मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पदार्पण नववर्षात… ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆

सुश्री निलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव ?

☆ पदार्पण नववर्षात… ☆ सुश्री निलांबरी शिर्के

नववर्षात पदार्पण  करता

मागे सोडू  नकारात्मकता

हेवा ,मत्सर ,द्वेशही सोडू

पाठीमागे  पुढती  जाता

 

 खुप काहीसे आनंदी क्षण

  काळीजकुपी जपून  नेऊ

  लळा जिव्हाळा आपुलकी

  रेशमलडीसम  संगती घेऊ

 

  घडले काही  आनंददायक

  शिदोरीसम   बांधून  घेऊ

  यातनादायक सारे सारे

  इथेच पुरते  गाढून जाऊ

 

  हातामध्ये हात घेऊ  या

  आपुलकीचा संदेश देऊ या

  संकट समयी मी आहे ना!

 एकमेकांना विश्वास लेऊ या

© सुश्री निलांबरी शिर्के

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #218 ☆ सूर्य मावळला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 218 ?

सूर्य मावळला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

होता सूर्य मावळला, गेल्या वर्षाला घेऊन

काही बुडाले दारूत, होते सामिष खाऊन

सारे नव्हतेच तसे, काही पहाटे उठले

नव्या वर्षाच्या सूर्याचे, त्यांनी दर्शन घेतले

त्याचे रूप पाहुनीया, मन जाते हे मोहून

संध्या स्नान जे करून, अर्घ्य देतात देवाला

ऊर्जा सूर्यकिरणांची, सूर्य देतो त्या देहाला

आहे कोवळी किरणे, त्यात घेऊया न्हाऊन

झाले जीवन गढूळ, शुद्ध संकल्प करुया

घडा पापाचा जरासा, चला रिकामा करुया

गेलेल्याच्यासोबतीने, जावे पापही धुऊन

परप्रकाशी चंद्राला, नका कुणी नावे ठेवू

त्याच्यामुळे धुंद रात्र, त्याला कुशीमध्ये घेऊ

चंद्रावर जाणे सोपे, चला येउया भेटून

स्वप्ने सत्यात येताना, आहे पाहतो हा देश

साऱ्या जगात पोचला, आहे आमुचा संदेश

असो संकटात कोणी, जातो देश हा धावून

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवीन वर्षा तुझ्या स्वागता… लेखिका : शांता शेळके ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ नवीन वर्षा तुझ्या स्वागता… लेखिका : शांता शेळके ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

 ☆

कुठले पुस्तक कुठला लेखक

लिपी कोणती कसले भाकित

हात एक अदृश्य उलटतो

पानामागून पाने अविरत

गतसालाचे स्मरण जागतां

दाटून येते मनामधे भय

पान हे नवे यात तरी का

असेल काही प्रसन्न आशय

अखंड गर्जे समोर सागर

कणाकणाने खचते वाळू

तरी लाट ही नवीन उठता

सजे किनारा तिज कुरवाळू

स्वतः स्वतःला देत दिलासा

पुसते डोळे हसतां हसतां

उभी इथे मी पसरुन बाहू

नवीन वर्षा तुझ्या स्वागता

 ☆

लेखिका : शांता शेळके

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ त्रिगुणात्मक हो… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– त्रिगुणात्मक हो… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

त्रिगुणात्मक हो | गुरुदेव दत्त |

प्रसन्न हे चित्त | दर्शनाने ||१||

अनुसया अत्री | लाभे माता पिता |

ध्यान सर्वज्ञाता | दत्तात्रेय ||२||

ब्रम्हा विष्णू शिव  | एकत्र साकार |

दत्त अवतार | सृष्टीतत्व ||३||

कामधेनू उभी | चार वेद श्वान |

अवधूत ध्यान | गुरुदेव ||४|

दत्त संप्रदाय | कठीण साधना |

आनंद  जीवना | भक्तीमार्ग ||५||

दत्त महाराज |  व्हावी मज कृपा |

भवसिंधू सोपा | तारायासी ||६||

श्री दत्त जयंती  | उत्सव सोहळा |

भक्तीमय मेळा | साधकांचा ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरणारे वर्ष मी… कवी – मंगेश पाडगांवकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सरणारे वर्ष मी… कवी – मंगेश पाडगांवकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(वर्षाच्या निरोपाची मंगेश पाडगांवकरांची सुंदर कविता)

मी उद्या असणार नाही

असेल कोणी दूसरे

मित्रहो सदैव राहो

चेहरे तुमचे हासरे

 

झाले असेल चांगले

किंवा काही वाईटही

मी माझे काम केले

नेहमीच असतो राईट मी

 

माना अथवा नका मानु

तुमची माझी नाळ आहे

भले होओ , बुरे होओ

मी फक्त ” काळ ” आहे

 

उपकारही नका मानु

आणि दोषही देऊ नका

निरोप माझा घेताना

गेट पर्यन्त ही येऊ नका

 

उगवत्याला ” नमस्कार “

हीच रीत येथली

विसरु नका ‘ एक वर्ष ‘

साथ होती आपली

 

धुंद असेल जग उद्या

नव वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला

खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला

 

शिव्या ,शाप,लोभ,माया

यातले नको काही

मी माझे काम केले

बाकी दूसरे काही नाही

 

निघताना ” पुन्हा भेटु “

असे मी म्हणनार नाही

” वचन ” हे कसे देऊ

जे मी पाळणार नाही

 

मी कोण ? सांगतो

” शुभ आशीष ” देऊ द्या

” सरणारे वर्ष ” मी

आता मला जाउ द्या।

(संकलन माधव विद्वांस)

🙏💦🌸💦🙏

प्रस्तुती : श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नव वर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नव वर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

कॅलेंडर बदलतं नि वर्ष नवं येतं

सांगा बरं काय घडतं ?

बदलतात का सूर्य-चंद्र ?

 

नाही हो !सृष्टी नाही बदलत.

एक मात्र नक्कीच घडतं

बदलतं आपलं मन.

 

नवी आशा,नवोन्मेष,संकल्पांचंं दालन

भविष्याचा वेध घेण्या,एक नवं कारण

जीवनाला उभारी देतं,स्वागतोत्सुक मन

चित्तवृत्ती बदलण्याचं,ठरतं एक साधन.

 

कौटुंबिक जिव्हाळा ते वृद्धिंगत करतं

नववर्ष मनामनांना, नव्यानं सांधतं .

 

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 154 ☆ नूतन वर्ष ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

 

?  हे शब्द अंतरीचे # 154 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… नूतन वर्ष ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(पाश्चात्य परंपरेची, नवीन वर्षाची सुरुवात आज झाली…. त्या निमित्ताने ह्या काही ओळी…)

नूतन वर्षाची, सुरुवात झाली

सूर्य किरणे, प्राचिवर प्रसवली

मंजुळ स्वरात, कोकिळा वदली

नवीन वर्षाला, सुरुवात झाली

चाफा सुंदर, फुलू लागला

मोगरा सुगंधी, बहरून आला

झाले जे ते, विसरून जावे

नव्याने पुन्हा, तयार व्हावे

पुन्हा नवी दिशा, पुन्हा नवा डाव

करा सावारा-सावर, टाका आपला प्रभाव

होणारे सर्व आता, छान छान व्हावे

चांगले योग्य, तेच घडून यावे

मनोभावे करावी, प्रार्थना देवाला

सुखी ठेव बा, चालू या घडीला

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 169 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media # 169 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 169) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 169 ?

☆☆☆☆☆

☆ Resolute Action… ☆ 

बहुत कोशिश की मैंने

उसको समझाने की,

फिर एक रोज़ मैंने खुद

को ही समझा लिया…!

☆☆

I tried desperately to

make him understand,

Then one fine day I

simply convinced myself…!

☆☆☆☆☆

☆ Optimism… ☆ 

यूं ही नहीं रहते हैं,

अंधेरे साथ-साथ मेरे,

जानते हैं, इक रोज़ करुंगा

सारा जहाँ रौशन मैं …!

☆☆

Darknesses don’t stay with

me  for  no  reasons,

They  know,  one  day I will

illumine the entire world..!

☆☆☆☆☆

☆ Revengeful Change… ☆ 

ये   तुमने  ख़ुद 

को  जो  बदला  है…

वो  एक  बदलाव  है

या फिर एक “बदला”..?

☆☆

The change that  

you’ve undergone…

Is  it  a  change

or  the  revenge …?

☆☆☆☆☆

☆ Breezy Invite…

हवा को दावतनामा भेज पाएं

ये तो हरगिज़ मुमकिन नहीं

पर खिड़कियों को खुला रखना

तो हमारे अख्तियार में है..!

☆☆

Sending invitation to the wind

may  not  be  possible, but…

Keeping the windows open is

certainly within our purview..!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अखेरचा आठवडा…अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? कवितेचा उत्सव ?

☆अखेरचा आठवडा…अज्ञात ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

निरंतर माळेतून

एक मोती गळतो आहे..

तारखांच्या जिन्यातून

डिसेंबर पळतो आहे ..

काही चेहरे वजा अन्

बर्‍याच आठवणी जमा..

वयाचा पक्षी

आभाळी दूर उडतो आहे ..

हलकी हलकी उन्हे

अन् आक्रसलेल्या रात्री..

गेलेल्या क्षणांवर

पडदा हळूहळू पडतो आहे..

मातीचा देह

मातीत मिळण्यापूर्वी..

हर मुद्द्यावर

इतका का आडतो आहे..

अनुभवण्या पूर्वीच

सुटून जात आहे आयुष्य..

एक एक क्षण जणू

ढग बनून उडतो आहे..

तारखांच्या जिन्यातून

डिसेंबर पळतो आहे ..

     …चला…

 

या वर्षाचा हा अखेरचा…. आठवडा

खुप सारे धन्यवाद..!!

तुमच्या या मैत्रीची साथ

यापुढे ही अशीच कायम असू द्या…

नव्या वर्षात नव्या उमेदीने

पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…🍫🍫🤝

 

कवि  अज्ञात

प्रस्तुती – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तूच… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ तूच… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 फुलणारे फूल ,

कधीतरी सुकणार !

हे माहीत असूनही,

फुलाचा सुगंध घ्यायला,

तूच शिकवलेस मला !…..१

 

    समईची जळणारी ज्योत,

     तेल, वात संपल्यावर

    विझून जाणार !

    पण समई सारखे मंद तेवायला,

    तूच शिकवलेस मला!…..२

 

 येणारा प्रत्येक क्षण

  पुन्हा येणार नाही,

हे माहीत असूनही,

प्रत्येक क्षण आनंदाने जगायला,

तूच शिकवलेस मला!…..३

 

    आयुष्याचे दान मला दिल्यावर,

     ते इतरांना कसे वाटावे,

    दुसऱ्यासाठी कसे झिजावे,

      तूच शिकवलेस मला !…..४

 

हा प्रत्येक क्षण कारणी लागावा,

 म्हणून झुरतंय मन ,

त्याला मार्ग दाखव ,

  हेच विनविते तुला..!…..५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print