(श्री जयेश कुमार वर्मा जी बैंक ऑफ़ बरोडा (देना बैंक) से वरिष्ठ प्रबंधक पद से सेवानिवृत्त हुए हैं। हम अपने पाठकों से आपकी सर्वोत्कृष्ट रचनाएँ समय समय पर साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता दोस्त, तुम जब भी जाना…)
☆ कविता ☆ दोस्त, तुम जब भी जाना… ☆ श्री जयेश वर्मा ☆
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
विनायक महादेव कुलकर्णी :
विनायक महादेव तथा वि.म.कुलकर्णी यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी या गावात झाला.त्यांनी पुणे विद्यापीठात बी.ए.केले. तेव्हा तर्खडकर सुवर्णपदक प्राप्त केले. मुंबई विद्यापीठातून एम.ए.केले तेही चिपळूणकर पुरस्कार प्राप्त करून. त्यानंतर नाटककार खाडीलकर या विषयात डाॅक्टरेट संपादन केली. त्यांनी काही काळ बेळगाव येथे लिंगराज महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. नंतर सोलापूर येथील दयानंद महविद्यालयात प्रदीर्घ काळ अध्यापन करून तेथूनच निवृत्त झाले. अशी त्यांची जीवनाची वाटचाल होती.
या वाटचालीत त्यांनी शब्दांची साथ सोडली नाही. गद्य, पद्य आणि बालसाहित्य यात ते रमून गेले. विशेषतः काव्य प्रांतातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. भाषेतील सौम्यता आणि अनुभवांची प्रामाणिकपणाने मांडणी ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. निसर्ग, प्रेमभावना आणि पारंपारिक संस्कृतीचे दर्शनही त्यांच्या काव्यातून दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या कविता पाठ्यपुस्तकातून शिकायला मिळाल्या आहेत. आठवणीसाठी काही कविता अशा :
गाडी आली गाडी आली झुक झुक झुक, माझ्या मराठीची गोडी, लमाणांचा तांडा, ते अमर हुतात्मे झाले, आम्ही जवान देशाचे, माझा उजळ उंबरा, एक दिवस असा येतो … इत्यादी
प्रकाशित साहित्य
बालसाहित्य—
अंगतपंगत, गाडी आली गाडी आली, चंद्राची गाडी, छान छान गाणी, नवी स्फूर्तीगीते, फुलवेल इ.
काव्यसंग्रह
अश्विनी, कमळवेल, प्रसाद रामायण, भाववीणा, मृगधारा, पाउलखुणा,विसर्जन इ.
अन्य साहित्य
मला जगायचय..कादंबरी
न्याहरी..कथासंग्रह
गरिबांचे राज्य..चित्रपट कथा
पेशवे बखर,मराठी सुनीत,रामजोशी कृत लावण्या…संपादित…..इत्यादी
प्राप्त पुरस्कार
गदिमा पुरस्कार, भा.रा.तांबे पुरस्कार, दिनकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार, उत्कृष्ट प्राध्यापक…राज्य शासन पुरस्कार
शब्दांची कमळवेल फुलवून भाववीणा छेडीत जाणारा हा कवी कवितांच्या पाऊलखूणा मागे सोडत तेरा मे दोन हजार दहा ला निधन पावला.त्यांच्या साहित्य प्रतिभेस आदरांजली.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, आधुनिक मराठी काव्यसंपदा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
( …बीट मार्शलना वायरलेस मेसेजने अॅलर्ट करतो…आता इथून पुढे )
—मुलाची आई रस्त्याकडे हताशपणे पहात आसवं गाळीत असते. वडील आपला मुलगा लहान असला तरी कसा हुशार आहे , पूर्ण नांव , पत्ता सांगू शकतो हे पोलिसांना सांगून हा प्रकार काही क्षणात कसा झाला हे समजावत अशा गर्दीत त्याला कडेवर न घेतल्याबाबत पश्चाताप करत बसतात.
तेवढ्यात चहावाला पोऱ्या येतो. तो सगळ्यांना ” कटिंग” वाटत असताना ड्यूटी ऑफिसर त्या दोघानाही चहा द्यायला खुणावतो. मुलाचे वडील नको नको म्हणत ग्लास उचलतात तरी. आई त्या चहाला होही म्हणत नाही आणि नाहीही. समोर असून चहा तिला दिसत नसतो. त्याक्षणी तिला फक्त आणि फक्त तिच्या हरवलेल्या बाळाचा निरागस चेहेरा दिसत असतो.
ड्युटी ऑफिसर , लागून हद्द असलेल्या पोलीस ठाण्यात स्वतः फोन लावून हरवलेल्या मुलाबाबत माहिती कळवून असा कोणी मुलगा आढळून आल्यास ताबडतोब कळवायला सांगतो.
काही पोलिस ठाण्यांच्या हद्दी इतक्या अस्पष्ट असतात की विचारता सोय नाही. रस्ता एका पोलिस स्टेशन कडे तर फुटपाथ दुसऱ्या पोलिस स्टेशन कडे असा प्रकार. त्यामुळे अगदी हद्दीच्या टोकावरील ठराविक ठिकाणाला एखादे पोलिस ठाणे काही पावलावर असले तरी, ते ठिकाण त्या पोलिस ठाणे हद्दीत असेलच असे नाही. अशा ठिकाणी हरवलेले मूल सापडले की नागरिक पोलिस स्टेशनच्या हद्दीचा विचार न करता साहजिकच जवळच्या पोलिस ठाण्यात मुलाला पोहोचवतात.
ड्यूटी ऑफिसर् शेजारच्या पोलिस ठाण्याशी बोलत असताना पलीकडे फोनवर त्याचाच बॅचमेट असला की मग त्यांच्यात कामाव्यतिरिक्त इतर माफक गप्पाही ओघाने होतात . एखादी “अरे, कालची गंमत ” वगैरे संभाषण चालू असते. इथे व्याकूळ आईचा धीर आणखी सुटत असतो. तिच्या चेहेऱ्यावर फक्त तिच्या बाळाचा ध्यास स्पष्ट दिसत असतो. पोलिस स्टेशनचा फोन सतत खणखणत असतो. प्रत्येक वेळा फोनची घंटा वाजली की आपल्या बाळाची खबर असणार या आशेने डोळ्यात आणि कानात प्राण आणून ती फोन कडे पाहाते.
मधेच इतर कामाबद्दल काही लिहित असलेल्या ड्यूटी ऑफिसरचा , लिहिता हातही आपल्या दोन्ही हातानी धरून हलवत ती आई , ” साहेब बघा ना जरा कुठे गेला असेल तो!” असं शब्दा शब्दाला वाढत जाणाऱ्या रडवेल्या स्वरात विनवते. सगळं काम सोडा आणि आधी माझ्या मुलाला
शोधा ही तिची स्वाभाविक अपेक्षा असते.
असाच काही काळ जातो.
आणि शेजारच्या पोलिस स्टेशन मधून अपेक्षित फोन येतो. अमुक अमुक बीट चौकीमधे कुणा एकाने ,गर्दीत एकटा रडत फिरणारा , चुकलेला अमुक वर्णनाचा मुलगा आणून पोहोचविला आहे .
” मिळाला आहे मुलगा तुमचा ” , फोन खाली ठेवत ड्यूटी ऑफिसर त्या दोघांना सहजपणे सांगतो.
” कुठे आहे हो! कसा आहे? ठीक आहे ना हो ?”
आईला पुन्हा रडू फुटतं.
चुकलेले मूल पोलिस ठाण्यात कुणी सहृदयी नागरिकाने आणून दिल्यानंतर त्याचे पालक मिळेपर्यंत पोलिस स्टेशन मधे त्या मुलाची काळजी महिला पोलिस घेतात.आईच्या आठवणीने अखंड रडत असलेल्या त्या छोटया जीवाला सांभाळणे सोपे नसते. कडेवर घेऊन पोलिस स्टेशन भोवती फिरवत चॉकलेट , बिस्किट्स वगैरे खाऊ देऊन “बच्चू हे बघ , बच्चा ते बघ ” करत त्याचं चित्त जाग्यावर ठेवायची त्यांची कसरत सतत चालू असते.
ड्यूटी ऑफिसर जीप रवाना करतो. थोड्याच वेळात या नाट्याचा बालनायक महिला पोलिसाच्या कडेवर पोलिस ठाण्यात येतो.
त्या क्षणी त्याच्या आईची अवस्था काय वर्णावी !
रडता रडता ती धावत जाऊन त्याला खेचून घेते. तिचे पिल्लुही तिला बिलगते. ती त्याला कवटाळते. अचानक अतिप्रेमाने त्याला बोल लावत मारतही सुटते. पुनः घट्ट जवळ धरते. रडून रडून कळकट झालेल्या त्याच्या चेहेऱ्याचे सारखे मुके घेते. ” आता कध्धी कध्धी नाही हं असं तुला सोडणार ” असं त्याला समजावत , स्वतः रडत असताना आपल्या पदराने त्याचा रडवेला चेहेरा पुसत रहाते.
इकडे ड्युटी ऑफिसर, पोलिस कंट्रोल रूम ला फोन करून आधीच्या फोनचा संदर्भ देऊन हरवलेला मुलगा सापडल्याचे आणि पालकांच्या ताब्यात दिल्याचे कळवून , त्या प्रमाणे पोलिस स्टेशन डायरी आणि संबंधित रजिस्टर मधे नोंद घेण्यास सुरूवात करतो.
आई आता सावरलेली असते.
एखादा पांडा जसा झाडाला हातांचा आणि पायांचा विळखा घालून असतो , तसच ते मूल गळ्यात हात टाकून आईला धरून असतं.
पोलिस कर्मचारी मुलाची करमणूक व्हावी म्हणून त्याच्याशी हास्यविनोद करत असतात.
आईवडील आणि मूलही आता हसत असतात.
आयुष्यभर लक्षात राहील अशा घटनेची आठवण मनाशी बांधून निघताना आई ड्यूटी ऑफिसरच्या किंवा या प्रसंगाचे साक्षी असलेल्या एखाद्या वयस्क हवालदारांच्या पाया पडायचा प्रयत्न करते.
मुलगा चांगला तीन साडेतीन वर्ष वयाचा , धावता येऊ शकणारा असला तरी , पोलिस स्टेशनमधून निघताना त्याचे पाय जमिनीला लावू न देता , आई त्याला कडेवर घेऊनच आनंदाश्रूना मोकळी वाट करून देत , आपल्या घरची वाट धरते .
जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली, श्रीमंत घरातली ती महिला एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली.
“नाही ताई ! मला नाही परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या हव्यातच.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून काढून आपल्या हाती परत घेतले.
“अरे भाऊ ! अरे, केवळ एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत..! तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशाच तर फार जास्त होतात. केवळ मी म्हणून तुला दोन साड्या तरी देऊ करतेय.”
“राहू द्या, तीन पेक्षा कमी मध्ये तर मला अजिबातच परवडत नाही.” तो पुन्हा बोलला.
आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका वेडसर तरुण महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला आपल्याला कांही खायला द्या म्हणून विनंती केली.
अशा लोकांबद्दल असलेल्या घृणेमुळे त्या श्रीमंत महिलेनं एकवार जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं. तिची नजर त्या वेडसर दिसणार्या महिलेच्या कपड्यांकडे गेली.
जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपलं उमलतं तारुण्य झाकायचा तीचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता.
त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी, पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही असा विचार करीत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर तरुण भिकारणीच्या पात्रात टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली, “हं तर मग काय भाऊ! तू काय ठरवलंय ? दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या?”
यावर कांही न बोलता भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या, आपल्या गाठोड्यात टाकल्या, पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला…
विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला उठली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली… तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला, त्यानं आताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी देत होता.
आता हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार भारी झाल्यासारखं वाटू लागलं होतं. त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं होतं. घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं देऊ करायला एकाएकी कां तयार झाला होता याचं कारण तिला आता चांगलंच उमगलं होतं. आपला विजय झाला नसून आज त्या यःकश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे ह्याची तिला आता जाणिव झाली होती.
कुणाला कांही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं….!!
🙏आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे यानं कांहीही फरक पडत नाही. आपली विचार करण्याची पद्धत व नियत शुद्ध असायला हवी.🙏
संग्राहिका – सुश्री सुजाता गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक संवेदनशील लघुकथा ‘अनहोनी’. डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस ऐतिहासिक लघुकथा रचने के लिए सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 92 ☆
☆ लघुकथा – अनहोनी ☆
कई बार दरवाजा खटखटाने पर भी जब रोमा ने दरवाजा नहीं खोला तो उसका मन किसी अनहोनी की आशंका से बेचैन होने लगा। ऐसा तो कभी नहीं हुआ। इतनी देर तो कभी नहीं होती उसे दरवाजा खोलने में। आज क्या हो गया ? आज सुबह जाते समय वह बाथरूम से उससे कुछ कह रही थी लेकिन काम पर जाने की जल्दी में उसने जानबूझकर उसकी आवाज अनसुनी कर दी। कहीं बेहोश तो नहीं हो गई ? दिल घबराने लगा, आस – पड़ोसवाले भी इकठ्ठे होने शुरू हो गए थे।
वह रोज सुबह अपने काम से निकल जाता और रोमा घर में सारा दिन अकेली रहा करती थी। बेटी की शादी हो गई और बेटा विदेश में था। उसने कई बार पति को समझाने की कोशिश भी की कि अब उसे काम करने की कोई जरूरत नहीं है, उम्र के इस दौर में आराम से रहेंगे दोनों पति-पत्नी लेकिन पुरुषों को घर में बैठना कब रास आता है। किसी तरह से घर का दरवाजा खोला गया। रोमा बाथरूम में बेहोश पड़ी थी उसे शायद हार्ट अटैक आया था। पड़ोसियों की मदद से वह रोमा को अस्पताल ले गया। रोमा को अभी तक होश नहीं आया था। वह उसका हाथ पकड़े बैठा था और सोच रहा था कि अगर आज भी रोज की तरह देर रात घर आता तो ?