मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवा गणेश देवा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ देवा गणेश देवा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

देवा गणेश देवा तू सृष्टीचा नियंता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला  अनंता

 

श्वासात तूच आहे

हृदयी तुझाच वास

चोचीत पाखरांच्या

तू भरवितोस घास

स्वामी चराचराचा आदर्श तू विधाता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

दे शक्ती बुद्धी विद्या

दे ध्यास  सद्गुणांचा

वरदान दे प्रभू रे

व्हावी विनम्र वाचा

देतोस मुक्तहस्ते तू एकमेव दाता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

पुष्पातला सुवास

मकरंद तु पराग

झुळझुळ वाहणारा

तू रंग अन तरंग

देहात जागणारा चैतन्यदायी आत्मा

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

माता पित्यास आम्ही,

तुझिया रूपात पाहू,

श्रम शक्तीच्या पूजेला

सारे आयुष्य वाहू

अस्तित्व जाणवावे तव गीत गात असता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #174 ☆ बाप्पा… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 174 ☆ बाप्पा… ☆ श्री सुजित कदम ☆

बाप्पा तुझा देवा घरचा पत्ता

मला तू ह्या वर्षी तरी

देऊन जायला हवा होतास..

कारण..,

आता खूप वर्षे झाली

बाबांशी बोलून

बाबांना भेटून…

ह्या वर्षी न चूकता

तुझ्याबरोबर बांबासाठी

आमच्या खुशालीची

चिठ्ठी तेवढी पाठवलीय

बाबा भेटलेच तर

त्यांना ही

त्याच्यां खुशालीची चिठ्ठी

माझ्यसाठी

पाठवायला सांग…

बाप्पा…,

त्यांना सांग त्याची चिमूकली

त्यांची खूप आठवण काढते म्हणून

आणि आजही त्यांना भेटण्यासाठी

आई जवळ नको इतका हट्ट

करते म्हणून…,

बाप्पा तू दरवर्षी येतोस ना तसच

बाबांनाही वर्षातून एकदातरी

मला भेटायला यायला सांग..,

तुझ्यासारखच…,त्यांना ही

पुढच्या वर्षी लवकर या..

अस म्हणण्याची संधी

मला तरी द्यायला सांग…,

बाप्पा.., पुढच्या वर्षी तू…

खूप खूप लवकर ये..

येताना माझ्या बाबांना

सोबत तेवढ घेऊन ये…!

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आतुरता आगमनाची… ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आतुरता आगमनाची… ? ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

शोभसी तू बुद्धीची देवता तू दयाळा 

भक्तांना दिला वाव मनाप्रमाणे मूर्ती घडवाया

 बुद्धी अन् श्रध्देचा सुंदर मिलाफ होता

 साजिरा-गोजिरा अवतरे घरी अन् मनी विघ्नहर्ता

ज्याला जसा भावला त्याने तसा रंगविला

भक्ताघरी काही दिवस तर मनी कायमचा राहीला 

अबाल-वृद्धांच्या मनी उधाण चैतन्याला 

काही दिवस पारावार नाही आता आनंदाला

इतकेच काय तो मंडळातही अवतरला 

भक्तांसाठी तो भर रस्त्यातही उभा ठाकला 

इतकीच विनंती सर्व भक्तांना जनांना

 ठेवावे साजेसे वर्तन नको वाव टिकेला 

तेव्हाच आनंद होईल स्वर्गी  टिळकांना

  बाप्पा आपले अन्याय घालतो सदा पोटी 

अन् दुःख ताराया येतो भक्तांच्या भेटीसाठी

 आतुरता साऱ्यांनाच तव शुभ आगमनाची

 आस तुझे गोजिरे रूप डोळ्यात साठवण्याची

इतके मागणे हे श्रीगणेशा

 आदर्श घेऊ तव गुणांचा

 दे आशीर्वाद सद्वर्तनाचा

 दे आशीर्वाद सद्वर्तनाचा — 

             मोरया

😍दEurek(h)a🥰

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लपंडाव… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ लपंडाव… ☆ सुश्री शोभना आगाशे

निळ्या अर्णवी शोधित राही,

श्रीकृष्णाची अतल निळाई।

निळ्या अंबरी अनंत निळेपण,

चकवुनि जाता हताश होई॥

मधुवनी घुमता बासुरीचे स्वर,

शोधू जाता निसटुनी जाई।

शारदराती रास खेळता,

अगणित रूपें समोर येई॥

भास कोणता, खरा कोणता,

दृष्टीभ्रम का मलाच होई।

पुरे हरी हा लपंडाव ना,

मज सामोरी झडकरी येई॥

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 200 ☆ ॥ गजानन ॥ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 200 ?

☆ ॥ गजानन ॥ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आले घरोघर

 वाजत गाजत

बुद्धीचे दैवत

गजानन ॥

 

केली पूजाअर्चा

आर्पिली जास्वंद

झाले की प्रसन्न

गजानन ॥

 

मोदक साजूक

खीर तांदळाची

तृप्त की जहाले

गजानन ॥

 

खिरापत रोज

आवडेच भारी

लाडू पेढे खाती

गजानन ॥

 

आरती म्हणता

रात्रंदिन आम्ही

झाले की प्रसन्न

गजानन ॥

 

दहा दिवसाचे

असती पाहुणे

दरवर्षी येती

गजानन ॥

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुण्य पदराला… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ पुण्य पदराला… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला

आभाळाच्या भाळी अबीर ल्याला ॥

गडगटाचा मृदु्ंग, थेंबांची तुळशीमाळ

टपटप आवाजाचे वाजतात टाळं

ढग अश्व धावे कधी, सज्ज रिंगणाला

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला ॥

भक्त मेळाव्यात हा असा सामावला

विसरूनी देहभान अभंग गाईला

रिमझीम चिपळ्यांनी ठेका तो धरला

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला ॥

पंढरपुरी येता विठूमय झाला

आनंदाचा पूर चंद्रभागेला आला

पापक्षालन झाले पुण्य पदराला

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला ॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मानस पूजा ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मानस पूजा ☆ सौ.मंजिरी येडूरकर

गोड मानूनी घ्यावी वरदा, आज ही मम पूजा

नयनात वसे तव मूर्ती, ना कोणी दूजा

तव स्नानासाठी अश्रुंचे या नीर मी साठविले

पापण्यांनी तुझ्या समोरी, जुडे दुर्वांचे मांडिले

माझे काही नाही जवळी, सारे तुझेच रे दान

सद्विचारांचे गंध लाविते, तव भाळी छान

सद्गुणांचे फूल वाहते, तव जपा घे मानूनी

सत्कर्मांची ओंजळ तुजला, मंत्राक्षता जाणूनी

गोड स्वरांनी कोकिळ गातो, तुझी आरती राजा

लगबगीने घंटा वाजवी, चिमण्यांची ही प्रजा

नमस्कारा हात जोडीते, एक असे मागणे

पूजेच्या या साहित्याला, कधी न पडो रे उणे

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #206 ☆ सावली होती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 206 ?

☆ सावली होती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मनावर ताण आहे का ? धुमसते रान आहे का ?

तुझ्या मागावरी कोणी, उभा सैतान आहे का ?

तुला पाहून का वनवा, भडकतो पेटतो आहे ?

दिले वाऱ्यास या कोणी, इथे वरदान आहे का ?

ढिगारे खूप कचऱ्याचे, तुझ्या बाजूस हे सडके

तुला मी भेटण्याइतका, परीसर छान आहे का ?

घराचे तोलले छप्पर, म्हणूनच सावली होती

अता त्या जीर्ण भिंतीला, कुठे रे मान आहे का ?

चुलीला भ्रांत आहे की, जळावू लाकडे नाही

दिवाळी रोज तो करतो, कुणी धनवान आहे का ?

किती ह्या मोहमायेने, मनाला ग्रासले आहे

इथे तर मृत्युही जगतो, तया सन्मान आहे का ?

खऱ्याचे चालते कोठे, मनाबाहेर पडल्यावर

कटू हे सत्य चघळाया, मसाला पान आहे का ?

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चेहरा तोच आहे…! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ चेहरा तोच आहे…! ☆ श्रीशैल चौगुले ☆

आरसे फुटले कितीही मोहरा तोच आहे

स्पंदने सुटले कितीही चेहरा तोच आहे.

पारणे फिटले कितीही आशयी तोच आहे

लोचने मिटले कितीही चेहरा तोच आहे.

काळजा लुटले कितीही भाबडा तोच आहे

बंधने तुटले कितीही  चेहरा तोच आहे.

भावना पुसले कितीही संयमी तोच आहे

आसवे हसले कितीही चेहरा तोच आहे.

प्रेयसी रुसली कितीही साजना तोच आहे

साथही एकटी कितीही चेहरा तोच आहे.

सांगते मन हे कितीही चोरटा तोच आहे

प्रेम जे लपवी कितीही चेहरा तोच आहे.

सावळा फसवे कितीही राधिका तीच आहे

नाटकी दुनिया कितीही चेहरा तोच आहे.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भूतलावरची हंडी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? भूतलावरची हंडी… ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

स्वर्गातल्या रोजच्या कामाला

कंटाळून भगवंतांनी मारली दांडी !

भगवंत अवतरले सुदाम्यासंगे

बघायला भूतलावरची दहीहंडी !

कुठे जावे विचार करून

आले दोघेही मुंबापुरीत !

आपला जयघोष ऐकून

हायसे वाटले या नगरीत !

भगवंत आश्चर्याने  म्हणाले

कोणाचे प्रयत्न चालले अथक?

सुदामा हसत हसत उत्तरले

हे मुंबईतले गोविंदा पथक ! 

दही हंडी का रे टांगली 

त्यांनी इतक्या उंचावर ?

पुढाऱ्यांनी महत्वाकांक्षेचे

लावलेत इथे थरावर थर !

मडक्यात काय घातलय 

दही का नुसतेच  पाणी?

स्टेजवरच्या मंडळीनी

आधीच मटकवलय लोणी !

अरे त्या कोण नाचत आहेत 

तिथे सुंदर गौळणी?

सिलेब्रिटी तारका डोलती 

डीजेवरची कर्कश्य गाणी !

लोणी नाही तर  मिळेल

का थोडंसं दूध अन् दही?

जी.एस.टी. लागलाय आता 

प्रश्न विचारता तुम्ही काहीही !

सुदाम्या भाग्यवान आपण

द्वापार युगातच सरलो !

कलयुगात नामस्मरणासाठी

पोथीतच नाममात्र उरलो !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print