सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मळभ ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

आज मी या वृक्षतळी

अशी उदास बसलेली

मनी सवे  भारलेल्या

तव प्रेमाच्या चाहुली

*

तुझ्या मिठीत सजलेल्या

 किती सुरम्य सांजवेळा

कुंतली या मोगऱ्याचा

प्रीतगंध दरवळला

*

क्षण क्षण तो सुरंगी

चांदण्यात भिजलेला

राग रागिणी  सुरांनी

धुंद असा नादावला

*

दाटले का तुझ्या मनी

मळभ  रे संशयाचे

काय जाहले नकळे

दुभंगले नाते प्रीतीचे

*

 पखरली वाट तुझी

 कधीच मी आसवांनी

पाहते वाट अजुनी

येशील तू परतूनी

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments