मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राधेमन…. ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ राधेमन…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

(छंदवृत्तः स्त्रग्विनी)

मोर माझ्या मनी नाचता लाज ही

श्रीकृष्णाची जिवा ओढ जी आज ही.

 

बासरी ऐकता यमुन काठावरी

भानही हरपले विसरुनी साजही.

 

सांज ही दाटली मन कसे धुंदले

धावले मीच वृंदावनात गुजही.

 

राधिका भाबडी वेड का शामचे

रासलीला कि प्रेमभक्तभावन सई.

 

अंतरी नाम ध्यास मुरली धरल हा

तोच सावळ नटखट कृष्ण जो देवही.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सूर ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

सूर… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

आता नाय, मग नाय

असं म्हणून चालेल काय ?

 

खर काय? खोटं काय ?

बोलून एकदा टाक बाय

 

ओढी पाय ,होतं काय

दुसरं आम्हा येतंय काय?

 

याला फसव, त्याला फसव

याच्या शिवाय केलंय काय?

 

करी चाडी, भरी माडी

न भरणारी झाली वेडी

 

सत्यालाच डांबर पुस

खोटी फुस घरात घूस

 

माणूस कात्रून केल्या चिंध्या

झाडाच्याही खाल्ल्या फांद्या

 

बदनाम करुन पार बेडा

असत्याच्या तोंडात पेढा

 

याला पिडा, त्याला पिडा

खात फिरे पान विडा

 

रस्ता झाला पीकदाणी

अभद्र बोले याची वाणी

 

इथं फेक, तिथं फेक

वाढ दिनी मोठा केक

 

शब्दात धार करी गार

याच्याच गळ्यात घाली हार

 

सगळेच म्हणे चूक चूक

शहाणा आता झाला मुक

 

इथं पार्टी, तिथं पार्टी

वेडी झाली सारी कार्टी

 

दारु पूर, सोडी घुर

शहाणाही पळे दूर

 

मारून ठोसा, बदला नुर

सत्याचा ऐकू येईल सूर

 

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वेड…. ☆ श्री राजकुमार कवठेकर

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वेड…. ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

तुझ्या प्रीतीमुळे हेही, घडाया लागले आता

मला ही प्रेम गे माझे, मिळाया लागले आता

 

कसे या  वेड पाचोळ्यास लागे र्भिभिरायाचे

मनी ते वादळांसाठी झुराया लागले आता

 

मला ग्रीष्मातही या पावसाने चिंबसे केले

तुझे ते भेटणे जेंव्हा, स्मराया लागले आता

 

तुझ्याशी बोलताना शब्द जेंव्हा टाळले काही

कळाले वेगळे नाते,  जडाया लागले आता

 

जरा मागीतला होता, उठाया हात मी त्यांचा

कडेने ओळखीचेही, पळाया लागले आता

 

जगाची रीत ‘ही ‘जेंव्हा, आचरू लागलो मीही

जगाशी याच माझेही, जमाया लागले आता

 

लपायाच्या दडायाच्या जश्या का पाडल्या भींती

पणानी प्राण हे माझे, लढाया लागले आता

 

कुणाचे कोणही नाही, स्मशानी हे कळू येते

शवानी पेट घेता ‘ते’, वळाया लागले आता

 

रडायाचा जुना त्यांचा, असे रे शौक बाजारू

सुखांनी नाहताना ते, कण्हाया लागले आता

 

जरी ना माणसांना या, यशाची कौतुके माझ्या

तरूंचे चौघडे रानी, झडाया लागले आता

                  ***

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 81 – वीण ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 81 – वीण ☆

संसाराची वीण अचानक, उसवत गेली।

आयुष्याची घडी अनोखी, चकवत गेली।

 

गोड गुलाबी स्वप्न मनोहर, तुझेच  सखये।

अर्ध्यावरती डाव असा का, उधळत गेली।

 

घरट्यामधली पिले गोड ही, किलबिलणारी।

पंखामधली ऊब तयांच्या, हरवत गेली।

 

काळासंगे झुंज देत ही, घुटमळणारी।

ओढ लावूनी छबी तुझी ग, रडवत गेली।

 

देऊ कसा ग निरोप तुजला, आज साजणी।

मनी वेदना पुन्हा पुन्हा ती,  उसळत गेली।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆- मोगरा – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ मोगरा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

मोग-याची चार फुले

तुला देण्यासाठी आलो

धुंद तुझ्या सहवासे

सारे काही विसरलो

 

फुले तशीच खिशात

जरी गेली कोमेजून

तुझ्या कालच्या भेटीत

गंधारले माझे मन.

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मुक्तिसूक्त.. ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ मुक्तिसूक्त.. ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

घमघमले हे कुठून अत्तर

कुठून आला गंध चंदनी

सडा अंगणी स्फटिकशुभ्रसा

शिंपित आली कोण चांदणी ?

 

दूर राउळी घणघण घंटा

नाद निनादे चराचरातुन

पार दिशांच्या आर्त प्रार्थना

भिजवी मजला कवेत घेवुन !

कशा अचानक पेटुन उठल्या

मिणमिण पणत्या नक्षत्रांसम

रुजले कंठी अभाळगाणे

दिव्य सुरांची रिमझिम रिमझिम !

 

अगम्य भवती धुके दाटले

धरा कोणती,कुठले अंबर ?

शोधित होतो ज्या सत्याला

स्वप्नाहुन ते दिसले सुंदर !

खळखळ तुटल्या कशा शृंखला

मुक्तिसूक्त ये अवचित कंठी

पल्याड माझ्या मीच पोचलो

सात सागरा माझ्या भरती !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 101 – वचन…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 101 – विजय साहित्य ?

☆ वचन…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

प्रेम प्रितीचे बंध रेशमी नवे

नाते अक्षय फुलवायाला हवे.

 

विश्वासाचे वचन मागतो आता

हात मदतीचा देतो येता जाता .

 

संसाराच्या पानांवरती वचने

सहजीवनाची गाथा प्रवचने.

 

शब्द वचनी करार होतो जेव्हा

जातो होऊन परस्परांचे तेव्हा .

 

रामायण घडले वचनांसाठी

वनवास ते भोगले आप्तांपोटी

 

माया ममता ही विश्वासाची लेणी

हळवेली ही अंतरातली देणी.

 

जगण्याचा आधार ठरे कविता

वचनात प्रीतीच्या माझी वनिता.

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अखेरचा मुजरा…. ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ अखेरचा मुजरा…. ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र अभिवादन.

इतिहासाच्या वाटेवरचा

देखणा प्रवास सरला

शिवधर्माचा सच्चा उपासक

शिवतेजात विलीन झाला  ||

 

कित्येक दशके तळपली

ज्यांच्या वाणीची तलवार

शिवरायांची कथा मांडली

तेजस्विता जिची अपरंपार ||

 

असंख्य शब्दोत्सवातूनी

शिवप्रेमाचे बीज रुजविले

शिवतेजाची ओढ लावुनी

शौर्य स्फूर्तीचे वेड लाविले ||

 

‘जाणता राजा’ महानाट्यातून

साक्षात शिवशाही उभी केली

त्या दैदिप्यमान पर्वाची धग

असंख्यांनी अनुभवली ||

 

त्या वाणीला विराम मिळता

शिवकथा आज मूक झाली

शिवशाहीर बाबासाहेबांना

विनम्र आदरांजली !! ?

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इथेच आणि या बांधावर☆ “काव्यतीर्थ” कवी सुधांशु

? कवितेचा उत्सव ?

☆ इथेच आणि या बांधावर☆ “काव्यतीर्थ” कवी सुधांशु ☆ 

इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ

सख्या रे, किती रंगला खेळ !

 

शांत धरित्री शांत सरोवर

पवन झुळझुळे शीतल सुंदर

अबोल अस्फुट दोन जिवांचा अवचित जमला मेळ.

 

रातराणीचा गंध दरवळे

धुंद काहीसे  आतून उसळे

चंद्र हासला,लवली खाली नक्षत्रांची वेल.

 

पहाटच्या त्या दवात भिजुनी

विरली हळुहळु सुंदर रजनी

स्वप्नसुमांवर अजुनी तरंगे ती सोन्याची वेळ.

 

– “काव्यतीर्थ” कवी सुधांशु

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 87 – आई..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #87 ☆ 

☆ आई..!☆

माझ्यासाठी किती राबते माझी आई

जगण्याचे मज धडे शिकवते माझी आई

तिची कविता मला कधी ही जमली नाही

अक्षरांची ही ओळख बनते माझी आई…!

 

अंधाराचा उजेड बनते माझी आई

दु:खाला ही सुखात ठेवे माझी आई

कित्तेक आले वादळ वारे हरली नाही

सूर्या चा ही प्रकाश बनते माझी आई…!

 

देवा समान मला भासते माझी आई

स्वप्नांना ही पंख लावते माझी आई

किती लिहते किती पुसते आयुष्याला

परिस्थिती ला सहज हरवते माझी आई…!

 

ठेच लागता धावत येते माझी आई

जखमेवरची हळवी फुंकर माझी आई

तिच्या मनाचे दुःख कुणाला दिसले नाही

सहजच हसते कधी न रडते माझी आई…!

 

अथांग सागर अथांग ममता माझी आई

मंदिरातली आहे समई माझी आई

माझी आई मज अजूनही कळली नाही

रोज नव्याने मला भेटते माझी आई…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares