मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू एक ऋतूचक्र ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ तू एक ऋतूचक्र… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

देहात चैत्र सोळा, डोळ्यांत पावसाळा,

लाजेत लाजरा गे, तो थरथरे हिवाळा ||धृ||

 

ऋतुचक्र चालते हे, त्याला तुझा इशारा,

स्पर्शून वाहताना, गंधीत होई वारा,

तुज पाहूनी ऋतुंनी, हा चक्रनेम केला ||१||

 

धारेत श्रावणाच्या, तू नाहताच चिंब,

थेंबागणीक प्रगटे, शितोष्ण सूर्यबिंब,

बघता तुला तयाचा, तो दाह शांत झाला ||२||

 

पानाफुलात झुलती, वेल्हाळ हालचाली,

ती कृष्णरात्र गेली, लावूनी तीट गाली,

तारुण्य पेलवेना, बिंबातल्या नभाला ||३||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #127– रूपरेषा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 127 – विजय साहित्य ?

☆ रूपरेषा…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(गालगागा गालगागा, गालगागा,गालगा.)

जीवनाची रूपरेषा,घेतली उमजून  मी

भावनांची वेषभूषा, पाहिली बदलून मी…! १

 

काळजाची भावबोली,‌बोलली परतायचे

यातनांची नाच गाणी, साहिली उकलून मी..! २

 

या दिलाची बाग तीही, सारखी भुलवायची

यौवनाची प्रेमवाणी, ऐकली उमलून मी..! ३

 

चाळली मी , प्रेम पाने, घेतले वाचायला

जिंदगानी आठवांची, काढली नखलून मी…! ४

 

तापलेल्या वाळवंटी, का मने हरखायची ?

पाजले पाणी कुणी ना , बावडी समजून मी..! ५

 

चाललो चालीत माझ्या, संगतीला आप्त रे

चाल माझ्या सोयऱ्यांची , नेणली परजून ‌मी..! ६

 

लेखणीने आज माझ्या, अंतरी जपला वसा

अंतरीची भाव बोली , छेडली जुळवून मी..! ७

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सोनसळी बहावा…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ सोनसळी बहावा… ! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

एका  रात्री पाहिला बहावा,

चंद्र प्रकाशी बहरताना!

गुंतुन गेले हळवे मन माझे,

पिवळे झुंबर न्याहाळताना!

 

निळ्याशार नभिच्या छत्राखाली ,

लोलक पिवळे सोनसावळे!

हिरव्या पानी गुंतुन लोलक ,

सौंदर्य अधिकच खुलून आले!

 

शांत नीरव रात भासली,

जणू स्वप्नवत् स्वर्ग नगरी!

कधी न संपावे ते अपूर्व क्षण,

आस लागली मनास खरी!

 

फुलल्या बहाव्याच्या मिठीत,

सामावून अलगद जावे!

मृदू कोमल स्पर्शाने त्याच्या,

अंगोपागी बहरुन यावे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #111 – ती…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 111 – ती…! ☆

आजपर्यंत तिनं

बरंच काही साठवून ठेवलंय ..

ह्या… चार भिंतींच्या आत

जितकं ह्या चार भिंतींच्या आत

तितकंच मनातही…

कुणाला कळू नये म्हणून

ती घरातल्या वस्तूप्रमाणे

आवरून ठेवते…

मनातला राग..,चिडचिड,

अगदी तिच्या इच्छा सुध्दा..,

रोजच्या सारखाच

चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचा

खोटा मुखवटा लाउन

ती फिरत राहते

सा-या घरभर

कुणीतरी ह्या

आवरलेल्या घराचं

आणि आवरलेल्या मनाचं

कौतुक करावं

ह्या एकाच आशेवर…!

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझा गांव ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 माझा गांव ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

माझ्या गावच्या वेशीवर

सुंदर स्वागत कमान,

होते स्वागत पाहुण्यांचे

देऊन त्यांना योग्य मान !

 

माझ्या गावच्या वेशीवर

मंदिरी वसे ग्रामदेव

सांज सकाळ पूजा करी

आमच्या गावचा गुरव !

 

माझ्या गावच्या वेशीवर

दगडी कौलरू शाळा,

धोतर टोपीतले गुरुजी

लावती अभ्यासाचा लळा !

 

माझ्या गावच्या वेशीवर

मंदिरा जवळच तळे,

त्यात दंगा मस्ती करती

पोहतांना मुले बाळे !

 

माझ्या गावच्या वेशीवर

म्हादू पठ्य्याची तालीम,

गावचे होतकरू मल्ल

तालमीत गाळीती घाम !

 

माझ्या गावच्या वेशीवर

वडा भोवती मोठा पार,

गप्पा टप्पा करण्या सारे

सांजेला जमती त्यावर !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१८-०५-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 134 ☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 134 ?

☆ गझल… ☆

 चांगले आहे कुणाची भिस्त व्हावे

 आपल्या मस्तीत जगणे मस्त व्हावे

 

घातल्या आहेत कोणी या पथारी

मी कशासाठी इथे संन्यस्त व्हावे

 

 मागण्या आहेत ज्या त्या माग राजा

राज्य कोणाचे कसे उद्ध्वस्त व्हावे

 

 पांगले आहेत येथे कळप सारे

 विश्व त्यांचे का बरे बंदिस्त व्हावे

 

 शिस्त त्यांनी लावली होती मलाही

  का तरी आयुष्य हे बेशिस्त व्हावे

 

उगवले नाहीच जर जन्मून येथे

 का असे वाटे तुला मी अस्त व्हावे                                  

 

 तोच आहे नित्य माझा पाठिराखा

 वाटते आता मला आश्वस्त व्हावे

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तंबाखू मुक्ती दिन – गुटका नको ग बाई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ तंबाखू मुक्ती दिन – गुटका नको ग बाई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

गुटका नको ग बाई

बाई बाई बाई!

     काय झालं बया?

    बया बया बया…..

     काय झालं बया…..

   बया बया बया……

     सांग की ग बया……

     मला गुटका नको ग बाई

 

 

     मला तंबाखू नको ग बाई..

अग पण का ग बाई…

     असं केलं तर काय त्यानं…

     या गुटक्याची घेली मी चव…!

   समद जग दिसाया लागलं नवं नवं…..

अगं मग बेस झालं की….

दमडी खिशात टिकनं बाई….।।१।।

 

मला गुटका नको ग बाई……

या गुटक्यानं नादावली सारी आळी…..

  अन् मग ग…

घरादारात अन् गल्ली बोळात..

अग झालं तरी काय….

काढली पिचकारीची रांगोळी …..

  मग छानच झालं की…

बायाच्या शिव्याला दमच नाई

   कुठं बसाया जागा नाही….

मला गुट का नको ग ……।।२।।

 

या गुटक्यान …

  या या गुटक्यानं,.

    अग पर केलं तरी काय,,,..

 या या गुटक्यानं लावली माझी कड….

    म्हंजी ग…

   या या गुटक्यानं लावली माझी कड….

  अन्  कॕन्सर  झोपवील माझं मडं……

आग ग ग ग  ….

        अग  परं ….

      तू sss तर …

   हे जिणं …

बी काय जिणं …

   हाय व्हय……

अन्  दिवसा ढवळ्या ….

     दिसाया लागलं मरणं…..

   लई वंगाळ झालं बघ….

   पोरं बाळ ती भिकंला जाई….।।४।।

 

   मला गुटका नको ग बाई…..

एका जनार्दनी  समरस झाले….

एका जनार्दनी  समरस झाले…..

  अन् शरण व्यसन मुक्तीला ssss गेले…..

 आता गुटक्याचं नावच नाई,……

मला गुटका नको ग बाई…..

मला गुटका नको ग बाई…..

मला तंबाखू नको ग बाई..,..

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मिठी ☆ मेहबूब जमादार

? कवितेचा उत्सव ?

☆ मिठी ☆ मेहबूब जमादार ☆

आणेन चंद्र म्हणते

तुझे येणे लांबलेले

आणेन दिप म्हणते

धुके धरा लपेटलेले

 

विरहाचे क्षण कसे

काळजाला छेदलेले

आठवांचे पेव सा-या

भोवताली विखुरलेले

 

प्रेमात ऊर फुटता

नेत्र अश्रूंनी भारलेले

मोहक क्षण भेटींचे

तुझ्या पथी पसरलेले

 

तू नसताना कसे

क्षण मनी गोठलेले

पाहू दे सख्या मला

तुझ्या मिठीत गुंफलेले……

 

*️⃣ मेहबूब जमादार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #140 ☆ दुष्काळ नाही ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 140 ?

☆ दुष्काळ नाही 

पावसावर झोडण्याचा आळ नाही

पंचनामा सांगतो दुष्काळ नाही

 

काळ हा नाठाळ आहे एवढा पण

मानले त्याला कधी जंजाळ नाही

 

गळत आहे छत बदलतो कैकदा मी

पण बदलता येत मज आभाळ नाही

 

शरद आला घेउनी थंडी अशी की

अग्निला मग शेक म्हणती जाळ नाही

 

मार्ग स्वर्गाचा मला ठाऊक होता

मी धरेवर शोधला पाताळ नाही

 

देउनी चकवा ससा निसटून गेला

पारध्याची आज शिजली डाळ नाही

 

मी मनाचे कोपरेही साफ केले

साचलेला आत आता गाळ नाही

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अधांतरी… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ अधांतरी… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

मानस सरोवरीच्या हंसा

जा उडून कुठंतरी

मीच आहे अधांतरी

तुला कसा सांभाळू ?

 

मनीच्या खोपीतल्या सुगरणी

नको बांधू नवे घरटे

नैराश्याचे बोचणारे काटे

तुझ्या घरट्यात अडकतील

अन् घरट्याची नाजूक वीण

विस्कटून विस्कटून जाईल !

 

लावू नकोस कोकीळे

मन जागविण्या पंचम

आघात सोसून सोसून

थंड पडलयं माझं मन !

 

या थंडगार मनात

कसे रहातील

हंस, सुगरण, कोकीळ ?

त्यांच्या मनानं घ्यावी भरारी

मनातून माझ्या जावे अंबरी

मला माहीत आहे

मीच आहे अधांतरी !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print