कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 149 – विजय साहित्य ?

☆ देव देव्हार्‍यात नाही …! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

पैशामधे मोजमाप

देव देव्हार्‍यात नाही

शोधूनीया पाही

जगतात . . . !

 

सेवाभाव जाणायला

हवे नात्यांचे गोकुळ

विसंवादी मूळ

देखाव्यात. . . !

 

देवरुप जाणायला

नररूप आधी जाण

देव्हार्‍याची खाण

सापडेल. . . !

 

अशा देव्हार्‍यात

देव राही जागा

ह्रदयाचा धागा

विचारात.

 

देवरूप शोधायला

मायबाप आधी जाणा

कैवल्याचा राणा

अंतरात. . . . !

 

गरजेस बघा

येतो धावून माणूस

नसे मागमूस

उपकारी.. . . !

 

अशा देवासाठी

मनी हवी भूक

देव्हार्‍याचे सुख

कश्यासाठी. . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments