मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मुक्ता…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆मुक्ता… ! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(२५ मे रोजी मुक्ताई पुण्यतिथी होती, त्या निमित्ताने केलेली अभंग रचना…)

 निवृत्ती, ज्ञानाची,

 लाडकी बहीण,

 जगली क्षणक्षण,

 भावांसाठी !

 

बालपण गेले,

अकाली प्रौढत्व,

ज्ञानाचे तत्व,

सामावले !

 

ज्ञानदेव रुसला,

बंद ताटी केली,

मायेची मुक्ताई,

साद घाली !

 

पोरपण होते

मांडे करू वाटले,

ज्ञानाने चेतवले,

अग्नी रूप!

 

होती आदिमाया,

तिन्ही भावंडांची,

शिकवण  तिची,

नाम्यासही !

 

मुक्त झाली मुक्ता,

देह बुद्धी गेली ,

अमर राहिली ,

विठ्ठल कृपेत !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वीकारा वा नाकारा मज… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वीकारा वा नाकारा मज… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

{वृत्त: पादाकुलक}

स्वीकारा वा नाकारा मज

मलंग मी तर चंचल वारा

तुमच्या संगे तुमची नगरी

माझ्या संगे माझा तारा !

 

खुशाल वगळा वस्तीमधुनी

दिशादिशांचा मज परवाना

दरबारी मी चराचराचा

ऋतूऋतूंचा मज नजराणा!

 

एक विश्व मी माझ्यामधले

त्या विश्वाचा मी तर स्वामी

अवघे गोकुळ अंकित तुमच्या

कान्हा वेणू माझ्या धामी !

 

रोज कालच्या क्षितिजावरती

पुन्हा नव्याने उदया येतो

प्राणांची झटकून काजळी

ज्योतिर्मय मी अजून होतो !

 

खळखळ माझी वाहत वाहत

अथांग आता होऊ पाहे

गाज माझिया मौनाचीही

पार तटांच्या जाऊ पाहे !

 

कधितरि माझा अलखनिरंजन

घुमेल तुमच्या अधिराज्यातुन

होइल जागा उरि तुमच्याही

सूर आतला एक विलक्षण !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पारीजात ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पारीजात… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

आज अचानक, मनात फुलला, वृक्ष पारीजात,

गुपित कानी सांगून जाता, सुगंधित वात ||धृ.||

 

तृषार्त या धरणीवर पडता, पाऊल मेंदीचे,

मनात माझ्या मळे उमलले, ते निशिगंधाचे,

कसा पोहचला? कळले नाही, ताऱ्यांनाही हात ||१||

 

काळे काळे खडक प्रसवले, निर्झर मोत्यांचे,

निनादले कानांशी अवचित, कुजन सरीतेचे,

गंधर्वाचे थवे उतरले, प्रणयगीत गात ||२||

 

आज उराशी घट्ट बिलगले, ते स्वप्नांचे ससे,

माध्यांनीला चंद्र नभीचा, मन पंखावर बसे,

सलज्ज वदना अहा! प्रगटली, संध्या ऋतुस्नात ||३||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आई झाली स्वतः च नाव… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? आई झाली स्वतः च नाव ?   सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

पैलतीरावर जाण्यासाठी

आई झाली स्वतः च नाव

आजुबाजुला अथांग पाणी

दूर तिथे   वसतिचा गाव

पोटची पिले पाठीवरती

मदार  वल्हे पायावरती

मातेवरच्या विश्वासावर

पिल्ले निवांत पाठीवरती

पक्षांमधला क्षण हा सुंदर

मात्रुभावनेचा  जागर

जलाशयातील प्रतिबिंबाने

सौंदर्याची चढवी झालर

 🦆दिवसभराच्या शुभेच्छा🦜

 

चित्र साभार – सुश्री नीलांबरी शिर्के 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रणवरहस्य !… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रणवरहस्य !… ☆ श्रीशैल चौगुले ☆

पायाखालची जमीन सरता

आभाळाची आस ऊरते

दिशांचे वार्यातले घरटे

जळी श्वास कुस तरते.

 

क्षितीजाची काया खण-खंबीर

ब्रम्हांडाचे ध्यास धरते

वज्रातून तप्त लहरी

प्रणव तेज प्रखरते.

 

समुद्राची माया वाहे अनंत

शीतल शशीत भरते

अन् शलाका होता डोळे

तिमीराचे भय सरते.

 © श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 104 – तरी तयाच्या पुसते वाटा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 104 – तरी तयाच्या पुसते वाटा ☆

फुलात मजला दिसतो काटा।

तरी तयाच्या पुसते वाटा।

 

आठवणींच्या हिंदोळ्यावर।

आज अचानक झुलती लाटा।

 

संस्कृतीस या स्वार्थांधांच्या।

स्वार्थाने या दिधला चाटा।

 

नात्यामधली विरली गोडी।

जेव्हा फुटला तयास फाटा।

 

प्रेमालाही तोलू पाहे।

प्रेमवीर हा दिसता घाटा।

 

अजब जगाची रीत साजना।

लाथ मारती भरल्या ताटा।

 

देश धर्मही धाब्यावरती।

अखंड करशी त्यांना टाटा।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आत्मा… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आत्मा… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

(आनंदकंद)

स्वप्नात रोज माझ्या तू यायचे कशाला

इतक्या खुले पणाने वागायचे कशाला

 

कमळावरी देवाचे सजलेत छान मोती

स्पर्शून व्यर्थ त्यांना दुखवायचे कशाला

 

अलवार प्रेम होते भोगून संपलेले

विरहातले निखारे फुलवायचे कशाला

 

गेले घडून जे जे त्याचाच ग्रंथ झाला

निवडून पान त्याचे वाचायचे कशाला

 

आनंद घेत जगणे जगतो अजून आहे

सौंदर्य छान आहे मिरवायचे कशाला

 

सरणात वास्तवाच्या जळतोय एक आत्मा

दाऊन सौंख्य त्याला भुलवायचे कशाला

 

भरपूर त्रास देते छळतेच खूप जगणे

परतून जन्म असले मागायचे कशाला

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #126 – विजय साहित्य – गोडवा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 126 – विजय साहित्य ?

☆ गोडवा…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

 (नदी या विषयावरील रचनां… सागर नदी विषयी बोलतो आहे..)

असंख्य सरिता येऊन मिळती

जलाशयी आगरा

तरीही का मी अथांग खारट ?

चिंता पडे  सागरा

 

प्रवास करूनी जीवन अवघे

वाटत येते नदी ..

लपवीत नाही, कणभर काही

दानशूर ती नदी ..!

 

समुद्र फळांची, राखण करतो

संचय खारा उरी

गोड नदीचा, होतो सागर

खारट जल ना उरी.

 

 नदी अविरत , उधळीत येते

जीवन वाऱ्यावरी

रत्नाकर मी, दडवीत राही

 माणिक रत्ने, नाना परी

 

जीवनावरती, उदार होऊन

गावोगावी वसते, अभ्यंतरी

म्हणून राहतो ,भरून गोडवा

नदी , तुझ्या अंतरी..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ त्रा ता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 त्रा ता ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

ताप वैशाख वणव्याचा 

साहवेना मजला आता,

बोले येऊन काकुळतीस

काळी भेगाळली माता !

 

जीव सुखला तुजवीण

रुक्ष लाव्हारुपी झळांनी,

अंग अंग पेटून उठले

मागू लागले सतत पाणी !

 

बीज कोवळे पेरणीचे

मज गर्भात आसुसलेले,

कधी होईल जन्म माझा

सारखे विचारू लागले !

 

चार थेंब पडता तुझे

तप्त साऱ्या अंगावरती,

हवा हवासा मृद् गंध

पसरेल साऱ्या आसमंती !

 

नांव सार्थ करण्या माझे

सकलांची धरणी माता,

नाही तुझ्याविना जगात

मज दुसरा कुणी त्राता !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२३-०५-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “संदेश…” ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

 

? कवितेचा उत्सव ?

☆ “संदेश…” ☆ सौ. अमृता देशपांडे 

(कीर्तनभूषण कृष्ण हरीभट्ट रेगे या गोमंतकीय आद्य पिढीचे कीर्तनकार. त्यांनी कीर्तनाबरोबर काव्याचा छंदही जोपासला होता. त्यांनी “ह्रदयनाथ, कविग्मुतभरण” अशा टोपण नावे काव्य केले आहे. त्यांची 1967 मध्ये लिहिलेली एक कविता खूप गाजली होती.)

 

राज्य तुझे पणजीत

होईल तरीच आमचे हित ll धृ

 

तुजसी विधानसभा लाभेल

मनिचि उद्दिष्ट की गाठशील

याच पावली मंत्रीही होशील

जननेता म्हणवीत ll

 

गोड वागणुक मिळता येथिल

सोन्याहुनमग पिवळे म्हणशिल

ख्रिश्चन हिंदु मुस्लिमादितिल

वीरश्री स्मुखीत ll

 

बहु गोव्याच्या वैशिष्ट्याचे

घेसि मंगल अनुभव साचे

भारत भाग्य विधात्या गुरुचे

मूलभूत वचनोक्त ll

 

हो स्वामी या भूदेशाचा

महाचालक उद्योगांचा

डंका शुभसंकल्प कीर्तिचा

गर्जो भावना ऐक्यात ll

 

कुलशीलवंत चरित आठवून

हो सर्वाशी समरस जीवन

क्षमा दया शांती ठेव राखुन

असे घ्यावे ह्रदवित्त ll

 – हृदयनाथ

 

धृवपद मिळून बावीस ओळींच्या या  कवितेतील प्रत्येक तिसरे अक्षर घेता एक संदेश मिळतो.

 

तुळशीची पाने वाहून गोमंतभूमीचा आशीर्वाद घ्याहा संदेश.

समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना खान निघाल्याची बातमी अशा प्रकारे काव्यरचना पाठवून कळवली होती.

 

(संदर्भ – लेखक श्री.  गोविंद काळे यांच्या “नाचू कीर्तनाचे रंगी “ या गोमंतकीय कीर्तनकारांवरचे पुस्तकातील आहे)

प्रस्तुती – सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा 

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print