ नाही. नियम हा नियम असतो.”
एके दिवशी मी त्यांना पुन्हा चिडवले, २८ दिवसांच्या त्या विचित्र नियमावर.
त्यादिवशी ती बोलली आणि म्हणाली, “ तुला समजणार नाही भाऊ, सुरुवातीला हा नियम नव्हता. मी खूप प्रेमाने असा स्वयंपाक करून खायला घालत असे. पण त्यांच्या तक्रारी कधी संपतच नसत. कधी ही उणीव, कधी ती उणीव, नेहमी असमाधानी आणी नेहमी टीका…… त्यामुळे वैतागून हा नियम केला. २८ दिवस प्रेमाने खायला द्या आणि उरलेले 2-3 दिवस बाहेरचे खा. आता त्या ३ दिवसात नानी आठवते. मैदा आणि मसूर यांचे भाव कळतात. बाहेर किती महाग आणि तरीही निकृष्ट अन्न मिळते हे कळते. चहाचे दोन घोट १५ ते 20 रुपयांना मिळतात.—- माझे मूल्य त्यांना या ३ दिवसांतच कळते, त्यामुळे उरलेले २८ दिवस अतिशय नरम राहतात.”
खरंय — जास्त आरामाची व आयत्याची सवय माणसाला असमाधानी आणि आळशी बनवते.
अशीच परिस्थिती देशात राहणार्या काही जनतेची देखील आहे, ज्यांना देशाच्या प्रत्येक परिस्थितीत नेहमीच काही उणिवा दिसतात. अशा लोकांच्या मते देशात काहीही सकारात्मक घडले नाही, होत नाही आणि होणारही नाही.
अशा लोकांनी काही दिवस पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेत घालवावे, जेणेकरून त्यांची बुद्धी बरोबर ठिकाणावर येईल.
संग्राहक : विनय गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक भावप्रवण कविता ‘रिश्ते ’।