(ई-अभिव्यक्ति में श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’ जी का स्वागत। पूर्व शिक्षिका – नेवी चिल्ड्रन स्कूल। वर्तमान में स्वतंत्र लेखन। विधा – गीत,कविता, लघु कथाएं, कहानी, संस्मरण, आलेख, संवाद, नाटक, निबंध आदि। भाषा ज्ञान – हिंदी,अंग्रेजी, संस्कृत। साहित्यिक सेवा हेतु। कई प्रादेशिक एवं राष्ट्रीय स्तर की साहित्यिक एवं सामाजिक संस्थाओं द्वारा अलंकृत / सम्मानित। ई-पत्रिका/ साझा संकलन/विभिन्न अखबारों /पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। पुस्तक – (1)उमा की काव्यांजली (काव्य संग्रह) (2) उड़ान (लघुकथा संग्रह), आहुति (ई पत्रिका)। शहर समता अखबार प्रयागराज की महिला विचार मंच की मध्य प्रदेश अध्यक्ष। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – बदलते रिश्ते।)
अरुणा जी को किताबें पढ़ने का बहुत शौक था। उनकी बहू जूही ने उन्हें कहा कि आप किताबें मत पढ़ो मैं आपको मोबाइल पर आज कहानी दिखाती हूँ। आप किसकी सुनेंगी। बहू तुम अपनी पसंद की कहानी सुना दो। मां मैं आपको मालगुडी डेज की कहानियां दिखाती हूं।
सास बहू दोनों कहानी देखते-देखते उसमें खो गई, तभी अचानक उसका मोबाइल का नेट चला गया।
बहू की कहानी बहुत अच्छी लगी। उसने कहा – मां जी आप किताब उठाइए, अब मुझे आगे की यह कहानी पढ़नी है। अरुणा जी मुस्कुराने लग गई और उन्होंने कहां कि कहां गई तुम्हारी टेक्नोलॉजी। कोई बात नहीं, वक्त के साथ सब कुछ बदलता है।
☆ जंगलाला धडकी भरली आहे – लेखक – श्री शेखर नानजकर ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
आता सुट्ट्या लागतील. मुलं आणि त्यांचे पालक, दोघेही मुक्त होतील. प्रत्येकजण शहराच्या या धकाधकीपासून कुठेतरी दूर जाण्याचं ‘प्लॅनिंग’ करू लागेल. कोणी दुसऱ्या शहरात, आपल्या नातेवाईकांकडे जायचं ठरवेल. कोणाला कोकण बघायचं असेल. कुणी ट्रेक ठरवेल. कुणी हिमालयातलं प्लॅनिंग केलेलं असेल. कुणाला सह्याद्रीचं वेड असेल. कुणाला जंगलात जायचं असेल. कुणाला वाघ पाहायचा असेल. कुणी स्वत:ला फोटोग्राफर मानत असेल. कुणाला पक्षी ‘कॅच’ करायचे असतील, कुणाला टायगर ‘ओव्हर’ झाला असेल, म्हणून ‘मायक्रो’ फोटोग्राफीच्या मागे असेल… पण एक नक्की, की एक मोठा लोंढा आता निसर्गात घुसेल.
निसर्गात जाण्याची प्रत्येकाची कारणं थोडीफार वेगळी असू शकतील. पण एक कारण मात्र सामायिक असेल, ‘मज्जा करायची!’ म्हणजे काय करायचं, तर असं काहीतरी करायचं की ज्यानं सगळ्यांना ‘मज्जा’ आली पाहिजे. आणि मज्जा करणारा हिरो ठरला पाहिजे. मग त्यासाठी काहीही वेडे चाळे, आरडाओरडी, विदुषकी चाळे, असं काहीही चालतं. जेणेकरून आपण आकर्षणाच्या केंद्राबिंदूशी असलो पाहिजे. असे सगळे चाळे आणि तमाशे आता पाहायला मिळतील…..
इकडे निसर्गात काय चाललेलं असेल…. थंडीची हुडहुडी कमी झाली असेल. पानगळ जोरात सुरु झाली असेल. काही झाडांना नवीन पालवी फुटू लागली असेल. ओढ्याची धार पूर्ण आटलेली असेल. खाचखळग्यात पाणी साचून पाणवठे तयार झाले असतील. त्या स्वच्छ आणि नितळ पाण्यात निवळ्या फिरू लागल्या असतील. खडकांवर बसून बेडकं जमेल तितकं ऊन खात असतील. नखा एवढे मासे पाण्यात फेर धरू लागले असतील. ‘नावाडी’ किडा पाण्यावर पुढं मागं करत वेळ काढत असेल. पाणतळीच्या दगडांच्या सपाटीतून खेकडे नांग्या बाहेर काढत असतील. मधमाश्या आणि फुलपाखरं पाण्यावर घोंगावू लागली असतील. पाणतळीचं शेवाळ अजूनही हिरवं गारच असेल. मैदानावरची गवतं वाळून गेली असतील. पक्षी आता काटक्या शोधू लागले असतील.
वसंत आताशा सुरू होतोय. अजून झाडांना फुलं लागायची आहेत. काहींना कळ्या धरल्या आहेत. पण पक्षी आत्ता पासूनच घिरट्या घालू लागले आहेत. नर मादी एकमेकांना खुणवू लागले आहेत. आता पळस फुलेल, पांगारा फुलेल, कडूनिंब फुलेल, करवंदाना फुलं लागतील, जांभळाला फुलोरा येईल, बहावा पिवळा जर्द फुलेल. अंजनाच्या जांभळ्या फुलांनी हिरवाई की जांभळाई असा प्रश्न पडेल.
मधमाश्या घोंगावू लागल्या आहेत. कळ्यांची फुलं व्हायची वाट पाहू लागल्या आहेत. त्यांना त्यांची पोळी मधानं भरायची आहेत. अस्वलं त्याचीच वाट पाहत वेळ काढतायत. लिंबोण्या, जांभळं, करवंदं, आंबे… फळांचा नुसता खच पडेल. वानरं सुखावतील, सांबरं, भेकरं, गवे यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. उदमांजरं, जावडीमांजरं, साळींदरं नवीन बीळं उकरू लागतील.
येणार, येणार, वसंत येणार… फळाफुलांनी जंगलं भरून जाणार! पुरेसं पाणी, मुबलक फळंफुलं. आता मिलन, प्रजोपात्ती आणि त्याचं संगोपन! सगळं जंगल आनंदात आहे….!
आणि इतक्यात बातमी आली, दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या…… येणार येणार पर्यटकांचा लोंढा येणार… जंगलाची शांतता, एकांत, स्वच्छता… काय होणार त्याचं?
सगळ्यात आधी पाणवठे घाबरले! इतर सगळे जीव फक्त गरजेपुरतंच पाणी वापरायचे. फक्त प्यायला! आता माणूस येणार, त्याला खूप पाणी लागतं…. प्यायला पाणी, धुवायला पाणी, शिजवायला पाणी, खेळायला पाणी, नासायला पाणी… तो पाण्यात खेळणार, काहीही बुचकळणार, पाणवठ्यात काहीही फेकणार.. भांडी विसळणार, चुळा भरणार… मग त्या पाण्यातल्या जीवाचं काय? खरं तर या पाण्यावर पहिला हक्क त्यांचा! त्यांनी कुठं जायचं? पाण्यावर येण्याऱ्या पक्ष्यांनी कुठे जायचं? सगळ्या बाजूनं माणसंच राहायला असतील तर जंगलातल्या प्राण्यांनी पाणी कुठं प्यायचं? स्वच्छ, नितळ पाणवठा आता गढूळ होणार, खराब होणारं… त्याला रात्रंदिवस माणसं चिकटणार.. त्याचे नेहेमीचे सवंगडी त्याला भेटू शकणार नाहीत… एखाद्या बंदिवानासारखा पाणवठा आता माणसाच्या कैदेत रहाणार! पाणवठ्याला खूपच वाईट वाटू लागलं….. सुट्ट्या लागल्या… माणसं येणार…. पण तक्रार कुणापाशी करायची?
पायवाटांनाही दाटून आलं.. आत्ता पर्यंत पायवाटांवरून प्राणी जायचे, त्यांच्या खूरांच्या, पंज्यांच्या ठश्यांनी वाट सजायची.. सांबरांची, भेकरांची लेंडकं जागोजाग दिसायची… फळांनी, बियांनी वाटा सजून जायच्या… आता वाटांवर बुटांचे ठसे दिसतील, फळं, बिया, चिरडल्या जातील, प्राण्यांच्या पाउलखुणा पुसल्या जातील, लेंड्या चिरडल्या जातील, मुंगळ्यांची रांग वाटेवरून जात असेल तर ती चिरडून सपाट होईल. वाटेवर आडवी बांधलेली कोळ्यांची जाळी तटातट तुटतील, वाटेवर प्लास्टिक, चांद्या, सिगारेटी, त्यांची पाकीटे, बिसलरीच्या बाटल्या यांचा खच पडेल… जंगलातली जिवंत पायवाट एखाद्या कलेवरासारखी दिसू लागेल. पायवाटांना खूपच वाईट वाटू लागलं……. पण तक्रार कुणापाशी करायची?
झाडंही हेलावली. आत्तापर्यंत त्यांच्या अंगाखांद्यावर वानरं खेळत असायची, शेकरं उड्या मारत असायची, पक्षी उतरायचे, घरटी करायचे, अस्वलं झाडं येंगायची, वाघळं लटकायची, सरडे फिरायचे, मुंगळे रांगा लावायचे… आता माणसं येतील, झाडांवर चढतील, फुलं तोडतील, फळं तोडतील, फांद्या ओरबाडतील, काटक्या तोडतील, त्याच्या शेकोट्या करतील…. झाडांना जे, पक्ष्या – प्राण्यांना द्यायचं होतं ते माणूस खाऊन जाईल… त्याचा विध्वंस करेल…. सुट्ट्या लागल्या, कसं आवरणार या माणसाला? झाडं हिरमुसून गेली.. पण तक्रार कुणापाशी करायची?
दिवसभर पक्षी पाणवठ्याच्या चकरा मारायचे. धोबी यायचे, हळदे यायचे, स्वर्गीय नर्तक यायचे, होले यायचे, सातभाई यायचे, वंचक, सुतार, गरूड, शृंगी घुबडं, खाटिक, खंड्या, बंड्या, कितीतरी पक्षी दिवसरात्र पाण्यावर यायचे. त्यातले काही पाणवठ्यापाशीच राहायचे! आजूबाजूच्या कपारीत, फांद्यांमध्ये त्यांनी घरटी केली होती. काहींनी जोडीदार शोधले होते. दोघं मिळून घरट्यासाठी काड्या काटक्या गोळा करत होते. जंगलाच्या शांततेत आता पर्यंत फक्त त्यांचेच नाजूक स्वर तरंग उठवत होते. वसंताच्या आगमनानं पक्षीगण आनंदला होता, मोहोरला होता. इतक्यात बातमी जंगलात पसरली…. सुट्ट्या लागल्या… माणसांची झुंड निसर्गात घुसणार… अराडाओरडी होणार, जंगलात धूर पसरणार… माणूस पाणवठे काबीज करणार…. त्यात घाण करणार,,, पाणी नासवून टाकणार… आता पाणी कुठे प्यायचं? खंड्यानं कुठल्या पाण्यात बुचकळ्या मारायच्या…. मासे कसे धरायचे? वंचकानं कुठल्या पाणवठ्यात ध्यान लावायचं? पाण्यावरचे किडे धोब्यानं कुठे शोधायचे? दोन महिने तरी आता पाणी माणसाच्या ताब्यात रहाणार! अवघा पक्षीगण चिंतेत बुडाला….. पण तक्रार कुणापाशी करायची? साकडं कुणाला घालायचं?
ओढे आत्ताच आटलेत. आता पाणवठेही कमी कमी व्हायला लागतील. तसंही दिवसभर पाण्यावर जाताच येत नाही. जीवाची भीती असते प्राण्यांना! अंधार पडता पडता पाण्यावर यावं लागतं. रात्रभरात मधून मधून पाण्यावर जाता येतं, पण अंधार असे पर्यंतच! सूर्य बुडाला, थोडं कडूसं पडलं, की आळीपाळीनं प्राणी पाण्यावर जायचे. एकमेकांना टाळून जायचे. दिवसभराचा तहानलेला घसा पाण्यानं ओला करून घ्यायचे. पोट भरून पाणी प्यायचे. पुन्हा पाणी कधी मिळेल सांगता यायचं नाही. पण पाणी पिण्यासाठी पाणवठा त्यांची हक्काची जागा होती. तिथे शांतता होती, समाधान होतं!….. आणि त्यांच्याही कानावर ती बातमी आदळली….. सुट्ट्या लागल्या.. माणसांच्या झुंडी जंगलात घुसणार… पाणवठ्यांच्या बाजूनं मुक्काम करणार… रोज नवनवीन झुंडी….! रात्रभर शेकोट्या करणार, गाणी गाणार, नाचणार, आरडाओरडी करणार, धिंगाणा करणार… निरव शांततेच्या पाठीवर चाकूनं ओढल्यासारखे चरे ओढणार… दिवसभर जंगल तापणार, तहानतहान होणार. दिवसा तर पाण्यावर जाणं शक्यच नसतं, पण आता रात्री सुद्धा पाण्यावर कसं जायचं? तसाच धीर धरून कसाबसा पाण्यापाशी पोहोचलो आणि कुण्या माणसानं पाहिलं तर? आरडाओरडी होणार, लोक त्या प्राण्याच्या मागे पळणार, त्याचे फोटो का काय ते काढण्यासाठी धावपळ होणार… कदाचित काही लोक त्या प्राण्याला मारायलाही सरसावतील. जीव मुठीत धरून त्या प्राण्याला पळावं लागेल… मग तहानलेल्या त्या जीवाचं काय होणार? त्याला पुन्हा पाणी कधी मिळणार?…. नेमके हे उन्हाळ्याचे अवघड दिवस, आणि त्यातून हा जंगलात घुसणारा माणसांचा लोंढा… काय करावं? कुणाला सांगावं? सगळं प्राणी कुळ चिंतेत पडलं…. सुट्ट्या लागल्या… सुट्ट्या लागल्या…! ओढ्यांचं धाबंच दणाणलं!…. पण तक्रार कुणापाशी करायची?
जंगलाला धडकी भरली आहे…. आता सुट्ट्या लागल्या आहेत …..!
लेखक – श्री शेखर नानजकर
संग्राहक – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वंशाचा दिवा… की पणती ?… भाग – 1 ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
दुपारी दोन वाजता राजाभाऊ दुकान वाढवून घरी आले. तसे ते रोज एक वाजताच घरी जेवायला जायचे, पण आज रविवार. मुलगा, सुन घरी असणार. स्वयंपाकाला जरा उशिरच होतो. त्यांना सुट्टी… मग आरामात उठणे.. त्यानंतर नाश्ता.. मग स्वयंपाक.
सोमवार पेठेत त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता. बहुतेक सर्व जुने भाडेकरू. मालकाच्या.. म्हणजे त्यांच्या ताब्यात जेमतेम अडिच खोल्या. त्याही आता जिर्ण झालेल्या.
लाकडी जिना चढून राजाभाऊ वरती आले. कठड्याला धरून जरा वेळ थांबले. हल्ली त्यांना दम लागायचा. आतला संवाद ऐकून ते जागीच थबकले.
“मला काय वाटते मिनु,आपण अजून एक दोन वर्षे थांबुया.” हा आवाज राहुलचा होता.
“नाही हं. एक दोन म्हणता म्हणता चार वर्ष झाली. तुझी कारणं चालुच असतात.”… मीनु जरा चिडुनच म्हणाली.
“माझं ऐकायचच नाही असंच तु ठरवलयं का? दादांना काय वाटेल?आईचा काही विचार केलास?”
“आता मी या पडक्या वाड्यात रहाणार नाही. चार वर्ष राहिले. खूप झालं. नील आता दोन वर्षाचा झालाय. त्याची शाळा सुरू होण्याच्या आत मला इथुन निघायचंय. या असल्या वातावरणात मी त्याला इथे ठेवणार नाही”.
राहुल चिडलाच मग. “या असल्या वातावरणात म्हणजे? आम्ही नाही राहिलो? अदिती नाही राहिली? अगं फार काय.. लग्नाच्या आधीचे दिवस आठव. माहेरचं घर म्हणजे काय फार मोठा महाल लागुन चाललाय का?विसरलीस का ते दिवस?”
राहुलचा आवाज वाढला.. तसे राजाभाऊ आत आले. त्यांनी राहुलला शांत केलं.
“सुनबाई, समजतं मला.. तुमची इथे अडचण होते. तु फ्लॅट घ्यायचा विचार करतेय ना? मग घेऊ की आपण फ्लॅट. मी काही मदत करीन. सर्वांनी मिळुन जाऊ नवीन घरात.”
मीनु जरा शांत झाली. आणि खरंच.. पुढच्याच आठवड्यात राहुल आणि मिनलने फ्लॅट चे फायनल केले. गंगापूर रोडवर आनंदवल्लीच्या पुढे एक टाऊनशिप तयार होत होती. त्यात काही फ्लॅटस् उपलब्ध होते. फ्लॅट बुक करायला ते दोघे राजाभाऊंना घेऊन गेले. फ्लॅट बुक झाला. येताना त्यांनी नवश्या गणपतीपुढे पेढे ठेवले. येत्या दिवाळीत ताबा मिळणार होता.
राजाभाऊ खुष होते. त्यांना पण अलीकडे वाटु लागले होते की, बस झाले हे गल्लीतील आयुष्य. आपल्या आजुबाजुला बघीतले की त्यांना जाणवायचं.. बरोबरीचे बरेच जण गल्ली सोडून गेले. बहुतेक जणांचे फ्लॅट झाले. ज्यांनी फार पुर्वी प्लॉट घेतले त्यांचे तर बंगलेसुध्दा बांधून झाले. आपण मात्र आहे तिथेच आहोत. अदिती, राहुलचे शिक्षण.. त्यांची लग्ने यातच बरीचशी पुंजी खर्च झाली.
भद्रकाली परीसरात त्यांचे टेलरिंगचे दुकान होते. मिळुन मिळुन मिळणार तरी किती? अडचणी तर कायम दार ठोठावतच होत्या. त्यातुनही मार्ग काढला. ललितानेही साथ दिली. आता साठी जवळ आली. गावाबाहेर, मोकळ्या वातावरणात, मोठ्या खोल्यांमध्ये उर्वरित आयुष्य जाणार. अजून काय पाहिजे आपल्याला या वयात? आपल्याच मनाशी बोलत ते स्वप्न पाहु लागले.
2 बी.एच.के.चा प्रशस्त फ्लॅट सहा महिन्यात ताब्यात मिळाला. फर्निचरचे काम सुरू झाले. एक दिवस रात्री जेवताना राहुलने विषय काढला. “दादा, आम्ही पाडव्याला शिफ्ट होतोय”.
“आम्ही म्हणजे…?”
“आम्ही म्हणजे.. आम्ही तिघे. मुहूर्त पण चांगला आहे.”
“अधुनमधून येत जा ना तुम्ही आईंना घेऊन.” मीनु म्हणाली.
राजाभाऊंची बोलतीच बंद झाली. काय, कसे विचारावे त्यांना कळेचना.
“अरे,पण आपले तर ठरले होते…”
त्यांना पुढे बोलु न देता मीनलने सुत्र हातात घेतली. “ठरले होते दादा.. आपण सर्वांनी जायचं, पण मीच सांगितले राहुलला.. आई दादांना ईथेच राहु दे म्हणून. तुम्हाला इकडची.. गावात रहायची सवय आहे ना. तुम्हाला नाही करमणार तिकडे”.
“अगं,असंच काही नाही” त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला.
“नाही.. तसे येत जा ना तुम्ही अधुनमधून. नीलला भेटायला”.
काही बोललेच नाही राजाभाऊ. भ्रमनिरास झाला त्यांचा. किती स्वप्न रंगवली होती त्यांनी नवीन जागेची. जेवण करून बाहेर गॅलरीत येऊनही उभे राहिले. पराभूत मनस्थितीत. ललिताबाई मागे येऊन उभ्या राहिल्या.
“सांगत होते तुम्हाला.. पैसे देऊन टाकु नका. मागीतले तरी होते का त्यांनी? त्यांचे ते समर्थ होते ना जागा घ्यायला. तुम्हालाच फार हौस नवीन जागेची. जी काय गंगाजळी होती, ती पण गेली”.
राजाभाऊ ऐकत होते… आणि नव्हतेही.
पाडव्याचा मुहूर्त बघून राहुल, मीनल ..नीलला घेऊन नवीन जागेत गेले. फक्त कपडे नेले त्यांनी. बाकी सर्व इथेच ठेवले. वाड्यातील त्या दोन अडीच खोल्यात फक्त राजाभाऊ आणि ललिताबाई राहिल्या.
भद्रकालीत टेलरिंग शॉप होते, पण आता काही फारसा धंदा होत नव्हता. रेडिमेडच्या जमान्यात कपडे शिवायला कोण येणार? आणि तेही राजाभाऊंकडे. तेही आता थकले होते. फारसे काम होत नव्हते. आयुष्यभर मशीन चालवून गुडघे पण आताशा दुखत. दोघांपुरते कसेबसे मिळे. अजून तरी मुलाकडे हात पसरायची वेळ आली नव्हती. अपेक्षा होती…. म्हणावे राहुलने.. ‘दादा तुम्ही आता काही करू नका. दोघेजण आरामात रहा फ्लॅटवर.’ पण ते त्यांच्या नशिबी नव्हते.
आज हुताशनी पौर्णिमा आहे. हिंदू कालगणनेनुसार वर्षातील शेवटचा सण !! सर्वप्रथम सर्वांना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
आपले सर्व सण सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारे आहेत. आजचा सण सर्वसाधारणपणे ‘होळी’ किंवा कोकणांत ‘शिमगा’ या नावाने ओळखला जातो. पण नुसता होळी हा शब्द घेतला तर त्यात अनेक अर्थ लपले आहेत असे दिसून येईल. आपल्या मायबोलमध्ये म्हणी नावाचा एक प्रकार आहे. या म्हणींनी आपली मायबोली अधिक श्रीमंत, समृध्द केली आहे असे आपल्या लक्षात येईल.
जीवनाची ‘दिवाळी व्हावी, आयुष्यात कायम दसरा असावा, पण आयुष्याचा होळी होऊ नये आणि कोणी आपला ‘शिमगा’ करू नये, असे मानले जाते, तसा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि असायलाही हवा. पण ‘जाणीवपूर्वक’, विशिष्ट आणि उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयुष्याची होळी करणाऱ्या असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांचेही आजच्या दिवशी कृतज्ञतेने स्मरण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे नमूद करावेसे वाटते. यात स्वा. सावरकरांचे एक वचन इथे देत आहे. आपल्या संसाराची होळी करून जर उद्या देशाला स्वातंत्र्य मिळणार असेल आणि पुढील अनेक पिढ्या सुखाने जगणार असतील तर माझ्या संसाराची होळी झाली तरी मला चालेल. सरदार भगत सिंह, चंद्रशेखर आझाद आदींनी हेच केलं, नाही का ?
आजच्या पावन दिवशी आपल्या अंगीच्या अनेक वाईट गुणांची यादी करून आजच्या होळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर त्या दुर्गुणांची होळी करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करू. हे वैयक्तिक पातळीवर करण्यासाठी सुचवले आहे. पण समाज म्हणून विचार करताना, राष्ट्र म्हणून विचार करताना जातीपाती, प्रांतभेद, वर्णभेद आणि तनामनातील अनेक भेद या होळीच्या अग्नीत जाळून भस्मसात करणे तितकेच गरजेचे आहे.
आपल्यातील व्यक्तिगत संकुचित स्वार्थ आणि हेवेदावे विसरुन एकदिलाने *’प्रथम राष्ट्र’ हे ब्रीद वाक्य ध्यानात ठेवून ‘विवेका’ने, योग्य उमेदवारास मतदान करू. आपण सर्वांनी शतप्रतिशत मतदान केले तर देशाला पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार प्राप्त होईल. असा संकल्प करू. आपण सर्व त्यासाठी कटिबद्ध होऊ आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही बळकट करू.*
शिशिर सरला. वसंतपंचमी ही येऊन गेली. ऋतुबदलाचे संकेत केव्हापासूनचेच. ऊन आता मी म्हणत असलेलं. रात्री तर गारवा अजूनही झोंबणारा. रात्र आली की उदासीनतेची छाया पसरून राहते, मनाच्या कणाकणावर. खिडकीशी येऊन बसलं की थंडावत असलेली रात्र जागी होते. रात्रीला कोलाहल तसा कमीच. रस्त्यावरची वर्दळ कमी कमी होत गेली की शांतता अवतरते. बराच वेळ टिकणारी. त्या शांततेच्या उदरातही बरंच काही लपलेलं असतं. अभोगी, अव्यक्त, तेही अंतस्थ, म्हणजे ते तसं असतंच सदानकदा, पण रात्रीने दारावर टकटक केले की ते अकारण असलेलं मनातलं बरंच काहीचं अस्तित्व टोकदारपणे जाणवू लागतं, मग स्वस्थ असणं काही होत नाही. तमाचा खेळ पाहत बसण्यापलिकडे काहीसुद्धा होत नाही, घडत नाही. एक दीर्घ श्वास, उच्छ्वास निसासा काही म्हणो….
एकेक पान गळून निष्पर्ण झालेलं झाड समोर खिडकीशीच. एकाद्या व्रतस्थ मुनीसारखं उभं असलेलं. बोलेल काही, आताच. लगेच. वाटत राहतं. सारखं निरखणं त्याला. तसा तो एकाकीच. वाटतं की तो बोलला तर सगळ्या जखमा उघड्या करेल. तसं त्यालाही उचंबळून येत असेलच की. कुणीतरी ऐकणारं लाभावं म्हणून तरसून गेलाही असेल. खोलवरच्या, वरवरच्या जखमांचं दालनच असेल. मूळापासून ते टोकापर्यंत. तडतडणाऱ्या साली, भेगाळलेला बुंधा. हिरवं काही नसण्याची निराशा आणि झुंज गारठ्याशी. पाऊसकाळ अजून तसा लांबच, भिजवून टाकायला. जमीन तशी कोरडीच. हात आकाशाला टेकायचे म्हणून वर वर वाढणं तेव्हढं झालेलं, पण हेमंत व शिशिराने सारे वैभव लुटून नेलेलं. एक साधं इटुकलं पानही राहू दिलं नव्हतं फांद्यांवर. कोण काळाचे वैर उभं राहिलेलं. तग धरणं तेव्हढं हातात. गारठ्याबरोबर असतो वारा तोही अचूक सूड उगवतो.
कधीकधी उत्तर, मध्य वा पूर्वरात्रीच चंद्र उगवतो, तो काही सूड उगवत नाही. उलट त्याचं असणं हे आश्वासक थोडंफार. तसा तो लांबच, पण शुभ्रधवल किरणांची पखरण करून बापजन्माचा दाह शमवण्याचा त्याचा प्रयत्न, तोही कधीकधी केविलवाणा भासणाराच. तोही किती पुरणार? जेथे शीतलतेचीही धग वाटावी ही परिस्थिती. किती काढावी कळ? किती सोसावं?
नेहेमी निळंशार असणारं आभाळही राखूडलेलं. एकदा का दिवाकर मावळला की आभाळ रंग बदलतंच.कितीही असोत टिमटिमणारे तारे, ते अनंत असलेलं आभाळ गूढ वाटू लागतं. तेही अनंत. तसं असलं तरी जितकी भूमी हवीशी तितकंच आभाळही. ते परकं नसतंच कधी. दिवसभराची दगदग संपली की एकांतात तेच साथीला. बस न्याहाळत रहावं त्याला. निरूद्देश. काहीच बोलू नये, काही सांगू नये. फक्त एकमेकांपुरतं असण्याचंच नातं! बस तेव्हढंच पुरे!!
पर्णहीन असलेल्या खोडावर एखादा निशाचर येऊन बसतो सावकाश. विसावा घेऊन झालं की देतो कर्णकर्कश हाळी व पंख फैलावत उडून जातो. काहीक्षण वाटत असतं आहे कुणीतरी सोबतीला, पण ते काहीक्षणच. हवी असते तशी साथ, यावं कुणीतरी, गुजगोष्टी कराव्यात, ख्यालीखुशाली विचारावी, मनमोकळं करावं, रितं व्हावं. आपलंसं होऊन जावं, पण ते तितकसं सोपं नसतं. मोकळं होता येतच नाही. आभासी क्षणिक जवळीक तशी आभासीच. निष्पर्ण वृक्षावर घरटं कधी करतात का पाखरं?
दिवस चटकन निघून जातो. रात्र सरतासरत नाही. ती सरपटत असते हळुहळू गोगलगायीसारखी. दूरसुदूर तमाचं साम्राज्य. दिवा लावो वा निओनसाइन्स. तमाचं राज्य अढळच, एकछत्री. क्षणाक्षणावर अंमल त्याचा. हटता हटत नाही तो काळोख, आत आत झिरपत जात असलेला, जन्मोजन्मीचं नातं असल्यागत. तो काळोखही आवडायला लागतो कधी ते कळतही नाही. मग रात्र होण्याची वाट पहायची सवयच लागते. काळोखाला घट्ट मिठी मारण्यासाठी. काळोखाला नसतात दिशा, काळोखाला नसतात मार्ग. काळोखाला नसतो तळ वा नसते गती. काळोख बऱ्याचदा असतो गोठून जाणारा क्षण. तोही कल्पेच्या कल्पे वाटावा असा. त्या गोठलेल्या काळोखाचं सौंदर्य शिल्पीत करावं अशी एक शलाका क्षणभर चमकून जाणारी. तीही निखळणाऱ्या ताऱ्यागत, उल्कागत. तरीही तम, काळोख आपला वाटावा तो क्षण मोलाचा!
☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
(आर्थिक व्यवहार प्रचंड वाढले. या वाढीव आर्थिक व्यवहारांना सहजपणे तोंड देईल अशी बँकिंग प्रणाली विकसित झाली.) – इथून पुढे
पूर्वी प्रत्येक व्यवहार बँकेत जाऊन करावा लागे तिथे आता तसे करण्याची गरज उरली नाही. बँकेत कॉम्पुटर आले तशी जॉब जातील अशी ओरड करणाऱ्या युनियन्सचे देखील या ऑटोमेशनच्या रेट्यापुढे काहीही चालले नाही. देशाचे बजेट काही हजार कोटींचे असे ते काही लाखो कोटींचे झाले. ग्राहकाला बँकेत जाण्याची गरज नसल्याने ब्रांच मधील स्टाफ कमी झाला असला तरी बँकांची आणि ब्रांचेसची संख्या वाढल्याने बँक क्षेत्रात बेकारी वाढली नाही. पैसा खेळू लागला त्यामुळे बँकेचा स्टाफ जो कांऊटर बसून व्यवहार करत होता तो कार लोन, होम लोन,बिझनेस लोन देण्यसाठी मार्केटिंग करत फिरू लागला. ऑटोमेशनमुळे बँकेत जाऊन व्यवहार करण्याची गरज संपली तशी कॅश व्यवहार करण्याची गरज देखील संपली. अगदी १० रुपयांची वस्तू घेण्यास पैसे जवळ बाळगण्याची गरज देखील संपली. QR कोड नावाची जादुई गोष्ट प्रत्येक दुकानात फेरीवाल्याकडे आली. आर्थिक देवाणघेवाण गरिबच काय अशिक्षित देखील सहज करून लागला. सुट्या पैशांचा प्रश्न तर सुटलाच. पण उरलेले किती द्यायचे घ्यायचे ही वजाबाकी (होय काही सुशिक्षित तरुणांना देखील ही वजाबाकी अवघड जात असे) करण्याचा प्रश्न पण संपला. बँकेत एके काळी राजकीय पक्षांच्या लोन वाटपाच्या योजनांसाठी लागणारी झुंड बंद झाली आणि सामान्य व्यावसायिक आत्मनिर्भर होऊ लागला. त्याचा क्रेडीट स्कोर तयार होऊ लागला. लोन देण्यसाठी बँक पुढे येऊ लागली कारण लोन बुडणार नाही याची खात्री बँकेला झाली.
इतके दिवस ऑटोमेशन मानवी कष्ट कमी होतील किंवा कमीत कमी मानवी कष्टात जास्तीत जास्त उत्पादकता मिळावी या साठी होती. उत्पादकतेबरोबरच गुणवत्ता आणि अचूकता हा देखील उद्देश होता. आता हे ऑटोमेशन मानवी क्षमताच्या आणि भावभावनांच्या ताबा घेऊ लागले आहे किंवा त्यावर मात करू लागले आहे. उदा. गाडी चालवणे ही केवळ मानवी क्षमता असे आजवर आपण मानत आलो आहोत. कारण गाडी चालवताना कान आणि डोळे या ज्ञानेंद्रियांकडून जे ज्ञान होते, त्या ज्ञानाचे मेंदूंत अतिशय वेगाने पृथक्करण करून ड्रायव्हरला गाडीचा वेग वाढवणे, कमी करणे,आपत्कालात प्रसंगी क्षणात ब्रेक दाबणे, जरुरी इतके डावीकडे वा उजवीकडे वळणे इत्यादी क्रिया आपला मेंदू इतर अवयावांकडून सहजतेने घडवून आणतो. एकदा गाडी चालवण्याचे तंत्र शिकले की गाडी केव्हाही हातात घ्या आपला मेंदू आणि इतर अवयव एकमेकांशी संवाद साधून आपण अपघातरहित गाडी चालवतो. हे केवळ मानवाला दिलेले ईश्वरी वरदान आहे असा आपला आजवरचा समज. अर्थात गाडी चालवताना मेंदू आणि अवयव यांच्यातील संवाद काही कारणाने वा लक्ष विचलित झाल्याने तुटला तर अपघात हमखास. हे लक्ष विचलित होणे ही चूक मानवाच्या हातून होणे ही सहज प्रवृत्ती आहे. पण ही चूक प्राणांतिक ठरू शकते. ए-आय या मानवी चुकांपलीकडे काम करण्याची क्षमता ठेवते. यात कारला चहू बाजूने कॅमेरे लावलेले असतात. या कॅमेर्यांनी घेतलेल्या फोटो एका कृत्रिम मेंदूकडे पाठवले जातात हा मेंदू (CPU) या इमेजेसचे तत्काळ पृथक्करण करून गाडीत असलेल्या वेगवेगळ्या मोटोर्सना (अवयव) आज्ञा देऊन काय action घ्यायची हे घडवून आणतो. हे काम मानवी मेंदू आणि त्यांचे अवयव ज्या तत्परतेने करतात त्यापेक्षा अधिक वेगाने आणि अचूक घडू शकते. आता ड्रायव्हरची गरजच नाही. ए-आयला मानवी भावभावना नसल्याने चित्त विचलित होण्याचा प्रश्नच नाही. शिकवलेले काम मुकाट्याने करायचे. रस्त्यात सुंदर मुलगी दिसली म्हणून चित्त विचलित झाले. घरी बायकोशी भांडण झाले म्हणून आज गाडी अवास्तव वेगात नेली आणि धडकवली हा प्रश्नच नाही. आता भावभावनांच्या कल्लोळातून अपघात होण्याचा प्रश्न टळला. कोणत्याही नव्या डेव्हलपमेंटनवे प्रश्न उपस्थित नको का व्हायला? मग अशा ए-आय चलित गाड्या आल्या तर ज्या लाखो ड्रायव्हरांना नोकऱ्या मिळतात त्यांच्या बेकारीचे काय. ग्राहकाला नाकारणे, अवास्तव पैसे मागणे, उर्मटपणे बोलणे हे दुर्गुण घेऊन जर ड्रायव्हर ग्राहकाशी वागणार असतील तर उद्या OLA UBER अशा गाड्या घेऊन रस्त्यावर आल्या तर काय हा प्रश्न आहे. अशा गाड्या महाग आहेत आणि फक्त अतिश्रीमंतांना त्या परवडतील त्यामुळे काळजी नाही असा जर आपला समज असेल तर तो खोटा आहे. आज गाडीच्या भोवती लावलेले कॅमेरे गाडी चालवताना चालकाला अपघाताची क्षमता असलेल्या जागेची सूचना देऊ लागल्या आहेत. अगदी ५० फुटावर असलेला स्पीड ब्रेकर गाडीला ओळखता येतो. किंवा रस्त्यावरचे खड्डे ओळखून गाडीतील लोकांना त्रास होणार नाही नाही या नुसार गाडीचा वेग कमी होऊ शकतो अशी वाहने बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. तेव्हा ए-आय आधारित स्वस्त कार्स फार दूर नाहीत. वर कारचे उदाहरण दिले आहे. अशा अनेक जागा ए-आय माणसाकडून हिसकावून घेते आहे. अनेक रेस्टॉरंटमध्ये वेटर्सची जागा ए-आय रोबोट्सनी घेतली आहे. डिलिव्हरीबॉय डिलिव्हरीड्रोन घेतायत. जगातले अनेक संशोधक नवनव्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन या कामात आपली creativity दाखवत आहेत. ए-आय हे केवळ शाप की वरदान हा निबंध लिहिण्याइतकेच मर्यादित नाही तर त्यापलीकडे मानवी जीवनावर परिणाम साधणारे आहे. यात केवळ ड्रायव्हर, डिलिव्हरीबॉय आणि वेटर्सचे जॉब जाणार नाहीत तर चित्रकार, कलाकार, व्हाईस artist, actors, क्लार्क, शिक्षक, मॅनेजरस् अशा अनेकांना आपले स्कील वा ज्ञान ए-आयच्या पलीकडे अद्ययावत ठेवावे लागणार आहे. हा तंत्रज्ञानाचा रेटा कोणीच रोकु शकणार नाही. रेल्वेत, मेट्रोमध्ये बुकिंग क्लार्क आता लागतच नाहीत. तंत्रज्ञानामुळे मेट्रोमध्ये विदाऊट तिकीट तुम्ही जाऊच शकत नाही. रस्त्यावर ट्राफिक नियमांचे केलेलं उल्लंघन तुमच्या मोबाईलवर त्याचे चलन येते कारण कॅमेरे तुम्हाला गुन्हा करताना ओळखतात. ‘उपरवाला सब देख रहा है’ ही उक्ती आता प्रत्यक्षात आली आहे ती ए-आयमुळे. अमेरिकेत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना तपासणीमधून जावे लागत नाही ए-आय कॅमेरे तुम्हाची ओळख पटवून घेतात नी तुम्हाला अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवतात. कारण तुमची ओळख ए-आय कॅमेरे ज्या अचूकतेने घेतो ती मानवाच्या दृष्टीतून कधीतरी सुटू शकते. बेकायदेशीर मानवी तस्करी,गुन्हेगारांचा शोध ए-आय सहज घेऊ शकते. पोलिसांना ए-आय वरदान ठरणार आहे. उद्या ए-आय स्वयंपाकघरात येणार आहे. गृहिणीचा वा गृहस्थाचा सुगरणपणा ए-आय माध्यमातून काय स्वयंपाक करायचा आणि चव कोणती आणायची हा असणार आहे.
ए-आय हा मानवाचा मदतनीस असणार त्यापेक्षा जास्त स्पर्धक असणार हे निश्चित. इतकी वर्षे ऑटोमेशन मशीनपुरते मर्यादित होते. आता एआयमुळे ते मानवापर्यंत येऊन ठेपले आहे. या स्पर्धाकाशी मुकाबला सोपा नाही. गेली २५ वर्षे softwareक्षेत्राने मध्यम वर्गाला उच्च मध्यम वर्ग अथवा श्रीमंतीचे दिवस आणले. त्यांचा गर्व देखील हे एआय उतरवणार आहे. Software coding आता एआय करू लागले आहे. एके काळी मॅट्रीक पास होण्याच्या जोरावर नोकरी मिळवणे आणि ती रिटायर होईपर्यंत टिकवणे शक्य होई. आता ही मंडळी आता भाग्यवान वाटू लागली आहेत. छोट्याश्या ज्ञानाच्या भांडवलावर संसार ४-४ मुलाबाळांची लग्ने केली. आता आपले आज कमावलेले ज्ञान उद्या निकामी आणि निरुपयोगी ठरणार आहे. ज्ञानाची कुशलतेची expiry date पाच वर्षांच्या आत येते आहे. कशी टक्कर देणार याला हा मोठा प्रश्न आहे. आपली विनयशीलता,कार्यक्षमता, बुद्धिमत्ता, चातुर्य या गुणांवर काही प्रमाणात टक्कर देणे शक्य आहे. मत्सर, इर्षा,भांडखोरवृत्ती, उर्मटपणा सोडला आणि एकमेकांना धरून या स्पर्धेवर मात करावी लागेल. नाहीतर बायको/नवऱ्याचा प्रेयसी/प्रियकराचा स्वभाव फार किरकिरा आहे म्हणून कोणी एआय ड्रिव्हन अलेक्सा अथवा जॉन बरोबर रहाणे पसंत करू लागले तर ही स्पर्धा कुठपर्यंत जाईल हे सांगता येणार नाही. काळजी घेऊयात. नाहीतर…..पस्ताओगे.
भगवान कृष्णाने छोट्या करंगळीनंच गोवर्धन पर्वत का उचलला ?
तसंही आपण सर्व जाणतोच की, इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी श्रीकृष्णानं करंगळीनं गोवर्धन उचलला.
दुसऱ्या बाजूने सुध्दा या प्रसंगाचा विचार करता येईल.
जेव्हा कृष्णानं इंद्राच्या रागा पासून गोकुळ वासियांचं संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वतच आपल्या बोटानं उचलण्याचं ठरवलं, तेव्हा कृष्ण आपल्या हाताच्या बोटांना विचारतो, मी कोणत्या बोटानं पर्वत उचलू ?
सर्वात आधी अंगठा म्हणाला, मी सर्वात ताकदवान आहे, पुरुष आहे, बाकीच्या तर स्त्रिया आहेत, आपण पर्वत उचलण्यासाठी माझाच वापर करावा !
नंतर तर्जनी म्हणते, भगवान, कधी कुणाला चुप बस असं सांगताना मिच कामास येते.आणि आपण जे काम करणार आहात ते इंद्राला चुप करण्याचंच आहे.म्हणून आपण माझा वापर करावा, हे उत्तम !
यानंतर मध्यमा म्हणाली, सर्वात उंच होण्यासोबतच मी ताकदवान सुध्दा आहे.म्हणून या कामासाठी आपण माझाच विचार करावा !
अनामिकेला खात्री होतीच, तरीही ती म्हणाली, भगवान, सर्व पवित्र कामं माझ्यामुळं संपन्न होतात. सर्व मंदिरांत मीच देवतांना टिळा लावते.
आता कृष्णानं फक्त छोट्या करंगळीकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात पाणी होतं, ती म्हणाली, ” भगवान, एक तर मी सगळ्यात छोटी आहे.माझ्यात असा कोणताच असामान्य गुण नाही.
माझा कुठं उपयोग सुध्दा होत नाही. माझ्याकडे एवढी शक्ती सुध्दा नाही, की मी पर्वत उचलू शकते. मला फक्त याची खात्री आहे की, मी तुझी आहे !” छोट्या करंगळीचं म्हणणं ऐकून भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, “ कनिष्ठे तुझी विनम्रता पाहून मी आनंदी झालो आहे. जर काही उच्च मिळवायचं असेल तर विनम्र होणं आवश्यक आहे.” ….. आणि कनिष्ठेच्या सन्मानासाठी भगवंतानं करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला !”