(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा है।आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण कविता “अहसास”।)
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय एवं भावप्रवण कविता “# ये महानगर है #”)
☆ विचार–पुष्प – भाग 18 – असतील शिते तर जमतील भुते ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’
नरेंद्र ब्राह्मो समाजाच्या कामात, त्यांच्या मतप्रणालीत आतापर्यंत चांगला मुरला होता. त्यामुळे श्री रामकृष्णांबरोबर पूर्ण वेळ काम करण्याचे अजून त्याचे मन मानत नव्हते. बर्याच दिवसांत नरेंद्र दक्षिणेश्वरला गेला नव्हता. त्यामुळे रामकृष्णांचे मन सुद्धा नरेंद्रला भेटण्यास उत्सुक होते. ब्राह्मो समाजात गेलं तर, नरेंद्र तिथे नक्की भेटेल असं त्यांना वाटलं आणि ते सरळ संध्याकाळी उपासनेच्या वेळी ब्राह्मो समाजात गेले. त्यावेळी आचार्य, वेदिवरून धर्मोपदेश देत होते. त्यांच्या ईश्वरीय गोष्टी ऐकून रामकृष्ण सरळ वेदीजवळ जाऊन पोहोचले, याचा अंदाज नरेंद्रला होताच. लगेच तोही त्यांच्या पाठोपाठ वेदीजवळ गेला आणि त्यांना सावरू लागला. यावेळी आचार्य, आसनावरून उठले नाहीत आणि रामकृष्णान्शी बोलले देखील नाहीत. साधा शिष्टाचार सुद्धा पाळला नाही. नरेन्द्रनी, कसेतरी श्री रामकृष्णांना सभागृहाबाहेर काढून, त्यांना दक्षिणेश्वरला रवाना केले. त्यांचा आपल्यासाठी असा झालेला अपमान नरेंद्रला सहन झाला नाही. या जाणिवेने क्षुब्ध आणि व्यथित होऊन नरेन्द्रने त्या दिवसापासून ब्राह्मो समाजाचे काम सोडले ते कायमचेच.
नरेंद्र बी.ए.ला शिकत असतानाच विश्वनाथ बाबूंनी त्यांचे मित्र, निमईचरण बसू यांच्याकडे कायद्याच्या शिक्षणाची सोय केली होती. त्याच्या जीवनात स्थैर्य यावं, म्हणून त्यांचा प्रयत्न चालला होता. घरी नेहमी पाहुणे रावळे, येणारे जाणारे, नातेवाईक यांची वर्दळ असे. त्यामुळे नरेंद्र अभ्यासाला आजीकडे जात असे. साधे अंथरूण, आवश्यक पुस्तके, एक तंबोरा एव्हढेच त्याचे सामान असे. एकांतवास, ध्यानधारणा, कठोर शारीरिक नियम असा ब्रम्हचार्याचा दिनक्रम असे. काही वेळा तर श्रीरामकृष्ण सुद्धा तिथे येऊन साधनेसंबंधी उपदेश देऊन जात असत. काही नातेवाईक आणि मित्रांना हे वागणे आवडत नसे. सर्वजण आध्यात्मिकतेपासून नरेंद्रला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असत. मात्र तरीही नरेंद्र चे मित्रांना भेटणे सुरू असे.
एकदा असेच वराहनगर मध्ये मित्राकडे सर्व जमले होते. गप्पागाणी यात सर्व दंग झाले असताना, अचानक घाबरलेल्या अवस्थेत एकाने येऊन, नरेंद्रच्या वडिलांची हृदयक्रिया बंद पडून ते गेल्याची बातमी दिली. या बातमीने सगळ्या झगमगाटात सुद्धा नरेंद्रला सगळीकडे अंधार दिसू लागला. ताबडतोब तो घरी आला. ते दृश्य पाहून, पितृशोकाने नरेंद्रचे वज्रदृढ हृदय वितळून अश्रुंच्या धारा लागल्या.
आता भविष्यकाळ कसा असेल? आता दर महिन्याचा हजारो रूपयांचा खर्च कसा चालवायचा? भुवनेश्वरी देवींना आकाश फाटल्यासारखं झालं. संसारासंबंधी नेहमी उदासीन असलेल्या नरेंद्रला दारिद्र्याच्या कल्पनेने गांगरून जायला झालं. अनुकूल अवस्थेत अगदी जवळची म्हणवणारी, प्रतिकूल अवस्था येताच जवळचीच मंडळी पारखी होऊ लागली. विपन्नावस्थेत कुणी साथ देत नाहीत ही जगाचीच रीत. नरेन्द्रनाथाच्या तीक्ष्ण बुद्धीला सर्व उमजलं आणि समजलं सुद्धा. हे बसणारे चटके ते नेटाने आणि धैर्याने सहन करू लागले होते.
एकीकडे वकिलीची परीक्षा देत होते. दुसरीकडे कामधंदा, नोकरी शोधत होते. तीन चार महीने असेच गेले. घरात धान्याचा कण नसल्याने एखाद्या दिवशी सर्वांना उपाशीच झोपावे लागे. जवळच्या मित्रांना त्याने हे कळू दिलं नव्हतं. कधी अन्न आहे पण सर्वांना पुरेसे नाही. असे पाहून नरेंद्रनाथ, “आज मला एकाने जेवायला खूप आग्रह केला आहे, तेंव्हा, मी आज घरी जेवणार नाही” असे खोटेच भुवनेश्वरी देवींना सांगून कडकडीत उपास करत असे.
अशा लागोपाठ उपवासांनी तर एकदा ग्लानी येऊन निपचीतच पडले. काही जवळचे मित्र आर्थिक मदत करायला पुढे येत, त्यांची मदत ते सविनय परत करत असत. पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा स्वीकारायची हे त्यांना असह्य होत असे. कधी कधी मित्र त्याला घरी जेवायला बोलावण्याचा प्रयत्न करीत. तेंव्हा कामाचा बहाणा करून नरेंद्र टाळत असे. नाहीतर कधी खोटा खोटा आव आणत जेवायला जात असे तेंव्हा त्यांच्या मनात कालवाकालव होऊन, डोळ्यासमोर, भुकेने कोमेजलेली आपली लहान लहान भावंडे दिसत.
तारुण्यात पाय ठेवत असतानाच भाग्यचक्र अचानक पालटल्यामुळे, पितृछत्र गेल्याने नरेन्द्रनाथ कुटुंबाचा पालनपोषणाचा भार सांभाळत असतानाच आणखी एक अरिष्ट आलं. नातेवाइकांनी कुटुंबाला घराबाहेर काढण्याचा डाव रचून कोर्टात फिर्याद दाखल केली.
एक दिवस सकाळच्या प्रहरी उठता उठता भगवंताचे नाव घेऊन नरेंद्र अंथरुणातून उठत असताना, आईने ऐकले आणि त्वेषाने संतपून त्यांना म्हणाली, “ चूप रहा कार्ट्या, लहानपणापासून केवळ भगवान आणि भगवान. फार छान केलं भगवानानं?” हे शब्द ऐकून नरेन्द्रनाथाच्या व्यथित मनाला घरे पडली. तसच भाग्य फिरताच, वडिलांच्या जुन्या मित्रांचं वागणं पाहून नरेंद्र अचंभीत झाला. जगाच्या ह्या शोचनीय कृतघ्नतेचे बीभत्स रूप पाहून त्याचं मन बंडखोर होऊन उठलं.
वयाच्या विसाव्या वर्षी कॉलेजमध्ये भेटलेले तो आणि ती. पहिल्या नजरेत नाही पण जसजसे एकत्र दिवस गेले तेंव्हा त्यांना कळून चुकले की ते एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत. चोरून भेटणे आणि चोरून प्रेम करण्याची एक वेगळी मजा असते ती दोघांनी चांगल्या प्रकारे अनुभवली. कॉलेजमधले प्रेमाचे ते सुवर्ण दिवस भराभर पुढे सरकले आणि दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेऊन स्वतःचं एक घरकुल उभं केलं. लग्नाची पहिली २-३ वर्षे छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात, हातात हात घालून गप्पा मारायची असतात, नवनवीन स्वप्न रंगवायची असतात. त्यांचीही ती दोन तीन वर्षे तशीच गेली. थोडी हौस मौज झाली. थोडे हिंडणे फिरणे झाले, एकमेकांना भेट वस्तू दिल्या गेल्या. तो आणि ती खूप खुषीत होते.
पण त्यांचे हे दिवस पटकन उडून गेले. त्याच काळात त्यांचे बँकेत जमवलेले शून्य थोडेसे कमी झाले. त्याचवेळी त्यांना हळूच चाहुल लागली बाळाची आणि वर्षभरातच त्यांच्या नवीन घरात एक पाळणा हलू लागला. आता तो आणि ती जरा गंभीर झाले. त्यांच्या वयापेक्षा ते जास्त जबाबदार झाले. त्या दोघांनी एकमेकांच्या खुषीचा विचार न करता त्यांचे सर्व लक्ष आता त्यांच्या बाळावर केंद्रीत केले. त्याचे खाणे पिणे, शू – शी, त्याची खेळणी, त्याचे कपडे, त्याचे लाड कौतुक वेळ कसा फटाफट निघून जात होता. सुरूवातीला सगळे दोघे मिळून करत होते ॰नंतर तिच्यावर बाळाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आल्या आणि तिचा हात नकळत त्याच्या हातून सूटत गेला. तो ही आता जास्त मेहनत घेऊन जास्तीत जास्त पैसा कमविण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याचा जास्त वेळ घराबाहेर जाऊ लागला होता. त्यांचे गप्पा मारणे, हिंडणे, फिरणे केव्हाचं बंद झालेले होते आणि विशेष म्हणजे दोघांच्याही हे लक्षात आलेले नव्हते.
अशातच दोघांनी तिशीचा उंबरठा ओलांडलेला होता. बाळ मोठा होत होता. तो आणि ती दोघेही स्वतःच्या आवडी निवडी आणि गरजा बाजूला ठेऊन बाळाचे जमेल तसे लाड करत होते. . ती बाळात जास्त गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात जास्त गुरफटत जातो. घराचा हप्ता, बाईकचा हप्ता आणि त्यात बाळाची वाढत जाणारी जबाबदारी, त्याच्या शिक्षणाची, भविष्याची सोय आणि महत्वाचे म्हणजे बँकेतल्या शिलकीचे शून्य वाढवायचा ताण. घरात लहान लहान कारणांवरून दोघांमध्ये वाद चालू होऊन त्याचे रूपांतर छोट्या भांडणात होऊ लागले तरीही तो पूर्णपणे स्व:तला कामामध्ये झोकून देतो. बाळाचे शाळेत जाणे चालू होते. बाळ मोठा होऊ लागतो. आता तिचा सगळा वेळ त्याच्या मागे मागे करण्यातच सरतो.
एव्हाना पस्तीशी आलेली असते. स्वतःचे घर त्यांनी चांगले सजविलेले असते. हप्त्याने दाराशी चार चाकी गाडी आलेली असते. बैंकेत बऱ्यापैकी नाही पण पाच शून्य जमा झालेले असतात पण तरीही काही तरी कमी असते आणि ते म्हणजे समाधान.
रोजच्या धावपळीमुळे तिची चिडचिड वाढलेली असते आणि त्याचा ही वैताग वाढलेला असतो. आणि तो मग दर वीकेंड ला आपल्या मित्रांबरोबर बैठका सुरु करतो. सुरवातीच्या एकच प्यालाने झालेली सुरवात पुढच्या पाच एक वर्षात एका क्वार्टर पर्यंत पोचते.
दिवसामागुन दिवस जात असतात. बाळ मोठे होते. आता त्याचे स्व:तचे एक विश्व तयार होते. त्याची दहावी येते आणि त्याची दहावी येईपर्यंत दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते.
☆ पिक्चर रस्त्यावरचा…अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
आमच्या मित्राने रस्त्यावरच्या पिक्चरच्या पडद्याचा फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 40 वर्षं मागे भूतकाळात गेलं. असंख्य आठवणींचा कल्लोळ झाला. साले काय दिवस होते. माझे जे अनुभव आहेत, तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील! त्यांच्यासाठी खास हा लेख.
आमच्या लहानपणी तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्रोत्सव हे रस्त्यावरच्या पांढऱ्या पडद्यावर बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नसत. मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो त्याच्या. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. मुख्य म्हणजे फुकट असायचे. खर्च मंडळातर्फे केला जायचा. दिवसा सायकलवर फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे, फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे. आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या. मग तारीख लक्षात ठेऊन जायचो. कधी विसरलो की हळहळ वाटायची. एकाच दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असली, तर मग चांगला सिनेमा जिथे असेल तिथे जायचे. तो संपला की दुसरीकडे जायच। तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा. गणपतीमधे 10 दिवस रोज सिनेमा असायचा. सिनेमा बघतांना मधेच पाऊस यायचा. मग आडोशाला पळायचं. प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरली जायची. त्याकाळी गणपतीत फार पाऊस असायचा. पण एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे.
आम्ही कुठे कुठे जायचो, कसेही कुठेही बसायचो, रस्त्यावर बसायचो गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून. अगदीच काही मिळालं नाही तर वर्तमानपत्र टाकून. किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो! त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही. घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.
प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे ही खूप मजेशीर गोष्ट असायची! गंमत म्हणजे पडद्याच्या एका बाजूला लेडीज बसायच्या. तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि सगळे जेन्टस नेहमी अपोझिट साईडला! त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसल्यासारखी वाटायची. सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची. हे सगळं नको असेल, तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभं राहून बघायचं. नाहीतर कडेला रेतीवर नाही तर खडीवर बसून बघावं लागायचं. ती खडी खाली टोचायची. जेवढं लांब बसू, तेवढा सिनेमा छोटा दिसायचा. म्हणून पुढे बसायचं सिनेमा बघतांना भरपूर डास चावायचे, मुंग्या चावायच्या. तरी सुद्धा नेटानं बसायचं. प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवावी लागायची. त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायच्या. त्यांना टेबल फॅन असायचा. त्यांचा खूप हेवा वाटायचा!
त्यावेळी सिनेमा चालू असतांना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे. मग बोंबाबोंब. मधेच उंदीर किंवा घूस घुसायची, नाहीतर कुत्रे घुसायचे. मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या मारामाऱ्या व्हायच्या.आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करतांना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे आकडे स्क्रीनवर यायचे. तेव्हा ते आकडे मोजत ओरडायचो. एक रीळ संपलं की दुसरं लावायचं… काही वेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र यांचा मेळ जमत नसे. तेव्हा विचित्रच वाटायचं ऍक्शन आधी आणि आवाज नंतर! तरी तसाच सिनेमा बघायचो.
सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या! मग परत रिवाइंड करून वन्स मोअर! इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे. तेवढ्या वेळा रिवाइंड. पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत … सोड सोड म्हणून ओरडत!!
केश्तो, असित सेन, मेहमूद, असरानी, जगदीप, राजेंद्रनाथ, यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची. गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे. शम्मी, देव, ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची. सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे. शोले, जंजीर, दीवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम, तिसरी मंझिल, वो कौन थी, कालीचरण — किती नांवं घेऊ! हे सिनेमे थिएटरमध्ये एक-दोनदा आणि रस्त्यावर असंख्य वेळा बघितले!
मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे. दामुअण्णा, शरद तळवलकर, राजा गोसावी, निळू फुले, सूर्यकांत, रमेश देव, अशोक सराफ, दादा कोंडके, रवींद्र महाजनी, सीमा, चित्रा, रेखा, जयश्री गडकर, रंजना, उमा यांचे पिक्चर असायचे. सासुरवाशीण सिनेमा बघतांना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या. त्यावेळी ती दोघं तिथे आली असती तर त्यांनी नक्कीच मार खाल्ला असता, अशी परिस्थिती असायची.
आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात. कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.
गेले ते दिन गेले — !!
रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही. आणि खिशातून पांच पैशाचे चणे दाणे खाण्याची चव फ्रेंच फ्राईजला, बर्गर आणि पॉप कॉर्नला सुद्धा येणार नाही.आताच्या मुलांना ही मजा अनुभवायला कधीच मिळणार नाही.
गेले ते दिवस. राहिल्या फक्त आठवणी !!
लेखक – अनामिक
संग्राहक – सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
आमच्या प्रवासाचा आता दुसरा टप्पा सुरू झाला. शीलाँग सोडताना मन थोडे जड झाले होते. पण आसामची सफर करण्यासही मन उत्सुक होते.
आसाम हे ईशान्य भारतातले राज्य. त्याचा मुळ उच्चार असम असा आहे. असम म्हणजे समान नसलेला प्रांत. पहाडी आणि चढ-उतार असलेले हे राज्य अतिशय निसर्गरम्य आहे शिवाय बांबू, चहा, यासाठी प्रसिद्ध आहे. . आसाम हे वाइल्डलाइफ आणि पुरातत्वशास्त्र साठी प्रसिद्ध असे राज्य आहे. आसाममधील काझीरंगा हे शहर अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. शिलॉंग ते काझीरंगा हे जवळजवळ 300 किलोमीटरचे अंतर आहे. ड्राईव्ह अर्थातच सुरेख होता. रस्ते वळणावळणाचे. दुतर्फा हिरवेगार चहाचे मळे. सुपारी, केळीची बने, लांबच लांब पसरलेले डोंगर! मेघालयातील डोंगर आपल्या सोबतीने चालतात असे वाटायचे मात्र आसाममधील डोंगर दुरूनच आपले स्वागत करतात. पण तेही दृष्य अतिशय मनोहारी वाटते. रसिक मनाला चित्तवृत्ती फुलवणारे वाटते.
काझीरंगा हे एक ऍनिमल कॉरिडॉर आहे. या जंगलात र्हायनो(गेंडा) हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. आम्ही प्रवास करत असताना, एका जलाशयाजवळ आम्हाला तो दिसला. एक शिंगी, जाड कातडीचा, बोजड प्राणी. डुकराच्या फॅमिलीतला वाटणारा. अत्यंत कुरूप पण वेगळा. म्हणून त्याच्या प्रथम दर्शनाने आम्ही खुश झालो. समूहातील सर्वांनी रस्त्यावर उतरून पटापट फोटो काढले. सूर्यास्त पाचलाच झाला. बाकी आजचा सगळा दिवस प्रवासातच गेला. संध्याकाळी युनायटेड-21 रिसॉर्ट हे आमचे वास्तव्य स्थान होते.
दुसऱ्या दिवशी आम्ही काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. पर्यटकांचे प्रमुख आकर्षक स्थळ म्हणजे हे उद्यान. हे आसाम मधील गोलघाट जिल्ह्यात आहे. भारतात १६६ राष्ट्रीय उद्याने आहेत आणि हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे. १९८५ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून यास घोषित केले. हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्या साठी तर प्रसिद्ध आहेच शिवाय या उद्यानात, भारतात कोठेही उपलब्ध नसलेले काही प्राणी आहेत. पक्ष्यांचे उत्तम क्षेत्र म्हणूनही हे ओळखले जाते. हंस, सारस, नाॅर्डमॅनचा हिरवा शंख, काळ्या गळ्याचा सारस असे पक्षी इथे बघायला मिळतात. इथे वाघही आहेत. जंगली पाण म्हशी इथे आढळतात. या उद्यानाची हिरवळ जगप्रसिद्ध आहे. सदाहरित असा हा जंगल प्रदेश आहे. या पार्क मध्ये आम्ही उघडी जीप सफारी केली. सकाळची प्रसन्न वेळ, दाट जंगल, जलाशय आणि मुक्त फिरणारे र्हायनो (गेंडे) हरणे, हत्ती, आनंदाने पोहणारी बदके. . . पक्ष्यांमध्ये निळकंठ पॅलिकेन बघायला मिळाले. रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत होती. प्रदूषण विरहित जंगल सफारीचा हा मुक्त अनुभव अविस्मरणीय होता.
1. ब्रह्मपुत्रा 2.आसामी कलकुसर 3. आसामी जेवण
आसाम मधले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथली ऑर्किडची लागवड. इथली ऑर्किड्स ही जगातल्या इतर ऑर्किड्स पेक्षा निराळी आहेत असा आमचा टूर गाईड सांगत होता. या फुलांना सहाच पाकळ्या असतात शिवाय झाडांच्या पानावर संपूर्ण सरळ आणि समांतर रेषा असतात. . ऑर्किड पार्कमधला फेरफटका नेत्रसुखद होता. . अनेक रंगांची ही ऑर्किड्स मनमोहक होती. त्यांची नावेही गमतीदार होती. बटरफ्लाय ऑर्किड, लेडी ऑर्किड वगैरे. . नावाप्रमाणेच फुलांचे आकार होते. याच पार्क मध्ये कॅक्टस आणि औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. विविध रोगांवर या वनस्पतींचा कसा उपचार होऊ शकतो याची भरपूर माहिती आम्हाला मिळाली. शंखपुष्पी, अश्वगंधा शतावरी, काळीहळद, बांबू वगैरेची झाडे पाहायला मिळाली. एका लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबे लगडली होती. हे झाड माझ्या लक्षात राहिले ते लिंबांच्या आकारामुळे. एकेक लिंबू पपई सारखे लांबट आणि मोठे. शिवाय हिरवेगार. चवीलाही अतिशय स्वादिष्ट.
पारंपारिक आसामी जेवणाचा आस्वाद इथे आम्हाला घेता आला. भल्यामोठ्या थाळीत १४ वाट्या होत्या. या आसामी थाळीत तिथेच पिकणार्या भाज्या प्रमुखांनी होत्याच. फणस केळफुल, कारली, भेंडी, तोंडली, बटाटे असे नाना प्रकार होते. तेल नसलेल्या उकडलेल्या भाज्या. डाळी आणि भरपूर भात. खीरही होती. खार नावाच्या माध्यमात ते बनवतात. स्वयंपाकात सरसोचे तेल वापरतात. सुरुवातीला या तेलाच्या वासाने खावेसे वाटेना पण हळूहळू सवय झाली. वेगळ्या चवीचे आणि आकर्षक असे हे आसामी भोजन होते.
आसामी लोक हे मांसाहारी आहेत. त्यांचे प्रमुख खाणे भात आणि करी (कालवण)हेच आहे. ते गोमांस खातात. रस्त्यारस्त्यावर गोमांस विक्रेत्यांची उघडी दुकाने पाहताना मात्र, मन शहारले. त्या वेळी जाणवलं की आपली खाद्यसंस्कृतीची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत. !गाय हे आपल्यासाठी दैवतच आहे. त्यामुळे या दुकानांवरुन जाताना नकळतच डोळे झाकले जातात.
आसाम मध्ये बांबूचे प्रचंड उत्पन्न आहे. त्यामुळे इथली घरे, कुंपणे, फर्निचर, सजावट ही सारी बांबूची असलेली आढळते. नंबर फिफ्टी फोर, द हाऊस ऑफ अ बांबू डोर…या गाण्याची आठवण झाली. मेघालयातही बांबूचा फार मोठा व्यवसाय आहे. इथला हस्तकला व्यवसाय ही बांबू शी निगडीत आहे. बांबू पासून केलेल्या अनेक कलात्मक कलाकृती इथे पहायला मिळतात.
इथल्याच एका म्युझियमला आम्ही भेट दिली. यामुळे आम्हाला आसामच्या पारंपरिक संस्कृतीची ओळख झाली. त्यांची स्वयंपाकाची भांडी, चुली, शेगड्या, हत्यारे, राजाराणी चे पोशाख, दागदागिने, वगैरे पाहायला मिळाले. आपल्याकडील महिला जसा पारंपारिक पद्धतीने डोक्यावरून पदर घेतात, तसेच इथल्या स्त्रिया मेखला आणि गामोशा हे वस्त्र पांघरतात. हे वस्त्र म्हणजे स्त्रियांची अब्रू राखणारे. . असा संकेत आहे. आणि इथल्या बहुतांश स्त्रियांच्या अंगावर ते दिसतेच. ते छान दिसते. पारंपारिक असले तरी सुटसुटीत आहे. आणि त्याचा आगळावेगळा लुक मला आवडला. एखादं आपण विकत घ्यावं का असा विचारही माझ्या मनात आला.
आसाम सफरी मधले वैशिष्ट्य म्हणजे तिथले बिहू हे लोक नृत्य. आपल्याकडे जसे कोळी नृत्य हा लोक परंपरेचा आणि लोककलेचा प्रकार आहे, त्याच पद्धतीचे बिहू हे लोक नृत्य. काहीसे लावणी प्रकाराशी ही त्याचे साम्य वाटले. बिहू हा आसाम चा सण आहे. आसाम हे कृषिप्रधान राज्य आहे. आणि बिहू हा तेथील शेतकर्यांचा सण आहे. हा वर्षातून तीनदा साजरा करतात.
पहिला रंगीन बिहू. हा 1४ एप्रिल पासून महिनाभर धूमधामपणे साजरा होतो. साधारण वसंतोत्सव सारखा हा सण असतो. युवक युवतींच्या प्रणयाला बहार आणणारा. त्यावेळची गीते आणि संगीत हे शृंगारिक असते. लगीन सराईचेही हेच दिवस.
दुसरा बिहू म्हणजे कंगाल बिहू. हा ऑक्टोबर म्हणजे कार्तिक महिन्यात असतो. यास कार्तिक बिहू असेही म्हणतात. हा दोनच दिवसांचा सण असतो. कारण या वेळेस शेतकरी, त्याच्या जवळचे सगळे पैसे शेतीसाठी गुंतवतो. त्यामुळे तो भविष्याच्या चिंतेत असतो. आणि कंगाल ही झालेला असतो.
तिसरा बिहू हा भोगी बिहू म्हणून साजरा होतो. संक्रांतीनंतर हा सोहळा असतो. यावेळेस शेतकरी आनंदात असतो कारण पीक पाणी चांगले होऊन शेतकऱ्यांच्या खिशात पैसे खुळखुळत असतात. हा अठवडाभर साजरा केला जातो.
बिहू हे लोकनृत्य अतिशय देखणे. ठेकाबद्ध, तालमय आणि जोशपूर्ण आहे. त्यातील बांबू नृत्य हे फारच चलाखीने आणि चपळाईने केले जाते. टाइमिंग आणि एनर्जी याची कमाल वाटते. त्यांचा पोशाखही अतिशय आकर्षक आहे. पुरुष गुडघ्यापर्यंत धोतरासारखे वस्त्र घालतात. अंगात जॅकेट. डोक्यावर आसामी पद्धतीची टोपी. गळ्यात माळा वगैरे घालतात. स्त्रियांचे वस्त्र गुडघ्यापर्यंत आणि कमरेभोवती घट्ट असे नेसलेले असते लाल आणि पिवळसर रंगाची ही वस्त्रे असतात. डोक्यावर घट्ट आंबाडा आणि ऑर्किडच्या फुलांचा गजरा माळलेला असतो. गळ्यात हातातही फुलांच्या माळा असतात. या सर्व नर्तिका अगदी वनराणी सारख्या दिसतात. चपळ आणि हसतमुख. खासी भाषेतील त्यांची गीतं, नीट लक्ष देऊन आपण ऐकली तर आपणास समजू शकतात. अर्थ आणि भाव कळतात. संगीत ही अशी भाषा आहे की मानवाच्या मनातले भाव ते सहज टिपतात. त्यासाठी बोली भाषेचा अडथळा होतच नाही. या लोकनृत्यासाठी वाजवली जाणारी वाद्य म्हणजे ढोल (ढोलकी )ताल (टाळ मंजिरी )टोपा, पिपा. ही सारी बांबूपासून बनवलेली तालवाद्य आहेत आणि त्यांचा एकत्रित मेळ एक जोशपूर्ण संगीताचा अनुभव देतो. एकीकडे हे नृत्य चालू होते आणि बाहेर निसर्गाचे तांडव नृत्य चालू होते. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा एक ताल. सारेच संगीतमय झाले होते. आसामच्या या पावसाचा अनुभव फार आल्हाददायक होता.
गुवाहाटी आणि ब्रह्मपुत्रेचं विशाल दर्शन …तिसऱ्या भागात वाचूया )