☆ पावसाच्या धारा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
“काय रे,काय करतोयस ?”
“काही नाही रे,बसलोय निवांत,”
“निवांत”?
“होय,खिडकीपाशी बसलोय पाऊस बघत!”
“पाऊस बघतोयस? काय लहान आहेस काय?”
“लहान नाहीय रे,पण लहान झालोय”
“आता शहाणा की खुळा?”
” म्हण खुळा हवं तर.पण मी झालोय लहान.तू बसला असशील मोबाईल घेऊन बोटं बडवत.पण इथं खिडकीपाशी बसून पाऊस बघताना,रस्त्याच्या कडून वाहणारं पाणी बघताना,वाहून गेलेलं सगळं आठवतं बघ.पावसाच्या पाण्यानं खिडकीच्या काचा पण झाल्यात स्वच्छ!म्हणून की काय,सगळं स्वच्छ दिसतय बघ.आठवतंय तुला,आपल्या वेळेला पाऊस आणि शाळा एकदमच सुरू व्हायचं.जणू काही पावसाचीपण उन्हाळ्याची सुट्टी संपायची आणि त्याची जाणीव झाली की तो एकदम धावत यायचा.ज्या आठवड्यात शाळा सुरू,त्याच आठवड्यात पाऊस सुरू.मग आपले नवे कोरे युनिफॉर्म,दप्तर आणि वह्यापुस्तकं जपत,सांभाळत,रेनकोट घालून अवघडत चालत चालत शाळा गाठायची.शाळाही सगळी ओलीचिंब! बाहेरून आणि बरीचशी आतूनही.पण बरेचसे शिक्षक मात्र आतून कोरडेच असायचे.पावसात सुद्धा थोडासा उशीर झाला तरी पट्टीचा एक फटका बसणारच हे नक्की.
फटका आठवला आणि भानावर आलो बघ.ते बघ,ती चिखल तुडवणारी पोरं.एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणारी पोरं.ते बघ,तिकडून आली ती दोघं, कागदाच्या होड्या घेऊन.आता या मोठ्या पावसात काय टिकणार या होड्या?पण केव्हा एकदा होडी सोडतोय पाण्यात असं झालंय त्यांना.ते बघ तिकडं रंगीत पट्टयापट्टयाची छत्री घेऊन कोण आलय.सुटलं वारं आणि झाली छत्री उलटी.आता काय,नुसती रडारड.पावसाच्या मा-यापेक्षा घरच्या माराचीच भीती जास्त.ती बघ अंगणातली छोट्यांची फौज.गोल गोल फिरत सुरू झालीत गाणी पावसाची.”पावसाच्या धारा,येती झरझरा…”पलिकडे बघ जरा.शेजारच्या काकू आल्या धावत आणि पडल्या धबक्कन चिखलात.सगळी पोरं हसताहेत
फिदीफिदी. आता वाळत टाकलेले कपडे एवढ्या पावसात भिजल्याशिवाय राहणार आहेत का? कशाला घाई करायची? जाऊ दे,आपल्याला तर मजा बघायला मिळाली की नाही !अशा सगळ्या गमतीजमती डोळ्यासमोर उभ्या राहतात चित्र बनून असा पाऊस बघायला लागल्यावर.म्हणून थोडा वेळ तरी लहान व्हायचं असतं.नाहीतर उद्या पेपर आहेच की ,कुठं झाडं पडली,कुठं नुकसान झालं,कुठं दुर्घटना घडली हे सगळं वाचायला.हे सगळं घडू नये असं वाटतं पण तरीही घडत असतंच.मग असं थोडं मागचं आठवाव,मनाच्या पुस्तकाची पानं फडफडावीत आणि जरा ताजं तवान व्हावं.हे सगळं आठवता आठवता पावसाचा जोर ओसरला बघ.चला,आता जरा गरमागरम चहा मिळतोय का बघूया.सारखं खिडकीत बसून कसं चालेल?येतोयस का चहाला?तू कशाला येशील म्हणा?तिकडे भजावर ताव मारत असशील,होय ना?
चला, दुसरी सर यायच्या आत चहाची एक फेरी होऊन जाऊ द्या !
नंदिनीच्या आयुष्यात मावशी आल्या आणि तिच्या जीवनाला एक वेगळेच वळण लागले. आई गेल्यावर ती अगदी एकाकी झाली. पती निधनानंतर दहा वर्ष्ये आईने तिला सावलीसारखी साथ दिली होती. पण आई का जन्मभर पुरणार? दोन्ही मुले अमेरिकेत. . . !एकटेपणा काय असतो ह्याची जाणीव खर्या अर्थाने आईच्या स्वर्गवासाने तिला झाली. तशी अवतीभवती बरीच माणसे होती, बहीणी होत्या, दीर~नणंदा होत्या, पण त्यांची साथ कायम कशी काय शक्य? प्रत्येकाला त्यांचे त्यांचे संसार, जबाबदार्या होत्याच ना?
नंदिनी तशी अतिशय खंबीर मनाची. पतीच्या अकस्मात निधनानंतरही तिने स्वतःला पूर्णपणे सावरले, स्वतःचे व्यक्तिमत्व जपले. आज एकटी आहे म्हणून रडत बसणे हा तिचा स्वभावच नव्हता.
तिच्या शेजारच्या घरात एक चोवीस तासांची बाई होती. शेजारीण फार चांगली. ती म्हणाली, “आँटी, तुम्ही एकट्या आहात म्हणून मी माझ्या बाईला रात्री तुमच्यासोबत झोपण्यासाठी पाठवत जाईन. ” तिला बरे वाटले नाही, परंतु शेजारणीने इतके आस्थेने सांगितल्यावर नाही म्हणणेही प्रशस्त वाटले नाही.
शेजारची बाई तिच्याकडे येऊ लागली. तिच्या मनात आले की आपणही अशीच एखादी चांगली बाई ठेवली तर?मग तिने चौकशीला सुरवात केली. शेजारची बाई एका नोकरवर्ग पुरविणार्या एजन्सीतून आली असल्याचे रात्री झोपताना केलेल्या गप्पा~गोष्टींवरून नंदिनीला समजले. “ताई , तुम्ही आमच्या मॅडमना विचारा. त्यांच्याकडे एजन्सीचा नंबर असेल. त्या देतील तुम्हाला. “अशा रीतीने भंडारीबाईंकडून तिला नंबर मिळाला. एजन्सीमार्फत एक दोन बायका तिच्याकडे आल्याही परंतु त्यांच्या सोबत सतत रहाणे नंदिनीला रास्त वाटले नाही. दहा बारा दिवस असेच गेले. शेजारच्यांच्या बाईला असे किती दिवस बोलवायचे? ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा का?नंदिनी फार अस्वस्थ होती. एजन्सीला रोज फोन लावून चांगली बाई मिळण्याची शक्यता आहे की नाही याचा अंदाज घेत होती. “ताई तुम्ही निश्चिंत रहा. लवकरच आम्ही तुम्हाला तुमच्या मनासारखी चांगली बाई मिळवून देतोच” असे तिला आश्वासन मिळत होते.
एक दिवस संध्याकाळी दारावरची बेल वाजली, एजन्सीचा माणूस बाईला घेऊन आला होता.
साधारण पन्नाशीतली बाई. गळ्यात ठसठशीत सोन्याची बोरमाळ आणि कानात सोन्याचे झुमके, कानावर सोन्याच्या पट्या लावून
ठाकठीक बसवलेले. प्रथमदर्शनी कोणाचीही नजर खेचून घेणारे. सावळा वर्ण पण नाकी डोळी नीटस. पदर पिनप करून सिंथेटिक साडी व्यवस्थित परिधान केलेली. केस काळेच, मधूनच एखादी रूपेरी छटा. कपाळावर लाल मध्यम आकाराची टिकली. केसांना तेल लावून आंबाडा घातलेला. नीट नेटकी, स्वच्छ. चाल एकदम ताठ. . . !प्रथमदर्शनीच त्यांच्याशी जमण्यास काही अडचण येऊ नये असे नंदिनीला वाटले.
एजन्सीच्या माणसाने त्या बाईशी ओळख करून दिली आणि त्यांच्या काही कागदपत्रांवर सह्या घेऊन “बघा तुम्हाला ह्या बाई पटतात का, नाहीतर आम्हाला कळवा. आम्ही दुसरी बाई देऊ. “असे सांगून तो निघून गेला.
“द स्काय इज पिंक”, या चित्रपटातला तो मुलगा, मला सहज आठवला. त्याने एक चित्र काढले होते आणि त्या चित्रातले आकाश त्यांनी गुलाबी रंगाने रंगवले होते. त्यावेळी त्याची शिक्षिका त्याला रागावली होती. म्हणाली होती…
…”तुला कळत नाही का? आकाश निळे असते गुलाबी नसते”
मुलाचे म्हणणे सूर्य उगवतांना आणि सूर्य मावळतांना आकाश गुलाबीच असते ना? पण तरीही त्याने काढलेले ते चित्र रद्द ठरले.
त्याच्या आईने त्याला समजावले आणि म्हटले “तुला आकाश गुलाबी दिसते ना मग तू ते गुलाबी रंगानेच रंगव, बक्षिस नाही मिळाले तरी चालेल.”
मनात पटकन विचार आला की खरंच आपल्या दृष्टीला जे रंग दिसतात तेच खरे. कुणी कोणता रंग हाती घ्यावा ही ज्याची त्याची मर्जी.
कधी वाटतं, आयुष्य म्हणजे रंगपंचमी आहे. जन्माला येतानाच ईश्वराने आपल्यासोबत एक रंग पेटी दिली आहे.
“ता ना पि ही नि पां जा” — या सप्तरंगाची पेटी घेऊनच आपण या पृथ्वीतलावर आलो. या सप्तरंगांच्या मिश्रणाने आणखी कितीतरी रंगांच्या छटा नकळत आपल्या आयुष्यासोबत झिरपत असतात का?
“पानी रे पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिला दो लगे उस जैसा।
गंगा से जब मिले तो बनता गंगाजल ।बादल से तू मिले तो रिमझिम बरसे सावन।।”
जन्मतः कुठलाच रंग नसतो जीवनाला, ते असते पाण्यासारखे नितळ, रंगहीन पण निर्मळ जगण्याच्या प्रक्रियेमध्ये मग रंग भरत जातात. कधी नकळत कधी आपण ते जाणीवपूर्वक भरत राहतो. मग त्यात प्रेमाचा गुलाबी रंग असतो, मनाच्या ताजेपणाचा हिरवा रंग असतो, कधी लाल रंगाचा अंगार असतो, तर कधी शौर्याची नारिंगी छटा असते, भक्तीचा निळा शांत प्रकाश असतो, पांढऱ्या रंगाची स्थिरता असते, तर पिवळ्या रंगातला आनंद असतो. पण कधी द्वेष मत्सर यांचा हेवा दाव्याचा, तीव्र स्पर्धेचा, मान अपमानाचा भयानक काळाभोर रंग व्यापून उरलेला असतो.
कधी अंतरंगात डोकावून पाहिलंय का? कोणता रंग दिसतो? काळाच काळा. मग बाकीचे पेटीतले इतके सुंदर रंग गेले कुठे? का पण ते कधी हाती घेतलेच नाही? या काळ्या रंगातच रेघोट्या मारत बसलो? असं म्हणतात कावीळ झालेल्या माणसाला सगळे जगचं पिवळे दिसते तसं झालं का आपलं? फक्त या काळ्या रंगाने आपल्यावर कुरघोडी केली का ? इंद्रधनुष्यातील सात रंग कुठे हरवले? आनंदाने नाचणाऱ्या मोराचा निळा रंग, वर्षा ऋतूतील धरेचा हिरवा रंग, बहाव्याचा पिवळा सुखद रंग, पिकलेल्या रानाचा सुवर्ण रंग, याने कां नाही भुलवले आपल्याला?
बरं !!काळ्या रंगातही आपण पाहिला तो कावळा…
…विठ्ठल नाही पाहिला, पाणी देणारा मेघ नाही पाहिला. आपण रंग पाहिला तो अंधाराचा. या काळ्या रंंगाने आपल्या आयुष्याला भीषण केलं, गढूळ केलं. मुळातच कुठला रंग हाती घ्यावा हे ठरवायच्या आधीच या काळ्या रंगाने प्रवेश केला अन मग सारंच काळवंडलं कां?
सुरेश भट यांची एक गझल आठवते—
।। रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा.
गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा.
माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी,
माझियासाठी न माझा, पेटण्याचा सोहळा.
रंग माझा वेगळा ।।”
एका कलंदर माणसाच्या आयुष्याचं व्यक्तिमत्व कसं असतं तर साऱ्या रंगांच्या, दुःखाच्या, अपमानाच्या, फसवणुकीच्या झळा सोसूनही तो सूर्यासारखा तळपतो आणि वेगळ्या रंगाचा सोहळा साजरा करतो आणि म्हणतो रंग माझा वेगळा. — कोणता रंग घेऊ हाती याचे उत्तर जणू या काव्यपंक्तीत सापडतं.
चला तर मग ईश्वराने दिलेली रंगपेटी उघडू या. सप्तरंगांनी आपले जीवनचित्र रंगवूया. हा काळा रंग पार बाजूलाच ठेवूया—
— असा रंग हाती घेऊ या की, ज्याने “ अवघा रंग एक झाला,” ही भावना मनावर स्वार होईल.
☆ वाचनाचे फायदे… ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
बिजू (बिजयानंद) पटनायक (१९१६- १९९७) हे भारतातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव तीन देशांच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आले होते. भारत, रशिया आणि इंडोनेशिया.
बिजू दोन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्रीही होते.
बिजू पटनायक हे वैमानिक होते आणि दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियन अडचणीत असताना त्यांनी डकोटा हे लढाऊ विमान उडवून हिटलरच्या सैन्यावर बॉम्बफेक केली, ज्यामुळे हिटलरला माघार घ्यावी लागली. सर्वोच्च पुरस्कारही त्यांना देण्यात आला आणि त्यांना सोव्हिएत युनियनने मानद नागरिकत्व बहाल केले.
जेव्हा कावळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा बिजू पटनायक यांनीच २७ ऑक्टोबर १९४७ रोजी दिल्ली ते श्रीनगर दिवसातून अनेक दौरे केले आणि सैनिकांना श्रीनगरला नेले.
इंडोनेशिया ही एकेकाळी डचांची म्हणजे हॉलंडची वसाहत होती आणि डच लोकांनी इंडोनेशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. डच सैनिकांनी इंडोनेशिया भोवतीचा संपूर्ण समुद्र आपल्या ताब्यात ठेवला आणि त्यांनी एकाही इंडोनेशियन नागरिकाला बाहेर पडू दिले नाही.
१९४५ मध्ये इंडोनेशियाची डचांपासून मुक्तता झाली आणि पुन्हा जुलै १९४७ मध्ये पी.एम. सुतान जहरीर यांना डचांनी घरात अटक केली. त्यांनी भारताची मदत मागितली. त्यानंतर नेहरूंनी बिजू पटनायक यांना तत्कालीन इंडोनेशियन पंतप्रधान जहरीर यांना भारतात सोडवण्यास सांगितले. २२ जुलै १९४७ रोजी बिजू पटनाईक आणि त्यांच्या पत्नीने जीवाची पर्वा न करता डकोटा विमान घेतले, डचांच्या नियंत्रण क्षेत्रावरून उड्डाण करत ते त्यांच्या मातीत उतरले आणि मोठे शौर्य दाखवत इंडोनेशियन पंतप्रधानांना भारतात आणले. सिंगापूरमार्गे सुरक्षितपणे. या घटनेने त्यांच्यात एक प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांनी डच सैनिकांवर हल्ला केला आणि इंडोनेशिया पूर्णपणे स्वतंत्र देश झाला.
नंतर, जेव्हा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो यांच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा त्यांनी बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीला नवागताचे नाव देण्यासाठी बोलावले. त्यानंतर बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या मुलीचे नाव मेघावती असे ठेवले.
इंडोनेशियाने १९५० मध्ये बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या देशाचा मानद नागरिकत्व पुरस्कार ‘भूमिपुत्र’ प्रदान केला होता.
नंतर त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्षी इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्माननीय पुरस्कार ‘बिनतांग जासा उत्मा’ प्रदान करण्यात आला.
बिजू पटनायक यांच्या निधनानंतर इंडोनेशियामध्ये सात दिवसांचा राजकीय शोक पाळण्यात आला आणि रशियामध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्यात आला आणि सर्व ध्वज खाली करण्यात आले.
आपल्या देशाच्या इतिहासाच्या पुस्तकांनी कधीही न सांगितलेल्या अशा महान व्यक्तीबद्दल मला कळले तेव्हा मला अभिमान वाटला.
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है एक भावप्रवण रचना “शहर…”।)
(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त । 15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव एवं विगत 22 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक लगभग 72 राष्ट्रीय एवं 3 अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन।
आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है।
आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है एक भावप्रवण हिंदी ग़ज़ल “हम गीत गुनगुनाऐंगे…”।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – लघुकथा – प्रवाह
वह बहती रही, वह कहता रहा।
…जानता हूँ, सारा दोष मेरा है। तुम तो समाहित होना चाहती थी मुझमें पर अहंकार ने चारों ओर से घेर रखा था मुझे।
…तुम प्रतीक्षा करती रही, मैं प्रतीक्षा कराता रहा।
… समय बीत चला। फिर कंठ सूखने लगे। रार बढ़ने लगी, धरती में दरार पड़ने लगी।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे। उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। आज से प्रस्तुत है आपके कांकेर पदस्थापना के दौरान प्राप्त अनुभवों एवं परिकल्पना में उपजे पात्र पर आधारित श्रृंखला “आत्मलोचन “।)
☆ कथा कहानी # 33 – आत्मलोचन– भाग – 3 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆
मनपसंद कुर्सी से आत्मलोचन जी के प्रबल आत्मविश्वास में और भी ज्यादा वृद्धि हुई और हुक्म चलाने की अदा में कुछ बेहतर पर कड़क निखार आ गया. ये कुर्सी उन्हें सिहांसन बत्तीसी की तरह अधिनायक वादी पर दिनरात एक कर लक्ष्य पाने का ज़ुनून दे रही थी और उनका इस विशिष्ट कुर्सी के प्रति प्रेम, चंद्रकलाओं की तरह दिन प्रति दिन बढ़ता जा रहा था. जिलाधीश को अक्सर किसी न किसी मीटिंग में भाग लेकर अध्यक्षता करनी पड़ती है अथवा संभागीय स्तर के उच्चाधिकारी, प्रभारी मंत्री ,सांसद, विधायकों की अध्यक्षता में आहूत बैठक में भाग लेना पड़ता है.तो जब भी बैठक की अध्यक्षता करनी होती तो बंगले से सिंहासनबत्तीसी की जुड़वां कुर्सी मीटिंग हॉल में आ जाती अन्यथा आत्मलोचन जी को उनसे ऊपर वालों की उपस्थिति में हो रही मीटिंग्स में प्रोटोकॉल के कारण बहुत अनमनेपन से सामान्य कुर्सी से ही काम चलाना पड़ता.कलेक्टर की अध्यक्षता में साप्ताहिक TL याने टाईमलिमिट मीटिंग पहले हर मंगलवार को निर्धारित थी पर जब उन्होंने पाया कि जिलास्तर के विभागीय प्रमुख अपना सप्ताहांत महानगर स्थित परिवार के साथ बिताने के बाद सोमवार को “देरआयद दुरुस्तआयद” की प्रक्रिया का पालन कर आराम से कार्यालय पहुंचते हैं तो उन्होंने TL meeting को सोमवार 11बजे से लेना प्रारंभ कर दिया. उनके बहुत सारे अधीनस्थ इससे परेशान तो हुये क्योंकि अब उन्हें हर हाल में जिला मुख्यालय में सुबह पहुंचना पड़ता था पर और कोई दूसरा रास्ता भी नहीं था क्योंकि वीकएंड में मुख्यालय बिना अनुमति के छोड़ने की परंपरा यहां पर भी सामान्य रूप से प्रचलन में थी. हर तिमाही रिजर्व बैंक के निर्देशानुसार होने वाली बैठक उनकी अध्यक्षता में होती थी जिसके बिंदुवार अनुवर्तन के मामले में वो बहुत कुशल और कड़क थे और पिछली मीटिंग्स में दिये गये आश्वासन पूरे नहीं होने पर false promise करने वाले अधिकारियों की कड़क समझाइश भी की जाती थी भले ही वह व्यक्ति उनके अधीन हो या न हो.उनका यह सोचना था कि जिले की प्रगति के साथ अनुशासन बनाये रखने की जिम्मेदारी उनकी है और हर मीटिंग्स के लक्ष्य शत-प्रतिशत पूरा करना उपस्थित अधिकारियों का कर्तव्य.इस बारे में उनके हर कोआर्डिनेटर को स्पष्ट निर्देश थे कि मीटिंग्स अटैंड करनेवाले लोग अधिकारसंपन्न हों,कई बार प्राक्सी लोगों को आने पर मीटिंग्स से वापस भेजने की परिपाटी उनके कार्यकाल में ही रिवाज में आई.
आत्मलोचन जी अविवाहित थे और अपने माता पिता के साथ अपने बंगले में सामान्य पर गरीबी मुक्त वैभवशाली जीवन व्यतीत कर रहे थे जो उनकी प्रतिभा, निष्ठा, परिश्रम और सौभाग्य के कारण उनका हक था पर उनके शिक्षक पिता कभी कभी अपने पुत्र के व्यवहार में संवेदनहीनता, घमंड, निर्दयता की झलक पाकर चिंतित हो जाते थे. पुत्र की असीम उपलब्धियों ने , पिता से पुत्र को सलाह देने या कुछ सुधार करने की पात्रता छीन ली थी और पितृत्व की शक्ति का स्थान, इन अवगुणों को नजरअंदाज करने की निर्बलता लेती जा रही थी.
पुत्र इस बात पर आश्वस्त थे कि पिता ने उसके ऊपर जो भी इन्वेस्ट किया था उससे कई गुना सम्मानित और वैभवशाली जीवन वह अपने पिता को लौटा चुका है तो अब पिताजी को अपना शेष जीवन आराम से अपनी रुचियों (हॉबीज़) के साथ बिताना है और कम से कम पुत्र के जीवन में अब कोई दखलंदाजी करने की जगह नहीं है और आखिर हो भी क्यों और वो क्या समझें कि कलेक्टर का दायित्व कितना बड़ा होता है.
पिता और पुत्र के बीच संवाद की एक ही स्थिति थी “संवादहीनता” जो धीरे धीरे कब अपना स्थान बनाती गई, दोनों को पता नहीं चल पाया. जन्म केे रिश्तों का अपनापन, अधिकार और गरमाहट कब ठंडी पड़ गई ,एहसास बहुत धीमे धीमे हुआ पर आखिर हो ही गया और पिता और पुत्र एक ही बंगले में एक दूसरे के अस्तित्व को अनुपस्थिति के समान उपस्थिति से भरा समय समझते हुये गुजारते जा रहे थे.