मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा– ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – 🇮🇳 अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा 🇮🇳 –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

अमृत महोत्सव सोहळा स्वातंत्र्याचा

राष्ट्रध्वजाचे जाहले आरोहण

आदराने गाऊ राष्ट्रगीताचे गायन

स्मरुनी वीरांनी अर्पियले स्वःप्राण..

आकाशात लहरतो तिरंगा

देशाचा असे गर्व अन शान

देशधर्म निभावूनी चालू सारे

व्यर्थ न व्हावे त्यांचे बलिदान..

घेरले कितीदा देशास आपुल्या

अघोर आपदा,बेबंध संकटांनी

लावियले प्राण पणास वीरांनी

बाजी शर्थ अन हिम्मत दावूनी..

पंच्याहत्तर वर्षांचा काळ लोटला

स्वातंत्र्य मिळूनी भारताला

उगा जात धर्म भेद लोढण्याने

नका गमवू हो स्वारस्याला..

उत्साहात उत्सवाप्रती साजरा

असे देशाचा हा मंगलदिन

आठवूनी देशभक्तांचे समर्पण

तिरंग्यास करूया सादर वंदन..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

ठाणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श र णा ग त ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 श र णा ग त ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

धून ऐकून बासरीची

होई घालमेल राधेची,

नकळत पाऊले तिची

वाट चालती वनीची !

 

वाटेत थबके राधा

बघून पावलांचे ठसे,

शंका होणार खरी

मनोमनी तिज भासे !

 

तरुखाली बैसली मीरा

हाती धरून एकतारी,

उभा राहून सामोरी

पावा वाजवी श्रीहरी !

 

पाहून दृष्य समोरचे

मनात असूया दाटे,

घेतला हक्क हिरावून

उगा राधेला मनी वाटे !

 

मनीचे ओळखून भाव

सांगे राधेला तो मुरारी,

मज समान सारे भक्त

मी, भेदभाव न￰ करी !

 

मनात होऊन खजील

राधा धरी हरीचे चरण,

म्हणे, चुकले माझे वेडीचे

आले तुजला मी शरण !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 116 – दिलदार मित्र ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 116 – दिलदार मित्र ☆

दिलदार मित्र माझा

लाख काढतो रे खोडी।

तुझ्या छेडण्याने गड्या

वाढे जीवनाची गोडी।

 

चिमणीच्या दाताची ती

अशी अवीट माधुरी ।

तिच्यापुढे फिकी होती

पंच पक्वान्नेही सारी।

 

तुझा प्रेमळ कटाक्ष

देई लढण्यास धीर।

कौतुकाच्या थापेला रे

मन आजही अधीर।

 

शब्दाविना कळे तुला

व्यथा माझिया मनाची।

हृदयीच्या बंधानाला

भाषा लागेना जनाची।

 

जीवनाच्या वाळवंटी

तुझ्या मैत्रीचा ओलावा।

लाख मोल सोडूनिया

शब्द सख्याचा तोलावा।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावणाचे तोरण !… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावणाचे तोरण ! ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

भारतीय वर्षाच्या दारी

श्रावण बांधतो तोरण

प्रत्येक दिवस ठरतो

कौतुकाचाच सण !…

नागपंचमीचा दिवस

माहेरवाशिणीचा खास

बळीराजाचा मित्र नाग

बंधू तिचाच होतो…!

सजते नारळी पौर्णिमा

बहीणभावाच्या प्रेमाने

घट्ट होतात त्यांची नाती

राखीच्या धाग्याने…!

संपविण्या दुष्ट शक्ती

कृष्ण जन्मतो याच मासी

राधाकृष्णाच्या प्रेमासी

सागराची भरती..!

गोपाळकाल्याचा दिस

 बांधतो सख्य मित्रत्वाचे

कृष्णसुदाम्याचे मैत्रच 

ठरले जगावेगळे…!

सप्ताहाचे सात वार

उलगडती सणांचे पदर

भारतीय संस्कृतीच्या

आदर्शांची…!

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #138 ☆ साद…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 138 – विजय साहित्य ?

☆ साद…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

हळू हलवा पाळणा

साद घाली गं बासरी

आली कृष्णाची अष्टमी

छबी कान्हाची हासरी….! १

 

साद घालते गोकुळ

आली यमुना डोळ्यात

सजे पाळणा कान्हाचा

कान्हा दंगला मेळ्यात…! २

 

साद घालितो हा  कान्हा

मित्रा ,  ये रे बा ,सुदामा…..

अंतर्यामी या  गोकुळी

सार मैत्रीचे सुदामा ……! ३

 

साद घालितो हा  कान्हा

गोकुळच्या गोपसुता

दहीहंडी,  दहीकाला

पाझरते शब्दसुता.. . . ! ४

 

साद घालितो हा  कान्हा

रंगे उत्सव  अंतरी

गोविंदाची दहिहंडी

मना मनाच्या संकरी. . . . ! ५

 

साद घालितो हा  कान्हा

वारा श्रावण दारात

आला आनंद पाहुणा

सण सौख्याचा श्वासात. . . . ! ६

 

 नाम राधा माधव  हे

ध्यास  अंतरी प्रेमाचा

भाव भक्तीच्या मिलनी

नाद संयमी स्नेहाचा. . . ! ७

 

साद घालितो हा  कान्हा

संकीर्तन हे प्रितीचे

मैत्र रूजले अंतरी

वेणू वादन भक्तीचे. . . . . ! ८

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

१८/८/२०२२

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आजची परिस्थिती… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ आजची परिस्थिती… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

निवडणुकीपर्यंत रोज  तेच ते … 

रोजची भाषणं , रोजची आश्वासनं 

तोच अत्याचार, नेहमीचा भ्रष्टाचार 

माझा तो बाबू, दुसऱ्याचा तो बाब्या 

मी आहे साधा, दुसरा तो सोद्या —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

नेहमीचे रस्ते, मोठाले खड्डे 

तुफान पाऊस, तुंबलेले पाणी 

संपावर कामगार, कचऱ्यांचे आगार 

आजारांना आमंत्रण, औषधांची वणवण —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

स्वतःची कमाई, दुसऱ्याची भरपाई 

खरे गुन्हेगार, खोटे साक्षीदार 

मोठी आशा, छोटी मदत 

नोकरीची कमी, बेकारीची हमी —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

माझे ते कायदेशीर, तुझे ते बेकायदा 

माझे ते खरे, तुझ्या त्या थापा 

मी प्रामाणिक, दुसरा मात्र चीटर 

माझी समाजसेवा, तुझे ते राजकारण—- 

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

मंदिर मस्जिद वाद, धर्म सगळ्या आड 

पाण्याची कमतरता, योजनांचा भडीमार 

सरकारी मदत, हातात नाही पडत 

महागाईचा भस्मासूर, संप मोर्चांचा आसूड —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते…..

आमचे ते आमदार, फुटले ते गद्दार

करोडोची कमाई, ईडीची कारवाई 

सरकारी घोटाळे, मतदारांचे वाटोळे 

बातम्यांची वटवट, जनतेला कटकट 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते …..

 

निवडणुकीनंतरही रोज तेच ते …..

तेच ते —–

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

१०-०७-२०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साजरा श्रावण ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ साजरा श्रावण ☘️ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

   आभाळाच्या मंडपात

   मेघ गातसे मल्हार

    थेंबा थेंबानी ओविले

     शुभ्र मौक्तिकांचे हार….💦💦

 

      हळदुल्या उन्हाच्या या

       पावसात येरझारा

        ऊनं पावसाचा खेळ

         असा श्रावण साजरा..🌦️

 

         ओल्या चिंब पावसाला

          येई प्राजक्ताचा गंध

         जाई -जुई -चमेलीही

         झुलतात मंद मंद…🌼

 

         सोनसळी किरणांनी. 

         इंद्रधनु रेखाटले

         नभं गळता गळता

         मनं माझे आभाळले…🌈

 

          आठवांच्या शिंपल्यात

           झुले माहेरचा झुला

            त्या आनंद क्षणांचा

            असे पाऊस आगळा…😢

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #122 – गेली कित्येक वर्षी… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 122 – गेली कित्येक वर्षी…… ☆

शहरात गेल्यापासून

तुम्ही पार विसरून गेलात मला..,

आज इतक्या वर्षानंतर

तुम्ही मला घर म्हणत असाल की नाही

ठाऊक नाही…

पण मी अजूनही सभांळून

ठेवलंय..,घराच घरपण

तुम्ही जस सोडून गेलात तसंच

गेल्या कित्येक वर्षीत

अनेक उन पावसाळ्यात

मी तग धरून उभा राहतोय

कसाबसा…. तुमच्या शिवाय…

रोज न चुकता तुमच्या सर्वांची

आठवण येते …

पण खर सांगू आता नाही

सहन होत हे ऊन वा-याचे घाव …

माझ्या छप्परांनी ही आता माझी साथ

सोडायचा निर्णय घेतलाय…

माझा दरवाजा तर तुमची वाट पाहून पाहून

कधीच माझा हात सोडून

निखळून पडलाय….

माझ्या समोरच अंगण तुळशीव्दावन

सगळच कसं दिसेनास झालंय आता…

माझ्या भिंतीनी माझा श्वास

मोकळा करून देण्या आधी

एकदा तरी फक्त एकदा तरी ….

मला भेटायला याल अशी आशा आहे…

तूमचं घर तुमची वाट पाहतय…

गेली कित्येक वर्षी…

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – हर घर तिरंगा – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – हर घर तिरंगा   ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

हर घर तिरंगा

केवढी संधी

केवढा मान

मोठीच शान —

खोचला पदर

कसली कंबर

कासोटा घट्ट 

मनात आदर —

मजबूत  हात 

भक्कम  साथ

 वर मान  ताठ

 ध्वजाला हात —

अशा हातांनी

ध्वजारोहण 

अमृतमहोत्सव 

 रास्त  कारण —

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सारे मिळूनी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

 

? कवितेचा उत्सव ?

☆ सारे मिळूनी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

जात-पात लिंगभेद संपवूनी । समतेची छान गोधडी शिवू

चला आपण सारे मिळूनी, समतेचे नवे गाणे गाऊ !

 

नव्या उमेदीचे । नव्या तंत्रज्ञानाचे,

तुझ्या-माझ्या स्वप्नातील । सुराज्याचे गाणे गाऊ !

 

विरहाचे, दुःखाचे । आनंदमय क्षणांचे,

तुझ्या माझ्या कल्पनेतील ।  सुखाचे गाणे गाऊ…

 

श्रमणाऱ्या  हातांचे । शिकणाऱ्या  मुलांमुलींचे

तुझ्या माझ्या हातातील । नव्या कौशल्याचे गाणे गाऊ !

 

सीमेवर लढणाऱ्यांचे । मांडीवर जोजवणाऱ्यांचे,

तुझ्या माझ्या मनातील । संवेदनांचे गाणे गाऊ !

 

तिमिर दूर करणाऱ्यांचे । लख्ख प्रकाश किरणांचे,

तुझ्या माझ्या जाणिवेतील । विवेकाचे गाणे गाऊ..!

 

हृदयाच्या स्पंदनाचे । नीती मुल्यांच्या जोपासनांचे,

तुझ्या माझ्या काळजातील । जिव्हाळ्याचे गाणे गाऊ..!

 

बंधू-भावाचे, प्रेमाचे । न्यायाचे, वैश्वीक नात्याचे,

तुझ्या माझ्या अभिमानाचे । लोकशाहीचे गाणे गाऊ !

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print