मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ पावसाळा… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ पावसाळा… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

मेघ बरसला

श्वास गंधाळला

मनी उतरला

अलगद

 

वारा वेडावला

सुसाट सुटला

बेभान जाहला

नकळत

 

थेंब ओघळले

अंग शहारले

मन मोहरले

पावसात

 

हाच पावसाळा

भुलवितो मला

प्रत्येक क्षणाला

असा कसा

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मिड-लाईफची कथा – मानवाची व्यथा” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “मिड-लाईफची कथा – मानवाची व्यथा…” ☆ श्री आशिष मुळे ☆

निम्म्या अंतराची कथा

ऐकुन तू घेशील का

आहे माणूसच मी

व्यथा तुला कळेल का

 

उधाणाच्या या दर्यात

कश्ती तुझी टिकेल का

दर्याच्या खोल मनातली

दौलत तुला दिसेल का

 

तापलेल्या जिंदगीची

बरखा तू बनशील का

विझत चाललेल्या सूर्याची

पहाट लाली होशील का

 

आजवर चाललेले अंतर

क्षणात या मिटवशिल का

अंतराच्या अंतरात्म्याची

कहाणी तू ऐकशील का

 

शब्दांना या माझ्या

अर्थ तू देशील का

एकसूरी बेसूर गाण्याला

चाल काही लावशील का

 

गुंता या निरर्थक खेळाचा

अलगद बोटांनी सोडवशील का

कधी न भरणाऱ्या या पोटाची

भूक तू संपवशील का

 

सोडून लाज सारी

कुशीत मला घेशील का

मनातल्या निर्लज्ज बाळाची

आई बनूं शकशिल का…

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – गंधवती मी… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– गंधवती मी– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

मूळास ओटीपोटी धरूनी

माती मजला उठ म्हणाली

फोडून  माझे अस्तर वरचे

पानोपानी हळू फुट म्हणाली

मी न सोडीन मूळास कधीही

तुझ्या कुवतीने वाढ म्हणाली

नभास पाहंन हरकून मीही

पिसार्‍यासम फुलत राहीली

काही दिसानी सर्वांगावरती

इवले इवले कळे लागले

क्षणाक्षणांनी कणाकणांनी

ते ही हळूहळू वाढू लागले

पहाटे अवचित  जागी होता

गंधाने मी पुलकीत झाले

अय्या आपला चाफा फुलला

आनंदाने कुणी ओरडले

भराभरा घरातील सगळे

माझ्या भवती झाले गोळा

फुलवती मी गंधवती मी

मी अनुभवला गंध सोहळा

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पहिला पाऊस…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पहिला पाऊस….” ☆ श्री सुनील देशपांडे

पाऊस पहिला,

भिजवून गेला,

थंडी अजून बाकी।

 

मनात शिरली,

स्मृतीत उरली,

आठव अजून बाकी।

 

वर्षा सरली,

वर्षे सरली,

इच्छा अजून बाकी।

 

पुन्हा भिजावे,

धुंद फिरावे,

जोश न आता बाकी।

 

धरती भिजली,

मनेही भिजली,

काय राहिले  बाकी?

 

वृत्ती थिजली,

गात्रे थिजली,

जीवन अजून बाकी।

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक थेंब पावसाचा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?  कवितेचा उत्सव ?

एक थेंब पावसाचा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक थेंब पावसाचा

धरतीच्या अंगावर

रत्नखाण झाली तिची

धन्य सारे खरोखर॥

 

एक थेंब पावसाचा

डोंगराच्या माथ्यावर

स्वर्ग लोकातील गंगा

दरी घेई कडेवर॥

 

एक थेंब पावसाचा

कुसुमाच्या पाकळीत

सव्वा लाखाचा हा हिरा

जणू जपला मुठीत॥

 

एक थेंब पावसाचा

बळीराजाच्या कपोली

डोळ्यातील एक थेंब

उराउरी भेट झाली॥

 

एक थेंब पावसाचा

प्रेमिकांच्या कायेवर

चेतावली तने मने

येई प्रेमाला बहर॥

 

एक थेंब पावसाचा

अडव ,जीरव आता

मानवा कल्याण करी

होसी सृष्टीचा तू त्राता॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 163 – बाळ गीत – इंजिन दादा  इंजिन दादा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 163 – बाळ गीत – इंजिन दादा  इंजिन दादा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

इंजि न दादा इंजिन दादा

थांब  थांब थांब।

सोडू नको धूर असा लांब लांब लांब।।धृ।।

 

कोळसा खाऊन पाणी पिऊन केली फार मजा।

इजिनाचा धूर झाला आमच्या साठी सजा

निरामय आरोग्याला ठेवू नको लांब

इंजिन दादा ….।।१।।

 

देऊन रोज कोळसा ती खाण झाली रिती।

इंधन साठा पुरेल का वाटे आम्हां  भिती।

करून सवरून बनू नको आता भोळा सांब।

इंजिन दादा ….।।२।।

 

तेच निशाण तीच शिट्टी वाजू दे रे छान।

आधुनिक इंधने वाढवतील रे शान।

काळासोबत धावूनिया जावू लांब लांब

इंजिन दादा ….।।३।

 

कर नारे बदल थोडा, युग आले नवे

झुक झुक गाडीतून फिरायला हवे

गेले झेंडे आणि कंदील आले नवे खांब

इंजिन दादा ….।।४।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ग्रंथऋण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ग्रंथऋण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

ग्रंथाचे ऋण आयुष्याला माझ्या

जन्मोजन्मी राजा   ज्ञानदेव.

 

संतांची भुमी   पुण्यलोक साधे

 मानवाशी बोधे    आत्मदेह.

 

संगत योग्य   संसाराशी नाते

अध्यात्माचे श्रोते   भक्तजन.

 

संबंध जोडे  गीतातत्व सार

ग्रंथ उपकार   सकळाशी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घन – मेघांनो… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ घन – मेघांनो… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

आषाढातील घन-मेघांनो, जा घेऊन संदेश,

वने, उपवने, सरीता, सागर, शोधा सर्व प्रदेश ||धृ.||

 

भेटतील खग, विहंग, यात्री, मार्गामाजी तुम्हां,

लोप पावल्या नक्षत्रांच्या, दिसतील पाऊलखुणा,

पुसा वायुला, असे जयाला, जगती मुक्त प्रवेश ||१||

 

शैल शिखरेही, जिथे चुंबीती गगनाचे भालं,

कैलासाचे दर्शन घ्याया, थांबा क्षणकालं,

मार्ग दाखवील प्रसन्न होऊन, उमापती शैलेश ||२||

 

निर्मळ निर्झर मानसरोवर, कुठे पुष्प वाटिका,

कमल दलातील भृंग बावरा, मिलनोत्सुक सारिका,

कथा तयांना विरह व्यथेने, व्याकुळ यक्ष नरेश ||३||

 

हवा कशाला स्वर्ग, हवी मज प्रियाच स्वप्नांतली,

विरहाश्रूंचे सिंचन करुनी, प्रीती मी फुलवली,

सजल सख्यांनो, कथा तियेला, अंतरीचा आदेश ||४||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #185 ☆ शब्द‌ सौंदर्याचा साज… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 185 – विजय साहित्य ?

☆ शब्द‌ सौंदर्याचा साज ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

नव्या युगाचे पोवाडे

बिजलीचा न्यारा बाज

सैन्य चाललेले पुढे

शब्द सौंदर्याचा साज…! १

 

अतींद्रीय प्रतिमांची

नादवती शब्दकळा

साधनेचा सपादक

लावी‌ रसिकांसी लळा..! २

 

राष्ट्रसेवा दल आणि

साने गुरूजींनी साथ

साहित्यिक प्राध्यापक

मूळ नाव विश्वनाथ..! ३

 

दिशा अकरावी दिली

काव्य सकीना मानसी

शिंग फुंकले रणी ते

शब्द तेजसी राजसी..! ४

 

सामाजिक विषमता

हाताळली शिताफिने

आंग्ल,‌संस्कृत‌ बंगाली

भाषा गुंफिली खुबीने..! ५

 

चळवळ स्वातंत्र्याची

केले भारत दर्शन

शब्द लावण्याचा ऋतू

जाणिवांचे संकर्षण…! ६

 

बारा गावच्या पाण्यात

संकलित लोककला

अभिजात शृंगारीक

बहरला शब्दमळा..! ७

 

जन जागृती करोनी

दिले विचारांचे दान

गाजविली अकादमी

काव्य दर्शनाची खाण…! ८

 

बाल साहित्यात ठसा

नेले परीच्या‌ राज्यात

फुलराणी गिरकीने

चंगामंगा साहित्यात..! ९

 

सामाजिक‌ सांस्कृतिक

साहित्यिक योगदान

परीपक्व मितभाषी

नैसर्गिक शब्दखाण..!१०

 

पुरस्कार विभुषीत

लाभे अध्यक्षीय मान

नाम वसंत‌ बापट

काव्य दर्शनाची शान…!११

 

लावणीच्या लावण्यात

रमे वसंत लेखणी

शारदीय सारस्वती

सेतू संपदा देखणी..!१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोडे… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ कोडे… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सान होऊनी बांलकांसवे

भान विसरूनी खेळत जावे

हासत नाचत बागेमध्ये

फेर धरुनी फिरून यावे ||

 

मनात येते विहंग होऊन

आकाशी त्या मुक्त विहरावे

जगामधले अनन्य सुंदर

डोळे भरुनी पाहून घ्यावे ||

 

दुःख काळजा दूर होऊनी

ईश चरणी मन रमावे

अनन्यभावे शरण जाऊनी

नामस्मरणी रंगून जावे ||

 

ऐकू यावी बासरी अन

यमुनातीरी फेर धरावा

अलगुज होऊन कृष्णाची

कुंजवनी तो स्वर घुमावा ||

 

मन हे मोठे अजब आहे

कोडे जणू विश्वनियंत्याचे

कधी न होते इच्छापूर्ती

आवर्तन अनेक इच्छांचे ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print