मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फेरे प्रारब्धाचे… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

सुश्री प्राची जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ फेरे प्रारब्धाचे… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

निळ्या आसमंती झाली ढगांची दाटी

काळ्याभोर ढगांतूनी सूर्यकिरणे डोकावती – –

*

ढगांनी व्यापलेले हे काळेभोर आकाश

मनावरील मळभ खोलवर उदास – –

*

ढगांतूनी डोकावतो निळा निळा प्रकाश

जणू तो दाखवितो प्रकाशाची वाट – –

*

काळे ढग उन्मळूनी घनघोर बरसती

त्या पावसातल्या उन्हातूनी इंद्रधनुष्य डोकावती – –

*

सप्तरंगी इंद्रधनुष्याची अती तेजस्वी किरणे

पाहताना दिसे मज शिवधनुष्य पेलले रामाने – –

*

निसर्गाच्या लीलांवर असे प्रभुत्व परमेश्वराचे

मानवाच्या हाती उरे खेळ पाहणे किमयांचे – –

*

परमेशाच्या लीला असती अगाध

मानवाच्या बुध्दीला नसे तिथे वाव – –

*

हात धरी रामराया असा अलगद आपला

परमार्थाच्या भवसागरी पार करी प्रपंचनौका – –

*

सागरात दिसे रामनौका अशी दूरवर जाताना

जाणवे खोल मनात रामलक्ष्मण सीतेची व्यथा – –

*

वाटे असे…..

जिथे देव भोगी वनवास तिथे मानवाचे काय

प्रारब्धाचे न चुकले फेरे कुणा मानवा सात जन्मात – –

©  सुश्री प्राची अभय जोशी

मो ९८२२०६५६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तिच्या मानसी मी…☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ तिच्या मानसी मी ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

दुरावा तिचा हा जरा साहतो ना

तिच्या मानसी मी सदा राहतो….

*

तिचे राज्य माझे मनावरती हो

तरी तेच सारे प्रेमाने वाहतो मी

कसे रूप तिचे सावळे आभाळ ते

आभाळाशी जणू आहे माझे नाते…

अशा त्या तिला मी मनी पाहतो

तिच्या मानसी मी सदा राहतो…

*

कशी चाफेकळी सावळीशी छान

बटा ओघळती वेळावते मान

विना शृंगार ती दिसे मेनका हो

मन मोर नाचे केतकी बनी हो

तिची मूर्त अशी हृदी जपता

तिच्या मानसी मी सदा राहतो…

*

तिचा ध्यास माझ्या मिटे पापण्यात

तिला पाहतो मी रात्री चांदण्यात

धुके होऊनी ती लपेटून घेते

अलगद ओठ पहा टेकवते

तिच्या ह्या अदा नि रूपसंपदात

कळेना मला हो स्वप्नी की सत्यात….

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “सुख…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “सुख…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

मुक्त विहरती कशी पाखरे.. किलबिल किलबिल आकाश भरे

ऐकला परी कुणी कधी का, कलरव त्यांचा उसासे भरे

*

खळखळ झरझर पाणी वाहे, स्वतःच शोधे वाट नि वाहे

दिसले का परि कधी कुणाला. वैतागून ते थांबून राहे

*

वृक्षवेली अन बागा फुलत्या, वाऱ्यासंगे नितचीडोलत्या

दिसल्या का पण कुणा तरी हो, कंटाळून कधी चिडलेल्या त्या

*

राग लोभ अन मोह नि मत्सर, त्यांच्या वाटे कधी न जाती

विश्वच त्यांचे किती वेगळे.. सुख-दु:खाची मुळी न गणती

*

वाटे मजला रोजच त्यांना पहाटेच तो देव भेटतो

षड्रिपू त्यांचे बांधून ठेवून मुक्त तयांना करून जातो

*

आम्ही माणसे पाखंडी किती.. सुखनिधान ते उरी गाडतो

षड्रिपू सारे मुक्त सोडूनी.. सुख शोधत अन वणवण फिरतो

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 247 – मन स्वामिनी… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 247 – विजय साहित्य ?

☆ मन स्वामिनी…

(पंचाक्षरी कविता)

काय लिहावे

मना कळेना

मनाप्रमाणे

शब्द वळेना…! १

*

सुख दुःखाचे

कागद कोरे

सांगे कविता

जीवन होरे…! २

*

कधी वाटते

मन साकारू

भाव मनीचे

सुर आकारू…! ३

*

काय लिहावे

प्रश्न लिहिला

नापासातूंन

आलो पहिला…! ४

*

नाव लिहिले

गाव जाणले

शब्द सुतेला

हृदी आणले…! ५

*

अमृत गोडी

अक्षर लेणी

प्रकाश‌पर्वी

आशय नेणी…! ६

*

मायबोलीचे

रूप साजिरे

अर्थ प्रवाही

गोड गोजिरे…! ७

*

अक्षर लेणी

अक्षर गाथा

विनम्र भावे

झुकला माथा..! ८

*

सरस्वतीच्या

पाई वंदन

शब्द फुलांचे

भाळी चंदन..! ९

*

शब्द सुतेची

मना मोहिनी

प्रतिभा माझी

मन स्वामिनी….! १०

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंतोत्सव… ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ वसंतोत्सव… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

(पुरस्कृत कविता)

आला वसंत हा आला

चैतन्याने जो नटला ||धृ||

*

पीतफुले घेऊनिया

बहावाही बहरला

पांथस्थांना सुख द्याया

आनंदाने जो नटला ||१||

*

पुष्पें गुलमोहराला

रक्तवर्णे तळपला

ग्रीष्मासंगे जो फुलला

रस्ता मखमली झाला ||२||

*

पर्णपाचू बहरला

हिरवाई ने सजला

पुष्पांसवे तो रंगला

ग्रीष्मासवे जो दंगला ||३||

*

मोद मना मना झाला

वसंताने तोषविला

कूजनाने वेडावला

गंधांसह रुजविला ||४||

*

आला वसंत हा आला

उत्सवात जणू न्हाला ||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवनगाणे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवनगाणे☆ श्री अनिल वामोरकर ☆

वाटेला आलेले

जगलो जीवन

आव्हाने पेलीत

चालत राहीलो..

*

निवांत क्षणी

भूत आठवला

हळूच हसलो गाली

पण होतो कधी रडलो..

*

बसलो सुसज्ज अशा

मखमली सोफ्यावर

आठवले मज मग

लोखंडी खुर्चीत बसलेलो..

*

पुर्ण बाहीचा सदरा

सुखावह स्पर्ष तो

भयावह ते दिवस

का उगा आठवित बसलो…

*

गुणगुणतो गाणे

माझेच वाटे मजला

दुखभरे दिन बितेरे भैया

अब सुख आयो रे

रंग जीवन मे नया अब आयो रे….

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ माया… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ माया… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

दृश्य अनोखे आज 

रस्‍त्‍यावर मला दिसले

पाहून निर्मळ प्रेम ताईचे 

डोळे माझे ओले झाले 

*

असेल हरवले बहुदा

छत्र डोईवरचे मायेचे 

आले म्हणून ताईला 

भान मग कर्तव्याचे

*
घेण्या छोट्याची काळजी 

जरी बालपण गमावले 

शिरणे भूमिकेत आईच्या 

तिने आनंदाने स्वीकारले

…. तिने आनंदाने स्वीकारले

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाहुनी बहावा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पाहुनी बहावा... ? सौ शालिनी जोशी 

पाहुनी बहरलेला तो बहावा

सहजच शब्द आले वाहवा

*
घोसांनी पिवळ्या तरु तो झाकला

भूमीवर गालिचा पिवळ्या फुलांचा अंथरला

*

जणू पितांबर नेसुनी श्रीराम मूर्ती अवतरली

आणि धरती ही पिवळे वधूवस्त्र लेवून सजली

*
जणू तरुवर रघुराजाने वर्षाव सुवर्णाचा केला

सडा त्याचा धरणीवरही पडला

*
पिवळ्या रत्नांचे जणू टांगले झुंबर

प्रकाशकिरण त्यातून पडले भूमीवर

*
निसर्गाचा वातावरण तज्ज्ञ हा तरु

बहरानंतर साठ दिसांनी पाऊस होई सुरू

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 269 ☆ खुशी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 269 ?

☆ खुशी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

एक हिंदी कवयित्रीनं विचारलं माझ्यासमोरच,

दुसऱ्या हिंदी कवयित्रीला—

“ये प्रभा सोन – वणेजी है ना,

महाराष्ट्र इकाई की अध्यक्ष?

बहुत अच्छा चला रही है,

महाराष्ट्र इकाई!”

खूप छान वाटलं होतं,

पण तेव्हा मला आठवली,

माझ्याबरोबर काम करणारी,

वेदस्मृती- महाराष्ट्र इकाई मंत्री!

खूप प्रगल्भ, सुजाण कवयित्री,

तिच्यामुळेच हताळलेली,

काही हिंदी वृत्ते,

आपल्या यशात नेहमीच,

सामिल असतात,

आपले आप्तस्वकीय,

कुठल्याही कामाचा असू नये गर्व, दंभ,

एकटीनेच एव्हरेस्ट जिंकल्यासारखा!

“खुशी बाँटनेसे  दुगुनी होती है”

हे भान असलेल्या,

माझ्यातल्या मी वर मीच,

खुश असते मी नेहमीच!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनानिमित्त – पुस्तक… ☆  मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनानिमित्त – पुस्तक ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

वाचावं पुस्तक अन

घ्यावे जगांच ज्ञान

पुस्तक चाळून चाळून

शोधावं आपलं पान

*

पुस्तक लिहिलं तर

लोकांना कळलं पाहिजे

माणसाशी माणूसकीचं

नातं जुळलं पाहिजे

*

खरंतर पुस्तक म्हणजे

प्रत्येकाचं आयुष्य असतं

बरंच सारं भरून जातं

कुठलं पान कोरं नसतं

*

पुस्तक देतात पंख

करण्या गगन विहार

बघा असंख्य नेत्रांनी

शोधा मनाचा हुंकार

*

पुस्तकी असे ओलावा

पानाही पालवी फुटते

काळजात फुटतो पान्हा

समुद्रालाही भरती येते

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares