मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती रक्त चंदनाची पहाट… ☆ श्री संदीप काळे ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

?जीवनरंग ?

☆ ती रक्त चंदनाची पहाट… ☆ श्री संदीप काळे ☆

मी विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. उन्हाळा जोरात सुरू झाला होता. सकाळी आठ वाजता जोराने ऊन लागत होते. रस्त्याच्या कडेला पळसाच्या झाडावर लालभडक असलेली फुलं लक्ष वेधून घेत होती. एक व्यक्ती धोतर कमरेला खोवून पळसाच्या झाडावर चढून फुले तोडत होती. त्या व्यक्तीला पाहून मला राहवलं नाही. मी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि त्या वर चढलेल्या व्यक्तीला म्हणालो, “दादा जरा दोन-चार फुले मला द्या ना. “

माझा आवाज ऐकून त्या व्यक्तीने हातामध्ये असलेली फुले माझ्या दिशेने खाली फेकली. मी त्या फुलांचा झेल घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून अर्धी फुले हातात राहिली आणि आर्धी फुले खाली पडली. असे वाटत होते, त्या फुलांच्या स्पर्शाने धरणीमाता ही आनंदून गेली असेल. हातात पडलेली ती फुले मी तशीच छातीला घेऊन कवटाळली. त्या फुलांमुळे वसंत ऋतू एवढ्या उन्हामध्ये किती प्रसन्नतेने आपलं स्वागत करत आहे, असेच मनोमनी वाटत होते.

मी ती फुले घेऊन आता निघणार, तितक्यात माझे लक्ष त्या फुले तोडणाऱ्या व्यक्तीकडे गेले. तो इतक्या गडबडीने एवढी फुले का तोडत असेल, असा मला प्रश्न पडला होता. तो फुले तोडायचा आणि त्या रिकाम्या थैलीमध्ये टाकायचा. त्या व्यक्तीची थैली आता भरत आली होती. मी थोडे जवळ जाऊन त्या व्यक्तीला विचारले, “एवढी फुले कशाला हवी आहेत?”

तो म्हणाला, “रंग करायला. “

मला माझे बालपण आठवले, मी लहानपणी होळीला याच फुलांचा रंग करायचो. मी त्या व्यक्तीला म्हणालो, “तुम्ही फार हौशी दिसताय. या काळातही ह्या फुलांचा रंग करताय म्हणजे कमाल आहे तुमची. “

तो म्हणाला, “साहेब मुलींसाठी करतोय, त्यांना या मुलांचा रंग फार आवडायचा. त्यांच्या आठवणीत मी आणि माझी बायको दोघेजण दर वर्षी रंगपंचमीला त्यांच्या समाधीला या फुलांच्या रंगाची अंघोळ घालतोय. “

मला त्या वडिलांची असलेली भावना पाहून आश्चर्य वाटलं. मी काही न बोलता तिथेच थांबलो. तो माणूस खाली आला. कमरेला खोवलेले धोतर त्याने सोडले. त्याच धोतराने त्याने डोक्यावर आलेला घाम पुसला.

मी म्हणालो, “काय झाले होते मुलीला. “

तो म्हणाला, “काय सांगावे, साहेब, खूप मोठी कहाणी आहे. जाऊ द्या. काळाने माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून हिरावून घेतल्या. ” तो त्या पुढे काहीही न बोलता पुढे जात होता आणि मी त्याच्या मागे. आमचे बोलणे सुरू असताना तो व्यक्ती मधेच म्हणाला, “साहेब वाट छोटी आहे. त्यात आजूबाजूने इर्षेतून भावकीने काटे टाकले आहेत. “

 मी म्हणालो, “भावकीने अर्जुनालाही सोडले नाही, आपण कोण?”

 माझे बोलणे एकूण तो व्यक्तीही हसला. आता तो माझ्याशी बोलण्यात हळू हळू खुलत होता. आमचे बोलणे सुरू असताना, दुरून एका महिलेने आवाज दिला, “अहो काय करून राहिले, चला ना लवकर, किती वेळ आहे अजून, मला उन्हाच्या अगोदर घरी पोहचायचे आहे. ”

मला त्या व्यक्तीच्या मागे पाहून त्या बाईच्या आवाजाचा सूर थोडा कमी झाला. आम्ही आंब्याच्या झाडाखाली असलेल्या लाकडी पलंगावर बसलो. बाजूला पाण्याचा माठ भरला होता. त्या माठातले पाणी थंड राहावे यासाठी त्यावर ओले करून फडके टाकले होते. ती व्यक्ती त्यांच्या बायकोला माझी ओळख करून देत म्हणाली, “साहेब मुंबईचे आहेत. यवतमाळला जात आहेत. राजश्री आणि विजयश्री विषयी त्यांना मी सांगितले, त्यांना फार वाईट वाटले. बोलत बोलत आले माझ्यासोबत. “

त्या माऊलीने मान हलवत मला पाणी दिले. मी ती व्यक्ती आणि त्यांची पत्नी आम्ही बोलत बसलो. कुणाच्याही वाट्याला एवढे दुःख येऊ नये, एवढे दुःख या दोघांच्या वाट्याला आले होते. जगावे तर का? आणि मरावे तर का? असा प्रश्न त्या दोघांच्या समोर निर्माण झाला होता.

शेतकरी मोठा असो की छोटा, सततची नापिकी, पिकले तर चांगला भाव नाही, हे सर्व शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले. शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था कोणी विचारू नये आणि कुणी सांगूही नये अशीच होती आणि आहेही.

मी ज्यांच्याशी बोलत होतो ते त्रंबक जाधव आणि त्यांची पत्नी देवकी जाधव यवतमाळ पासून जवळच एका खेडेगावात राहतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित २७ एकर जमीन होती. त्यातून विकून विकून त्यांच्याकडे आता तीन एकर जमीन आहे. त्यांच्या राजश्री आणि विजयश्री या दोन मुलींनी दोन वर्षांपूर्वी स्वतःचे आयुष्य संपवले.

राजश्री आणि विजयश्री या दोघींच्या लग्नाची घरात चर्चा सुरू होती. पाहुणे यायचे, पसंत करायचे आणि हुंड्यासाठी आग्रह धरायचे, मोठे लग्न करून द्या म्हणून आग्रह धरायचे. खूप मागणीमुळे लग्न काही जमेना. त्रंबक आणि त्यांची पत्नी देवकी यांची काळजी दिवसेंदिवस वाढत होती.

आई वडिलांना होणारा त्रास दोन्ही मुलींना पाहवत नव्हता. त्याच काळात हुंड्यासाठी, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्या सतत कानावर पडत होत्या. त्रंबक म्हणाले, “माझ्या दोन्ही मुली मरणाच्या आठ दिवस अगोदर रात्री एक झोपायची एक जागी राहायची. आम्हा नवरा-बायकोला हे का होत होते हे कळाले नाही. आम्ही जेव्हा खोलीमध्ये जाऊन माहिती घेतली तर कळाले. मी काही टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या वगैरे तर करणार नाही, याची काळजी त्या त्या दोघींना वाटायची, म्हणून त्या रात्री जागी राहायच्या, माझ्या मागे मागे शेतात यायच्या. मरणाच्या आदल्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या, दोन्ही पोरी खूप मोठ्या झाल्यासारख्या आमच्याशी बोलत होत्या. आमच्या दोघांचे पाय दाबत होत्या. ‘बाबा तुम्हाला कशाचेही टेन्शन येणार नाही, तुम्ही नका काळजी करू. पुढच्या जन्मी आम्ही दोघीही मुले म्हणून तुमच्या पोटाला जन्माला येऊ. ‘

चंदनाचा लेप उगाळताना मुलींच्या गप्पा सुरू होत्या. राजश्री म्हणाली, ‘बाबा मी पळसाची फुले रंगासाठी भिजवली आहेत, या वर्षी तुम्हीही आमच्यासोबत रंग खेळाल ना? आम्ही दोघी कुठेही असो, बाबा आम्हाला दर रंगपंचमीसाठी याच फुलांचा रंग पाहिजे हा?’ त्रंबक म्हणाले, ‘हो बेटा, नक्की मिळेल, का नाही. ?”

असे आम्ही दोघे बोलताना मध्येच देवकी म्हणाल्या, “दोन्ही मुली अशा का बोलतात याचे मला खूप आश्चर्य वाटले, “

त्रंबक म्हणाले, “का कुणास ठाऊक, त्या रात्री सकाळी सकाळी काहीतरी वाईट घडणार आहे, असं मला मनोमनी वाटत होते. त्या दिवशी सकाळी सकाळी घरात दोन मांजरांच्या भांडणात डब्बे खाली पडले आणि आम्हाला जाग आली. आमची दोघांची नजर मुलींच्या अंथरुणाकडे गेली, तिथे मुली नव्हत्या. आमच्या पोटात एकदम धस्स झाले. अशा मुली न सांगता कुठेही गेल्या नाहीत, एकदम गेल्या कुठे असे आम्ही एकमेकांना विचारत होतो. तेव्हढ्यात माझ्या भावाचा मुलगा पळत घरी आला आणि म्हणाला, ‘मोठे बाबा शेताकडे चला, दोन्ही पोरींनी फाशी घेतली. ‘

आम्ही रडत पडत शेतात गेलो, तेव्हढ्या सकाळी अवघे गाव आमच्या शेतात जमले होते. आम्ही रात्री झोपलो होतो, पण मुलींनी झोपल्याचे सोंग घेतले होते. आम्ही झोपल्यावर मुली घरातला मोठा दोर घेऊन कधी शेतात गेल्या आम्हाला कळाले नाही. सकाळी आम्ही शेतात जाऊन पाहिले तर काय दोन्ही मुलींनी गळ्याला फास लावून आत्महत्या केली होती. त्या झाडाला लटकत्या मुली पाहून आम्ही दोघेही बेशुद्ध पडलो.

आम्हाला जाग आली तेव्हा दोन्ही मुली स्मशानात होत्या. आम्हीही तिथे पोहचलो. रडण्यासाठी शरीरात ताकत नव्हती. रात्री जे चंदन मुलींनी उगाळून काढले होते, ते चंदन पहाटे रक्त चंदन होऊन येईल असे कधी वाटले नव्हते. ” ते दोघेही मुलींची आत्महत्यांची कहाणी सांगून हामसू हामसून रडत होते.

त्या दोघांची समजूत काढण्याची माझी हिंमत होत नव्हती. शेवटी रडून रडून रडणार तरी किती? ते दोघेही उठले, स्वतःला सावरत त्यांनी त्या पळसाच्या फुलांचा रंग केला. ज्या ठिकाणी त्या दोन्ही मुलींची समाधी होती, तिथे तो रंग टाकला. एकीकडे त्या पळसाच्या फुलांचा अभिषेक त्या मुलींच्या समाधीवर होत होता, तर दुसरीकडे अभिषेक करणाऱ्या आई बाबांच्या डोळ्यातील अश्रूही त्या रंगात मिसळत होते. ते सारे दृश्य पाहून माझ्यासारख्या हळव्या मनाच्या माणसाचे अश्रू डोळ्यांतून बाहेर येत होते.

त्यांना थोडीबहुत मदत करून, मी त्या दोघांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. शेती करणाऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे, याचे देणे घेणे कुणालाही नाही. त्रंबक जाधव आणि त्यांची पत्नी देवकी जाधव यांच्यासारखे हतबल शेतकरी कुटुंब आपल्या अवतीभवती तुम्हाला भेटतील, त्यांना नक्की मदत करा, त्यांना आधार द्या. बरोबर ना.

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नरहरीरायाचे दर्श…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “नरहरीरायाचे दर्शन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

नरहरी राया यायला निघाले बघ तुझ्या दर्शनाला..

 मनातूनच अशी ओढ लागते.. तुझी तीव्रतेने आठवण येते.. आणि यायला निघतेच….

 तशी सगळ्याच देवांवर श्रद्धा आहे पण तू……. कुलदैवत आहेस ना.. म्हणून तुझ्यावर जरा जास्त माया आहे…. त्या ओढीनेच निघते.

मला तर वाटते… कुलदैवत ही संकल्पना यातूनच आली असावी.

हा देव माझा आहे….. ही भावना मनात रुजते.. त्या देवी.. दैवता विषयी मनात भक्ती बरोबरच आपलेपणा वाटतो… तो जवळचा वाटतो.. तो देव हक्काचा वाटतो…

टेंभुर्णी फाट्याला वळून वीस-बावीस किलोमीटर गेलं की येतं तुझं नरसिंगपुर….

नीरा नदीच पाणी संथ वाहतं असतं. पुलावर गाडी गेली की लांबूनच कळसाचं दर्शन होतं.

अरे देऊळ जवळ आलं की……

थोड्याच वेळात तुझ्या पायऱ्यांपाशी येऊन पोहोचते. तुझे ते भव्य बुरूज त्यावर उडणारे पोपट पहात क्षणभर उभी राहते. नंतर पायऱ्या चढायला सुरुवात करते. हल्ली अर्ध्या पायऱ्या चढून गेलं की जरा वेळ थांबते… सत्तरी झाली रे आता.. पूर्वी कसं भरभर चढून येत होते. आसपास बघते थांबते.

 आजकाल अस थांबणं पण आवडायला लागलं आहे… न पाहिलेलं दिसायला लागलं आहे….

आधी प्रल्हादाला भेटते. त्या लेकराचं दर्शन घ्यायचं.. त्याच्या थोर भक्तीमुळे तू आम्हाला मिळालास.

 आरतीत म्हटल्याप्रमाणे..

” प्रल्हादाच्या इच्छेसाठी

 देव प्रगटे स्तंभा पोटी

 ऐसा ज्याचा अधिकार

 नमु त्यासी वारंवार…. “

त्याला वंदन करून मग तुझ्याकडे यायला निघते. तुझ्यासमोर बसलं की मन आनंदून जातं…. प्रेमभराने तुझ्याकडे बघत राहते. लाल पगडी, पिवळा पितांबर, शेला पांघरलेला, गळ्यात हार.. तुझं रूप मनात साठवते..

मंद समई तेवत असते. धूप, उदबत्ती फुलांचे हार, यांचा संमिश्र वास आसपास दरवळत असतो.

समोर बसून काय बोलू रे तुझ्याशी…. आता ते पण कमी झालं आहे… तुला सगळं कळतं.. आता मागणं तर काहीच नाही. आहे त्यात समाधानी आहोत. तुझी सेवा घडू दे. अंतरंगाला तुझा ध्यास असू दे. तेवढ्यानी मन शांत होणार आहे… तूच एक त्राता आहेस हे समजले आहे.

” दया येऊ दे आमची मायबापा

करी रे हरी दूर संसार तापा

अहर्निश लागो तुझा ध्यास आम्हा

नमस्कार माझा नरहरी राया… “

प्रेमाने परत डोळे भरून बघते.. आणि निघते लक्ष्मीआईंना भेटायला…

 एक सांगू…. तुझा थोडा धाक वाटतो रे.. बापासारखा…

लक्ष्मी आई मात्र भोळी भाबडी.. साडी चोळी घालून. साधंसं मंगळसूत्र घालून उभी असते. तिला काही भपका नाही.. मला तर ती आई, मावशी, काकू सारखीच वाटते.. आमची वाट बघत तुझ्या बाजूला उभी असते बघ… तिच्याजवळ दारात बसून मनमोकळं बोलते.

बापाशी बोलता येत नाही ते आईलाच सांगणार ना रे लेक…… तिला सगळं सांगून झालं की मन भरून येत.. शांत वाटतं. तिचा आश्वासक चेहरा बघून मन तृप्त होतं…

…. प्रदक्षिणा पूर्ण करून तुझ्याकडे येते. परत दर्शन घेते.. तू भक्कम पाठीशी आहेस म्हणून काळजीच नाही रे…. देवळात येऊन आसपास हिंडून, तुला बघून खूप आनंद होतो बघ… म्हणूनच आठवण आली की येते तुला बघायला….

आता मात्र निघते रे… खूप कामं पडली आहेत… काही नाही रे….. आज सकाळीच तुझी आठवण आली म्हणून आले होते भेटायला…… लागते आता कामाला… दूध आलं आहे ते तापवायचे आहे.. चहा करायचा आहे… पेपर आत घ्यायचा आहे.. सुरू झाला आमचा संसाराचा गाडा…..

तुम्हाला मनातलं सांगू का…..

पूर्वीसारखं वरचेवर त्याला भेटायला जाणं होत नाही.. मग अशीच जाते….. हल्ली तेच आवडायला लागलं आहे. कुणी नसतं देवळात… नरहरी राया आणि मी … त्या निरामय शांततेत त्याच्याशी मनानी जोडली जाते … ते काही क्षणच खरे असतात.. सच्चे असतात…. निर्मळ असतात हे आता कळलेले आहे… त्यामुळे ते फार हवेसे वाटतात….

 तुम्ही पण अनुभव घेऊन बघा… तुम्हाला पण येईल ही प्रचिती…

…… आपल्या मनातल्या देवाची…. मग तो देव कुठलाही असू दे…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ५ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी  ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

डोंगल ते वाय फाय (बालपण) भाग – ५ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

श्रावण तसा मन भावन. भरपूर पाऊस होऊन गेलेला. श्रावणाची रिमझिम, उनं पावसाचा खेळ, सोनेरी सूर्याची किरणे त्यात पडणारा पाऊस मध्येच आकाशात इंद्रधनुष्याचे आगमन, मन प्रसन्न करणारे वातावरण.

मातीच्या भिंतीनी धरलेली ओलं. प्रत्येक भिंतीवर बाहेरून उगवलेले गवत आणि आघाडा गवतावरची फुले, बारीक तुरा. रस्त्यावर पण हिरवळ. झाडानी धरलेलं बाळस. परसात भारलेली फुलांची झाड. फुलांच्या वसातील दरवळ. त्यात गुलबा क्षची लाल चुटुक फुले, झेंडूचा वास अनेक प्रकारच्या वेलिंचे जाळे, न सांगता उगवलेले. ही साक्ष म्हणजेच, श्रीचे आगमनाची चाहूल.

 घरात गणपतीची लगबग.

गणपतीचा कोनाडा व जवळ जवळ सगळा सोपा रंगानी सुशोभीत केलेला. श्रीची मखर तयार करण्यासाठी दिवस रात्र एक.

 कुंभार वाड्यात सगळ्यांची वर्दळ. अनेक प्रकारच्या गणेश मुर्त्या तयार झालेल्या. त्यातीलच एकाची निवड करून आमच्या नावाची चिठी त्या गणेशाच्या किरीटवर लावलेल्या असतं.

 एकदाचा तो दिवस आला की सगळीकडे धामधूम. आम्ही गल्लीतील सर्वच जण एकत्रित मूर्ती आणित असू. प्रत्येकांच्या कडे पाट. त्यावर श्री बाप्पा विराजित होतं असतं. कुंभारला पान सुपारी व दक्षणा देऊन मुर्त्या बाहेर पडत, त्या निनाद करतच. प्रत्येकाकडे

घंटी, कैताळ, फटाक्यांचा आवाज आणि जयघोष करत, आपापल्या घरी बाप्पा येत. दरवाज्यात आले की, त्याच्यावरून लिंब लोण उतरून टाकले की बाप्पा मखरात बसत. फटाके फक्त गणपतीच्या सणात मिळत एरवी नाही.

 प्रत्येकाच्या घरी रोज सामूहिक आरती, मंत्रपुष्प, प्रसाद वाटप हे ठरलेलं. रोज वेगवेगळे नैवेद्य. असे दहा दिवस कसे सरत जात होते ते कळत नसे. त्यात भजन कीर्तन वेगळेच. शाळेत पण गणपती बसवत व ते आणायला आम्हालच जावे लागे. रस्ता पावसानी राडेराड कुठे कुठे निसरडे रस्ते. त्यावेळी डांबरी सडक नव्हतेच. त्यात आम्हा मुलांची मिरवणूक. नेमके दोन चार जण तर पाय निसरून पडत असतं. मग ते इतर जण हसतात म्हणून, घरी पोबारा करीत.

 सातवी संपली बरेच मुले दुष्काळी परिस्थिती मुळे इकडे तिकडे कामाला लागली. मलाही पाणी भरण्याचा कंटाळा आलेला. मी पण सातवीत जे गाव सोडले ते आजतागायत!

 गावापासून पाचशे किलोमीटर लांबवर मी आठवीत प्रवेश घेतला त्यावेळी माझं वय होतं ते फक्त 12 वर्षे! एक वर्ष लवकरच शाळेत घातलं गेल.

अनोळखी गाव व तिथले राहणीमान ही वेगळेच. भाषा मराठी पण मराठवाडी. येथे मात्र गोदावरी कठोकाठ वाहत होती. दिवसातून चार वेळा मुबलक पाणी नळाला येत असले तरी, माझी अंघोळ ही गंगेकाठी चं सलग तीन वर्षे नदीत अंघोळ. महापुरात पण पोहण्याचा सराव.

 तस हे तालुक्याचे गाव पण चहुकडे मोठे मोठे दगडी वाडे. एक एक दगड दोन फुटांचा लांब आणि रुंद. निजामशाही थाटातील वड्यांची रचना. तीन तीन मजली वाडे. निजामचे बहुतेक सगळेच सरदार, दरकदार असावेत असे. प्रत्येक घराला

टेहळणी बुरुज पण असलेला. अजूनही बरेच वाडे जश्यास तसेच आहेत.

 मंदिराच गाव असं म्हटलं तर वावगे ठरु नये. गावात बरीच हेमाड पंथी मंदिरे. गोदा काठी तर अगणित मंदिरे. काठाला दगडी मजबूत तटाची बांधणी. बऱ्याच मंदिराचे जीर्णोद्धार हे अहिल्यादेवी होळकर ह्यांनी केलेले. गावात सुद्धा दगडी रस्ता. पण गाव हे गल्ली बोळाचे. अरुंद रस्ता व बोळ. वाडे मात्र टोलेजंग. गाव तस सनातनी धार्मिक. पूजा, अर्चना, भजन कीर्तन, पुराण हे सगळीकडे चालूअसलेलं. का बरं असणार नाही.

हे चक्क संत जनाबाईचे जन्मस्थान! संत जनाबाईचे गाव. वारकरी संप्रदाय पण मोठा. सगळ्या देवी देवतांची मंदिरे.

त्यात तालुक्याचे गाव. निजामशाहीचा ठसा मात्र जश्यास तसाच होता. घराच्या दगडी महिरपी चौकट्या, त्यावर महिरपी सज्जा, सज्यातून वरच्या बाजूला महिरपी लाकडी चौकट. अवाढव्य मोठी घरे प्रत्येक घरात दोन्हीही बाजूला पाहरेकऱ्यांचा देवड्या लादनी आकारात सजलेल्या. प्रत्येक घरात सौजन्य, ममता आस्था, कणवाळू प्रिय जनता.

 तरीपण मला तिथे रमायला काही दिवस लागले, मित्र पण मिळाले. पण आमचे गावठी खेळ तिथे नव्हतेच. प्रत्येक घरात कॅरम बोर्ड, व पत्ते. पत्त्यात पण फक्त ब्रिज खेळण्यात पटाईत लोक दिसलें. कब्बडी खोखो हे मैदानी खेळ, मला आवडणारा खेळ फक्त लेझिम होता, बस्स. चिन्नी दांडू, वाट्टा, धापा धुपी, ईशटॉप पार्टी नव्हतीच! सायकल पण नव्हती! हे विशेष! शाळा झाले की रोज रेल्वे स्टेशनं वर नियमित फिरायला जाणे. सकाळी तासभर नदीत डुंबणे. कधीतरी मित्रासह मंदिरात जाणे. एवढाच कार्यक्रम.

शाळेत असताना मात्र बँड मध्ये सहभागी म्हणून पोवा फ्लूट वाजवायला घरी मिळाला. त्यावर मास ड्रिलचे काही वेगवेगळ्या धून आणि राष्ट्रगीत वाजवत बसणे. गावात असताना भजनात बसत असल्यामुळे सूर पेटीचा नाद लागलेला होता. तो आता येथे येऊन मोडला. स्वरज्ञान, राग आलाप हे आता फक्त फ्लूट वर येऊ लागले. कारण सुरपेटी वाजवायला मिळत नव्हतीच. कसेबसे तीन वर्षे त्या संत जनाबाईच्या गावात काढले, पण बालपण विसरून गेलो. खरी खोटी माणसे वाचवायला फार लवकरच शिकायला मिळाले.

 सुट्टीत गावी आल्यावर काही जुने मित्र भेटत, काही कायमचीच निघून गेलेली होती.

कॉलेज सुरु झाले तसे परत नवीन मित्र मंडळी भेटत गेली. आणि जगण्याची व्याख्या पण बदलत गेली.

क्रमशः…

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत !” –  भाग- १  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत !” –  भाग- १  ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

नायब सुभेदार संतोष राळे

त्याला त्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे… नऊवेळा माघारी धाडले! तरीही तो दहाव्यांदा परतून आला. त्याला आयुष्यात दुसरं काहीच प्यारं नव्हतं…. फक्त लढाई करायची होती! छत्रपती शिवरायांच्या जन्माने आणि कर्माने पावन झालेल्या भूमीत एका शेतक-याच्या पोटी जन्मलेल्या या मुलाच्या मनात एक गोष्ट निश्चित होती…. झुंज घ्यायची… परिणाम हा शब्द त्याच्या कोशात नव्हताच तर भीती हा शब्द तरी कसा असेल? दहावी उत्तीर्ण झाल्यावर कनिष्ठ महाविद्यालयासाठी गावातून तालुक्याच्या गावी जावे लागले तर तिथे हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक नजरेस पडायचे…. असे काही तरी हातून घडले पाहिजे… त्याचा विचार पक्का झाला!

त्याने या विचाराला कृतीची जोड खूप आधीपासून द्यायला आरंभ केला होताच. शेतात राबायचं, तालमीत कसायचं. शाळेत जाऊन-येऊन आठ दहा मैल पळतच यायचं… गोटीबंद शरीर तयार होत होतं. शरीराचं वजन उंचीला मागे टाकून पुढे धावत होतं… काही पावलं.

ते वर्ष १९९१-९२ होतं. भारतीय लष्करात वर्षातून अनेक वेळा भरती कार्यक्रम आखले जात. सैनिक म्हणून युवकांना भरती करून घेताना कडक मापदंड असतातच. शारीरिक आणि वैद्यकीय तपासण्या अत्यंत काटेकोर असतात. शैक्षणिक कौशल्यही तपासले जाते.

आपले हे पहिलवान पहिल्या भरतीला पोहोचले आणि सर्व कसोट्या लीलया पार करते झाले… धावणे, उंच उडी, लांब उडी, पुल-अप्स इत्यादी इत्यादी मध्ये पहिला किंवा फार फार तर दुसरा क्रमांक…. पण एक गोष्ट आडवी आली….. उंची आणि वजन यांचा मेळ बसेना. उंची तर कमी किंवा जास्त करता येण्यासारखी नव्हती…. मग वजन कमी करणे गरजेचे झाले. प्रयत्न क्रमांक दोन ते नऊ मध्ये दरवेळी दीड दोन किलो वजन कमी व्हायचे पण तरीही ते भरतीच्या निकषांच्या जवळ जाऊन थांबायचे…. रिजेक्टेड शिक्का ठरलेला!

दहाव्या वेळी मात्र दैव काहीसे प्रसन्न झाले… चिकाटी पाहून! नेहमीप्रमाणे सर्वच कसोट्या पार पडलेल्या… आणि भरती अधिकारी म्हणाले…. नहीं होगा! त्याच वेळी मात्र तेथे उपस्थित असलेल्या जबाबदार वरिष्ठ अधिका-याची नजर या पहिलवान गड्यावर पडली… चेहरा ओळखीचा वाटत होता… नऊ वेळा येऊन गेलेला पोरगा कसा विसरला जाईल? त्या साहेबांनी त्यांच्या अधिकारात या गड्याला लष्करात घेतलं! काहीच महिन्यांत अंगावर लष्कराची वर्दी घालायला मिळणार होती. बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप मध्ये सैनिक असलेले शरीरसौष्ठवपटू चुलते श्री. रमेश बळवंत यांच्या नंतर लष्करात भरती होणारा त्यांच्या परिसरातला हा केवळ दुसराच तरुण ठरणार होता.

बेळगावच्या मराठा लाईट इन्फन्ट्री प्रशिक्षण केंद्रांत पाऊल ठेवले तोच प्रवेशद्वारात छत्रपती शिवरायांचा पुतळा दृष्टीस पडला आणि तिथे प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांनी केलेला बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! हा घोष कानी पडला…. आणि खात्री पटली की आपली पावले योग्य मार्गावर पडत आहेत. पण इथेही उंची वजन गणित आडवे आले. इतर सर्व बाबी परिपूर्ण असल्या तरी देहाचे वजन काहीसे मर्यादेच्या पलीकडे होते. वैद्यकीय अधिकारी म्हणाले…. नहीं होगा! पण भारतीय लष्कराला एक शूर, निधडा जवान लाभण्याचा योग होता. दहाव्या भरतीच्या वेळी भेटलेले वरिष्ठ अधिकारी येथेही देवदूत म्हणून उभे राहिले….. संतोष तानाजीराव राळे हे आता मराठा लाईट इन्फन्ट्री मध्ये प्रशिक्षण घेऊन देशरक्षणासाठी स्वीकारले गेले! यथासांग प्रशिक्षण पार पडले…. कसम परेड झाली!

त्या साहेबांनी विचारले… कोणत्या बटालियनमध्ये जाणार? याची तर काहीही माहिती नव्हती! संतोष म्हणाले…. जिथे प्रत्यक्ष लढायला मिळेल तिथे पाठवा, साहेब! साहेब मनात हसले असतील… त्यांनी संतोष राळे यांना ७, मराठा मध्ये धाडले! ही पलटण सतत सीमेवर तैनात असते… अर्थात शत्रूच्या अगदी नाकासमोर… मर्दुमकी गाजावण्याची संधी मिळण्याची शक्यता अधिक! संतोष मोठ्या आनंदाने कर्तव्यावर निघाले. पहिली नेमणूक भारत-पाकिस्तान काश्मीर सीमेवरील पूंछ सेक्टर येथे मिळाली… शत्रू तिथून अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होता. इथे काही महिने काढले कसे बसे.. पण काहीच घडेना. रात्रभर दबा धरून बसायचे पण शत्रू काही गावत नव्हता… रायफल शांत शांत असायची हातातली! मग देशाच्या काही सीमांवर बदली झाली… भूतान देशात जाऊनही चीन सीमा राखायला मिळाली… पण रायफल अजून शांतच होती… त्यामुळे संतोष यांना अस्वस्थ वाटू लागायचं…. सैनिक आणि लढाई या एका नाण्याच्या दोन बाजू…. हा रुपया बंदा असला तरच खणकतो. काहीच वर्षांत कारगिल घडले. पण याही वेळी पुढे जायला मिळाले नाही. पण कारगिल युद्धविराम झाल्यानंतरही एका पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी गटाने भारताच्या काही चौक्या त्यांच्याच ताब्यात ठेवल्या होत्या. यांपैकी एक चौकी परत मिळवण्याच्या कामगिरीमध्ये मात्र संतोष यांना सहभागी होता आले होते! वाघाला शिकारीची चटक लागली होती! पण पुढे बरीच वर्षे तशी शांततेमध्ये व्यतीत झाली…. संतोषराव पुन्हा अस्वस्थ झाले.. त्यांचे बाहू तर फुरफुरत होतेच.

२००७ वर्ष होते. त्यांच्या जवळच उरी सेक्टर… मच्छिल येथे ५६, आर. आर. अर्थात राष्ट्रीय रायफल्स बटालियन कार्यरत होती. ही बटालियन त्यांच्या अतिरेकीविरोधी यशस्वी अभियानामुळे सतत चर्चेत असायची! मला आर. आर. मध्ये जायचे आहे… घातक कमांडो कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या जवान संतोष यांनी हट्ट धरला… दोनेक वर्षांनी वरीष्ठांनी सांगितले… जाव! आणि मग हा मर्द गडी प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात उतरला…. आणि रणभूमीने संतोष राळे यांची आर्जवे मान्य केली!

वर्ष २००८. अठरा अतिरेकी भारतात घुसणार आहेत.. अशी पक्की खबर लागली. त्यानुसार त्यांच्यावर चालून जाण्याची योजना तयार झाली. वरिष्ठ अधिका-यांनी दोन तुकड्या तयार केल्या. मागील तुकडीत संतोष साहेब होते. एक तुकडी पुढे दुस-या मार्गाने निघाली होती. त्या अठरा जणांना भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी जंगलाने वेढलेला एक रस्ता वापरणे अनिवार्य होते. या रस्त्यावर एक नाला होता आणि त्या नाल्यावर एक लाकडी पूल होता. नाल्यातील पाणी प्रचंड थंड असल्याने नाल्यात उतरून नाला पार करणे कोणालाही शक्य नव्हते. त्यानुसार त्या रस्त्याच्या आसपास सापळा लावून संतोष आणि त्यांचे सहकारी सैनिक दबा धरून बसले. पहाटेचे चार वाजले पण अतिरेकी दिसेनात. थंडीमुळे सैनिकांची शरीरे आकडून गेलेली.. तशाही स्थितीत बसल्या बसल्या शारीरिक व्यायाम करून शरीरांत उष्णता आणण्याचे प्रयत्न सुरु होते. पण उजाडले तरी अतिरेकी त्या लाकडी पुलावरून आले नाहीत. ज्या बाजूला आर. आर. ची तुकडी होती त्या बाजूला अचानक गोळीबाराचे आवाज येऊ लागले.. काही समजेना!

जसे आपले खबरी होते तसे अतिरेक्यांचेही खबरी होतेच. किंबहुना आपल्या खबरीने हेतुपुरस्सर चुकीचा दिवस सांगितल्याची दाट शक्यता होती… एक दिवस (किंबहुना एक रात्र) आधीच ही श्वापदं आपल्या घरात घुसली होती! पहिला डाव आपल्या विरुद्ध गेला होता. वरीष्ठांनी संतोष यांना माघारी यायला सांगितले. हे अतिरेकी आपल्या दुस-या संरक्षक फळीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले होते. पहा-यावर असलेल्या जवानांना त्यांची चाहूल लागली…. भयावह धुमश्चक्री झाली. ४५, राष्ट्रीय रायफल्स चे कर्नल जोजन थॉमस साहेबांनी यांतील सहा अतिरेकी टिपले.. २२ ऑगस्ट २००८चा तो दिवस होता… पण यांत जोजन साहेब आणि दोन जवान धारातीर्थी पडले. उर्वरीत अतिरेकी तिथून पाकिस्तानी सीमेकडे पळाल्याचे वृत्त हाती आले! या पळपुट्यांची आणि संतोष यांच्या तुकडीची गाठ पडायची दाट शक्यता होती. आणि तशी ती पडलीही! चार तासांच्या पायापीटीनंतर संतोष साहेब मागे इच्छित स्थळी पोहोचले. लख्ख उजाडले होते… आठ-सव्वा आठ वाजले असावेत. माघारी येण्याच्या मार्गावर असलेल्या संतोष राळे यांच्या पथकाला माघारी न येता तिथून पळून जाणा-या अतिरेक्यांच्या मार्गात दबा धरून बसण्याच्या व त्यांना ठार मारण्याच्या कामगिरीवर नेमण्यात आले. आधीच्या रात्री प्रचंड थंडीत उघड्यावर झालेले जागरण आणि घडलेला उपवास यामुळे थकलेल्या जवानांना संतोष राळे यांनी माघारी पाठवले आणि नवीन कुमक मागवली… त्यात घातक तुकडीचे काही कमांडोज होते. प्रचंड गोळीबारामध्ये आपल्या सैनिकांनी जड युद्ध साहित्य जीवाचा धोका पत्करून पोहोचवण्याची कामगिरी यशस्वी केली.

 – क्रमशः भाग पहिला   

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निंदेचे फळ…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “निंदेचे फळ…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

एकेकाळी एका राजाने ठरवले की, तो दररोज १०० अंधांना खीर खायला घालेल.

एक दिवस सापाने खीर असलेल्या दुधात तोंड घातले आणि दुधात विष टाकले. आणि 100 पैकी 100 अंध लोक विषारी खीर खाल्ल्याने मरण पावले. 100 लोक मारल्याचा पाप लागणार हे पाहून राजा खूप अस्वस्थ झाला. राजा संकटात सापडल्याने आपले राज्य सोडून भक्ती करण्यासाठी जंगलात गेला, जेणेकरून त्याला या पापाची क्षमा मिळावी.

वाटेत एक गाव आले. राजाने चौपालात बसलेल्या लोकांना विचारले, या गावात कोणी धर्माभिमानी कुटुंबे आहेत का? जेणेकरून रात्र त्याच्या घरी घालवता येईल. चौपालमध्ये बसलेल्या लोकांनी सांगितले की, या गावात दोन बहिणी आणि भाऊ राहतात, त्या खूप पूजा पाठ करतात. राजा रात्री त्यांच्या घरी राहिला.

सकाळी राजाला जाग आली तेव्हा मुलगी सिमरनवर बसली होती. पूर्वी मुलीचा दिनक्रम असा होता की, ती पहाटे उजाडण्यापूर्वी सिमरनसोबत उठून नाश्ता बनवायची. पण त्या दिवशी मुलगी बराच वेळ सिमरनवर बसून राहिली.

मुलगी सिमरन मधून उठली तेव्हा तिचा भाऊ म्हणाला की बहिण, तू इतक्या उशिरा उठलीस, आपल्या घरी एक प्रवासी आला आहे. त्यांना नाश्ता करून निघून जावे लागेल. सिमरनपेक्षा लवकर उठायला हवे होते. तेव्हा त्या मुलीने उत्तर दिले की, भाऊ, असा विषय वरती गुंतागुंतीचा होता.

धर्मराजला काही गुंतागुंतीच्या परिस्थितीत निर्णय घ्यायचा होता आणि तो निर्णय ऐकण्यासाठी मी थांबले होते, त्यामुळे बराच वेळ सिमरनवर बसून राहिले. तिच्या भावाने विचारले, ते काय होते? तर मुलीने सांगितले की एका राज्याचा राजा आंधळ्यांना दररोज खीर खायला घालायचा. परंतु सापाच्या दुधात विष टाकल्याने 100 अंधांचा मृत्यू झाला.

आंधळ्यांच्या मृत्यूचे पाप राजाला, नागाला किंवा दूध उघड्यावस्थेत सोडणाऱ्या स्वयंपाकी यांच्यावर फोडायचे की नाही हे आता धर्मराजाला समजत नाही. राजाही ऐकत होता. आपल्याशी काय संबंध आहे हे ऐकून राजाला रस वाटला आणि त्याने मुलीला विचारले की मग काय निर्णय झाला?

अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे मुलीने सांगितले. राजाने विचारले, मी तुमच्या घरी आणखी एक रात्र राहू शकतो का? दोन्ही बहिणी आणि भावांनी आनंदाने ते मान्य केले.

राजा दुसऱ्या दिवशी थांबला, पण चौपालात बसलेले लोक दिवसभर चर्चा करत राहिले की काल आमच्या गावात एक रात्र मुक्काम करायला आला होता आणि कोणी भक्ती भाववाला घर मुक्कामसाठी विचारत होता. त्यांच्या भक्तीचे नाटक समोर आले आहे. रात्र काढल्यानंतर तो गेला नाही कारण तरुणीला पाहून त्या माणसाचा हेतू बदलला. म्हणून तो त्या सुंदर आणि तरुण मुलीच्या घरी नक्कीच राहील अन्यथा मुलीला घेऊन पळून घेऊन जाईल. चौपालमध्ये राजावर दिवसभर टीका होत होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी पुन्हा सिमरनवर बसली आणि नेहमीच्या वेळेनुसार सिमरनमधून उठली. राजाने विचारले, मुली, आंधळ्यांच्या हत्येचे पाप कोणाला लागले? त्या मुलीने सांगितले, ते पाप आमच्या गावच्या चौपालात बसलेल्या लोकांत वाटले गेले.

तात्पर्य : निंदा करणे हा तोट्याचा सौदा आहे. निंदा करणारा नेहमी इतरांचे पाप स्वतःच्या डोक्यावर घेतो. आणि इतरांनी केलेल्या पापांचे फळही त्याला भोगावे लागते. त्यामुळे आपण नेहमी टीका (निंदा)टाळली पाहिजे.

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खरी धुळवड / जीवनाच्या आनंदात दंग… – चित्र एक काव्ये दोन ☆ श्री प्रमोद वामन वर्तक आणि श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? खरी धुळवड / जीवनाच्या आनंदात दंग… – चित्र एक काव्ये दोन ☆ श्री प्रमोद वामन वर्तक आणि श्री आशिष बिवलकर 

श्री प्रमोद वामन वर्तक

(१) खरी धुळवड… 

नाते तुटले जन्माचे

साऱ्या खऱ्या रंगांशी,

नेहमी डोळ्यांसमोर

काळी पोकळी नकोशी !

*

काया दिली धडधाकट

पण डोळ्यांपुढे अंधार,

समान सारे सप्तरंग

मनांतच रंगवतो विचार !

*

तरी खेळतो धुळवड

चेहरा हसरा ठेवुनी,

दोष न देता नजरेला

लपवून आतले पाणी !

लपवून आतले पाणी !

© श्रीप्रमोद वामन वर्तक

मो 9892561086

श्री आशिष बिवलकर

(२) जीवनाच्या आनंदात दंग…

नेत्रहीन जरी असलो

तरी रंगांनी आम्ही रंगतो!

नशिबात जरी अंधार असला,

तरी जीवनाच्या आनंदात दंगतो!

*

कितीही जरी असला

अंधार काळा कुट्ट!

जीवनाशी जोपसतो

नाते आमचे घट्ट!

*

तिमिराकडून तेजाकडे,

जन्मत: आहे आम्हा ध्यास!

प्रेमाच्या ओलाव्याची,

मनाला एकच असते आस!

*

सहानुभूती नको आम्हा,

आजमावू दया पंखातले बळ!

फडफड जरी असली आता,

उडण्याची जिद्द नाही निष्फळ!

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #272 – कविता – ☆ आत्म शुद्धि की राह कठिन है… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष—  सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता आत्म शुद्धि की राह कठिन है…” ।)

☆ तन्मय साहित्य  #272 ☆

☆ आत्म शुद्धि की राह कठिन है… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

अहं भाव श्रेष्ठत्व कुलीनता भेद

भरा जब तक इस मन में

आत्म शुद्धि की राह कठिन है।

 

संकीर्णता सोच मन में, जब-जब भी आये

अहमन्यता पथिक को, सत्पथ से भटकाये

यदि बिगड़े संतुलन, सहारा कौन बनेगा

सोचें, सम्मुख जब दुर्दिन है

आत्म शुद्धि की राह कठिन है।

 

ग्रन्थि श्रेष्ठता की, तुलनात्मक भाव जगाए

अस्थिर चित्त, न रिश्तों को दुलार दे पाए

दर्प भरे घेरों में बँधे, अतृप्त विकल जन

मन, दोषों से ग्रस्त मलिन है

आत्म शुद्धि की राह कठिन है।

 

परछाई के सदृश, दोष यदि अपनायेंगे

सहज सरलता, संतुष्टि कैसे पायेंगे,

कृतज्ञता आभार भाव उपजाएँ मन में

हो प्रयास, साधन अनगिन है

आत्म शुद्धि की राह कठिन है।

 

आत्मोन्नति के सूत्र, सादगी में ही मिलते

हर मौसम से मेल, पुष्प तब ही हैं खिलते

भेद मिटे आपस के, हो निर्लिप्त आचरण

जैसे जल में, खिले नलिन है

आत्म शुद्धि की राह कठिन है।

☆ 

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 96 ☆ भाग्य हमारा ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “भाग्य हमारा” ।)       

✍ जय प्रकाश के नवगीत # 96 ☆  एक नवगीत-  भाग्य हमारा ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

अब तो मौसम के हाथों में

सब कुछ है भाई

देखो भाग्य हमारा

कैसी करवट लेता है।

 

जोड़ तोड़ कर बीज जुटाया

सपनों को बोया

आँखों के पानी से काली

रातों को धोया

 

कुछ कुछ आशा हुई बलवती

मंगरे पर कागा

रहा उचार सगुन बैठा

जाने कब सुधि लेता है।

 

ब्याह गई घर की है मैना

छोड़ गई करजा

और महाजन की ड्योढ़ी पर

हाथ जोड़ परजा

 

खड़ी हुई उम्मीदें सारी

खेतों के आँगन

दगा न दे निष्ठुर मौसम

शंकालू मन होता है।

 

अबके सब त्योहार देहरी

पूजेंगे मिलकर

धरा आत्मा में बैठी

गाएगी संवत्सर

 

फसल रचेगी राँगोली

हर द्वारे बंदनवार

चल कर आँयेगीं ख़ुशियाँ

उल्लास सगुन बोता है।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मैं ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – मैं ? ?

नई  तरह की रचनाएँ रच रहा हूँ मैं,

अख़बारों में ख़ूब छप रहा हूँ मैं,

देश-विदेश घूम रहा हूँ मैं,

बिज़नेस क्लास टूर कर रहा हूँ मैं..,

 

मैं ढेर सारी प्रॉपर्टी ख़रीद रहा हूँ,

मैं अनगिनत शेअर्स बटोर रहा हूँ,

मैं लिमोसिन चला रहा हूँ,

मैं चार्टर प्लेन बुक करा रहा हूँ..,

 

धड़ल्ले से बिक रहा हूँ मैं,

चैनलों पर दिख रहा हूँ मैं..,

 

मैं यह कर रहा हूँ, मैं वह कर रहा हूँ,

मैं अलां में डूबा हूँ, मैं फलां में डूबा हूँ,

 

मैं…मैं…मैं…,

उम्र बीती मैं और मेरा कहने में,

सारा श्रेय अपने लिए लेने में,

 

आज श्मशान में अपनी देह को

धू-धू जलते देख रहा हूँ मैं,

हाय री विडंबना..!

कह नहीं पाता-

देखो जल रहा हूँ मैं..!

?

© संजय भारद्वाज  

11:07 बजे , 3.2.2021

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 15 मार्च से आपदां अपहर्तारं साधना आरम्भ हो चुकी है 💥  

🕉️ प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्रम्, श्रीराम स्तुति, आत्मपरिष्कार मूल्याकंन एवं ध्यानसाधना कर साधना सम्पन्न करें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Petrichor… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present Capt. Pravin Raghuvanshi ji’s amazing poem “~ Petrichor… ~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)

? ~ Petrichor ??

In the grandest of “Perfumers Global Exhibition”,

A world of fragrances, a sensory exploration

Thousands of stalls, spread across miles wide,

Each one showcasing perfumes, with utmost pride

*

Every bottle gleamed, with its own unique flair,

Fragrances wafted, dispelling all dissonant air

The crowd swooned, in awe of perfumed delight,

Overwhelmed by choices, their senses took flight

*

Just then, dark clouds gathered, in the sky above,

Clouds rumbled, as raindrops began to pour in love

The earthy scent, of petrichor filled the entire place,

As heaven and earth merged, in a fragrant embrace

*

Perfumes, that once dazzled, now faded from sight,

As the earthy scent, took the center stage in delight

Petrichor, -the aroma of the soil, rose high and free,

A fragrance, surpassing, all perfumes, for all to see

~Pravin Raghuvanshi

(Hindi Credit: Mr. Sanjay Bharadwaj. Inspired by Mr. Sanjay Bharadwaj ji’s Hindi short story 👉 लघुकथा- सोंध )

 © Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune
15 March 2025

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares