मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 91 – प्रवास ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 91 – प्रवास ☆

जीवन गाडीच्या प्रवास

संगे साथी नातीगोती।

सारे शोधात फिरती

थांबा सुखाचा जगती।।धृ।।

 

आले आले बालपण होई आनद उधळण ।

हौस मौजेला न तमा जीवनाचे हे कोंदण।

वाटे फिरूनिया यावी बालपणाची प्रचिती।।१।।

 

किशोर ,कुमार वयात मित्र मैत्रिणींची धुंदी ।

पंख आकांक्षाना फुटती जीवन घडण्याची संधी।

मोहापाशाचे हे फासे गळ रस्त्या रस्त्यावरती।।२।।

 

शहाणा तो धरीतसे योग्य वळणाची वाट

शिखर यशाचे मिळता जीवन नक्षत्राचा थाट।

काय वर्णावी माधुरी सहचारी तो सांगाती।।३।

रगं त प्रवासाला आली जीवन बागही फुलली।

चिमण्या पाखरांच्या संगे आज माऊली रंगली ।

काय आनंदाला ऊणे आली सागरा भरती।।४।।

 

पाहून पिलांची उड्डाण माता आनंदली ऊरी।

गरूडाची झेप जणू जाई यशाच्या शिखरी।

मनी सतावते पुन्हा चाहूल एकटेपणाची।।५।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फक्त आमच्यासाठी…… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ फक्त आमच्यासाठी……☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

रक्तबंबाळ पावलांनी

अजून किती शिवार चालायचय.

भ्रष्टाचारी गिधाडाना

अजून कुठवर पोसायचय.

चक्रात घालून माणसांचा चोथा खरणा-याना

आम्ही देशप्रेमी म्हणायचय.

वर लाल दिव्याची गाडी देऊन

त्यांना फिरायला वावरायला.

आमच्या साठी का त्यांच्या साठी……

 

कुणाची पिलावळ पोसायची आम्ही.

आमच्या पोराबाळांचे पाडून फाके.

अरे  ! हा रिवाज आहे काय राजकारण्यांचा.

आई बाप बहिण भावाना गाढण्याचा.

करून खून लोकशाहीचा.

टेंभा मिरवत स्वातंत्र्याचा.

संगनमताने परस्पराना वाचवण्याचा.

आमच्या साठी का त्यांच्या साठी……

 

पाणी आता गळ्यापर्यंत आलंय.

जनतेला तर देशोधडीला लावलय.

आमच्या सौजन्याचं भांडवल केलंय.

पोट फुगून कुणाला अजीर्ण झालय‌.

खाल्लय तेवढं पचवून टाकलंय.

विकासाच तर मुंडकच छाटलय.

आभाळ सगळं चौबाजूनी फाटलय.

फक्त आमच्या साठी……..

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळीमाया ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ काळीमाया ☆ श्रीशैल चौगुले ☆

पठाराचं रानं

काळाजर्द वाण

शेंगवेली छान

 ऊंच तुरी मान.

जोंधळा हिरवा

पाखरांचा थवा

थंडवारा पावा

सुखावतो जीवा.

माच्यावर राजा

शेतकरी भारी

भुर्र हार्या फिरी

गोफणीची दोरी.

काळी माया थोर

मिटवील घोर

धान्य दाणं वर

पसा सालभर.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य #101 – निशब्द…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य # 101 ?

☆ निशब्द…! 

चार भिंतीच्या आत

एक कोपरा तुझा

एक कोपरा माझा…!

माझ्या कोप-यात किबोर्ड वर

बागडणारी माझी बोटं

आणि

तुझ्या कोप-यात

भांड्यावर सफाईदारपणे फिरणारे

तुझे हात

घरातल्या प्रत्येक कोप-यात

तुझ्या माझ्या अस्तित्वाच्या अशा काही

संकेतवजा वस्तू

सोडल्या तर

तुझ माझ अस्तित्व असं

काही उरणारच नाही

कारण

तुझ्या माझ्यात काही

संवाद झालाच

तर तो ह्या कोप-यातल्या

कोणत्या ना कोणत्या

वस्तूंच्या साक्षीनेच होतो…

नाहीतर

इतरवेळी आपण फक्त

निशब्द असतो

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पैलतिरावर जाणे ☆ श्री रवींद्र सोनावणी

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पैलतिरावर जाणे ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

सूर विखुरले दाही दिशांना, आता कुठले गाणे ?

तीर दिसेना ऐलतिरावर, पैलतिरावर जाणे ||धृ||

 

कुठे कशाचे बंध न उरले, 

सुखस्वप्नांचे स्वप्नही विरले,

दिशाहीन तो फिरे कारवां, घुमवित जीवन गाणे ||१||

 

पर्णहीन त्या कल्पतरूवर,

धुंडीत फिरतो मधू मधुकर,

आकांक्षेच्या स्वैर वारूवर, भिरभिरतात दिवाणे ||२||

 

फुलपंखांनी लहरत यावी,

माळावर त्या रिमझिम व्हावी,

आणि कोरले जावे अवचित, खडकावरती लेणे ||३||

 

शिशिरानंतर वसंत यावा,

चैतन्याचा मयूर झुलावा,

आणि अचानक बरसत यावे, भूवर गगन तराणे ||४||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 121 ☆ वृत्त-अर्कशेषा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 121 ?

☆ वृत्त-अर्कशेषा ☆

आजकाल मी इथेच वाट पाहते ना

दूर दूर होत एकटीच राहते ना

 

पंचमीस रंग खेळला कुणी दुपारी

शब्द एक लागला मलाच तो जिव्हारी

 

लावलाच ना कधी गुलाल मी कुणाला

डाग एक तो उगाच लाल ओढणीला

 

“लोकलाज सोडली” मलाच दोष देती

ना कळे कुणास प्रेम आकळे न प्रीती

 

एक दुःख जाळते मनास नेहमीचे

ना कुणास माहिती प्रवाह गौतमीचे

 

तारतम्य पाळतेच स्त्री ,वसुंधराही

प्रीतभाव ना कळे पुरूष, सागराही

 

एकटीच शोधते खुणा इथेतिथे ही

सोडते स्वतःस त्या जुन्याच त्या प्रवाही

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेयसीचे वदन माझ्या… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रेयसीचे वदन माझ्या… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

लाजणारा चंद्र नभीचा ना कधी कुणी पाहिला

वाहणारे चांदणे वा ना कधी कुणी पाहिले

हासताना मौक्तिमाला ना कधी कुणी पाहिली

बोलताना वा जलाशये ना कधी कुणी पाहिली

 

प्रेयसीचे वदन माझ्या चंद्र जणू तो लाजतो

हास्य करता चांदण्याचा ओघ जणू तो वाहतो

हास्य दावी दंतपंक्ती, मोती जणू ते हासती

बोलके ते दोन डोळे, जलाशये जणू बोलती.

 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 126 ☆ निर्माल्याची ओटी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 126 ?

☆ निर्माल्याची ओटी ☆

तुझ्या प्रेमाखातर मी

हात ढगाचा सोडला

खाली येऊन पाहिले

माझा कणाच मोडला

 

खाचखळगे मिळाले

चाललोय धक्के खात

बांधावर मी थांबतो

मला आवडते शेत

 

वाहणाऱ्या ह्या नदीला

नको निर्माल्याची ओटी

काहीजण घासतात

तिथे भांडी खरकटी

 

सागराच्या भेटीसाठी

होउनीया आलो झरा

आत्मा माझा हा निर्मळ

आणि सोबती कचरा…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग – 18 ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

प्रत्येक बुधवार और रविवार के सिवा प्रतिदिन श्री संजय भारद्वाज जी के विचारणीय आलेख एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ – उत्सव, मेला और तीर्थयात्रा   श्रृंखलाबद्ध देने का मानस है। कृपया आत्मसात कीजिये। 

? संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग – 18 ??

श्रद्धाभाव के साथ मनाई जाती है। वटपूर्णिमा अथवा वटसावित्री को वटवृक्ष को मन्नत के धागे बाँधकर चिरायु कर दिया जाता है। पीपल, आँवला को पूजकर प्रदान की जाती पवित्रता 24 बाय7 ऑक्सीजन का स्रोत बनती है। वटपूर्णिमा का एक आयाम लेखक की इस कविता में देखिये,

लपेटा जा रहा है

कच्चा सूत

विशाल बरगद

के चारों ओर,

आयु बढ़ाने की

मनौती से बनी

यह रक्षापंक्ति

अपनी सदाहरी

सफलता की गाथा

सप्रमाण कहती आई है,

कच्चे धागों से बनी

सुहागिन वैक्सिन

अनंतकाल से

बरगदों को

चिरंजीव रखती आई है!

इसी भाँति तुलसी विवाह प्रकृति में चराचर की एकात्मता का उत्कृष्ट उदाहरण है।

योग दिवस ‘सर्वे संतु निरामया’ की चैतन्य प्रतीति है। गुरु पूर्णिमा आषाढ़ मास की पूर्णिमा को मनाई जाती है। इसे आदिगुरु महर्षि वेदव्यास की जयंती के रूप में मनाया जाता है। अपने गुरु, मार्गदर्शक, शिक्षक को ईश्वर का स्थान देने का साहस केवल वैदिक संस्कृति ही कर सकती है।

 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः,

गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

कबीर ने गुरु को ईश्वर से भी उच्च स्थान दिया।

गुरु गोविन्द दोऊ खड़े , काके लागू पाय|

बलिहारी गुरु आपने , गोविन्द दियो बताय||

ये सब प्रतिनिधि रूप से कुछ त्योहारों का वर्णन किया है। किसी छोटे आदिवासी टोले से लेकर बड़े समुदाय तक हरेक के अपने पर्व हैं। हरेक एकात्मता और सामासिकता का जाज्वल्यमान प्रतीक है।

क्रमश: ….

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ध्यास असू दे नंदनवन पण… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ ध्यास असू दे नंदनवन पण… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त: वनहरिणी) – मात्रा :८+८+८+८

ध्यास असू दे नंदनवन पण  परसामधली बाग फुलू दे

नित्य नभाशी संभाषण पण  घरट्याशी संवाद असू दे !

 

स्वप्नीच्या त्या गंतव्याची   दे  पांथस्था कोण हमी रे

वळणे वळणे तीर्थस्थाने   तीर्थाटन तव धन्य होवु दे !

 

विझून जाते अंतरज्योती   गोठुन जाती झरे आतले

मूर्तिमंत हे मरण टाळण्या  एक निखारा उरी जळू दे !

 

रणांगणी ह्या जखमी जो तो  कुणि घालावे कोणा टाके

ही तर गंगा रक्ताश्रूंची  ओंजळ तुझीहि विलिन होवु दे !

 

बरीच पडझड तटबंदीची   किती गनीम नि कितीक हल्ले…

तुझ्या गढीवर पण जिवनाचा  ध्वज डौलाने नित फडकू दे !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares