सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री शोभना आगाशे

सुश्री मंजिरी येडूरकर

💐अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सुश्री शोभना आगाशे आणि सुश्री मंजिरी येडूरकर यांनी एकत्रितपणे लिहिलेल्या “ गीतांजली – जशी भावली तशी  या उत्कृष्ट काव्य संग्रहाला पुढील दोन पुरस्कार एकाच वेळी घोषित करण्यात आले आहेत हे सांगतांना विशेष आनंद होतो आहे. —–

१ ) नरेंद्र विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यातर्फे उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार. 

२ ) मासिक सारांश (मिरज) साहित्य पुरस्कार – २०२३ — विशेष साहित्यकृती पुरस्कार. 

💐 या दोन्ही प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी सुश्री शोभना आगाशे, आणि सुश्री मंजिरी येडूरकर या दोघींचेही आपल्या समूहातर्फे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

या दोघींच्या एका कवितेचा आस्वाद आज यानिमित्ताने घेऊ या… 

मुरली घेऊन दर्‍याडोंगरी

सूर चिरंतन निर्मित जाशी

त्या रुपाचे चिंतन करता

माझे अंतर स्पर्शून जाशी …. 

स्पर्शाने त्या पुलकित होते

शब्दातीत तुजसवे बोलते

तूच भारिसी चैतन्याने

तूच रिकामा आणि करिशी  …. 

कलश मम हा देहस्वरूपी

पुनःपुन्हा या धरणीपाशी

अमर्त्य आत्मा वेष बदलुनी

काळोखातून येत प्रकाशी …. 

माझी झोळी जरी तोकडी

दाता तू तर असीम असशी

युगे युगे तू देतचि जाशी

तरीही झोळीत जागा राही …. 

अनंत मी याचक युगांचा

असशी तू दाता कल्पांचा…

 – शोभना आगाशे 9850228658

 – मंजिरी येडूरकर  9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments