मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाकी सर्व  छान आहे… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

सौ. नेहा लिंबकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बाकी सर्व छान आहे☆ सौ. नेहा लिंबकर ☆

ओठात एक पोटात एक

हाच असे का जीवनी खेळ

त्याच्या संगे घुमतो आहे

बाकी सर्व छान आहे

 

उच्च नीच जाती पाती

खरे खोटे भेद भाव

सारे काही तसेच आहे

बाकी सर्व छान आहे

 

हाती हात नाती चार

जिव्हाळा जपणूक दूर फार

धागे त्यांचे गुंफतो आहे

बाकी सर्व छान आहे

 

हेवे दावे तुझे माझे

शाश्वत अशाश्वत सारे सारे

सवयीने नित्य जगतो आहे

बाकी सर्व छान आहे

 

जप  तप  होम हवन

नीति धर्म नित्य कर्म

बंध त्यांचे स्मरतो आहे

बाकी सर्व छान आहे

 

असले जरी असे काही

खात्रीने त्यात बदल होईल

पिढ्यानपिढ्यांचा  हाच विचार

होईल होईल सर्व छान

© सौ.  नेहा लिंबकर

पुणे 

मो – 9422305178

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य # 182 ☆ मध्वाचार्य… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 182 ☆ मध्वाचार्य… ☆ श्री सुजित कदम ☆

कर्नाटक प्रांतांतील

मध्वाचार्य भाष्यकार

दसऱ्याच्या शुभ दिनी

जन्मा आले तेजाकार…! १

 

बाल नाम वासुदेव

दैवी गुण बाळलीला

बोले लहान बालक

 देव आहे संगतीला…! २

 

परमेश्वर कृपेमुळे

सुरू जगाचा प्रवास

मार्ग दावी ईश्वराचा

द्रष्टा संत  बोले खास…! ३

 

प्रज्ञावान वासुदेव

शुद्ध स्पष्ट उच्चारण

करी ओजस्वी वाणीत

श्लोकार्थाचे निरूपण…! ४

 

मल्लयुद्ध क्रीडा खेळ

पोहण्यात तरबेज

वेदसुक्ते अध्ययन

बुद्धी शक्ती धावे तेज…! ५

 

बलवान शरीरात

वास कुशाग्र बुद्धीचा

वेदांतात बलवान

करी प्रयोग शक्तीचा…! ६

 

करा स्वतः चे रक्षण

हाती कु-हाड घेतली

केला डाकूंचा सामना

शक्ती विराची चेतली…! ७

 

होते जन  ते अस्थिर

यवनांची राजवट

दिली जीवन प्रेरणा

पुर्णज्ञानी मधुघट…! ८

 

धर्मजागृतीच्या साठी

केले भारत भ्रमण

तत्वज्ञान बोधामृत

ग्रंथ चाळीस लेखन…! ९

 

वृत्ती‌ संन्यासी व्रतस्थ

ब्रम्हसूत्र निरूपण

गीताभाष्या प्रवचन

मंत्रमुग्ध श्रोतेजन…! १०

 

कृष्ण मुर्तीची स्थापना

समृद्धसे ग्रंथालय

कृष्णामृत महार्णव

तंत्रसार शब्दालय…! ११

 

तिथी निर्णय गणित

ग्रंथ लेखन विपुल

वाणी माधुर्य  लौकिक

पडे प्रपंचाची भूल…! १२

 

शक्ती श्रेष्ठ परमेश

सत्य मार्ग त्याचा वास

परखड वाणीतून

धैर्य साहस विश्वास..! १३

 

माघ शुद्ध नवमी हा

मध्वनवमीचा  सण

पुण्यतिथी महोत्सव

पुण्यात्माची आठवण.! १४

 

घाली सुख दुःख वीण

मध्वाचार्य प्रवचन

द्वैत भाव संदेशाचे

करी स्मरण चिंतन..! १५

 

परमेश प्रतिबिंब

जीवनात पदोपदी

नाव घ्यारे कोणतेही

साक्षात्कार घडोघडी..! १६

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “येणार तो कधीचा…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ “येणार तो कधीचा…” – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

येणार तो कधीचा 

   उन्मेष मम मनीचा 

      प्रतिबिंब आमचे ते 

          आनंद जीवनाचा !! 

येणार तोची म्हणूनी 

     फुलला जणू वसंत 

         स्वप्ने किती सजावी 

             नाही मना उसंत !!

राजा असेल तो, की 

      राणीच गोजिरीशी 

           कोणी असो, आम्हाला 

              हुरहूर ती हवीशी !!

इवलेच पाय आणि 

      इवलेच दोन हात 

           केव्हाची देती माझ्या 

               वेड्या मनास साथ !!

गालावरी खळ्या त्या 

        आनंदमय नि डोळे 

             प्रतिमा मनीची माझ्या 

                 माझ्यासवे ती बोले !!

नाही तयाविना हो 

         या जीवनास अर्थ 

              येईल तोच तेव्हा 

                   होऊ आम्ही कृतार्थ !!!!!

कवयित्री : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 210 ☆ परदेशी पाहुणा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 210 ?

परदेशी पाहुणा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

परदेशातला मुलगा,

दहा दिवसांसाठी घरी येतो…

अर्थात ऑफिस च्या कामासाठी,

इथेही चालूच असतं त्याचं …

ऑफिस, मित्र, आप्तेष्टांना भेटणं,

तरीही तो घरात असतो,

त्याच्या जुन्या आवडी निवडीसह,

कुठले भारतीय पदार्थ,

खायचे असतात त्याला ?

तिथे न मिळणारे ?

“हल्ली सगळीकडे

सगळं मिळत,

आईबाप सोडून”

एक घिसापीटा डायलॉग …

अनेकजण ऐकवतात!

 

दिवस भर भर

सरकतात पुढे !

निघण्याच्या दिवशी

त्याचे आवडीचे पोहे करताना आठवतं ,

तो चार वर्षांचा असताना म्हटलेलं,

“आई ,आज जगदीश च्या डब्यातले

पोहे खाल्ले, मस्त होते,

लिंबू पिळलेले!”

 

आज त्याच्यासाठी पोहे करताना,

तेच आठवलं,

म्हटलं हसून…

“आज जगदीश च्या आई सारखे,

पोहे केलेत!”

मुलं कितीही मोठी झाली,

दूर देशी गेली,

 तरी,

तरी आपल्या हाकेच्या अंतरावरच

असतं त्यांचं शैशव,

आपण खूप जपून ठेवलेलं !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सखे… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ सखे… ☆ 🖋 मेहबूब जमादार

माझं जगणं सखे तुझ्यात आहे

पुनव  चांदणं सखे तुझ्यात आहे

धुंडाळले जग ते क्षीतिज पल्याड

माझे क्षीतिज सखे तुझ्यात आहे

स्वप्नांचा फुलोरा असा  बहरत जावा

फुलांचे  बहरने सखे तुझ्यात आहे

मी कुठे उरतो सखे तुझ्याविना

जे माझे आहे सखे  तुझ्यात आहे

रात्रंदिन असतो मला तुझाच ध्यास

माझा सारा प्रवास सखे तुझ्यात आहे

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #217 ☆ तुझ्यासारखा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 217 ?

तुझ्यासारखा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कधी वागतो अवखळ वारा तुझ्यासारखा

वादळ होता करतो मारा तुझ्यासारखा

अंधारी ती रात्र छळाया मला लागली

कुठेच नव्हता प्रसन्न तारा तुझ्यासारखा

अवकाळीच्या वर्षावाने चिंब नहाते

देतच नाही तो गुंगारा तुझ्यासारखा

काय शिकवले सांगशील का वाऱ्या त्याला

त्यानेही केला पोबारा तुझ्यासारखा

मी माहेरी आले आहे तुला सोडुनी

अन् बापाचा चढला पारा तुझ्यासारखा

कष्ट सोसुनी घास आणतो अमुच्यासाठी

गोड वाटतो बाबा चारा तुझ्यासारखा

आश्रमातला मनुष्य होता मला भेटला

वाटत होता तो म्हातारा तुझ्यासारखा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिशिर प्रारंभ… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शिशिर प्रारंभ… ☆ श्रीशैल चौगुले ☆

शिशिर प्रारंभ,शिशिर प्रारंभ

सृष्टीपुलकित  हिमवर्षा कुंभ.

टवटवीत जीव फुल पर्ण पक्षी

ऋतूप्रफुल्ल पर्ण गळ नव साक्षी.

स्पर्श हेवा धरा मृदेस,सूर्य ठेवा

ऊबदार कव अग्निचा वाटे दुवा.

धुके शृंगार हरित दवल काया

जन मन तन पुजा शिशीरी माया.

भृंगर नाद,गंध आल्हाद कोमल

धुंद मस्त वायू कृष्णबासरी चल.

वासर अस्त,चांदणे बहर सोहळा

नभी तेज साजेसा मुखचंद्रकोवळा.

ऐसा शिशिर चाले ऐटीत, हर्ष लुटीत

स्वागता पर्वत वृक्षलता प्रेमल पटीत.

नवा-नवा,शिरशिरी गारवा हवा तरुणा

अंतरी चंचल सहवास स्वप्नांकी कामना.

शिशिर प्रारंभ,शिशीर प्रारंभ

हलकासा शिडकावा हिमकुंभ.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बिचारा माऊस ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– बिचारा माऊस – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

कॅमेरा समोर नाचावे,

प्रत्येकाला आगळी हौस |

अपवाद नाही त्याला,

काय करेल बिचारा माऊस |

एक फोटो काढून घ्यावा,

उंदराने केला विचार छान |

फोटो स्टुडीओत घुसला,

बोकोबाचेच होते ते दुकान |

बोकोबा हसून म्हणाला,

उंदीरराव छान द्या स्माईल |

थोडया वेळात तुमचे,

छान स्मारक इथेच होईल |

उंदीर आणि मांजराचे,

दिसायला जरी आहे हे चित्र |

त्यातला उंदीर आपण,

टपलेला काळ बोका विचित्र |

धोक्याच्या ठिकाणी,

सेल्फी काढण्याचा आवरेना मोह |

काळ रुपी बोका,

क्षणात फस्त करून टाकतो देह |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाताळ विशेष – मृत्युंजयाची कविता… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

? कवितेचा उत्सव ?

☆ नाताळ विशेष – मृत्युंजयाची कविता…🎄⛄🌈 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

त्याची काय चूक होती?

की,

लाकडांना बांधून त्याला

खिळे ठोकले त्यांनी.

पण ,

त्यांचे पाप स्वतःच्या शीरावर घेऊन,

येशू –

मृत्युंजय झाला.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक 

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रास… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ रास☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(आनंदकंद)

भाऊक प्रेमिकाला उरणार आस नाही

या कागदी फुलांना मदधुंद वास नाही

माणूस स्वाभिमानी नसतो परावलंबी

लाचार होत कोठे खाणार घास नाही

स्वातंत्र्य प्रेम ज्याला निर्धास्त तोच होतो

तो ही कधी कुणाचा होणार दास नाही

बाजार भोवतीचा भलता भणंग झाला

जगण्यास आज कोठे कसलाच ध्यास नाही

झाल्या प्रदूषणाने जेरीस जीव आला

वारा निकोप येथे घेण्यास श्वास नाही

 विपरीत काळ झाला खोट्यास  मोल आले

सत्तेत हेच आहे नुसताच भास नाही

कृष्णास आज राधा शोधून सापडेना

वृंदावनात आता घडणार रास नाही

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares