मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जि व ल ग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 जि व ल ग ! 🙏 श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

आता थांबवीन म्हणतो

जरा शब्दांशी ते खेळणे,

त्यांनी तरी किती नाचावे

सदा माझ्या मनाप्रमाणे !

*

कशी कोण जाणे याची,

लागे शब्दांना कुणकुण,

सोडले अचानक त्यांनी

माझ्या डोक्यातील ठाणं !

*

गेले असेच दोन दिवस

सरल्या रात्री दोन-तीन,

‘ते’ परतणे शक्य नाही

याचे मज आले भान !

*

आज अवचित पडता

थाप डोक्याच्या दारावर,

उघडून पाहता दिसले

माझेच मला जुने मैतर !

*

गळा भेट होता आमची

सारे मनोमनी सुखावलो,

नाही सोडणार साथ कधी

एकमेका वचन देते झालो !

एकमेका वचन देते झालो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कष्टाचा सुगंध… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ कष्टाचा सुगंध… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

जिथवर हात पोहोचतो

तिथवर रचून थरावर थर

दिवसभर तो ओझे वहातो

त्यावर चालतं त्याचं घर

*

कष्टाने घाम फुटतो 

अन् वहातो तो देहावर

 त्याच घामावर कमावतो

 घरच्यांसाठी अन्न घासभर 

*

 घासभर त्या परब्रह्माला

 कष्टाचाच सुगंध असेल 

 त्या सुगंधाच्या शोधासाठी

उद्या तो कामावर हजर असेल

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ते… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ते… ☆ प्रा. भरत खैरकर 

ते आराखडे नवे आखीत आहे

तळवे वेळोवेळी चाखीत आहे.

*

‘होईल उध्दार मागुनी तुमचा ‘

ज्योतिष्याचे हे भाकीत आहे.

*

माणसाला न ज्यांच्या ठायी निवारा

हाय! दगडापुढे ते वाकीत आहे.

*

मिळाला न ज्यांना जीवनात कैफ

डुंबले रात्रंदिन ते साकीत आहे.

*

उलटेच सारे व्यवहार येथे

शेत कुंपणाला राखीत आहे.

*

कुणाचे तेल अन् दट्ट्या  कुणाचा?

आपापली सारे माखीत आहे.

*

मोक्याच्या ठिकाणी फाटलेच वस्त्र

ठेवून हात आता झाकीत आहे.

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “चैतन्याचे गमक…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “चैतन्याचे गमक” ☆ सौ राधिका भांडारकर 

(पादाकुलक वृत्त)

 फांदी वरती पक्षी गातो

मधुर स्वरांनी मना झुलवतो

रूप पाहुनी सुंदर त्याचे

चैतन्याचे गमक वाटतो ॥१॥

 *

धवल लाट ती येत किनारी

शुष्क वालुका ओली करते

स्पर्श तिचा तो पदास होता

आनंदाची लहर दाटते ॥२॥

 *

एकच तारा तो आभाळी

बेचैन मना धीर वाटतो

सांगावे की गुपित तयाला

अंतर्यामी दीप लागतो ॥३॥

 *

रानफूल ते गवतावरचे

स्वच्छंद कसे छानच झुलते

चिंता नसते त्या सुकण्याची

असेच जगणे ऊर्जित करते ॥४॥

 *

क्षितिजावरती भास्कर जातो

पहाट येण्या पुन्हा उद्याची

ऋतुचक्र असे हे सृष्टीचे

जाण मेख ही चैतन्याची.॥

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 245 – पाण्याचा परीस… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 245 – विजय साहित्य ?

☆ पाण्याचा परीस…

(अभंग वृत्त.)

नाना बाळलेणी  …

सजविली गेही

बाळकडू देही  … 

पाण्या तुझें….! १

*

आयुष्य प्रवास  … 

खोल उरातून

जलास टाळून …

शक्य नाही….!२

*

भागविते तृष्णा … 

जिवनाची धार

जीवन आधार …

जलस्रोत…!३

*

कोरड्या मनाला  …

माणसांची आस

पावसाळी श्वास  …

पाण्या तुझा ….! ४

*

पाण्यासाठी होई  …

त्रिलोकी संचार

पाणी उपचार   …  

फलदायी…!५

*

पाण्याविना जीव …

जाई आभाळात

येतसे धोक्यात …

लवलाही…!६

*

पाण्याचे आभाळ …

पाण्याची जमीन

सजीवांची नीव  …

पाणी पाणी …!७

*

सजीवांची ‌वृद्धी …

निर्जीवांचा‌ क्षय

नको अपव्यय …

पाण्याचा या..!८

*

पिकल्या फळांची …

कोवळ्या पानांची

पैदास धान्याची …

पाण्यावर….!९

*

पाण्याचीच वाफ …

वाफेतून वीज

सृजनाचे बीज …

शक्ती रूप…!१०

*

येताना जाताना …

क्रिया विधीसाठी

जीवनाच्या गाठी …

आचमनी…!११

*

कुणीच नाही रे …

जगी पाण्याविना

सृष्टी तरलीना …

दिगंतरी…!१२

*

आईचा गाईचा …

पान्हा कसदार

जीवन आधार …

जलबिंदू…!१३

*

पंचमहाभूती …

पाण्यातच शक्ती

पाण्याची आसक्ती …

ठायीं ठायीं…!१४

*

पाण्याचा परीस …

 सौभाग्य कनक

सृजन जनक …

संजीवक…!१५

*

कविराज शब्दी …

साकारे‌ घागर

आकारे सागर …

आशिर्वादी…!१६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गझल… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ गझल☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(आम्ही सिध्द लेखिका संस्था, राज्यस्तरीय गझल लेखन स्पर्धा २०२५. वर्ष तिसरे उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त कविता )

(मात्रा वृत्त — अनलज्वाला – ८|८|८)

किती अपेक्षा जगाकडुन या करतो आपण

थट्टेचा मग विषय जगाचा बनतो आपण

*

खरे नि खोटे पुरते माहित नसते तरिही

अर्ध्या हळकुंडाने पिवळे दिसतो आपण

*

झाड वाढते सहा ऋतूंची लहर सोसुनी

फक्त उत्सवी वसंत वैभव पुजतो आपण

*

बोलण्यातला अर्थ चुकीचा का लावावा

अर्थपूर्ण ती विरामचिन्हे पुसतो आपण

*

सुखदुःखाचा मेळ गुंफिते नियती अविरत

फक्त सुखाच्या पाठीमागे पळतो आपण

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फुललेला निसर्ग… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

फुललेला निसर्ग☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

फुललीस तू अबोली फुलण्यात बोललेली

वाटे मला असे की गजऱ्यास माळलेली

*

चाफा अबोल रुसला बोले अबोल गझला

प्राजक्त फार भुलला भुलला म्हणून फुलला

*

पाहून मोगऱ्याला नाते मनात फुलले

त्याचा सुगंध घेता मन हे खरेच भुलले

*

हा चंद्र पौर्णिमेचा झुलवेल चांदण्याला

फुलवून रातराणी प्रेमात गंध भरला

*

पाहून दृश्य असले तो मात्र शांत आहे

उंबर असा कसा हा वैराग्य त्यास आहे

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सखी कवितेस… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ सखी कवितेस… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

(मुक्त छंद)

कविते, तू आहेस तरी कोण ?

माझ्या भावना जाग्या करून

मुक्त करणारी सखी?

तू आहेस म्हणून तर मी जगतेय!

तुझा हात धरून हळुवार फिरतेय

*

सखी कविते, तूच माझी

जीवनदायिनी आहेस!

तूच माझे अस्तित्व टिकवलेस!

मी उन्मळून गेले तेव्हा,

तूच मला सावरलेस!

 

सखी कविते, तू आहेस अथांग!

लपतेस तू अंतरंगात !

 

भावनांचा कल्लोळ करताना,

घेतेस शब्दांचा आधार!

तुझे वर्णन मी काय करणार?

सखे, तू तर जीवनाधार!

 

मनाच्या अथांग सागरी तरंगतेस

 अन् माणिक मोत्यासारखी

येतेस!

माझ्या लेखणीत,

सजीव जीव बनून!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || आई कळली सगळी || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

☆ || आई कळली सगळी || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

चूल मांडली वेगळी, मजा वाटली आगळी

दिसा माग दिस गेले, आई कळली सगळी

*

खूणा सांगती भाजल्या, खस्ता केवढ्या खालल्या

तिने मारता फुंकर, थंड कातडी सोलल्या

*

किती कमवावे तरी, काही हिशेब लागेना

धुंडाळले डबे सारे, भूक त्यानेही भागेना

*

कशी जपू नातीगोती, अडसर कुंपणाचा

तिच्या पदराचा झेंडा, साज होतो अंगणाचा

*

जेव्हा थोडे आईपण, आले माझ्या खांद्यावर

झाला चेहरा मळका, थांबल्याने बांद्यावर

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जादू… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जादू… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

शितलता

दोहोतही

एक शशी

दुजी सदगुरु आई…

*
सुखद शांत

तरंगे मन

अलवार क्षण

पिसापरी वर जाई…

*
उघड्या नयनी

ध्यान लागे

निसर्ग पाहूनी

मन आनंदाने नाचे….

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares