मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 214 ☆ शिकवण ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 214 – विजय साहित्य ?

☆ शिकवण ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

कविता

म्हणजे काय

हे देखील

मला माझ्या

कवितेनंच

शिकवलं

जेव्हा

माझ्या वर

हसणाऱ्या

माणसाला

माझ्याच कवितेनं

रडवलं….!

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हवा संवाद… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ हवा संवाद… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

काहीं मराठी मालिका मध्यंतरी बघण्यात आल्या. त्यात काही लहान मुले काम करीत होती म्हणजेच आपली भुमिका पार पाडीत होते. खरंतर लहान मूल म्हणजे देवाघरचे फुल. परंतु ह्या विरुद्ध ती आक्रस्ताळी, जे हवयं ते हातपाय आपटून मिळवणारी मुल बघीतली आणि मन विषण्ण झाले. त्यांचं ते ओरडून चिडून बोलणे ऐकले आणि आभासी असूनही हात शिवशिवत होते. मनात आले कुठून बरं शिकत असतील हे सगळं ?

पण एक विसरून पण चालणार नाही मुल ही कधीकधी अनुकरणातून शिकतात. मुलांना घडविण्यात काही हिस्सा हा पालकांचा, शिक्षकांचा पण असतो आणि ही तरं सगळी मोठी, सुज्ञ मंडळी असतात.

इतक्या लहान वयात प्रचंड इगोस्टिक मुल बघून मन काळजीत पडतं. कधी कधी मनात येतं ही आजकाल जी सुबत्ता, चंगळ सुरु आहे त्यामुळे मन ही कधी मारायला पण आलं पाहिजे हे पालक पण जणू विसरूनच गेले आहेत. जरा स्पष्ट बोलायचं तरं हा इगो मुल बघतात, शिकतात कुठून ?

ही मुलं शिकतात आपल्याकडून, समाजाकडून, सोशल मिडियामुळे, टीव्हीमधून.

आपल्या वेळेचा आणि आपल्या आधीच्या पिढीचा काळ बऱ्यापैकी सारखा होता. परंतु आताच्या पिढीसाठी सगळ्याच बाबतीत काळ खूप जास्त वेगाने बदललाय. मग हा काळ स्पर्धा, शिक्षण, प्रगती, अर्थार्जन, चंगळवाद, मोकळीक ह्या सगळया बाबतींत लागू पडतो. साधारण आपल्या पिढीपर्यंत आपण एकदा का एखाद्या नोकरीच्या तत्सम क्षेत्रात शिरलो की तेथून बाहेर पडण्याचा मार्ग थेट ५८ वा ६० व्या वर्षीच आपल्याला सापडायचा. नोकऱ्या बदलणे हा विचार फारसा कुणाच्या डोक्यात, मनात शिरतच नव्हता. पण आता काळ खरचं खूप बदलला, आपल्याला नविन पिढीतील भरपूर पगार चटकन डोळ्यात भरतात पण त्यामध्ये असणारी अस्थिरता आपल्याला फारशी जाणवत नाही. आजची पिढी आज जगायला शिकली आहे. त्यांना फारसा उद्याचा विचार करायचा नसतो. कारणं तो करुन फायदा नसतो असं ह्या पिढीच स्पष्ट मत.

आजच्या लेखात नविन पिढीचा स्ट्रगल, वाढती महागाई, निरनिराळी प्रलोभने, मोठया शहरातील बेसुमार खर्च आणि त्यामधील अस्थिरता  समजावून सांगितली आहे. आपल्या पिढीला एवढे मोठे पगाराचे आकडे ऐकायची सवयच नव्हती त्यामुळे ते ऐकून आपले डोळेच फिरतात आणि त्या नादात आपण त्यातली अस्थिरता विसरून जातो. ह्या लेखामध्ये  जी तरुण पिढीची घुसमट होते आहे ती सांगितली आहे. आपल्या पालकांना ताण येऊ नये, काळजी वाटू नये म्हणून हा तरुण वर्ग आई वडिलांच्या प्रेमापोटी त्यांच्या समस्या पालकांसमोर उघड करीत नाही.

पण ह्या लपाछपीच्या खेळात पालक आणि पाल्य ह्यांच्या दरम्यान गैरसंमजाची एक दरी तयार होते. त्यामूळे आपल्याला येणाऱ्या समस्या मुलांनी आईवडिलांना खुल्या दिल्याने सांगितल्या तर नक्कीच ह्यातून पालकांच्या अनुभवांच्या गाठोड्यातून हमखास नामी उपाय हा सापडून जाऊ शकतो. पाल्यांमध्ये पण आपण एकट नसून आपले पालक आपल्याबरोबर कुठल्याही परिस्थितित ठामपणे पाठीशी उभे असल्याचे बघून एक वेगळाच आत्मविश्वास तयार होईल जो निश्चितच त्यांना उत्कर्षाच्या वाटेवर आणून सोडेल. मात्र ह्यासाठी दोन्हीही पिढीमध्ये मोकळे बोलण्याची, संवाद कायम साधत राहण्याची, परस्परांना समजून घेण्याची सवय ही असायलाच हवी. म्हणजेच काय तर आधी पालकत्व शिकावं लागेल तरच पुढील दिवस शांततेत घालवू शकू.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “चिल्लर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“चिल्लर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… कालपरवापर्यंत ही चलनी नाणी होती बाजारात…

… होतं त्याचं प्रत्येकाचं आपापलं मानाचं मुल्य….

.. दोन पैसै टाकले तर मिळत होती पार्लेची लिमलेटची  गोळी..

… आंबट गोड चवीने तोंड स्स स्स करणारी…

… आणे बाराणे, चवली पावली नि अधेली…

… खुर्दा चिल्लरचा खुळखुळ वाजविणारी…

… नगदी नोटांचा कागदी सुळसुळाट होता कि तेव्हा..

.. फक्त तो धनिकांच्या पेढीवर नि गरिबांकडे लाजाळू…

… तांबा पितळ, शिसे, अल्युमिनियम धातूचीं नाणी

… भाव वधारला धातूंचा नि जमाना लोपला नाण्यांचा…

… शेवटी कागदी नोटाने नाण्यांवर मात केली…

… चिल्लर आता बाजारातून हद्दपार झाली…

… कुठे कधीतरी नजरेस पडते एखादे फुटकळ नाणे…

… सांगत असते आपले भूतकाळाचे गाणे केविलवाणे…

… आता रस्तावरचा भिकारी त्याला झिडकारतो..

… ना बाजारातला व्यापारी गल्ल्यात आसरा देतो…

.. देवाच्या पेटीत गुपचूप दान धर्म केल्याचा टेंभा मिरवतो..

… डोळे बंद असलेला देव भक्ताची दांभिक भक्ती ओळखतो…

… अन माणसाला तू कितीही महान झालास तरीही मजपुढे…

…. आजही चिल्लर आहेस हेच सुचवत असतो.. तसे

… नवी येणारी प्रत्येक पिढी जुन्या पिढीला चिल्लर समजत राहते..

… मुल्य हरवून बसलेली  जुनी पिढी अवमुल्यनाच्या दुखाने अवमानित होऊन जाते…

… होतं त्याचं प्रत्येकाचं आपापलं मानाचं मुल्य…

… चिल्लर असलं म्हणून काय झालं?..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दानवातील देव… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

दानवातील देव ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

प्रसंग  माणसाला बरंच काही  शिकवतात, आणि अनुभवानेचं माणूस शहाणा होतो. 1977 ते 80 साल असलेले ते दिवस होते. अजूनही ते आठवतात. आणि अंगावर काटा येतो, ती प्रवासातील सत्य घटना आठवल्यावर मनांत येतं कसा निभावला तो प्रसंग आपण ? बरोबर माझा लहान मुलगा चि. प्रसाद होता. पण त्याचाही आधार वाटला मला. 

लेडीज डबा सगळ्यात शेवटी, म्हणजे स्टेशन आलं तरी प्लॅटफॉर्म पासून दूर असा. त्यातून स्टेशनवरचे लाईट गेलेले, रेल्वे लेडीज डब्यात आम्ही फक्त चौघीजणीच बायका होतो. त्यात 16 वर्षाची तरुण मुलगी सरला. , मूर्तिमंत भीतीचं प्रतिक असलेली ती मुलगी मला अगदी बिलगून बसली होती. मंडळी ऐकताय ना किस्सा? मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या चार वाजता सुटणाऱ्या पंजाब मेलमध्ये आम्ही चढलो. प्रसादचे बाबा पुढच्या डब्याकडे धावले. डब्यात गर्दी नव्हती. आणि लेडीज डब्यात आम्ही चौघी जणीचं, म्हणून खुश होते. आरामात बसायला मिळेल म्हणून ह्यांनी मला व चि. प्रसादला लेडीज डब्यात बसवले होते.. ही गाडी म्हणजे पंजाब मेल, भुसावळला रात्री एकला पोहोचणार होती. भरपूर मोकळी जागा म्हणून आम्ही अक्षरशः  लोळण फुगडी घेणार होतो. बाकावर गप्पा मारतांना मी  गाडीतल्या बायकांना आम्ही भुसावळला उतरणार असल्याचे सांगितले. ठराविक स्टेशनलाच गाडी थांबणार होती. पंधरा मिनिटांनी गाडी सुटणार इतक्यात घाईघाईनें  स्टेशन मास्तर, टीसी, हमाल, आणखी काहीजण, आणि डोळे सुजलेली खूप घाबरलेली एक मुलगी, असा लवाजमा, जेव्हा माझ्याजवळ आला. तेंव्हा काय गडबड आहे, मला काहीच कळेना. अखेर स्टेशन मास्तरांनी पुढे येऊन सगळा खुलासा केला. मी भुसावळला जाणार आहे. हे एका हमालाने  ऐकल्यावर तो पळतच स्टेशन मास्तरांकडे  गेला होता आणि स्टेशन  मास्तरांसह  माझ्यासमोर सगळी फलटण उभी राह्यली होती. सगळ्यांनी मला विनंती केली की या मुलीला तुम्ही भुसावळपर्यंत सुखरूप घेऊन जा. गोंधळलेल्या माझ्या मनाला काय प्रकार आहे काहीच समजेना. स्टेशनमास्तरांनी मग खुलासा केला, ती मुलगी म्हणजे सरला… राहणारी भुसावळची होती. भाऊ जळगावला रहात होता. त्याचा मुलगा आजारीअसल्याने त्याला ऍडमिट केलं होत. मुलाजवळ बसायला कुणी नव्हतं तरी भाऊ बहिणीला पोहॊचवायला स्टेशनवर आला. गाडी यायला वेळ होता आजारी मुलगा एकटा म्हणून त्यांनी बहिणीला भुसावळची गाडी ह्या प्लॅटफॉर्मवर  येणार असल्याचं समजावून सांगून, कसं जायचं ते सांगितलं. जळगाव भुसावळ अर्ध्या तासाचाच प्रश्न आहे, अशा विचारांनी तिला स्टेशनवर सोडून अगदी नाईलाजाने  घाईघाईने तो परत गेला. दुसरीच गाडी आली.. अनांऊसमेंट न ऐकता  भांबावलेली, भाच्याच्या आजारपणाच्या काळजीनें व्यग्र  असलेली सरला, समोर आलेल्या डब्यात चढली. दोन तास झाले अजून भुसावळ कसं नाही आल ? ह्या विचाराने ती काळजीतून जागी झाली. घाबरत शेजारच्या माणसाला विचारले, “काका भुसावळ कधी येणार ? तर त्यांनी ही गाडी मुंबईकडे जाणारी आहे. भुसावळ मागे राहयले  असं सांगितल्यावर ती घाबरून  रडायलाच लागली. त्या सदगृहस्थानी  टी सी ला बोलावून मुलगी चुकून दुसऱ्या गाडीत बसल्याचे सांगितले. ती गाडी होती गीतांजली. गाडी धाडधाड् पुढे धावत होती. विरुद्ध दिशेला धावणारी गाडी, ठराविकचं स्टेशनं घेत असल्याने भुसावळ पासून शेकडो मैल लांब आली होती. मागचा रस्ता बंद आणि पुढचा रस्ता चुकीचा. टीसी पण आता काय करावं ? या गोंधळात पडले. मुलगी तरुण आणि सारखी रडत होती. त्यावेळी मोबाईलची सोय नव्हती. शिवाय तिच्या घरी फोन नव्हता. बहिण अर्ध्या तासात पोहोचली असणारच म्हणून भाऊ आजारी मुलाच्या तैनातीत लागलेला. त्यातून घरी फोन नसल्याने त्याने वडिलांना पण ती येत असल्याचे कळवले नाही. इकडे सगळ्यांनी खूप विचार केला. अशा तरुण मुलीला  कोणाच्याही ताब्यात न देता चांगली सज्जन माणसाची सोबत बघून भुसावळला परत पाठवण्याची जबाबदारी आता त्या लोकांवर होती. शेवटी तिला गाडीने मुंबईला आणण्याचे ठरले. टी. सी. लोकांना त्यांची ड्युटी होती. त्यांनी तिला मुंबईला आणून स्टेशन मास्तरांच्या ताब्यात दिले. चांगली सोबत बघून भुसावळला रवाना करण्याची विनंती केली. स्टेशन मास्तरही सज्जन होते. त्यांनी सरलाला शांत करून खायला प्यायला घालून आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचवण्याचा दिलासा दिला.. मी भुसावळला उतरणार आहे हे  माझे बोलणे  हमालाने ऐकले, आणि लगेच त्याने स्टेशन मास्तरांना वर्दी दिली. कारण आत्तापर्यंत वाट चुकलेल्या सरलाची बातमी सगळ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचून प्रत्येक कर्मचारी जबाबदारीनें वागत होता. आणि मग नंतर तिची जबाबदारी आपोआपच माझ्यावर येऊन पडली. अहो हो ना! मलाही  सरलाची खूप दया आली. तिच्या जागी मला माझी लेक दिसायला लागली. हे बरोबर होते त्यामुळे अपरात्री भुसावळला गाडी पोहोचणार असली तरी, ह्यांच्या जीवावर मी ती जबाबदारी मान्य केली. आणि स्टेशन मास्तरांसकट सगळ्यांनी निश्वास सोssडला. सरला मला बिलगली. माझ्या आधारावर  ती निर्धास्त झाली होती. पण मला काय माहित पुढे मलाच कुणाचा तरी आधार शोधावा लागणार आहे म्हणून. अहो काय सांगू ! पुढे रामायण काय महाभारतच घडलं.. गाडी पुढे धावत होती. रात्र वाढत होती. आम्ही कड्या लावून  निर्धास्त पणे मोकळ्या बाकांवर लोळण फुगडी घेणार होतो. इतक्यात कुठेतरी आड मार्गावर जंगलात कचकन गाडी थांबली. बाहेर मिट्ट काळोख, त्यातून आमचा शेवटचा डबा, दरवाजा धाडधाड वाजला. गडबडीत आम्ही खिडकीची काच लावायची विसरलो होतो. बाहेर  30एक उंच पुरे धटिंगण उभे होते. “दरवाजा खोलो नही तो गोली चलायेंगे l” त्यांच्या पठाणी आवाजातल्या धमकीने आमचे पेंगुळलेले डोळे खाडकन् उघडले. खिडकीतून हात घालून त्यांनी एका लहान मुलाचे मनगट पकडले होते. त्यांच्या हातातले पिस्तूल बघून बाळाच्या आईने आकांत  मांडला. , “अहो  माझ्या पोराला वाचवा हो! तिचा आक्रोश  ऐकवत नव्हता. दरवाजा उघडा नाहीतर ते माझ्या लेकराला मारतील. वाचवा हो माझ्या मुलाला !” तिचा आक्रोश ऐकून आमच्या मदतीला कोणीच येणार नव्हतं. कारण जंगलात उभी असलेली गाडी. , शेवटचा डबा. , सिक्युरिटी गायब, गार्डही घाबरलेला. अशा परिस्थितीत आम्ही दरवाजा उघडला. नव्हे उघडावाच लागला  30 एक लोकं आत शिरले. रेल्वे लेडीज डबा गच्च भरला. मला त्या अंधारातही गार्ड दिसला. मी मदतीसाठी हाक मारली. गार्ड साहेब हात जोडून असहाय्य होऊन म्हणाले, ” क्षमा करा ताई. मी या जमावा पुढे एकटा काहीच नाही करू शकत. , ” मी चिडले, ” अहो पण सिक्युरिटी  कुठे आहेत?  ” पळता पळता गार्डनी  उत्तर दिलं “इतर लोकांच्या मदतीला ते धावले आहेत. हा दोनशे लोकांचा जमाव आहे त्यांच्या गावच्या जत्रेहून ते परत आलेत. गाडीत जागा मिळावी म्हणून शंभर जणांनी रुळावर उभ राहून गाडी थांबवली. आणि जबरदस्तीने आत शिरलेत. कायदा गुंडाळून पिस्तूल ‘ काठ्यांच्या धाकाने त्यांनी पूर्ण गाडीचा ताबा घेतला आहे. सगळे लोक गाडीत चढल्याशिवाय गाडी सुरू करायची नाही. असा दम भरून, ड्रायव्हरला पकडून ठेवलय त्यांनी. या जमावापुढे आमचा स्टाफ कितीसा पुरा पडणार ? “ धापा टाकत गार्ड बोलत होते. पुरुषासारखे पुरुष जीवाच्या भीतीने हवालदिल झाले होते, तर आमच्या बायकांची काय कथा! धक्काबुक्कीत बाकावर बसलेल्या बायका चेंगरल्या  गेल्या. मगाचं बाळ किंचाळून रडत होत. भीतीनें आणि भुकेनी. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळाला ती पदराआड पण घेऊ शकली नाही. कारण त्यातल्या काही  मवाल्यांची नजर, तरुण सरलावरून फिरत होती. अश्लील हात वारे करून ते खिदळत होते. सरला थरथर कापायला लागली. आगीतून फुफाट्यात पडली होती बिचारी. सैतानांच्या तावडीत गाय सापडली होती. प्रसंग बाका होता.

अखेर आमच्या चौघीतली एकजण  धिटाईने  उभी राहिली. त्यातल्या त्यात बुजुर्ग, सभ्य वाटणाऱ्या लोकांना तिने हात जोडले. “भाईसाहेब रक्षाबंधन सणाचे महत्व तुम्ही जाणता, ही राखी मी तुम्हाला बांधते. आमचं रक्षण करा.. ” असं म्हणून तिने ओढणीचा काठ फाडला आणि म्हणाली “ आज राखी पौर्णिमा नाही, तरी पण मी तुम्हाला राखी बांधतीय. आमचे चौघींचे धर्माचे भाऊ व्हा. आणि आमचे संरक्षण करा. ”  असं म्हणून तिने ओढणी पसरून संरक्षण मागितलं. आणि काय सांगू! एका क्षणात चित्र पालटलं. त्या वयस्कर सज्जनांनी असभ्य तरुणांना दम भरला. भुकेल्या बाळाची भूक भागवण्यासाठी असहाय्य आईला बाकावर बसवलं. थर थर कांपणाऱ्या सरलाच्या डोक्यावर हात ठेवून ते म्हणाले ” बहेनजी  हम लोग आपका कुछ नही बिगाडेंगे… माँ बहन बेटी को मिलने के लिए हम हमारे देश जा रहे थे. मगर रास्ते मे ही हमे माँ बहेन बेटी मिल गई. हमारे होते हुए कोई माई का लाल आपका बाल भी बाकॅl नहीं करेगा l” 

आणि ते धर्माचे भाऊ शेवट्पर्यंत शब्दाला जागले. त्यांच्या शब्दात इतकी जरब होती की त्यांच्यातल्या गुंडानी  माना खाली घातल्या. सगळं चित्रच बदललं. 30 एक  भावांच्या जीवावर आम्ही चौघी बहिणींनी निर्धास्तपणे पुढचा प्रवास केला. अबला स्त्रिया सबला झाल्या तरी, 25, 30 पुरुषांपुढे त्या दुबळ्याच ठरल्या असत्या. तरण्याताठ्या सरलाच्या बरोबर  आमच्या तिघींच्या डोळ्यासमोर काहीही, अगदी काहीही अघटीत होऊ शकलं असतं. पण नाही.. त्या दानवांतले देव जागे झाले होते. खरंच जगात देव आहे. कुठल्याही रूपाने तो आपल्या पाठीशी उभा राहतोच राहतो.

 रात्रीचे दोन वाजले. अखेर भुसावळ आलं. लहानग्या माझ्या प्रसादला कडेवर घेऊन सरलाला सांवरत सामान सांभाळत आम्ही ब्रिज ओलांडला. कारण ब्रिजच्या पलीकडे आमचं क्वार्टर  होतं. ब्रिजच्या अलीकडे असलेले सरलाचं घर आम्ही गाठलं. अनोळखी माणसांच्या बरोबर आपल्या लेकीला बघून आई-वडील भांबावले. सरला आईकडे धावली. आईच्या कुशीत शिरल्यावर इतका वेळ  आवरून धरलेला सरलाचा अश्रूंचा बांध कोसळून वाहू लागला. गांगरलेल्या आई-वडिलांना शांत करून ह्यांनी  सारी हकीगत त्यांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ” तुम्ही अगदी देवासारखे  धावून आलात. आणि माझ्या मुलीला इतक्या अपरात्री सुखरूप आणलंत.. तुमचे उपकार आम्ही कसे फेडू? आम्ही म्हणालो, ” नाही हो उपकार त्या दानवातल्या देवांचे, त्या देव माणसांचे माना. त्यांच्यामुळेचं  सरला, मी, माझा मुलगा आणि त्या दोन सहप्रवासिनी बचावल्या आहेत “ 

 मित्र-मैत्रिणींनो संपली माझी सत्यकथा. पण ही लिहीतांना मनात येतं, फोन किंवा मोबाईल शाप की वरदान?  हा ऐरणींवरचा  प्रश्न सोडवण्याची ती वेळ नव्हती. पण हेही तितकच खरं आहे की, जगांत माणुसकी आहे. मुळात माणूस वाईट नसतोचं त्यावेळची  परिस्थिती त्याला कारणीभूत असते. जगात दानव आहेत, तसेच दयाळू पण आहेत. दानशूर ही आहेत आणि माणुसकी जपणारी देवमाणसं पण आहेत. ह्याची प्रचिती या सत्य  घटनेतूनच मला आली. आणि मी आकाशाकडे बघून त्या विश्वकर्म्याला  हात जोडले.

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परवा बाजारात गेले होते••• आणि घरच्या उपयोगासाठी, किंवा नित्योपयोगी, काही वस्तू मिळत आहेत का ते पहात होते••• एका छोट्याशा दुकानासमोर, आपोआप पावले थबकलीच••• दुकान होते वेगवेगळ्या पिशव्यांचे••• मग त्यात अगदी पारंपारिक असलेला आजीबाईचा बटवा••• फॅशन म्हणून आलेला •••ते अगदी छोटी अशी मोबाईल बॅग म्हणून खांद्याला अडकवायची मोठा बंद असलेली साधीच पण मोहक अशी पिशवी•••

मग भाजी आणण्याकरता वेगळ्या पिशव्या••• किराणा आणण्यासाठीच्या वेगळ्या पिशव्या••• प्रवासाला जाण्यासाठीच्या वेगळ्या पिशव्या••• शाळेत न्यायच्या••• डब्बा ठेवायच्या •••कॉलेज कुमारांसाठी •••लॅपटॉप साठी••• सामान ने-आण करण्यासाठी•••टिकल्या ठेवण्यासाठी••• हातातच पर्स म्हणून वापरण्यासाठी••• महिलांचे दागिने ठेवण्यासाठी••• साड्या ठेवण्यासाठी••• रुमाल, ब्लाउज ठेवण्यासाठी••• उगीचच शो म्हणून वापरण्यासाठी••• लॉन्ड्रीचे कपडे देण्यासाठी •••अरे बापरे!•••

अजून खूप मोठी यादी••• लांबतच जाईल••• इतक्या तऱ्हेच्या पिशव्या त्या दुकानात होत्या••• दुकानाचे नाव पण कलात्मक ठेवलेले होते••• “BAG THE BAG”••• आणि सेक्शनला त्या त्या पिशव्यांची नावे दिली होती•••

दुकानात जाऊन हरखून जायला जायला झाले••• दुकानात गेल्यावर पिशव्यांचे एवढे प्रकार पाहून लक्षात आले ••• व्यवसाय करायचा म्हटल्यावर कोणताही करता येतो •••फक्त थोडा अभ्यास आणि लोकांची मानसिकता लक्षात घ्यायला हवी••• बघा साधी पिशवी, पण त्याचे एवढे प्रकार •••एवढी रुपे••• एकदम समोर आल्यावर••• गरज नसतानाही, एखादी तरी पिशवी घेतल्याशिवाय बाहेर पडतच नव्हते कोणी •••

पिशवीची व्याख्या काय हो? पिशवी म्हणजे कोणतेही सामान, वस्तू, सहजपणे ने-आण करता येण्यासाठी, त्याला धरायला बंद असलेली, पण बंद नसलेली, किंवा बंद करता येण्याजोगी, वस्तू••• पूर्वी या सगळ्या पिशव्या जुन्या कापडापासून, कपड्या पासून, बनवल्या जायच्या••• पण आता फक्त कापडाच्या नाहीत तर कागदाच्या, प्लास्टिकच्या, ऍक्रॅलिक पदार्थांपासून, नवीनच बनवलेल्या पिशव्या मिळतात••• म्हणूनच खूप आकर्षक दिसून त्या घेण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही•••

यावरुनच आठवली ती स्पंजची पिशवी••• सध्या ती पाहायला मिळत नाही ••• पण काही वर्षांपूर्वी अशा बऱ्याच पिशव्या लोक वापरत होते •••दिसायला अगदी छोटी पिशवी••• पण त्यात सामान भरायला सुरुवात केल्यावर, कधी पोत्यासारखे रूप घ्यायची••• कळायचे पण नाही••• आपण अशा वस्तू त्यात भरू लागतो••• तसतसा स्पंज ताणून ती पिशवी मोठी मोठी होत जायची ••• त्यामुळे कुठेही सहज ने-आण करता येण्यासाठी ही पिशवी सगळ्याकडे असायची•••

 मग लक्षात आले •••आपल्या शरीरात सुद्धा किती पिशव्या आहेत ना ? पोट, किडन्या, हृदय, जठर, मेंदू, स्त्रियांना गर्भाशय, अगदी शरीरातील शिरा धमन्या या पेप्सी मिळणाऱ्या पिशव्या सारख्याच नाहीत का?

म्हणजे काहीही असो••• कुठेही असो •••कसेही असो••• पिशव्यांची गरज ही पदोपदी लागते ••• आणि ती आपण वापरतच असतो••• पण पिशवी ही अशी वस्तू आहे, जी वापरायची •••पण परत रिकामी पण करायची असते •••जर रिकाम्या न करता पिशव्यांचा फक्त वापर केला तर काय होईल हो? घरातली जागा निष्कारण व्यापली जाणार •••कितीही मोठे घर असले तरी; एक दिवस जागा कमी पडू लागणार ••• हो ना? म्हणूनच आपण त्या त्या पिशवीचा उपयोग तेवढ्यापुरता करत असतो •••पुन्हा पुन्हा वापरली तरी ती काढ घाल करून त्या पिशवीचा वापर करत असतो•••

पिशवी ची व्याख्या, पिशवीचा उपयोग, पिशव्यांचे प्रकार पाहून वाटले••• आपले मन हे पण एक पिशवी आहे ना? नक्कीच आहे••• आणि तिचे रूप •••त्या स्पंजच्या पिशवी सारखे आहे••• काहीही••• कितीही •••कसे पण कोंबा••• ती पिशवी सगळे धारण करते•••

मग लक्षात आले •••पण पिशवीतून काढ घाल ही नेहमी होत राहिली पाहिजे •••नाहीतर एक दिवस जागा कमी पडणार••• पण मग त्याचा वापर तसा करायला हवा••• पण कोणी तसा करत नाहीये••• या मनामध्ये मिळेल ते••• दिसेल ते •••फक्त कोंबत आलो आहोत••• विशेषत: नको त्या वस्तूच •••पहिल्यापासून जास्त प्रमाणात भरल्या गेल्याने, त्यात हव्या त्या वस्तू ठेवायला जागा कमी पडत आहे•••

कोण केव्हा रागवले•••कोण केव्हा   भांडले••• कोण कोणाला काय बोलले••• हे सगळं बारकाव्यानिशी आपण आपल्या मनात ठेवत असतो••• म्हणून तेवढेच लक्षात राहते••• मग चांगल्या घटना, चांगले बोलणे, चांगले वागणे, याला मनात साठवायला जागा कमी पडते••• म्हणून आपण त्या वस्तू वापरून टाकून देतो•••

यामुळे प्रत्येकाचे मन हे नकारात्मक  गोष्टींनी भरले गेले आहे •••एक दिवस सुट्टीच्या दिवशी •••किंवा निवांत वेळी •••ही सगळी नकारात्मकता काढून फेकून दिली पाहिजे •••षड्रिपूंचे  जाळे काढून टाकले पाहिजे••• म्हणजे सकारात्मकतेला ठेवायला मनाच्या पिशवीत जागा होईल••• आत्मविश्वास त्यामध्ये भरता येईल ••• सगळ्यांचे चांगले गुण पाहण्याची दृष्टी त्यात जपता येईल••• या मनाच्या पिशवीला, अंतर्मनाचा बंद लावला की, किती छान या पिशवीचा वापर होईल ना?•••

कोणत्याही दुकानात न मिळणारी, पिशवी तुमची तुम्ही कलात्मकतेने सजवू शकता••• कधी त्याला चांगल्या वर्तणुकीची झालर  किंवा  लेस लावू शकता••• तर कधी चांगल्या विचारांच्या टिकल्या, आरसे लावून, आकर्षक करू शकता••• मग नकारात्मकता काढून, सकारात्मकतेला थारा दिलेली ही मनाची पिशवी, आजीबाईंच्या बटव्याची सारखी कधीच आऊटडेटेड न होणारी •••अशी असेल••• त्यातूनच कोणत्याही प्रसंगी••• कोणतीही ••• आवश्यक वस्तू तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळा दूर करायला मदत करेल••• बघा प्रत्येकाने आपली मनाची पिशवी साफ करून ठेवा•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिवस… २१ मार्च ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ जागतिक कविता दिवस… २१ मार्च… ☆ श्री प्रसाद जोग

 

जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हटले जाते.

शीघ्र काव्य रचायची प्रतिभा असणाऱ्या  कवी साधुदासांच्या कवितेची गंमत वाचा …

त्यांच्या शिघ्र कवित्वाबद्दल कै.कवी रेंदाळकर यांना शंका होती.म्हणून एके दिवशी अचानक ते साधुदासांच्या घरी पोचले ,आणि त्यांना म्हणाले तुमचं शिघ्र कवित्व म्हणजे ढोंग आहे, जर खरेच आपण शिघ्र कवी असाल तर मला अत्ताच्या अत्ता कविता करून दाखवा.या वर साधुदास त्यांना म्हणाले मला विषय तरी सांगा, कशावर कविता करू ते.तर रेंदाळकर म्हणाले, कवितेवर कविता करून दाखवा बघू.

क्षणभर हाताची हालचाल करून ते म्हणले,”हं घ्या लिहून आणि त्यांनी ही कविता  सांगितली … 

*

कवीने कविता मज मागितली

करण्या बसल्या समयी कथिली

*

कविता मज पाहुनिया रुसली

तरि आज करू कविता कसली

*

कविता स्वच काय विण्यामधले

म्हणून मज छेडूनी दावू भले

*

कविता गुज बोल मनापुरता

प्रिय तू बन मी करितो कविता

*

कविता मधुराकृती का रमणी

म्हणुनी तिज पाहू तुझ्या नयनी

*

कविता करपाश जिवाभवता

मृदू तू बन मी करितो कविता

*

कविता वद काय वसंत-रमा

म्हणुनी तुज दावू तिची सुषमा

*

कविता द्युती-लेख मतीपुरता

पटू तू बन मी करितो कविता

*

कविता वद काय कारंजी-पुरी

म्हणुनी करुनी तुज देऊ करी

*

कविता मकरंद फुलपुरता

अली तू बन मी करितो कविता

*

कविता सखया न गुलाब कळी

तुज की मृदू गंध तिचा कवळी

*

कविता कवी -चंदन- धूप- बली

बन मारुत तू कविता उकली

….. 

आणि आता ही दुसरी कविता केली आहे कवियत्री संजीवनी मराठे यांनी. कविता स्फुरते कशी  म्हणून सुंदर कविता त्यांनी केली आहे.

*

कशी अचानक जनी प्रकटते मनांतली उर्वशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी

*

कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गौळणी

नजरेपुढतीं ठुमकत येती रुपवती कामिनी

*

हंसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी

स्वप्नसख्या त्या निजाकृतीचा वेध लाविती उरी

*

त्याच्या नादे करु पाहते पदन्यास मी कशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी

*

हे स्वरसुंदर जीवनमंदिर कुणी कसे उभविले

मी न कुणाला दावायची शिलालेख आंतले

*

समयीमधली ज्योत अहर्निश भावभरे तेवते

तिच्या प्रकाशी कुणापुढे मी हितगुज आलापिते

*

कशी नाचते कीर्तनरंगी हरपुन जाते कशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी.

तेंव्हा आनंद घ्या या दोन्ही कवितांचा आजच्या कविता दिनी …… 

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

सुखमात्यन्तिकं यत्तद्‍बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम्‌ ।

वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ २१ ॥

*

अनंत आनंद इंद्रियातीत ग्रहण होतो सूक्ष्म प्रज्ञेस

अवस्थेत निग्रह करून योगी परमात्म स्वरूपास ॥२१॥

*

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।

यस्मिन्‌ स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२ ॥

*

हा लाभ होता तयासी प्राप्त 

त्यापरी दुजा तो नाही मानत

अवस्थेत अशा योगी निग्रही 

विचलित ना होत अतिदुःखानेही ॥२२॥

*

तं विद्याद्‌ दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्‌ ।

स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ २३ ॥

*

दुःखी संसाराचा नाही संयोग

तयासी नाव दिधले आहे योग

नको निरुत्साह अथवा उबग

धैर्य उत्साह निग्रहे आचरा योग ॥२३॥

*

सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।

मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ २४ ॥

*

शनैः शनैरुपरमेद्‍बुद्ध्या धृतिगृहीतया ।

आत्मसंस्थं मनःकृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत्‌ ॥ २५ ॥

*

संकल्पोद्भव कामना सर्वस्वी त्यागून

सर्वेंद्रियांचे मनाने नियमन करून 

क्रमेक्रमे अभ्यासे उपरती व्हावी 

मना परमात्मे शाश्वत स्थिती मिळावी ॥२४, २५॥

*

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम्‌ ।

ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्‌ ॥ २६ ॥

*

अधीन होउन विषयांच्या चंचल मानस भरकटते 

आवरुनीया ते पुनःपुन्हा स्थिर करावे ब्रह्म्याते ॥२६॥

*

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम्‌ ।

उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्‌ ॥ २७ ॥

*

शांतमानसी किल्मिष रहित रजोगुण जयाचा शांत

सहज साध्य अद्वैत योग्याला  श्रेष्ठ मोद होई प्राप्त  ॥२७॥

*

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।

सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ २८ ॥

*

निरंतर साधतो ब्रह्म्याशी अद्वैत योगी पापरहित

परब्रह्म प्राप्तीच्या आनंदाची अनुभूती तया येत ॥२८॥

*

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।

ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥२९॥

*

आत्मा ज्याचा स्थितअनंतात त्याची सर्वत्र समदृष्टी

आत्म्यात सर्वभूतात सर्वभूतासि आत्म्यात तया दृष्टी ॥२९॥

*

यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।

तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥३० ॥

*

पाही जो सर्वभूतात सर्व जीविता माझ्यात 

दर्शन माझे तया सदैव ना होत मी अस्तंगत ॥३०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख बघण्याची दृष्टी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

सुख बघण्याची दृष्टी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एका स्त्रीची एक सवय होती. ती रोज झोपण्याअगोदर आपला दिवसभराचा आनंद एका वहीत लिहीत असे. एका रात्री तिने लिहिले….

मी फार सुखी समाधानी आहे.

माझा नवरा रात्रभर फार मोठयाने घोरतो. ही ईश्वराची कृपा आहे. कारण त्याला गाढ म्हणजेच सुखाची झोप लागते.

मी फार सुखी समाधानी आहे. माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर डास झोपून देत नाहीत. म्हणजेच तो रात्री घरी असतो, आवारागर्दीत नसतो, वाईट वागत नाही. ही ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे. दर महिन्याला लाईट बिल, गॅस, पेट्रोल, पाणी वगैरेची बिले भरताना दमछाक होते खरी. म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत, त्या वस्तू वापरात आहेत. जर ह्या वस्तू माझ्याकडे नसत्या तर तर हे जगणे किती अवघड झाले असतं! ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

दिवस संपेपर्यत माझे थकून फार हाल होतात. पण माझ्याकडे दिवसभर कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे. आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत. हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

रोज मला घरातील केर कचरा काढून घर स्वच्छ करावे लागते. आणि दरवाजा खिडक्या स्वच्छ कराव्या लागतात. खरंच देवाची माझ्यावर खूप कृपा आहे. माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे. ज्याच्याकडे घर, छत नाही, त्याचे काय हाल होत असतील?

मी फार सुखी समाधानी आहे.

कधीतरी लहान मोठा आजार होतो. पण लगेच बरी होते. माझे आरोग्य चांगले आहे, ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

प्रत्येक सणाला भेटी देताना माझी पर्स रिकामी होते. म्हणजेच माझ्याजवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत – माझे नातेवाईक, मित्र, ज्यांना मी भेटी देऊ शकते. जर हे लोक नसते, तर जीवन किती वैराण झाले असते. ही ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

रोज पहाटे अलार्म वाजला की मी उठते. म्हणजे मला रोज नवी सकाळ बघायला मिळते. ही ईश्वराचीच कृपा आहे.

जगण्याच्या या फॉर्मुल्यावर अंमल करत आपले आणि आपल्या लोकांचे जीवन आनंदमयी बनवले पाहिजे, छोटया व मोठया दुःखात, संकटात, त्रासातून सुखाचा शोध घ्यावा, आनंद शोधावा. अशा या माझ्या ईश्वराचे मी आभार मानते.

ब्रह्मांडात जी ऊर्जा ठासून भरलेली आहे (Cosmic energy), तिचा एक नियम आहे की आपण आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात, आपल्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील.

सुख शोधून सापडत नसते. त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते.

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 187 ☆ बलि बोल कहे बिन उत्तर दीन्ही… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना बलि बोल कहे बिन उत्तर दीन्ही। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 187 ☆ बलि बोल कहे बिन उत्तर दीन्ही

आम बोलचाल की भाषा के मानक तय होते हैं जिन्हें सुनते ही अपने आप विशिष्ट अर्थ निकलता है। लिखने पढ़ने वालों को इनका उपयोग करते समय सतर्कता बरतनी चाहिए। शब्द ब्रह्म होते हैं जिनका  अस्तित्व ब्रह्मांड में बना रहता है, जो देर सबेर लौट कर आते हैं। इसलिए अनुभवी लोग कहते हैं, तोल मोल के बोल, अच्छा और सच्चा बोलो।

जब तक भाषा पर पकड़ मजबूत न हो अपनी बातों को बोलते समय ध्यान रखना चाहिए। एक बार अनर्थ हो तो उसे अनेकार्थी बनने से कोई नहीं रोक सकता। सब लोग अपनी मर्जी से व्याख्या करते हैं।

कहते हैं क्षमा बड़न को चाहिए छोटो को उत्पात। पर प्रश्न ये है, कि कोई कब तक युवा बना रहेगा कभी तो बुजुर्ग होना होगा, यदि समझदारी नहीं दिखाई तो जिम्मेदारी मिलने से रही। आखिर मुखिया को मुख सा होना चाहिए जो-

पाले पोसे सकल अंग, तुलसी सहित विवेक।

जितने लोग उतनी बातें, पर कुछ मुद्दों में सभी एक सुर से सही का साथ देते हैं और भीड़ में अकेले रह जाने का दर्द तो गलती करने वाले को भुगतना होगा। खैर जब जागो तभी सबेरा समझते हुए क्षमा मांगो और नयी शुरुआत करते हुए सर्वजन हितात सर्व जन सुखाय पर चिंतन करके राष्ट्रप्रेमी विचारों के साथ आगे बढ़ो।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ – Maverick Prince… – ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present his awesome poem ~Maverick Prince…~We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.  

☆ Maverick Prince… ?

He is a celestial fragrance,

will get scattered in the wind

The matter of concern is of

the flower, where will it go…

*

Just thought it to be a normal

wound that will heal itself

Who knew that it would spread

in every speck of my existence…

*

He keeps wandering around like

a maverick nomad only

Like a passing free-will breeze,

He too will come and go away

*

Whenever he visits me, seasons

of the blossoming spring

descends in my courtyard

Giving him a rousing welcome…

*

After all she too must be waiting

on the sand dune somewhere

His love is the river, that’ll flow

there to quench her eternal thirst..!

~ Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares