मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाल कामगार! ☆ श्री मुबारक बाबू उमराणी

श्री मुबारक बाबू उमराणी

शिक्षा – एम.ए.बी एड्.बी.लिब .

लेखन – कविता लेखन, कथाव इतर.-दिवाळी अंक, प्रातिनिधिक संग्रह.

पुरस्कार/अलंकरण – (1) निसर्ग मित्र शिक्षक पुरस्कार-०१० (2) रविकिरण सेवाश्री पुरस्कार–२०११ (3) युवाशक्ति सामाजिक संस्था नाशिक. आदर्श शिक्षक पुरस्कार-२०११ (4) सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल, आदर्श शिक्षक पुरस्कार-२०११ (5) महाराष्ट हरितसेना सदस्य-२०१७ (6) समीक्षक. म्हणून. म.रा मा.उच्च.मा. शिक्षण  मंडळ,पुणे,५. इ.१०वी साठी (7) ग्रीन ओलम्पियाड परीक्षा उत्तम नियोजक म्हणून सन्मानित (नवी दिल्ली)-२०१७ (8) स्वाध्याय पुस्तक लेखन इ.१०वी.पुणे बोर्ड (9) राज्यस्तरिय ,जिल्हास्तरिय तज्ज्ञ मार्गदर्शक मराठी विषय (10) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली,वेस्ट कल्चरल झोन आयोजित सांगली निर्मितीक्षम नाट्य प्रशिक्षण (11) नेपथ्य आणि प्रकाश योजना, कार्यशाळा उपस्थित, अखिल भारतीय नाट्यशास्त्र विद्यामंदिर समिती, सांगली-२००६ (12) समाजरत्न साहित्य पुरस्कार-२०१८ सम्राट फौडेशन, सांगली (13) उत्कृष्ट काव्य लेखन,रंगीत काव्यधारा साहित्य मंच, वासिम-२०१८ (14) साहित्यसेवा साहित्य समुहातर्फे लीनाक्षरी पुरस्कार व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक, माहूरगड, नांदेड-२०१९ (15) कविभूषण पुरस्कार, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव २०१९, नांदेड (16) अनेक काव्य स्पर्धेत परीक्षक (17) अर्धांगी कविता संग्रहासाठी प्रस्तावना लेखन (18)काव्यस्पंदन संस्थेचा महाराष्ट्र भूषण,नवरत्न पुरस्कार पुणे

☆ कवितेचा उत्सव ☆ बाल कामगार! ☆ श्री मुबारक बाबू उमराणी ☆ 

भूक अंगार होऊन रोज पेटे

उभं आयु काजळी धुराडी वाटे

 

कळ सोसेना भुकेची आग घरा

बाप व्यसनी पडला पहा धरा

 

आई धुणे भांडी दिसभर करी

ओढे संसार गाडा ती आसूभरी

 

जन्मे यातुनच बालकामगार

हातभारासाठी काय करणार ?

 

दुर्दैवच जगी  भयान अंधार

दूर दूर जाई शिक्षण भांडार

 

कमी पगारात राबवी मालक

मोडू प्रथा चला जागवू पालक

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 64 ☆ सुगंधाचा तोरा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “सुगंधाचा तोरा।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 64 ☆

☆ सुगंधाचा तोरा 

 

साऱ्या फुलात वेगळी

छान भासते ही कळी

दुमड ही पाकळीची

जशी गालावर खळी

 

तिच्या सुगंधाचा तोरा

होता भाळलेला वारा

दोष फक्त त्याचा नाही

तीही पडेते ना गळी

 

कधी वेणी कधी हार

फूल दोरा झाले यार

जीव जीवात गुंतता

हळू उमलते कळी

 

पाकळीचे हे पदर

जसे मोकळे अधर

माशा घोंगावत आल्या

डंख दिला होता भाळी

 

आली वादळी वरात

होती कळी ही भरात

सुन्या सुन्या या बागेचा

हिरमुसलेला माळी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रूबाया ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ ☆ रूबाया ☆☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

 

संघर्ष जयांची वाणी ते बंद जाहले ओठ

सत्तेची मिळता उब का सुटते यांचे पोट ….1

 

अस्वस्थ मनाचे क्रंदन ना कधी कुणाला कळले

न्यायाच्या शोधासाठी अन्याय साहूनी जगले ….2

 

रंक असो वा राजा भय सुटले नाही त्याला

जो तो रिचवत गेला नशिबाचा जहरी प्याला ….3

 

जे होऊन गेले थोर त्यांची कवने गाऊन झाली

आचरण्या त्यांचे काही पण वेळ कुणा ना जमली ….4

 

मामला असे चोरीचा भय उरले नाही कोणा

अंधार व्यापतो जगता झाला प्रकाश केविलवाणा ….5

 

सत्तेचा चाबूक दिसता सत्यास कापरे भरते

पाहूनी आंधळा न्याय गुन्ह्यास बाळसे धरते ….6

 

हे म्हणती नाही केली ते म्हणती नाही केली

मज सांगा मग कोणी ही भ्रष्ट व्यवस्था केली ….7

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लुब्ध होई धरा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ कवितेचा उत्सव ☆ लुब्ध होई धरा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

 

विष्णुकांती नभा, लुब्ध होई धरा

साठवे मृत्तिका, हर्ष तो बावरा

लुब्ध होई धरा…

 

स्पर्श नाजूकसा, थेंबधी झेलता

शिर्शिरी सृष्टिला, पावसा तोलता

गंधवा~यासही नाद ये मदभरा

लुब्ध होई धरा…

 

मेघ वर्षावती श्वास ओथंबले

वल्लरी वृक्षही भारले, गंधले

आगळे तेज ये शुभ्रशा निर्झरा

लुब्ध होई धरा…

 

सप्तरंगी झुला इंद्रधनु बांधतो

सोहळा देखणा पंख फ़ैलावतो

मीलनातूरसे रूप ये अंबरा

लुब्ध होई धरा…

 

चेतना अमृती जीवनी जागते

धुंद आलिंगनी नभ-धरा गुंगते

गर्भ मातीतला अंकुरे साजिरा

लुब्ध होई धरा…

 

गर्द हिरवा ऋतू ,सृष्टि नादावते

रोमरोमी तिच्या सौख्य रेंगाळते

तृप्ततेच्या नभी घन खुले हासरा

लुब्ध होई धरा…

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 15 ☆ निंदक… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी)  मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “निंदक … )

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 15 ☆ 

☆ निंदक … ☆

 

निंदका वंदावे, निंदका गुणावे

नेहमी निंदका, सन्मानित करावे

 

निंदक आहेत म्हणून,

आपण वंदक होतो

निंदक आहेत म्हणून,

आपण घडत असतो

 

असे हे निंदक नेहमी,

आपल्या पाळतीवर असावेत

असे हे निंदक नेहमी ,

आपल्या शेजारीच रहावेत

 

ते असतील शेजारी,

कृती आपली श्रेष्ठ होईल

ते असतील जवळपास

वर्तन आपोआप सुधारेल

 

झाडाची छाटणी केली,

झाड मस्त फोफावते

निंदनीय कृत्यापुढे,

वंदनीय कार्य बळावते

 

अश्या ह्या माझ्या चालू जीवनात

जे आलेत प्रत्यक्षात, अप्रत्यक्षात

 

त्या सर्व निंदकाचे मी,

आभारच मानतो

त्या सर्व निंदका मी,

असाच साथ द्या म्हणतो

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन

वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तो कोण ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ तो कोण ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ 

या फुलांना या धरेला

गंध तोची कोण देतो

तो अनादी सर्वसाक्षी

ईश सकला व्यापितो

तरुही बोले,पर्ण बोले

नाद तो झंकारतो

कोण स्पर्शे,तरल तनुला

त्या करांनी सुखवितो

झोपलेल्या त्या मुकुला

गुज स्वप्नी सांगतो

दिवस येता,मुग्ध रूपा

कोण तोची हसवितो

प्राणीमात्रा रूप द्याया

सृष्टीकर्मा जागतो

आस जैसी,फलित तैसे

सत्य हे साकारतो.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर.

भ्र. 9552448461

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दरवळ ☆ सुश्री निलांबरी शिर्के

☆ कवितेचा उत्सव ☆ दरवळ ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆ 

डोक्यावर जडभार

कडेवर छोटे पोर

पावलाच्यापुढे

साऱ्या आयुष्याचा घोर

 

कडेवरच लेकरू

उद्या चालाया लागेल

शिरावरचाही भार

जरा हलका होईल

 

उरातील स्वप्ने सारी

माझ्या बाळात पहाते

तळपायीच्या काट्यांची

मज जाणीव ना होते

 

आज देह कष्टविते

पोटच्या या गोळ्यासाठी

तोच होऊनीया मोठा

माझ्या आधाराची काठी

 

सुशिक्षित लेकराची

स्वप्ने कष्टात पहाते

स्वप्नपुर्ततेचे हासु

मुखी सदा विलसते

 

हेच ध्येय जगताना

सारी संपेल ही वाट

माझी अन लेकराची

नवी जन्मेल पहाट

 

त्या सोनेरी प्रकाशी

सारे जाई उजळून

जगण्यातील कष्ट सारे

स्वाभिमाने ये फुलुन

 

स्वाभिमानाच्या फुलांचा

चिरंतन दरवळ

आयुष्याचा सुख झरा

वाहणार झुळझुळ

 

© सुश्री निलांबरी शिर्के

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझं जगणं ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

 ☆ कवितेचा उत्सव ☆ माझं जगणं ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

 

पापभीरू मी

 

स्वत:च्या सावलीला घाबरतो

पण पायरी धरून जगतो

 

अर्धा भाकरीत चंद्र शोधतो

तृप्तीने ढेकर देतो

 

जर कधी गजरा आणला

जाऊन येतो मनाने काश्मिरला

 

हक्काच्या छप्परासाठी झिजतो

कर्जाच्या वेताळाला पाठीवर घेतो

 

रोजच्या जगण्याला भिडतो

समाधानाची फोडणी देतो

 

मुलांसोबत गोकुळात रमतो

जन्मदात्याच्या सेवेत

विठूरुखुमाई  शोधतो

 

आणि

 

सुखाच्या कल्पनेला

मोत्यांची झालर लावून

दाराला तोरण बांधतो

घराला घरपण देत

माझं जगणं जगतो

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य – मी….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है एक भावप्रवण कविता  “मी….!” )

☆ विजय साहित्य – मी….! ☆

मी….!

हरवतोय मी… की गवसतोय मी..

परीचितांना अपरीचित आणि

अपरिचितांना परीचित वाटतोय मी.

अविश्वासात विश्वास आणि

निस्वार्थात स्वार्थ गोवतोय मी

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

पुस्तकातले कुटुंब, समाज

त्यांच्यातच रमतोय मी.

माणूस माणूस जोडलेला

पुन्हा पुन्हा वाचतोय मी

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

गणिताची आकडेमोड

आकडेवारीत विस्तारतोय मी

माझ्याच गरजा, नी जबाबदा-या

कार्य कारण भाव निस्तरतोय मी.

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

चालतोय मी , थांबतोय मी

माझ्यातल्या मीला शोधतोय मी

लिहितोय मी, वाचतोय मी

विस्तारीत जगणे , आवरतोय मी.

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

कुणाच्या जमेत , कुणाच्या खर्चात

क्षणा क्षणाला साचतोय मी

ऊन्हातला मी, सावलीतला मी

चक्रवाढ व्याजात नाचतोय मी.

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

चुकतोय मी , मुकतोय मी

संसार नावेत, डुलतोय मी

कधी काट्यात , कधी वाट्यात

जीवन बाजारात , भुलतोय मी.

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

कधी भूतकाळात तर कधी

वर्तमानात जगतोय मी

अनुभूती वेचताना थकलो तर

तुझ्याच अंतरात वसतोय मी.

हरवतोय मी… की गवसतोय मी..!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 6 – कविता ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 6 ☆

☆ कविता ☆

 

आपण समजतो तेवढी सोपी नसते कविता

भावनांचा उद्रेक होतो तेव्हा जन्म घेते कविता

तुम्ही नाहीयेत तिचे जन्मदाते बाबांनो

उलट तिच्यामुळे तुमचा होतो जन्म  कवी म्हणून मित्रांनो

कविता म्हणजे असतं एखाद्याचं जिवंतपणे जळणं

कविता म्हणजे काळजातला खंजीर स्वतः ओढून मरणं

कविता असते बाणासारखी रुतणारी

छातीत घुसून पाठीतून आरपार निघणारी

कविता म्हणजे पायातला न दिसणारा काटा

कविता म्हणजे भावनांना हजार लाख वाटा

कविता म्हणजे असतो काळजावरचा घाव

कविता म्हणजे असतो एक मोडुन पडलेला डाव

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

17/05/20

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print