डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ नववर्ष सदिच्छा ! डॉ.सोनिया कस्तुरे ☆
नववर्षात सर्वांना आरोग्य लाभावे
कष्टकरी शेतकरी मजूरांना न्याय मिळावे
मालकीहक्क,लाचारी,गुलामी संपावी
अत्याचार, हिंसेला मुठमाती मिळावी.
चिंता,संताप , व्यसन, फसवणूक नसावी.
विश्वातील प्रत्येक व्यक्ती सुखाने नांदावी.
स्त्रीयांना जगण्याचे नवे बळ मिळावे.
गगनाला भेदण्याचे स्वातंत्र्य गवसावे.
अभिमान,स्वाभिमान,आत्मभान जागावे.
मानसिक,भावनिक, वैश्वीक नाते जडावे.
नवजात बाळाला विश्वास मिळावा.
वाढत्या वयाने आनंद साठवावा.
गोरगरीब,दीन,दुय्यम कुणी नसावे.
दोन वेळच्या जेवणाने तरी तृप्त व्हावे.
सत्याच्या वाटेवर सर्व काही असावे
शांततेच्या मार्गावर बुद्धत्व फुलावे.
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈