श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है।  श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  अपनी सासु माँ को समर्पित उनकी  एक अतिसुन्दर कविता  “इंगळ्यांची मंजुळा”।  कविता का प्रकार – मुक्तछंद है। श्रीमती उर्मिला जी की कवितायेँ हमारे सामजिक परिवेश को रेखांकित करती हैं। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है।  ऐसे सामाजिक / पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 23 ☆

ज्या घरात आजी-आजोबा,म्हणजे सासू सासरे,दीर जावा ,नणंदा , बाळगोपळ  आहेत असं घर गोकुळच असतं.सासरे घराचा कणा असतात तर सासूबाई  आपल्या घरातल्या चालीरीती,रुढी परंपरा चढून जाण्यासाठीचा जिना असतात.

आपण जेव्हा लग्न होऊन सासरी येतो तेव्हा पतीनंतर सगळ्यात पहिली चांगली ओळख होते ती सासूबाईची. त्यांचे मुळे आपल्या खऱ्या सासरच्या  आयुष्याची सुरुवात होते. घरातल्यांची आपले कुलाचार कुल परंपरांची ओळख होते , ती केवळ आणि केवळ सासुबाईंमुळेच.अशाच माझ्या सासूबाईं त्यांचं नाव ” मंजुळा ” त्यांची ओळख मी माझ्या कवितेतून करुन देते आहे.:-

 काव्यप्रकार:-मुक्तछंद

 शीर्षक:- “‘इंगळ्यांची मंजुळा “

 

मंजुळाबाई मंजुळा, सासुबाई

माझ्या मंजुळा !

मंजुळा त्यांचं नाव अन् वडगाव

आमचं गाव !

बरं कां म्हणून त्या ” ‘वडगावच्या

इंगळ्यांची मंजुळा ” !!१!!

 

गोरा गोमटा रंग त्यांचा ,

ठेंगणा ठुसका बांधा !

त्या होत्या आमच्या घराण्याचा

सांधा !!२!!

 

गोड गोड खायची सवय त्यांना

भारी !

लग्नकार्यात उठून दिसे

त्यांची भारदस्त स्वारी  !!३!

 

शिक्षणात होत्या अडाणी,

पण होत्या अगदी तोंडपाठ

त्यांच्या आरत्या अन् गाणी  !!४!!

 

जरब होती बोलण्यात,

रुबाब होता वागण्यात!

पण खूप खूप माया होती त्यांच्या

अंतरंगात  !!५!!

 

 

अहेवपणी मोठ्ठ कुंकू कपाळावर

शोभे छान !

गावातल्या साऱ्याजणी द्यायच्या

त्यांना मान !

पाणीदार मोत्यांची नथ शोभे

त्यांच्या नाकात !

नवऱ्यासह सारेजण असायचे

त्यांच्या धाकात  !!६!!

 

म्हणायच्या त्या नेहमी !…..

डझनभर माझ्या नातींचा

अभिमान लयी भारी !

सुंदर माझ्या चिमण्या घेतील

पटापट भरारी !

अशा माझ्या सासुबाई वाटायच्या

खूप करारी !

पण होती आम्हांवर त्यांची मायेची

पाखर सारी !!

त्यांची मायेची पाखर सारी !!

त्यांची मायेची पाखर सारी !!७!!

 

©️®️उर्मिला इंगळे

 

दिनांक:-१८-२-२०२०

 

!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments