☆ युगंधरा–स्त्री शक्ती ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
युगंधरा स्त्री शक्ती अनादी, अनंत !
किती युगे, किती वर्षे लोटली ! तरी मी आजतागायत आहे, तशीच आहे. कीती उन्हाळे, कीती पावसाळे, कीती ऋतु किती वर्षे, माझ्या पद स्पर्शाने तुडवली गेली, ते मलाच माहीत ! पण मी आहे तशीच आहे, तिथंच आहे !
परिवर्तने बरीच झाली, किती तरी युगे, काळ रात्री शृंगारात गप्प झाली, पण माझ मूळ रूप हा स्थायी भाव झाला, आहे आणी तो तसाच राहणार ही काळ्या दगडावरची रेघ !
मी कुठे नाही ? जगात कुठल्याही प्रांतात जा मी असणारच. तिन्ही काळ अष्टौप्रहर माझं अस्तित्व आहेच की. माझ्या शिवाय ह्या जगाचे सुद्धा पान इकडचे तिकडे होणार नाही !
देवादिकांच्या काळापासून माझं अस्तित्व मी पुढे पुढे नेत आहे. संख्याच्या प्रकृती सिद्धांता पासूनच ! त्यांच पण सदैव साकडं माझ्या पुढेच! मी त्यांचा बऱ्याच वेळा उद्धार केला. आज पण मी च सर्व मानवाचच नाहीतर, सर्व सृष्टीतील
सर्व प्राणी पशु पक्षी जीवजंतु यांचं पण पोषण करतेय ! किंबहुना मीच सृष्टी आहे. जगातील सर्व घटकावर माझीच नजर असते !
मला कोण आदिमाता म्हणतात, तर कोणी मोहमाया, तर कोणी आदिशक्ती, तर कोणी प्रकृती ! माझं कार्य हे मी कधीच बदलेल नाही, बदलणार नाही, हे त्रिवार सत्य.
मी च ती “त्रिगुणात्मक” सृजनशील शक्ती. मी सृष्टी ! मी धरा, मी मेदिनी मी च पृथा ! “मी माता, ” मी अनेक प्रकारची “माती” मी स्त्री !, मी प्रजनन करणारी !. पालन, पोषण संगोपन, करणारी ! मी जीवसृष्टीची निर्माती, मी
“माता ते मी माती” पुर्णस्वरूप जगत्रय जननी ! विश्व दर्शन ! देणारी. तमोगुणी असलेतरी, दीप, पणती उजळणारी ज्ञानाची ज्योत !
हो पण माझ्या काही सवयी आहेत, त्या मी पुर्ण करून घेण्यासाठी सर्व काही क्लुप्त्या वापरते. मी च हट्ट पुरवून घेणार ना ?
कोण नाही हो मी ? ऋतुनुसार माझे रूप पालटले जातात. मी प्रत्येक ऋतूत निराळीच असते. माझं सौंदर्य हेच माझं अस्त्र, माझ्या शिवाय तुमच्या जगण्यात पूर्णत्व येत नाही !
मी साज शृंगारा शिवाय राहू शकत नाही. मी च तर करणार ना साज शृंगार तो माझा निसर्गदत्त अधिकार ! मी अवखळ कन्या, तरुणी, कल्याणी, प्रेमिका, अभिसरीका, मी भार्या, मी च ती, सर्व हट्ट पुरवुन घेणारी तो ही अगदी सहज पणे !
मी साज, मी दागिना, नटणे, लाजणे, मुरडणे, नखरा करणे. मनमुरादपणे हौस करून घेणारी. स्वर्गातील अप्सरा रंभा मेनका उर्वशी हे माझेच पूर्वज ना ! माझेच रूप ना?
मी च “सांख्य तत्वाची” प्रकृती ! जड, अचेतन त्रिगुणात्मक, मोहमयी, गुढ, आगम्य, सर्वव्यापी, बीजस्वरूप कारण, मी सर्वत्र एकच आहे ! स्वतंत्र स्वयंभु पण निष्क्रिय !
मी कोण ! अस का वाटत तुम्हाला ? मी फुलात, पानात, फळात आहेच की. सुगंधच माझी ओळख.
विविध रंगाच्या आकाराची, फुले त्यांचं विविध गंध, वर्ण त्यांची झळाळी, हिरव्यागार झाडात वेलीत, त्यांचं मनमोहक रूप, तरीपण निष्क्रिय ! माझे अस्तीत्व मृदुमुलायम स्पर्शात, कोकिळेच्या कंठात, पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात, गायीच्या हंबरण्यात, मयुर केकात !
आजचे माझे अस्तित्व, काळानुसार जरी सुधारले असले तरी, मी सगळीकडे आहेच की, माझा पोशाख माझं राहणीमान माझ्यातल परिवर्तनाचाच भाग आहे.
मुळात माझ्याकडे निसर्गाने जी दैवी शक्ती दिली आहे, तीच आदिशक्तीचे अधिष्ठान आहे. अधिक जबाबदारी निसर्गाने घालून दिली.
म्हणूनच देवादिकांच्या पासुन ते आजच्या मानवापर्यंत माझी स्तुती चालत आली आहे.
।। दुर्गे दुर्घटभरी तुझं वीण संसारी
अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी ।।
।। वारी वारी जन्म मरणा ते वारी
हरी पडलो आता संकट निवारी ।।
अशी आरती करून तुम्ही माझ्या स्त्रीत्वाचा सत्कार आक्ख जग अजुनी करतच की !
अनादी अनंत चार युगे उलटली ! महिला आहे, म्हणुनच जग आहे, हे खरं ! जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हा पासुन पूजनीय वाटु लागली ? पुर्वी ती पूजनीय नव्हती का ? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का ! मग आजच नारीचा नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात, कुठला पुरुषार्थ आला बुवा ?
पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का ? पूर्वी इतकी स्त्री पुज्यनिय आता आहे असं वाटत नाही का ? बिलकुल नाही, पूर्वी जेवढी स्त्री पुजनिय होती, तेवढी आता नाही ! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.
“यात्र नार्यस्तु पुज्यन्नते रमंते ” ह्या विधानात सर्व काही आले, व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्ष्यात ठेवा. बस म्हटले की बसणारी उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे हातातील खेळणं आहे असं वाटत काय ?
हल्ली काळा नुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे, गरज शोधाची जननी ! काळ बदलला नारी घरा बाहेर पडली कारण परिस्थितीच तशी चालुन आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणुन, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोरा गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषर्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागच चुल मुलं बाळंतपण पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच ! त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य !
पुर्वीच्या काळात ही परिस्थितीला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला ! आठवा त्या गोष्टी, पिठाची गिरणी नव्हती हाताने दळणकांडणच काय घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीच धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभत त्या विकुन घरार्थ चालवीत होत्या अजुनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती कामात पण स्त्रिया मागे नव्हत्याच ! आता ही नाहीत.
मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की, नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना ? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषा बरोबरीने अंग मेहनत करत त्या अर्थार्जन करत होत्या !!!
लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा, असो वा कुलदैवत दर्शन, असो मंगळागौर असो किंवा डोहाळ जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मानपानच होता. गौरवच सत्कार होता ना ! प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना !
सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चांनाम्मा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीक च होती ना ?
काळ बदलला आस्थापना कार्यशैली बदलली. युग नवं परीवर्तन घेऊन आलं. नवं कार्याचा भाग पण बदलला तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार बलात्कार गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे ! पूर्वी पेक्ष्या नारी सुरक्षित आहे का ?
कारण स्पष्टच, चित्रपट टेली व्हिजन येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे, पूर्वीही संघटीत होत्या, नाही असे नाही तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे !
तिच्या अस्मितेची लढाई अजून चालू आहे. प्रत्येक क्षेत्रांत स्त्री आहे, घर कुटुंबा पासून ते सैन्य भरती पर्यंत ! मजल दरमजल करत ती पुढे पुढे जात आहे
अलिकडेच खेडे गावात राहणारी राहीबाई पोपोरे पासून ते कल्पना चावला पर्यंत ! अशी कित्येक उदाहरणे देता येतील. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्याअस्मितेवर तिने आघाडी घेतली आहेच. कोणतंही क्षेत्र तिने सोडलं नाही ! तरीपण कैक पटीने ती तीच अस्तिव सिद्ध करत आहे. स्त्री जीन पॅन्ट घालो अगर नऊ वारी सहा वारी साडीत असो, मातृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतलीच ना ? गरीब असो वा श्रीमंत, घरात असो वा कार्यालयात तिला मुलाप्रति जिव्हाळा हा तसूभरही कमी झाला आहे का ?
साक्षात भगवान शंकरांनीही पर्वतीकडे भिक्षा मागितलीच ना.
।। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ।।
ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्ष्यां देही च पार्वती ।।
बघा हं गम्मत साक्षात भगवान शंकर, पार्वती कडे भिक्षा मागतात !
काय म्हणतात हो ?
अन्नपूर्णे मला ज्ञान आणि वैराग्यासाठी भिक्षा घाल ! भुकेसाठी ? हो भूक ही नुसती पोटाची नसते बर का ! खर ज्ञान मिळण्यासाठी ! भूक पण अनेक प्रकारची असतेच की! वैराग्य प्राप्तीसाठी पण ! वैराग्य केव्हा प्राप्त होत ? तर विश्व दर्शन झाल्यावर. ही झाली देवादिकांची कथा त्यापुढे मानवाचे काय ? स्त्री शक्ती ही कालातीत आहे. असे असूनही तिच्यावरचे बलात्कार, स्त्रिभुण हत्या का थांबत नाहीत ?
☆ “आप की ऩजरो ने समझा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
… अलिकडे अलिकडे रिक्त हस्ताने रात्र माझ्या दारी अवतरते… उदासीचा घनघोर काळा अंधार बसतो पहाऱ्याला.. अन रात्रभर दार सताड उघडेच असते… कुणी येईल याची आतुरतेने वाट पाहात राहते… निराशा पदरी पडते पण कुणाचेही पाय इकडे वळत नाहीत… आलेली रिक्त रात्र मग सकाळ होताच तशीच निघून जाते दारातूनच.. उसासे भरून.. सगळया मोहल्यात तर दररोज संध्याकाळपासून दिव्यांची रोषणाई उजळून टाकत असते रंगीबेरंगी दारं, खिडक्या आणि भिंतीनां… अप्सरांचे मुखवटे दारी, सज्जात घुटमळत असतात मुरकत, भुवया उडवत, कंबर लचकत आपल्या नव्या नव्या सावजाच्या प्रतिक्षेत… साज शृंगाराने नटलेले शरीर, अत्तराचा घमघमाट, मोगऱ्याच्या गजऱ्याचा नाजूक सुकोमल फुलांचा पसरलेला सुगंध सारा माहोल धुंद करून सोडलेला असतो.. सुंगधी केवड्याच्या बनात नागीण लपून बसते तशी इश्काच्या माशुकी सळसळत राहतात आपल्या हवेलीत, हवेलीच्या वाटेवर… रात्र गडद होत जाते तशी हळुहळू इश्काचे माशुक येतात चोर पावलांनी दबकत दबकत… आपल्या मनाच्या
दुखऱ्या जखमेवर प्यारीचा हळवा कोपरा शोधत… व्यवहाराच्या सौद्या नुसार प्रेमाची देवाणघेवाण इथं रात्रभर चालते… घडी घडीला दार खिडक्यांची उघड मीट होत राहते… डोळयांची उघडझाप व्हावी तशी… भिडू बदलत गेला तरी पण आतली प्रीतीचा खेळ मात्र उत्तरोतर रंगत रंगत जातो… लखलखाटात प्रेमाचा मिना बाजार रात्रभर झळाळून निघत असतो इथं… पोटाच्या वितभर खळगी साठी, परिस्थितीच्या दुर्दैवी वरवंट्याखाली चेपून चिपाडं झालेली शरीरं नि मेलेली मनं घेऊन माशुकीं हतबलतेने उसने हासू चेहऱ्यावर दाखवत आयुष्यातली आपली एकेक रात्र कमी कमी करत जातात… थकलेलं शरीर, मरगळलेलं मन, चुरगाळलेल्या चादरी, काळवंडून सुकुन कोमजलेल्या मोगऱ्याच्या कळ्यांच्या बाजेवर सैलावून पडतं… त्राणं नसलेलं आंबलेलं शरीर दिवस तसाच लोळून काढतं… दोरीवर टाकलेले विरलेले, डागळलेले कपडे लोंबत असतात विस्कटलेल्या मनाच्या चिंध्या चिंध्या झाल्यासारख्या… मग पुन्हा संध्याकाळ झाली कि बेगडी प्रेमाची झुल अंगावर पांघरून घेतली जाते… अंगावरील वस्त्राच्या धागे सुटलेल्या कलाबुताचे दिव्याच्या उजेडात क्षीणपणे चमकताना दिसतात..
… मी ही त्यांच्यांतील एक… पोरसवदा वयात फसलेली.. नशिबाच्या फेऱ्यात अडकलेली… घरादाराने, समाजाने कलंकित म्हणून लाथाडलेली या वस्तीत कधी कशी आले काही कळलेच नाही… त्या सगळ्या लपंट देहातील.. वखवखून उसळून आलेली वासनाने शेवटी चांदनी बाजारापर्यंत आणून सोडले…. समज आली पण त्या मागचं गांभिर्य लक्षात येणारं वयं कधी आलचं नाही…. निराधाराला आधार अमिनाबाईची हवेली…. नजरेची जरब असणारी अमिनाबाई… वसुलीची पक्की…. कुठल्याही पुरूषात गुंतून पडायचं नाही हा एकमेव नियम मात्र कटाक्षाने पाळण्यास सांगितला जाई… दावणीला बांधलेल्या माजाला आलेल्या बैलांच्या नाकात वेसणीचा रज्जू असतो तसा हवेलीची मोहर उजव्या हातावर ठसठशीतपणे गोंदवलेली असल्याने तिथून बाहेर पडण्याचा मार्ग कायमचा बंद केलेला… असं असतानाही.. असचं एका रात्री बऱ्याच उशीराने त्याचं येणं झालं होतं.. ओळखी नंतर त्याचं येणं मग सुरूच झालं…. अमरप्रेममधील नायका सारखा… घरच्या स्त्री कडून झिडकारला गेलेला… प्रेमाचा भुकेला… आणि मी… नकळत त्याच्यात गुंतून गेलेली… या नरकातून माझी सुटका तोच करेल या आशेवर विसंबलेली… माझ्या मनीचे गुज ओळखले त्यानें आणि लवकरच येथून बाहेर घेऊन जाईन असा विश्वास दिला… या नरकातून फक्त मरणच सुटका करतं हेच सत्य असतं आणि बाकी सगळचं झुट असतं… हे मानायला नादावलेलं मन कुठे तयार असतं… अचानकपणे हळूहळू त्याचं येणं कमी कमी होतं जातं… खोट्या कारणांची ढाल तो पुढे करत राहतो… त्याचा उधवस्त होणारा संसाराच्या मोहात तो अडकून पडतो.. कमळात अडकलेल्या भुंग्यासारखा.. आणि येणं बंद होतं काहीही न कळवता सवरता… आशाळभूतपणे रोजची रात्र त्याचीच वाट पाहण्यात जाते… आज तो नक्की येईल.. पण तो त्यानंतर कधीच फिरकला नाही…
नेहमी सारख्या बाकीच्या आपआपल्या कोठीत दार बंद करून राहिल्या….. मला कुणी भेटलचं नाही त्या रात्री… वाटलं आजची रात्र आपल्याला फाके पडणार आणि त्यात अमिनाबाई चे गाली गलौच ऐकून घ्यावे लागणार ते वेगळे… रात्रभर तारवटलेले दिवे वाट पाहत राहीले, पहाटेला चला उशिराने का होईना पण आता तरी प्रकाश मिटून पडून राहता येईल. म्हणून… पण तसं काही झालं नाही… आता आता माझे डोळे सुद्धा भरून वाहणे विसरून गेलेत… आणि आणि… अलिकडे अलिकडे रिक्त हस्ताने रात्र माझ्या दारी अवतरते… उदासीचा घनघोर काळा अंधार बसतो पहाऱ्याला.. अन रात्रभर दार सताड उघडेच असते… कुणी येईल याची आतुरतेने वाट पाहात राहते… शमा जलती रही परवाने कि आने कि पैगाम पर… निराशा पदरी पडते पण कुणाचेही पाय इकडे वळत नाहीत… आलेली रिक्त रात्र मग सकाळ होताच तशीच निघून जाते दारातूनच गुणगुणत… जी हमे मंजूर है आपका ये फैस़ला…
तिने दुचाकी उभी केली. इकडेतिकडे पाहिले. दुपारची वेळ असल्याने रस्ता निर्जन होता. सारा परिसरच दुपारी वामकुक्षी घेत असल्यासारखा शांत, निद्रिस्त.. उपनगरातली नवी कॉलनी. सारेच बंगले जणू माणसा-माणसात आलेली अलिप्तता दाखवत होते. मोठे नोकरीला, छोटे शाळा- कॉलेजला. बऱ्याच बंगल्यांना कुलपे. तशी ती काही पहिल्यांदाच तिथं येत नव्हती. नवरा, मुलगा यांच्या बरोबर बऱ्याच वेळा आली होती. तरीही तिला सारे नवखे वाटत होते. तिने खाली उतरून स्वतःचा ड्रेस ठीकठाक केला.
सकाळपासूनच तिचं चित्त थाऱ्यावर नव्हते. चहात साखरच नाही, भाजीत मीठ जास्त तर आमटी आळणी असे काही ना काही सकाळपासून घडतच होतं.
“तुला काही होतंय काय? बरे वाटत नसले तर डॉक्टरकडे जाऊया. उगाच अंगावर काढू नकोस. ”
दीपक, तिचा नवरा तिच्या कपाळावर हात ठेवून ताप नाही ना याची खात्री करत तिला काळजीने म्हणाला तेव्हा त्याच्या स्पर्शाने तिचे मन आक्रसले होते. मनाच्या आक्रसलेपणाची जाणीव होताच तिला कसेसेच झाले होते. मनात अपराधीपणाची जाणीव जागी झाली होती पण पुढच्याच क्षणी तापल्या तव्यावर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखी ती जाणीव वाफ होऊन गेली होती.
‘’ डॉक्टरकडे कशाला? मला काय झालंय? उगाचच तुमचं काहीतरी असते. “
“घर, ऑफिसचं काम, त्यात अलीकडे सोनू पण फार हट्टी होत चाललाय. खूपच दगदग होते तुझी. आज रजा घेतेस का? जरा आराम कर.. जरा विश्रांती घेतलीस की बरं वाटेल तुला…”
त्याच्या ‘ रजा घेतेस का ‘ या शब्दांनी तिने दचकून त्याच्याकडे पाहिले. तो स्वतःचं आवरण्याच्या नादात होता. त्याचं आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून तिला हायसे वाटले.
तिच्याशी बोलता बोलता त्याने स्वतःचा, तिचा डबा भरला होता, सोनूची बॅग भरली होती.
“ तू आवर तुझे. आज जरा उशीरच झालाय. आठ वाजत आलेत.. हवं तर सोनूला मी सोडते आईकडे.. ”
तिच्या वाक्याने त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. ती आपल्याच विचारात असल्यासारखी.. स्वतःचा डबा पर्स मध्ये ठेवत होती. त्याला बसने ऑफिसला जावे लागायचं. तिच्या आईचं घर त्याच्या वाटेवर असल्याने रोजच तो सोनूला तिथे सोडून, स्टँडवर जाऊन बसने ऑफिसला जायचा आणि ऑफिस मधून येताना सोनूला घेऊन यायचा. तिचं ऑफिस आईच्या घराच्या नेमके उलट दिशेला होतं. सारे आवरून ऑफिसला जायचं म्हणल्यावर तिची नेहमीच घाई व्हायची. सहसा ती सोनूला सोडायला, आणायला जायची नाही. त्यामुळे तिच्या वाक्याने त्याने तिच्याकडे पुन्हा एकदा चमकून पाहिले होते.
“गेले काही दिवस झाले पाहतोय तुला.. तुझं लक्ष नसतं, स्वतःच्याच नादात, विचारात असतेस… एवढी कसल्या विचारात असतेस ? ऑफिसमध्ये काही झालंय काय ?“
“ मला काही म्हणालास काय?”
तिने दचकून भानावर येत त्याला विचारले. तिचे दचकणे त्याच्या नजरेतून सुटले नाही. त्याने तिला पुन्हा तेच विचारले.
“काही नाही रे. ऑडिट जवळ आलंय. पेंडिग कामे खूप आहेत त्याचा विचार करत होते. ”
तिने सावरत त्याला उत्तर दिले. त्याला ते उत्तर विचार करून, ठरवून दिल्यासारखं वाटलं. तो पुढे काही बोलला नाही. नुसतं‘ हं ‘ म्हणून स्वतःच आवरायला आत गेला. तिने सोनूचं सारे आवरले.
तिला ‘बाय‘ करून, सोनूला घेऊन तो गेला तशी ती रिलॅक्स होऊन मटकन सोफ्यावर बसली.
काही क्षण स्वस्थतेत गेले आणि पुन्हा अस्वस्थता मनाला बोचू लागली.. मनात द्वंद्व सुरु झाले…’काय करावे ? ‘ प्रश्नाचा भोवरा मनात गरगरु लागला.
मोबाईलची रिंग वाजली तशी ती विचारातून भानावर आली. तिने पाहिले. फोन स्वप्नीलचाच होता. उजाडायला सुरवात झाली की नकळत हळूहळू अंधार हटत जातो तसे तिच्या मनातले विचार, मनाची संभ्रमावस्था हटत गेली.
“ सुप्रभात ! आवरले काय ? सोनू काय म्हणतोय? झाली तयारी?”
स्वप्नीलचा खर्जातला आवाज कानावर पडला.. आणि ती भारावल्यासारखी झाली.
“ सुप्रभात ! दोघेही आत्ताच बाहेर पडले. आत्ता आठवण झाली वाटते?”
“ आठवण व्हायला विसरावे लागते… आणि कितीही, काहीही वाटले तरी तू थोडीच माझ्यासाठी फ्री आहेस ? तुझी वाट पाहणे हेच आयुष्य झालंय माझे… वाट पाहतोय.. येतेस ना लगेच ?”
“हं. ऑफिसला जाऊन येते.. ”
“ऑफिसला जाऊन.. ?”
त्याचा रुसल्यासारखा स्वर.. तिचे मधाळ हसणे. काही क्षणांनी तिने फोन ठेवला. तिचा चेहरा आणि मन खुलून आले होते.. मनात स्वप्नील रेंगाळत असतानाच तिने सारे आवरले.
ती आरशासमोर उभं राहून आवरत असताना तिने स्वतःच्या प्रतिबिंबकडे पाहत, ‘ मॅडम, रागावणार असला तर रागवा.. पण राहवत नाही म्हणून सांगतो.. आज तुम्ही खूप खूप छान दिसताय.. ‘ हे स्वप्नीलचे पहिले वहिले वाक्य अंगभर लपेटून घेतले.
ऑफिसमध्ये नव्यानेच बदलून आलेला स्वप्नील.. एकाच ऑफिसात असल्यावर ओळख व्हायला कितीसा वेळ लागणार? मुळात त्याचं व्यक्तीमत्व प्रथमदर्शनी प्रभाव पाडणारे होतंच. त्यात त्याचा खर्जातला, सतत ऐकावा वाटणारा आवाज.. , आपलेपणा वाटावा असे बोलणे, मदतीला सतत तत्पर असणे.. कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी भरभरून प्रशंसा करणे, प्रोत्साहित करणे.. त्याचं सारेच कसे भुरळ पाडणारे होते… पण भुरळ पडायला ती काही षोडशवर्षीया नव्हती. ती विवाहिता होती. तिचा दीपकशी प्रेमविवाह झाला होता आणि ती एका मुलाची, सोनूची आईही होती..
स्वप्नीलने केलेली तिच्या सौन्दर्याची प्रशंसा तिने काहीही न बोलता फक्त हसून स्वीकारली होती… पण त्याचे ते वेगळे शब्द, बोलण्याची वेगळी पद्धत तिला भावून गेली होती.. नकळत कुठेतरी तिच्या मनात.. अंतर्मनात रुजली होती. मनात त्याच्याबद्दल आपलेपणा रुजू लागला होता.
स्वप्नीलला ऑफिसच्या कामांची माहिती तर खूप होतीच त्याशिवाय इत्तर सर्वसाधारण माहितीही त्याला जास्त होती. त्याचं इंग्रजीवरचं प्रभुत्व खरंच वाखाणण्यासारखं होते त्यामुळे काहीही अडचण आली की सारेच त्याचे मार्गदर्शन घ्यायचे. तो ही हसतमुखाने आनंदाने, आपलेपणाने सगळ्यांना मदत करायचा.
तो तसा सगळ्यांनाच मदत करीत असला तरी आपल्याबाबतीत जरा जास्तच जवळकीने वागतो हे तिच्या लक्षात आले होते.. काळजीने, आपुलकीने चौकशी करणे, प्रोत्साहित करणे, हे सारेच तिला आवडायला लागले होते.. तिची स्तुती करणारे अनेकजण तिला भेटायचे त्यांना ती हसून दाद ही द्यायची पण स्तुतीने हुरळून जायची नाही. स्वप्नीलच्या बाबतीत मात्र वेगळे घडत होते. त्याने स्तुती केली की ती सुखावत होती. तिला त्याने केलेली स्तुती आवडू लागली होती, सतत त्याने स्तुती करावी आणि आपण ऐकत राहावी असे वाटायला लागले होतं. त्याचे शब्द तिच्या मनात रेंगाळायचे.. ती त्या शब्दांच्याआणि त्याच्या आठवणीत रमायला लागली होती.
ऑफीसातले काम घरी घेऊन यावे तसे ती त्याच्या आठवणीची फाईल घरी घेऊन येऊ लागली होती. हातातली कामं झटपट आटपून ती त्या फाईलमध्ये डोके खुपसून बसू लागली होती..
(अर्थ- जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, अर्थात त्यांना मान दिला जातो, तेथे देवता आनंदपूर्वक निवास करतात. जेथे त्यांची पूजा होत नाही, अर्थात त्यांचा मान राखला जात नाही तेथील सर्व चांगली कर्मे देखील निष्फळ होतात.) हा अर्थपूर्ण श्लोक चिरंतन आहे, म्हणूनच आजच्या काळात देखील तितकाच प्रासंगिक आहे.
८ मार्च या अंतर्राष्ट्रीय महिला दिनानिमित्य अभिनंदन आणि शुभेच्छा! या सर्वांनाच लागू होतात. कारण आजचा काळ असा आहे की पुरुषांची म्हणून लेबल लावलेली कामे महिला बिनधास्तपणे करतात, तर या उलट स्त्रियांची पारंपारिक कामे कधी कधी पुरुषमंडळी अगदी निगुतीने करतात. (यासाठी पुरावा म्हणून मास्टर शेफचे एपिसोड आहेतच).
आंतरराष्ट्रीय (जागतिक) महिला दिनाचा इतिहास
मंडळी आंतरराष्ट्रीय (जागतिक) महिला दिनाचा इतिहास थोडक्यात सांगते. अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगातील स्त्रियांना २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यात क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. ‘ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड निदर्शने केली. त्यात दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या प्रमुख मागण्या होत्या. सोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक स्तरावर समानता आणि सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क हे देखील मुद्दे होते. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी या अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लाराचा मंजूर झाला.
नंतर युरोप, अमेरिका आणि इतर देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्री संघटनांना बळकटी आली. जसजसे बदलत्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तसतशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
स्त्रियांचे सक्षमीकरण- माझा अनुभव
या निमित्याने मी महिला सशक्तीकरणाची एक आठवण शेअर करीत आहे. प्रवासात असतांना त्या त्या प्रदेशातल्या स्त्रिया कशा वागतात, त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य कितपत विकसित आहे, हे मी उत्सुकता म्हणून बघत असे. साधारण २००३ चा काळ होता. (मैत्रांनो, मित्रांनो हे लक्षात असू द्या की, हा काळ वीस वर्षे जुना आहे. ) मी केरळ येथे फिरायला गेले होते, देवभूमीचा हा सुंदर प्रवास रम्य अशा हिरवाईतून करीत होते. नारळांच्या वृक्षांच्या लांब रांगा अन लगत समुद्राचे निळेशार जल (समुद्र कुठला ते विचारू नका प्लीज)! बसमधून असे विहंगम दृश्य दिसत होते. बस कंडक्टर एक मुलगी होती, विशीतली असावी असे मला वाटले. अत्यंत आत्मविश्वासाने ती आपले काम करीत होती. बस मध्ये फक्त महिलांसाठी असे समोरचे २-३ बेंच आरक्षित होते. त्यावर तसे स्पष्ट लिहिले होते. कांही तरुण त्यावर बसले होते. एका स्टॉपवर कांही स्त्रिया बसमध्ये चढल्या. नियमानुसार त्या राखीव जागांवरून तरुणांनी उठून जायला हवे होते. त्यांनी तसे केले नाही. त्या स्त्रिया उभ्याच होत्या. तेवढ्यात ती कंडक्टर आली आणि मल्याळम भाषेत त्यांना जागा रिकामी करा असे तिने सांगितले, मात्र ते तरुण हसत होते आणि तसेच बसले होते. मी आता बघितले की, ती रोडकीशी मुलगी रागाने लाल झाली. तिने त्यांच्यापैकी एकाची कॉलर पकडली अन त्याला जबरदस्तीने उभे केले. बाकीचे तरुण आपोआप उठले. तिने नम्रपणे त्या स्त्रियांना बसायला जागा करून दिली, अन जणू कांही झालेच नाही असे दाखवत आपले काम करू लागली.
मैत्रांनो मला आपल्या ‘जय महाराष्ट्राची’ आठवण आली. असे वाटले की इथं काय झाले असते? केरळात साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के आहे! (तेव्हां आणि आत्ताही) मेघालयच्या प्रवासाचे वर्णन मी नुकतेच एका लेख मालिकेत केले, तिथे देखील स्त्रियांच्या संपूर्ण साक्षरतेमुळे आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे जे स्त्री शक्तीचे अद्भुत रूप मी ठायी ठायी अनुभवले, ते वारंवार नमूद केले आहेच.
मंडळी, यात कुठलीच शंका नाही की, मतदानाचा हक्क तर महत्त्वाचाच, पण त्या योगे स्त्री स्वतंत्र झाली असे समजायचे कां? तो तर दर पाच वर्षांनी मिळणारा अधिकार आहे. स्त्रीला घरात आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का? बरे, मांडले तरी ते विचारात घेतल्या जाते कां? हे सुद्धा बघायला नको कां? अगदी साडी खरेदी करायची असेल तर आर्थिक स्वातंत्र्य आहे कां, अन ते असले तरी स्वतःच्या पसंतीची साडी घेता येते कां? मंडळी प्रश्न साधा आहे पण उत्तर तितके सोपे आहे कां? ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ हे शब्द अजूनही जिवंत कां आहेत? १९५० साली आलेल्या ‘बाळा जो जो रे’ या सिनेमातील ग दि माडगूळकरांची ही रचना आज देखील सत्याशी निगडित कां वाटावी? जिथं स्त्रीला देवीच्या रूपात पुजल्या जाते तिथे तिची अशी अवस्था कां व्हावी?
युनायटेड नेशन्सच्या ८ मार्च २०२४ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे, “महिलांमध्ये गुंतवणूक करा: प्रगतीचा वेग वाढवा”. यात स्त्री अंकुराचे रक्षण, स्त्री आरोग्य, स्त्रियांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख जलदगतीने उंचावणे हे सर्व मुद्दे आहेत. पण स्त्रियांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचार रोखणे आणि ते झाल्यास अपराध करणाऱ्याला कठोर शिक्षा करणे, या बाबी तितक्याच महत्वाच्या आहेत. समाजात स्त्रीचे स्थान अजूनही दुय्यम कां आहे? यावर सामाजिक विचारमंथन होणे आवश्यक आहे. भलेही संविधानात नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही स्तरावर लिंगभेद नसावा हे स्पष्ट आहे, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
मला या दिनाविषयी इतकेच वाटते की, स्त्रीला देवी म्हणून मखरात बसवू नये तसेच तिला ‘पायाची दासी’ देखील बनवू नये. पुरुषाइतकाच तिचा समाजात मान असावा. ‘चूल आणि मूल’ या सेवाभावाकरता सकल आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्त्रीचे कौटुंबिक आणि सामाजिक स्थान ते सर्वमान्य व्हावे. तिच्या भावभावना, बुद्धी आणि विचारांचा सदोदित सन्मान झाला पाहिजे. खरे पाहिलॆ तर हे साध्य करण्यासाठी ८ मार्चचाच ‘प्राणप्रतिष्ठेचा दिवस’ नसावा तर ‘प्रत्येक दिवस माझा’ असे समस्त महिलावर्गाने समजावे. त्यासाठी पुरुषमंडळींकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यायची गरज असू नये. असा निकोप अन निरोगी सुदिन केव्हां येणार? प्रतीक्षा करावी, लवकरच हे स्वप्न पूर्ण होईल!
“Human rights are women’s rights, and women’s rights are human rights. ”
– Hillary Clinton.
“मानवी हक्क हे स्त्रियांचे हक्क आहेत आणि स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत. ”
– हिलरी क्लिंटन
धन्यवाद!
Attachments area
टीप- संयुक्त राष्ट्र द्वारा प्रसारित एक गाणे शेअर करते
“One Woman” song to celebrate International Women’s Day (March 8th-2013)
☆ येऊ द्या नवीन लाsssट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक ” लाटा ” उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात… त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात…
पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती…
प्रत्येक बाल्कनी – टेरेस – अंगणात गव्हांकूर पिकू- डोलू लागले…
कॅन्सर, डायबेटीस.. बी. पी… गायब होणार होते
आणि आपण एकदम तंदुरुस्त होणार होतो..
कैक टन गव्हांकूर संपले… मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही
व लाट ओसरली !
अल्कली WATER ची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती….
म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार होता…
२० हजार – ३० हजार मशीनची किंमत…
मशीन्स धूळ खात पडली…
आणि लाट ओसरली ! !
सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी..
वजन घटणार…
बांधा सुडौल होणार..
हजारो लिटर मध संपले…
हजार मिलीग्राम पण वजन नाही घटले…
लाट ओसरली ! ! !
मग आली नोनी फळाची लाट
नोनीने नाना – नानी आठवले
पण
तरीही नानी-नाना पार्कमधून काही मंडळी वैकुंठाला गेली….
अलोव्हेरा ज्यूस… !
सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी. पी. एकदम नॉर्मल होणार..
हजारो बाटल्या खपल्या… विशेष काही बदलले नाही… तीही लाट ओसरली ! ! ! !
मग रामदेव बाबांची बिस्किटे आली.
५००० करोडचा व्यवसाय झाला…. बाबा उद्योगपती झाले..
आणि इथे…. आमची आरोग्यस्थिती होती तशीच….
मग माधवबागवाले आले.
तेल मसाज पंचकर्म करा.. हृदयाचे ब्लॉक घालवा म्हणाले..
राहता ब्लॉक विकायला लागला.. पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.
(आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो. )
मग आली दिवेकर लाट….
मग आली दीक्षित लहर…
… ही लाट आता उसळ्या घेतेय….. ओसरेल लवकरच ! ! ! ! !
लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही. पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय
विचार करा.. आणि…..
Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा.
आणखी थोडा विचार करा..
आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद.. म्हणजे नियम शास्त्र.
रोजचे साधे घरगुती जेवण.. पालेभाजी, वेलवर्गीय भाजी, फळभाजी, मोड आलेली कडधान्ये, सँलड, साजुक तूप, बदलते गोडेतेल, गहू, ज्वारी, बाजरी, मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम.. पहा काय फरक पडतो
आम्हाला शिस्त नकोय..
पैसा बोलतोय…
जीभ चटावलीय..
” घरचा स्वयंपाक नकोय… “
आता तर … पंधरा मिनीटात… ओला.. स्विगी… दारात…
….. आली लाट मारा उड्या
एवढे टाळूया…
हसत खेळत जगूया,…..
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम…….. बस्स ! ! !
सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं,
दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.
आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम सातत्याने करणे आवश्यक आहे
आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे ?
दीर्घायुष्य लाभावं, आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,
याकरिता आपला आहार, आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.
आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरीरात विकार निर्माण होतात….. तसेच व्यायामात नियमितता व सातत्य असावं.
आणि हो :-
या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा. ताणतणाविरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल….
बघा पटलं तर घ्या..
नाहीतर…… चला.. येऊ द्या नवीन लाsssट……
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा ‘थाप। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 136 ☆
☆ लघुकथा – थाप☆ डॉ. ऋचा शर्मा ☆
दिन भर मशीन की तरह वह एक के बाद एक घर के काम निपटाती जा रही थी। उसका चेहरा भावहीन था, सबसे बातचीत भले ही कर रही थी पर आवाज में कुछ उदासी थी। जैसे मन ही मन झुंझला रही हो। उसके छोटे भाई की शादी थी। घर में हँसी -मजाक चल रहा था लेकिन वह उसमें शामिल नहीं हो रही थी, शायद वह वहाँ रहना ही नहीं चाहती थी।‘कुमुद ऐसी तो नहीं थी, क्या हो गया इसे?’ मैंने उसकी अविवाहित बड़ी बहन से पूछा।‘अरे कोई बात नहीं है, बहुत मूडी है‘ कहकर उसने बात टाल दी। मुझे यह बात खटक रही थी कि शादी लायक दो बड़ी बहनों के रहते छोटे भाई की शादी की जा रही है। कहीं कुमुद की उदासी का यही तो कारण नहीं? लड़कियाँ खुद ही शादी करना ना चाहें तो बात अलग है पर जानबूझकर उनकी उपेक्षा करना? खैर छोड़ो,दूसरे के फटे में पैर क्यों अड़ाना।
शादी के घर में रिश्तेदारों का जमावड़ा था। महिला संगीत चल रहा था और साथ में महिलाओं की खुसपुसाहट भी – ‘जवान बहनें बिनब्याही घर में बैठी हैं और छोटे भाई की शादी कर रहे हैं माँ–बाप। बड़ी तो अधेड़ हो गई है, पर कुमुद के लिए तो देखना चाहिए।‘ ढ़ोलक की थाप के साथ नाच –गाने तो चल ही रहे थे, निंदा रस भी खुलकर बरस रहा था। ‘अरे कुमुद! अबकी तू उठ,बहुत दिन से तेरा नाच नहीं देखा, ससुराल जाने के लिए थोड़ी प्रैक्टिस कर ले’ –बुआ ने हँसते हुए कहा। ‘भाभी अब कुमुद के लिए लड़का देखो, नहीं तो यह भी कोमल की तरह बुढ़ा जाएगी नौकरी करते- करते,फिर कोई दूल्हा ना मिलेगा इसे। ढ़ोलक की थाप थम गई और बात चटाक से लगी घरवालों को। नाचने के लिए उठते कुमुद के कदम मानों वहीं थम गए लेकिन चेहरा खिल गया। ऐसा लगा मानों किसी ने तो उसके दिल की बात कह दी हो। वह उठी और दिल खोलकर नाचने लगी।
कुमुद की माँ अपनी ननदरानी से उलझ रही थीं– ‘बहन जी! आपको रायता फैलाने की क्या जरूरत थी सबके सामने यह सब बात छेड़कर। इत्ता दान दहेज कहाँ से लाएं दो-दो लड़कियों के हाथ पीले करने को। ऐरे – गैरे घर में जाकर किसी दूसरे की जी- हजूरी करने से तो अच्छा है अपने छोटे भाई का परिवार पालें। छोटे को सहारा हो जाएगा, उसकी नौकरी भी पक्की ना है अभी। कोमल तो समझ गई है यह बात,पर इस कुमुद के दिमाग में ना बैठ रही। खैर समझ जाएगी यह भी’ —
ढ़ोलक की थाप और तालियों के बीच इन सब बातों से अनजान कुमुद मगन मन नाच रही थी।