सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ पुण्य पदराला… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला

आभाळाच्या भाळी अबीर ल्याला ॥

गडगटाचा मृदु्ंग, थेंबांची तुळशीमाळ

टपटप आवाजाचे वाजतात टाळं

ढग अश्व धावे कधी, सज्ज रिंगणाला

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला ॥

भक्त मेळाव्यात हा असा सामावला

विसरूनी देहभान अभंग गाईला

रिमझीम चिपळ्यांनी ठेका तो धरला

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला ॥

पंढरपुरी येता विठूमय झाला

आनंदाचा पूर चंद्रभागेला आला

पापक्षालन झाले पुण्य पदराला

पांडुरंग भेटीसाठी वरूण निघाला ॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments